चालू घडामोडी - २३ मे २०१७

Date : 23 May, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'मोदी' लाट कायम, आज पुन्हा निवडणूक झाल्यास मोदी सरकार येईल सत्तेवर :
  • तब्बल तीन वर्षांपुर्वी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारने निवडणूक जिंकत केंद्रात सत्ता मिळवली.

  • एकीकडे तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण होत असल्याने केंद्र सरकार आपण केलेल्या कामांचा प्रचार करत असताना दुसरीकडे विरोधक मात्र केंद्र सरकारचा कुचकामीपणा लोकांसमोर आणण्याचा दावा करत आहे. 

  • एनडीए पुन्हा पार करेल ३०० चा आकडा एबीपी न्यूज-सीएसडीएस- लोकनितीने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज निवडणुका झाल्यास एनडीएला ३३१ जागा मिळू शकतात. २०१४ मध्ये एनडीएला ३३५ जागा मिळाल्या होत्या.

  • युपीएसाठी १०४ जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०१४ शी तुलना करता ४४ जागा जास्त दाखवण्यात आल्या आहेत. एनडीएच्या मतांमध्ये सात टक्क्यांची वाढ दाखवण्यात आली आहे. 

लातूरच्या महापौरपदी सुरेश पवार यांची नियुक्ती :
  • महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे सुरेश पवार यांची तर उपमहापौरपदी भाजपच्याच देविदास काळे यांची निवड करण्यात आली.

  • काठावरचे बहुमत असल्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत चमत्कार घडणार, भाजपचे नगरसेवक कॉंग्रेसच्या गळाला लागणार अशा वावड्या उठवण्यात आल्या होत्या.

  • प्रत्यक्षात भाजपच्या सर्व ३६ नगरसेवकांमधील एकजूट शेवटपर्यंत कायम राहिली. त्यामुळे सुरेश पवार व देविदास काळे यांना निवडणुकीत ३६ मते पडली.

  • कॉंग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाच्या पांठिब्याने ३४ मते मिळाली. भाजपच्या सुरेश पवार यांनी त्यांच्या  ३६ विरुद्ध ३४ मतांनी पराभव केला.

जीएसटीची काही वैशिष्ट्ये :
  • वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे मूल्यवर्धित कर कायदे, कर दर यामुळे देशाची विभिन्न आर्थिक क्षेत्रात विभागणी होत होती.

  • तसेच जकात, प्रवेशकर, तपासणी नाके, यासारख्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. ते या करप्रणालीमुळे थांबेल.

  • जीएसटीत केंद्र आणि राज्याचे १७ कर विलीन होणार आहेत. केंद्र सरकार केंद्रीय वस्तू सेवा कराच्या स्वरूपात कर बसवून त्याची वसुली करणार आहे तर राज्य शासन वस्तू किंवा सेवांच्या किंवा दोन्हीच्या राज्यांतर्गत होणाऱ्या पुरवठ्यावर राज्य वस्तू आणि सेवा कर बसवून करवसुली करणार आहे.

  • जीएसटी हा कन्झमशन टॅक्स आहे. ज्या राज्यामध्ये वस्तू किंवा सेवांचा उपभोग होईल तिथे कर जमा होईल.

  • जीएसटीअंतर्गत आयजीएसटी कराची आकारणी केंद्र शासनामार्फत आंतरराज्य पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर करण्यात येईल. आकारणी झालेल्या कराची पूर्ण वजावट वस्तू आणि सेवांची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यास मिळेल.

मेजर नितीन गोगई यांचा 'लष्करप्रमुखांचे प्रशस्तिपत्र' देऊन गौरव :
  • काश्‍मिरी नागरिकाला जीपला बांधणारे लष्करी अधिकारी मेजर नितीन गोगई यांना लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याकडून 'लष्करप्रमुखांचे प्रशस्तिपत्र' देऊन गौरविण्यात आले.

  • काश्‍मिरी बंडखोरांविरोधात केलेल्या शाश्‍वत कारवाईसाठी गोगई यांचा सन्मान केला गेला असल्याचे कर्नल कमल आनंद यांनी सांगितले.

  • लष्करप्रमुख रावत यांच्या काश्‍मीर भेटीदरम्यान मेजर गोगई यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. 'लष्करप्रमुखांचे प्रशस्तिपत्र' हा भारतीय लष्करातील मानाचा गौरव समजला जातो.

  • श्रीनगर येथे निवडणुकांदरम्यान एका युवकाला जीपला बांधल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्यात आली.

  • काश्‍मिरी आंदोलक व बंडखोरांच्या दगडफेकीदरम्यान काश्‍मिरी नागरिकाचा ढालीसारखा वापर केल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र याप्रकरणी चौकशी केल्यानंतर गोगई यांना क्‍लीन चीट देण्यात आली होती.

आयफोन ८ ची किंमत किती असेल, तुम्हाला माहितीये का ?
  • आयुष्यात एकदा तरी आयफोन वापरुन पाहावा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आयुष्यात एकदा आयफोन वापरलेली व्यक्ती त्यानंतर दुसऱ्या कंपनीचा मोबाईल वापरत नाही, असंदेखील म्हटलं जातं.

  • आयफोन वापरणाऱ्या आणि आर्थिक कारणांमुळे तो न वापरु शकणाऱ्या, अशा दोन्ही वर्गांमध्ये अॅपलच्या नव्या फोन्सविषयी सारखीच उत्सुकता असते. आयफोन्ससोबतच त्याच्या किमतींचीही तितकीच चर्चा होताना दिसते.

  • आयफोन ७ बाजारात येऊन बराच कालावधी झाल्यानंतर आता पुढील फोनची म्हणजेच आयफोन ८ ची चर्चा सुरु झाली आहे.

  • अॅपलचा नवा फोन नव्या वैशिष्टांमुळे कायम चर्चेत असतो. आयफोन ८ ची चर्चा त्यामधील नेक्स्ट जनरेशन ओलईडी स्क्रिनमुळे सुरु झाली आहे. 

  • आयफोन ८ ची किंमत किती असेल, याबद्दलही अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. वॉल स्ट्रिटचे अॅनलिस्ट स्टिवन मिलुनोविच यांनी आयफोन ८ ची किंमत ८७० अमेरिकन डॉलरपासून सुरु होईल, असा अंदाज वर्तवला आहे. आयफोन ८ मधील २५६ जीबीचे व्हर्जन १ हजार ७० अमेरिकन डॉलरला उपलब्ध असेल, असेदेखील स्टिवन मिलुनोविच यांनी म्हटले आहे.

नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याकडे :
  • केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान प्रकृती अस्वास्थ्यामुळे परदेशात उपचार घेत असल्याने त्यांच्या खात्याचा कार्यभार कृषिमंत्री राधामोहनसिंह यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

  • तसेच पासवान हे बिनखात्याचे मंत्री असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राधामोहनसिंह यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. तर, विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे वने व पर्यावरण खात्याची जबाबदारी आली आहे.

  • राष्ट्रपती भवनातून सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार राष्ट्रपतींनी कृषिमंत्री राधामोहनसिंह यांना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक कल्याण खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याचे आदेश दिले आहेत. या खात्याचे मंत्री रामविलास पासवान यांच्यावर परदेशांत उपचार सुरू आहेत.

  • पुन्हा खात्याची सूत्रे पासवान यांनी स्वीकारेपर्यंत राधामोहनसिंह यांना पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • जुन्या जमान्यातील रंगभूमीवरील श्रेष्ठ संगीत समीक्षक केशवराव भोळे यांचा जन्म : २३ मे १८९६

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • भारतीय सैन्यातील ले. जनरल व व्हिक्टोरिया क्रॉस मिळविणाअरे पहिले ले. जनरल पी. एस. बापट यांचे निधन : २३ मे १९७५

ठळक घटना

  • बचेंद्री पाल या महिलेने एव्हरेस्ट शिखर चढून जाणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला : २३ मे १९८४

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.