चालू घडामोडी - २३ ऑक्टोबर २०१७

Date : 23 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फ्रान्स भारताला देणार ३६ लढाऊ विमाने, संरक्षणमंत्री फ्लोरन्स पार्ले गुरुवारपासून येणार भारताच्या दौ-यावर
  • नवी दिल्ली : फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरन्स पार्ले येत्या गुरुवारपासून भारताच्या दौ-यावर येत असून, भारताला अधिक राफेल लढाऊ विमाने विकण्याचा मार्ग या वेळी मोकळा होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

  • ३६ लढाऊ विमाने विकण्याबाबत त्यांच्या दौºयात दोन्ही बाजूंनी चर्चा होईल. या वेळी राफेलबरोबरच पाणबुडीच्या महानिविदेबाबतही विचारविनिमय होण्याची शक्यता आहे.

  • राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मार्कोन यांच्या डिसेंबरमध्ये होणा-या भारत भेटीच्या तयारीसह राफेल विक्रीवरही चर्चा अपेक्षित आहे. येत्या शुक्रवारी त्या नागपूरला जात असून, तेथे त्यांच्या हस्ते भूमिपूजन होईल.

  • राफेल करारांतर्गत उभारण्यात येणा-या डेसॉल्ट व रिलायन्स डिफेन्सच्या प्रकल्पांची पायाभरणी या वेळी केली जाईल.

बँक खात्याशी आधार कार्ड जोडणं आवश्यक - आरबीआय
  • नवी दिल्ली - बँक खात्याशी आधार कार्ड जोडणं आवश्यक असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शनिवारी स्पष्ट केले आहे.

  • 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग' कायद्यांतर्गत आधार कार्ड क्रमांक आपल्या बँक खात्याला जोडणं आवश्यक आहे,  असं भारतीय रिझर्व बँकेने सांगितले आहे.

  • आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडणं आवश्यक नाही, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, आरबीआयनं मात्र याचा बातमीचे खंडण करत स्पष्टीकरण दिलं आहे.

बोफोर्स प्रकरणात सीबीआय सर्वोच्च न्यायालयात जाणार
  • नवी दिल्ली : ‘सीबीआय’ने बोफोर्स घोटाळा प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यासाठी केंद्र शासनाला परवानगी मागितली आहे.

  • त्यामुळे हा घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यासंदर्भात ‘सीबीआय’ने केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण विभागाला पत्र लिहिले आहे. ३१ मे २००५ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या घोटाळ्यातील युरोपियन आरोपी हिंदुजा बंधूंविरुद्धचे सर्व आरोप रद्द केले आहेत.

  • ‘सीबीआय’ला त्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करायची आहे. ‘सीबीआय’ने २००५ मध्येही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची परवानगी मागितली होती, पण तत्कालीन यूपीए शासनाने त्यांना परवानगी नाकारली होती.

  • त्यामुळे या प्रकरणाची चर्चा बंद झाली होती. परंतु, ‘सीबीआय’ने हे प्रकरण पुन्हा बाहेर काढले आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटून आरोप-प्रत्यारोप सुरू होतील, असे बोलले जात आहे.

टाटा स्टील-जर्मनीतील पोलाद उत्पादनातील मोठी कंपनी थिस्सेनक्रुपच्या कराराला टीएसएनचा विरोध
  • नवी दिल्ली : टाटा स्टील आणि जर्मनीतील पोलाद उत्पादनातील मोठी कंपनी थिस्सेनक्रुप्प यांच्यात युरोपातील पोलाद उत्पादन ५० : ५० टक्के करण्याच्या नियोजित करारावर टाटा स्टीलच्या नेदरलँड्स शाखेच्या कामगारांच्या एका गटाने चिंता व्यक्त केली आहे.

  • टाटा स्टील नेदरलँड्सच्या (टीएसएन) सेंट्रल वर्क्स काउन्सिलने निवेदनात म्हटले आहे की, या सहमती करारांतर्गत टीएसएनच्या देखरेख करणा-या मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येईल व टीएसएनच्या संचालक मंडळाची स्थापना योग्यरीत्या होणार नाही.

  • तथापि, टाटा स्टीलच्या युरोपीयन कारभाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅन्स फिशर यांनी मात्र सर्व संबंधितांशी सल्लामसलत केली जाईल, अशा शब्दांत कामगारांच्या काळजीचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.

  • कंपनीने अनेक वेळा बैठका घेतल्या असून, विधायक चर्चाही केल्या, असे ते म्हणाले. 

दिनविशेष :

ठळक घटना :

  • १७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.

  • १८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.

  • १८९०: हरी नारायण आपटे यांनी करमणूक या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.

  • १९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.

  • १९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान.

जन्म 

  • १७७८: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)

  • १८७९: वैदिक धर्माचे पुरस्कर्ते शंकर रामचंद्र तथा अहिताग्नी राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर१९५२)

  • १९००: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९५८)

  • १९२३: भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुन २०१६)

  • १९२४: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९८९)

  • १९४०: ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म.

  • १९४५: अभिनेते व नाट्यनिर्माते शफी इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९९६)

  • १९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक अरविंद अडिगा यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९१०: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचे निधन. (जन्म: २० सप्टेंबर १८५३)

  • १९१५: इंग्लिश क्रिकेटपटू डब्ल्यू. जी. ग्रेस यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १८४८)

  • १९२१: चाकाच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक तसेच डनलॉप रबर चे संस्थापक जॉन बॉईड डनलॉप यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

  • १९५७: ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९०५)

  • २०१२: बंगाली कवी व कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.