चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ सप्टेंबर २०१९

Date : 23 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताचे माजी सलामीवीर माधव आपटे यांचे निधन :
  • माजी कसोटीपटू आणि भारताचे माजी सलामीवीर फलंदाज माधव आपटे यांचे सोमवारी पहाटे सहा वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. भारताकडून सात कसोटी सामने खेळणाऱ्या माधव आपटे यांनी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

  • माधव आपटे यांनी मुंबई संघातून पदार्पण करत रणजी सामन्यात सौराष्ट्रविरूद्ध शतक ठोकलं होत. त्यानंतर १९५२-५३ या काळात त्यांनी सात कसोटी सामन्यात भारताच प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यावेळी पाकिस्तानविरूद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यासाठी माधव आपटे यांची भारतीय संघात निवड झाली. यावेळी त्यांनी उत्तम खेळ केला. त्यामुळे नंतर झालेल्या वेस्ट इंडिच दौऱ्यासाठीही त्यांची निवड झाली होती. पाच सामन्यांच्या मालिकेत आपटे यांनी सलामीला खेळताना एक शतक आणि अर्धशतकांसह ५१.११ च्या सरासरीने ४६० धावा केल्या होत्या.

  • या दौऱ्यात त्यांनी केलेली खेळी गाजली होती. वेस्ट इंडिजच्या गोलदांजाची धुलाई करत माधव आपटे यांनी १६३ धावांची खेळी केली. पाॅली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ते ठरले होते. हा विक्रम १८ वर्ष त्यांच्या नावावर होता. या दौऱ्यानंतर त्यांना पुन्हा भारतीय संघात स्थान मिळालं नाही.

‘५जी’ तंत्रज्ञानाविरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये निदर्शने :
  • सर्व जण उत्सुकतेने फाइव्ह जी बिनतारी तंत्रज्ञानाची वाट पहात असले तरी त्याविरोधात स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे हजारो लोकांनी निदर्शने केली. फाइव्ह जी तंत्रज्ञानाने आरोग्याला मोठा धोका असल्याचे या निदर्शकांचे म्हणणे आहे.

  • स्वित्झर्लंडच्या संसदेपुढे ही निदर्शने करण्यात आली असून फाइव्ह जी मोबाईल अँटेना उभारण्यास लोकांचा विरोध आहे. फ्रिक्वेन्सिया या गटाने ही निदर्शने केली असून या संस्थेच्या सह अध्यक्ष टॅमलिन शिबलर यांनी सांगितले की,  फाइव्ह जी तंत्रज्ञानाचा वापर घातक असून त्याच्यामुळे आरोग्याला धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. युरोपात मोनॅको या देशात पहिल्यांदा चीनच्या हुआवे कंपनीद्वारे फाइव्ह जी तंत्रज्ञान लागू करण्यात आले आहे.

ऊर्जा सुरक्षा क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा :
  • भारत आणि अमेरिकने ऊर्जा सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहकार्याने काम करण्याची आवश्यकता आणि गुंतवणूक संधींचा विस्तार यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेतील ऊर्जा कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी गोलमेज परिषदेत चर्चा केली. भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी उपाययोजनांवर त्यांनी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आले.

  • एक आठवडय़ाच्या अमेरिका दौऱ्यासाठी मोदी यांचे ह्य़ूस्टनला आगमन झाले. तेथील ऊर्जा कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी गोलमेज परिषदेत मोदी यांनी चर्चा केली. गोलमेज परिषदेत १७ कंपन्यांचा सहभाग होता. या ऊर्जा कंपन्यांचे प्रकल्प दीडशे देशांत असून त्यांची उलाढाल एक लाख कोटी डॉलर्सची आहे, अशी माहिती परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी दिली.

  • या ऊर्जा कंपन्यांचे प्रकल्प भारतातही आहेत. या बैठकीनंतर टेलुरियन इन्कॉर्पोरेशन आणि पेट्रोनेट एलएनजी या कंपन्यांमध्ये करार झाला. करारात म्हटल्यानुसार पेट्रोनेट कंपनी टेलुरियन कंपनीच्या ड्रिफ्टवुड एक्सपोर्ट टर्मिनल प्रकल्पात २.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. त्या बदल्यात ४० वर्षांसाठी ५ दशलक्ष मेट्रिक टन एलएनजीचे हक्क पेट्रोनेटला मिळणार आहेत. ३१ मार्च २०२० रोजी त्यांच्यात व्यवहाराचा करार होईल.

ट्रम्प यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोदींचा पाकिस्तानवर निशाणा :
  • ह्य़ुस्टनमधील ‘हाउडी मोदी’ या मेळाव्यामधील मोदींचे भाषण चांगलेच गाजले. अगदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करण्यापासून ते पाकिस्तानवर नाव न घेता टिका करण्यापर्यंत मोदींच्या अनेक मुद्द्यांना उपस्थित अनिवासी भारतीयांनी भरभरुन दाद दिली. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात वापरलेल्या एका मुद्द्यावरुन मोदींनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

  • ट्रम्प यांनी आपल्या भाषणामध्ये ‘इस्लामिक दहशतवाद’ असा उल्लेख केला त्यानंतर ते थोडे अडखळले. मात्र मोदी यांनी हाच मुद्दा पकडून आपल्या भाषणामधून पाकिस्तानवर टीकेचा भडीमार केला. विशेष म्हणजे मोदींनी पाकिस्तान तसेच इम्रान खान यांच्या नावाचा उल्लेखही न करता आपला इशारा कोणाकडे आहे हे भाषणातून दाखवून दिले.

  • ट्रम्प आपल्या भाषणादरम्यान मोदी यांचा उल्लेख महान नेते असा केला. ६१ कोटी मतदार ही खूप मोठी संख्या आहे. या जनतेने मोदी यांच्या कर्तृत्वावर विश्वास टाकला. अमेरिकेतील भारतीयांनी या देशाला समृद्ध केले. येथे आलेले ५० हजार नागरिक या समृद्धीचे आणि भारत-अमेरिका मैत्रीचे प्रतीक आहे.

  • भारताची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अमेरिका वचनबद्ध आहे. त्याचबरोबर, इस्लामी मूलतत्त्ववादाविरोधात आमचा लढा भारताच्या बरोबरीने सुरू राहील, असे ट्रम्प यांनी सांगितले. मोदी आणि ट्रम्प यांनी परस्परस्तुती करून आणि भारत-अमेरिका मैत्रीचा विविधांगी आढावा घेतानाच, इस्लामी दहशतवादाविरोधात लढा तीव्र करण्याचे आश्वासनही स्वतंत्र भाषणांमध्ये दिले.

राहुल आवारेनं इतिहास घडवला, जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा पहिला मराठमोळा पैलवान :
  • कझाकस्तान : मराठमोळा पैलवान राहुल आवारेनं जागतिक कुस्ती स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. कझाकस्तानमध्ये सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुलनं कांस्यपदकाची कमाई केली. या कामगिरीसह जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारा तो महाराष्ट्राचा पहिला पैलवान ठरला. कांस्यपदकाच्या लढाईत राहुलनं ६१ किलो वजनी गटात अमेरिकेच्या टायलर ग्राफचं आव्हान मोडीत काढलं. त्यानं ही लढत 11-4 अशी जिंकली.

  • कझाकस्तानमधल्या यशानं राहुलच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवलाच पण महाराष्ट्रासाठीही त्याचं हे यश अभिमानास्पद ठरलं. महाराष्ट्राची कुस्ती गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र केसरीच्या गवगव्यातच अडकली असतानाच राहुल आवारेनं आंतरराष्ट्रीय कुस्तीत यश मिळवता येतं हे महाराष्ट्राच्या पैलवानांना दाखवून दिलं आहे.

  • जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुल आवारे हा पदक जिंकणारा पहिला मराठमोळा पैलवान ठरला. महाराष्ट्राचेच पैलवान खाशाबा जाधवांनी 1952 साली हेलसिंकीत भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून दिलं होतं.

  • पण जागतिक कुस्ती स्पर्धेत मराठी पैलवानांना यश हुलकावणी देत होतं. मूळच्या महाराष्ट्राच्या नरसिंग यादव आणि संदीप तुलसी यादव यांनी जागतिक कुस्ती स्पर्धेत याआधी कांस्यपदकाचा मान मिळवला होता. मात्र राहुल आवारेनं जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून पहिला मराठमोळा पैलवान होण्याचा मान मिळवला.

ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाल्यास रिफंड मिळेपर्यंत ग्राहकाला दर दिवशी शंभर रुपये, आरबीआयचे निर्देश :
  • मुंबई : ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाला तरी आता चिंता करण्याचं कारण नाही. कारण आता अशा व्यवहारात रिफंड मिळेपर्यंत दर दिवशी शंभर रुपये बँक ग्राहकाला देणार आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँकेनं परिपत्रक जारी केलं आहे.

  • तुमचा ऑनलाइन व्यवहार काही कारणास्तव अयशस्वी झाल्यास आता ग्राहकांना जर एक दिवसाच्या आत ते पैसै तुम्हाला परत मिळाले नाहीत तर दरदिवशी 100 रुपये मिळणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. UPI, IMPS, NACH द्वारे पेमेंट केल्यास हा नियम लागू आहे.

  • रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार निश्चित वेळेत फेल रकमेचे पेमेंट होत नसेल तर बँकांना संबंधित ग्राहकास प्रतिदिन 100 रुपयांच्या हिशेबाने दंड द्यावा लागेल. ग्राहकांना या नियमानुसार लाभ न मिळाल्यास रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकतात. हा नियम 15 ऑक्टोबर 2019 पासून लागू होणार आहे, असे या परिपत्रकात नमूद केले आहे.

  • आरबीआयने ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाल्यास संबंधित टर्न अराउंड टाइम (टीएटी) नियमांत बदल केला आहे. या बदलानंतर बँक ग्राहकांना फेल ट्रान्झॅक्शनच्या पैशांसाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८०३: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.

  • १८४६: अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.

  • १८८४: महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.

  • १९०५: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय घेतला.

  • १९०८: कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना झाली.

  • १९३२: हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.

  • १९८३: सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • २००२: मोझिला फायरफॉक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

जन्म 

  • १२१५: मंगोल सम्राट कुबलाई खान यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १२९४)

  • १७७१: जपानी सम्राट कोकाकु यांचा जन्म.

  • १८६१: बॉश कंपनी चे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९४२)

  • १९०३: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९५०)

  • १९०८: देशभक्त व हिन्दी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९७४)

  • १९११: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा जन्म.

  • १९१४: ब्रुनेईचा राजा ओमर अली सैफुद्दीन (तिसरा) यांचा जन्म.

  • १९१५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ क्लिफर्डशुल यांचा जन्म.

  • १९१७: भारतीय रसायनशास्त्र आसिमा चॅटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००६)

  • १९१९: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)

  • १९२०: नाट्य लेखक व अभिनेते भालबा केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७)

  • १९४३: अभिनेत्री तनुजा यांचा जन्म.

  • १९५०: समाजशास्त्रज्ञ डॉ. अभय बंग यांचा जन्म.

  • १९५२: क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचा जन्म.

  • १९५७: पार्श्वगायक कुमार सानू यांचा जन्म.

मृत्यू 

  • १२१५: मंगोल सम्राट कुबलाई खान यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १२९४)

  • १७७१: जपानी सम्राट कोकाकु यांचा जन्म.

  • १८६१: बॉश कंपनी चे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९४२)

  • १९०३: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९५०)

  • १९०८: देशभक्त व हिन्दी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९७४)

  • १९११: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा जन्म.

  • १९१४: ब्रुनेईचा राजा ओमर अली सैफुद्दीन (तिसरा) यांचा जन्म.

  • १९१५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ क्लिफर्डशुल यांचा जन्म.

  • १९१७: भारतीय रसायनशास्त्र आसिमा चॅटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००६)

  • १९१९: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)

  • १९२०: नाट्य लेखक व अभिनेते भालबा केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७)

  • १९४३: अभिनेत्री तनुजा यांचा जन्म.

  • १९५०: समाजशास्त्रज्ञ डॉ. अभय बंग यांचा जन्म.

  • १९५२: क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचा जन्म.

  • १९५७: पार्श्वगायक कुमार सानू यांचा जन्म.

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.