चालू घडामोडी - २३ नोव्हेंबर २०१७

Date : 23 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जीएसटीनंतर आता मोदी सरकार आयकर व्यवस्थेत मोठे बदल करणार :
  • जीएसटीच्या माध्यमातून अप्रत्यक्ष करप्रणालीत मोठा बदल केल्यावर आता मोदी सरकारकडून प्रत्यक्ष कर रचनेत मोठे बदल केले जाणार आहेत. यासाठी सरकारकडून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

  • या समितीकडून देण्यात येणाऱ्या शिफारशींच्या आधारे नव्या आयकर कायद्याचा मसुदा तयार करण्यात येईल. पुढील सहा महिन्यांमध्ये ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.

  • नव्या आयकर कायद्याच्या निर्मितीसाठी सरकारने सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष अरविंद मोदी यांच्याकडे या समितीचे नेतृत्त्व असेल.

  • सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम या समितीचे स्थायी विशेष आमंत्रित सदस्य असणार आहेत. प्रत्यक्ष करांमध्ये आयकर आणि कॉर्पोरेट कराचा समावेश होतो. तर सीमा शुल्क आणि जीएसटीचा समावेश अप्रत्यक्ष करांमध्ये होतो.

  • मोदी सरकारने अप्रत्यक्ष करप्रणाली सुटसुटीत करण्यासाठी जीएसटीच्या लागू केला. यानंतर आता प्रत्यक्ष कररचना सुधारण्यासाठी मोदी सरकार पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

सौरमालेत दिसला सिगार आकाराचा लघुग्रह :
  • वॉशिंग्टन : आमच्या सौर मालेतून गेल्या आॅक्टोबरच्या मध्यात इंटरस्टेलार अ‍ॅस्टेरॉईड (लघुग्रह) जाताना पहिल्यांदा आढळला. तो सिगारच्या आकाराचा असून तशा प्रकारचे लघुग्रह आमच्या सौरमालेत दिसणे हे खूपच अनपेक्षित आहे, असे नव्या संशोधनात म्हटले आहे.

  • हा लघुग्रह म्हणजे आॅडबॉल आहे, असे हवाईतील खगोलशास्त्र विद्यापीठातील कॅरेन मीच यांनी म्हटले. आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाचे ते प्रमुख आहेत. या लघुग्रहाचे नामकरण ‘ओऊमुआमुअ’ असे अभ्यासकांनी केले आहे.

  • हा लघुग्रह ४०० मीटर लांब आणि तो जेवढा रूंद आहे त्याच्या दहा पट विस्तारलेला आहे, असे ‘जर्नल नेचर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात म्हटले आहे. आमच्या सौरमालेमध्ये आतापर्यंत जे लघुग्रह किंवा धुमकेतुंचे निरीक्षण करण्यात आले त्यांच्यापेक्षा हा मोठा आहे. या लघुग्रहाचा वाढलेला आकारही आश्चर्यकारक आहे व आमच्या सौरमालेत जे लघुग्रह पाहण्यात आले त्यांच्यासारखाही तो नाही.

  • या घडामोडी इतर सौरमाला कशा अस्तित्वात आल्या याबद्दल नवे धागेदोरे असावेत, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. हा आता आमच्या सौरमालेत दृष्टीस पडलेला परंतु नेहमी न दिसणारा व ग्रह कोणत्याही तारकामालेशी जोडला न गेलेला आकाशगंगेत शेकडो दशलक्ष वर्षे भटकत असावा.

संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबरपासून :
  • नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर बुधवारी जाहीर करण्यात आली. विरोधी पक्षांनी या मुद्यावर सरकारवर सातत्याने आरोप आणि टीका केली होती. तीन आठवड्यांच्या हिवाळी अधिवेशनात १४ दिवस कामकाजाचे असतील.

  • नाताळ आणि नूतन वर्षाच्या सुट्यांमुळे अधिवेशनाचा कालावधी आणखी दोन दिवसांनी कमी होईल. सत्र १५ डिसेंबरला सुरू होऊन पाच जानेवारीला संपेल. अर्थमंत्री अरूण जेटली शास्त्रीभवनमध्ये तारखा जाहीर करताना म्हणाले की, अधिवेशन घेण्यापासून सरकार काही पळ काढत नाही.

  • सगळ््या प्रश्नांवर चर्चा करायला सरकार तयार आहे. यापूर्वीही संसदेचे अधिवेशन देशात या नाही तर त्या भागातील निवडणुकांमुळे विलंबाने सुरू झाले किंवा त्यांचा कालावधी कमी केला गेला आहे.

  • काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर हल्ला चढवत म्हटले होते की, ‘तुम्ही सत्य लपवले तरी ते दूर जाऊ शकत नाही. मोदी जी, लपणे बंद करा आणि संसद सुरू करा म्हणजे तुम्ही राफेल विमानांच्या व्यवहाराचे जे काही केले ते सगळा देश ऐकेल.’

बीडच्या कविता पाटीलची भारतीय महिला क्रिकेट 'अ' संघात निवड :
  • बीड : केज येथील कविता दिलीप पाटीलची भारतीय महिला क्रिकेट अ संघात निवड झाली आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात ती भारताकडून खेळणार आहे.

  • येत्या डिसेंबर महिन्यात कर्नाटक येथे बांग्लादेशच्या ‘अ’ महिला क्रिकेट संघासोबत भारतीय महिलांची ‘अ’ टीम भिडणार आहे. या मालिकेत 2 डिसेंबर पासून तीन एकदिवसीय सामने हुबळी येथे खेळले जाणार असून 3 टी-20 सामने 12 डिसेंबरपासून बेळगाव येथे होणार आहेत.

  • कविताचं महाविद्यालयीन शिक्षण प्रवरानगर येथे झालं असून पुण्याच्या बीएमसीसी कॉमर्स कॉलेजमधून ती पदवीधर झाली. त्यानंतर तिची निवड भारतीय रेल्वेमध्ये झाली. ती सध्या कार्यालयीन अधीक्षक पदावर आहे. शालेय जीवनात बास्केटबॉलची आवड असणाऱ्या कविताला नंतर क्रिकेटची आवड लागली.

  • खडतर मेहनतीने क्रिकेटमध्ये प्राविण्य मिळवत तिने 17 आणि 19 वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यानंतर ती पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडूनही खेळली.

मुस्लिम मागासवर्गीय नसल्यानं आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही : सुब्रमण्यम स्वामी
  • ‘मुस्लिमांनी देशावर ८०० वर्षे राज्य केले तरीही ते आरक्षण मागत आहेत. मुस्लिम समाज मागासवर्गीय नाही. त्यामुळे त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही,’ असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.

  • एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीवर जोरदार हल्ला चढवताना स्वामी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. टाईम्स नाऊने या संदर्भात वृत्त दिले आहे.

  • भारतावर ८०० वर्षे राज्य करुनही मुस्लिम समाज स्वत:ला मागास समजत असेल तर त्यांच्यासाठी ही शरमेची बाब आहे. देशात ब्राह्मण, क्षत्रियदेखील गरीब आहेत. मात्र, ते कधी आरक्षणाची मागणी करत नाहीत, असे स्वामी यांनी म्हटले आहे.

  • धार्मिक बाबीवरुन आपण कुठल्याही प्रकारे मागासपणा निश्चित करु शकत नाही. मात्र, ओवेसी जर खरोखर कोणत्या मागास व्यक्तीचे नाव सुचवत असतील, तर त्याला आम्ही शिष्यवृत्ती देऊ शकतो. तसेच त्या व्यक्तीला मदतदेखील करु शकतो, असेही स्वामी यांनी म्हटले आहे.

  • स्वामी पुढे म्हणाले, ओवेसी यांनी बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांच्याप्रमाणे विचार करायला हवा.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९२४: एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.

  • १९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.

  • १९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.

  • १९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.

  • १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.

  • १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.

जन्म

  • १७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)

  • १८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)

  • १८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)

  • १९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२)

  • १९२६: आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०११)

  • १९३०: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७२)

  • १९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.

  • १९६७: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.

  • १९८४: अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.

मृत्य

  • १९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८५८)

  • १९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८९१)

  • १९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)

  • १९७९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)

  • १९९३: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)

  • १९९९: अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.

  • २०००: चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)

  • २००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला  यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.