चालू घडामोडी - २४ डिसेंबर २०१८

Updated On : Dec 24, 2018 | Category : Current Affairsसीबीएसई १०वी, १२वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर :
 • मुंबई : सीबीएसईचे 10वी आणि 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डाच्या 12वी ची परीक्षा 15फेब्रुवारी पासून 3 एप्रिल दरम्यान होणार आहे. तर सीबीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत असणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेआधी अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी सीबीएसई बोर्डाने सात आठवडे आधीच हे वेळापत्रक जाहीर केले आहे.

 • सीबीएसई बोर्डाने हे स्पष्ट केलं आहे की, मागच्या वर्षीप्रमाणे या वेळापत्रकामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. शिवाय हे वेळापत्रक असे तयार करण्यात आले आहे की, जेणेकरून कोणत्याही इतर परीक्षेत ही बोर्डाची परीक्षा येणार नाही. मागच्या वर्षी फिजिक्स आणि जेईई मेन परीक्षा एकाच दिवशी आली होती. त्यामुळे फिजिक्सची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

 • परीक्षा सकाळी साडे 10 ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे. उत्तरपत्रिका सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना देण्यात येतील, तर प्रश्नपत्रिका सव्वा दहा वाजता देण्यात येतील. यावर्षी 10 वी सीबीएसई परीक्षा जवळपास 18 लाख विद्यार्थी देणार आहेत तर 12 वी सीबीएसई परीक्षा जवळपास 13 लाख विद्यार्थी देणार आहेत.

सात वर्षांचा आर्ची ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार, भारताविरुध्द कसोटी खेळणार :
 • मेलबर्न : पर्थ कसोटीत भारताचा पराभव करत कसोटी मालिकेत बरोबरी साधणारा ऑस्ट्रेलियन संघ बॉक्सिंग डे कसोटीसाठी सज्ज झाला आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियानं संघात मोठा बदल केला आहे. सात वर्षांचा फिरकीपटू आर्ची शिलरला ऑस्ट्रेलियन संघात स्थान देण्यात आलं आहे.

 • मेलबर्न येथे होणाऱ्या या तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने संघात सात वर्षाच्या आर्चीचा समावेश केला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी 15 जणांच्या संघामध्ये यजमानांनी सात वर्षाच्या आर्ची शिलर नावाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आर्ची शिलर हा तिसऱ्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार देखील असणार आहे.

 • ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने आर्ची शिलरच्या वाढदिवसादिवशी शनिवारी रोजी ही घोषणा केली आहे. यानंतर आर्ची शिलरने तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघासोबत सराव देखील केला आहे. सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.

 • बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियानं 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला. यामध्ये आर्ची शिलरला 15 वा खेळाडू म्हणून संधी देण्यात आली. कसोटी मालिकेतील पहिला सामना अॅडलेडवर झाला. त्यावेळी शिलरनं ऑस्ट्रेलियन संघासोबत सराव केला होता. त्यानंतर आता त्याला तिसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. शिलरच्या निवडीला ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेननंदेखील दुजोरा दिला आहे. यारा पार्कमध्ये बुपा फॅमिली डे आयोजित करण्यात आला. त्यावेळी शिलरच्या निवडीबद्दल पेनला प्रश्न विचारण्यात आला होता.

बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी :
 • जालना : बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेवर मात करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. बुलढाण्याच्या  बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली. या विजयानंतर मातीतल्या वाघाने मॅटच्या सिंहाला पराभूत केल्याची भावना कुस्ती विश्वामध्ये व्यक्त करण्यात येत होती.

 • अभिजीत कटकेने सामन्याच्या पहिल्या मिनिटात जोरदार आक्रमण केले होते. पण त्यानंतर बाला रफिक शेखने जोरदार पुनरागमन केले. बाला रफिकने जोरदार आक्रमण केले आणि दोन गुण कमावले. त्यामुळे पहिल्या काही मिनिटांमध्ये बाला रफिक शेखने अभिजितवर २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर बाला रफिक शेखने एक गुण मिळवत ३-१ अशी आघाडी मिळवली.

 • पुण्याच्या अभिजीत कटकेने २५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने जबरदस्त आक्रमक खेळताना येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. गत वर्षी भूगाव येथे चॅम्पियन ठरणाऱ्या अभिजीत कटकेने महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी गटात सुवर्णपदक जिंकले. प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्याचा अभिजीत कटके हा बुलढाणा येथील बाला रफिक शेख याच्याशी दोन केले.

 • 'महाराष्ट्र केसरी'ची गदा कोण बनवते - पेशव्यांनी 'पानगरी' नावाचे गृहस्थ खास नक्षीकाम आणि कोरीवकाम करण्यासाठी आपल्या चित्रशाळेत आणून ठेवले होते. पेशव्यांचे आकर्षक दागिने, विविध बांधकामं आणि भांडी यावर पानगरी नक्षीकाम करत असत. त्याच पानगरी घराण्याचे वारसदार प्रदीप प्रतापराव पानगरी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात.

राजस्थानमध्ये १३ कॅबिनेट, १० राज्यमंत्री आज घेणार शपथ :
 • जयपूर : राजस्थानमध्ये तीन दिवसांच्या गुऱ्हाळानंतर मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याशी चर्चेनंतर 23 मंत्र्यांची नावे ऩिश्चित करण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी 11.30 वाजता राजभवनात राज्यपाल कल्याण सिंह 13 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्र्यांना शपथ देणार आहेत. 

 • मंत्रिमंडळावर नजर टाकल्यास 23 पैकी 10 जण पहिल्यांदाच मंत्री बनणार आहेत. तर पहिल्यांदाच निवडून आलेल्या 25 आमदारांपैकी कोणाच्याही गळ्यात मंत्री पदाची माळ पडलेली नाही. 11 महिला आमदारांपैकी केवळ 1 सिकरायच्या आमदार ममता भूपेश या मंत्री होणार आहेत. तर मुस्लिम समुदायातून पोकरणचे आमदार सालेह मोहम्मद यांना संधी देण्य़ात आली आहे. आघाडीतील मित्रपक्ष आरएलडीचे सुभाष गर्ग हे देखील मंत्री होणार आहेत.

 • जयपूर-भरतपूरमधून सर्वाधिक मंत्री - राजस्थानमधील 14 जिल्ह्यांना एकही मंत्री देण्यात आलेला नाही. तर जयपूर आणि भरतपूरमधून प्रत्येकी 3 मंत्रीपदे देण्याच आलेली आहेत. दौसा-बिकानेरला 2 आणि अन्य जिल्ह्यांमधून प्रत्येकी 1 मंत्री देण्यात आला आहे.

कशी असते महाराष्ट्र केसरी विजेत्याला देण्यात येणारी चांदीची गदा, जाणून घ्या :
 • जालना : महाराष्ट्र केसरी' किताबविजेत्या पैलवानाला देण्यात येणारी चांदीची गदा परंपरेनुसार मोहोळ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द करण्यात आली. पानगरी घराण्याचे वारसदार प्रदीप प्रतापराव पानगरी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात. 

 • महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मामासाहेब मोहोळ यांचं 1982 साली निधन झालं. त्यानंतर गेली 36 वर्ष मोहोळ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र केसरी किताबविजेत्या पैलवानासाठी चांदीची गदा बनवून देण्यात येते. मामासाहेबांचं जन्मगाव मुठा येथून ही चांदीची गदा पुण्यात आणल्यावर ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे सुपूर्द करण्यात येते.

 • 'महाराष्ट्र केसरी'ची गदा कोण बनवते - पेशव्यांनी 'पानगरी' नावाचे गृहस्थ खास नक्षीकाम आणि कोरीवकाम करण्यासाठी आपल्या चित्रशाळेत आणून ठेवले होते. पेशव्यांचे आकर्षक दागिने, विविध बांधकामं आणि भांडी यावर पानगरी नक्षीकाम करत असत. त्याच पानगरी घराण्याचे वारसदार प्रदीप प्रतापराव पानगरी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात.

दहशतवादविरोधी आघाडीतील दूत ब्रेट मॅकगर्क यांचा राजीनामा :
 • आयसिसशी लढण्यासाठीच्या जागतिक आघाडीतील अमेरिकेचे दूत ब्रेट मॅकगर्क यांनी राजीनामा दिला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच सीरियातून सैन्य माघारीची घोषणा करतानाच अफगाणिस्तानातील सैन्यही निम्म्याने कमी करण्याचे ठरवले आहे.  त्याच्या विरोधात त्यांनी हा राजीनामा दिला. ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात आधी संरक्षणमंत्री जॉन मॅटिस यांनी राजीनामा दिला होता.

 • आयसिसचा पराभव झाला आहे असे मानणे हा मूर्खपणा आहे व अमेरिकी सैन्य माघारी घेणे ही मोठी चूक ठरेल, असा इशारा मॅकगर्क यांनी अकरा दिवसांपूर्वी दिला होता. मॅकगर्क यांनी फेब्रुवारीच्या मध्यावधीत पद सोडण्याचे ठरवलेले असताना ट्रम्प यांच्या घोषणेमुळे त्यांनी आधीच राजीनामा दिला आहे. मॅकगर्क यांची नियुक्ती ओबामा यांनी २०१५ मध्ये केली होती व त्यांना  ट्रम्प यांनी पदावर कायम ठेवले होते.

 • मॅकगर्क यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे, की दहशतवादी बचावात्मक पवित्र्यात असले तरी त्यांचा पराभव झालेला नाही. त्यामुळे सीरियातून सैन्य माघारी घेण्यास अमेरिकेने खूप घाई केली आहे. त्यामुळे आयसिसला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी त्यांनी परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांच्याकडे राजीनामा सादर केला असून, त्याची वाच्यता जाहीरपणे करण्यात आलेली नाही.

 • हा कोण दूत आहे हे मला माहीत नाही असे सांगून ट्रम्प यांनी ट्विट संदेशात या घटनेला किरकोळ महत्त्वही दिलेले नाही. ट्रम्प यांनी सीरियातून सर्व दोन हजार सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. अमेरिकेने तेथे तीन महिन्यांसाठी सैन्य पाठवले होते. आता सात वर्षे झाली तरी सैन्य तेथेच आहे. मी अध्यक्ष झालो तेव्हा आयसिसचा धुमाकूळ माजला होता. आता आयसिसचा पराभव झाला आहे. आता जे कुणी दहशतवादी राहिले आहेत. त्यांचा मुकाबला करण्यास तुर्कस्थान व इतर देश समर्थ आहेत. सीरियातील यादवी युद्ध २०११ मध्ये सुरू झाले तरी अमेरिकेने आयसिसवर २०१४ पर्यंत हल्ला केलेला नव्हता.

अमेरिकेत पुन्हा ‘शटडाऊन’ , ८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांपुढे पेच :
 • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीमेवर भिंत बांधण्यासाठी पैशांचा हट्ट धरल्याने पुन्हा एकदा रिपब्लिकन व डेमोक्रॅट नेत्यांमध्ये कोंडी निर्माण झाली आहे. सरकारी खर्चाला परवानगी देणारे विधेयक मंजूर न करताच अमेरिकी कॉंग्रेस संस्थगित झाल्याने अमेरिका सरकारचे “शटडाऊन’ आजपासून सुरू झाले.

 • ट्रम्प यांच्या मागणीवर अमेरिकी कॉँग्रेसमध्ये शुक्रवारी रात्री बारापर्यंत खर्चाला मंजुरीबाबत घमासान चर्चा सुरू होती. मात्र, रिपब्लिकन सरकारच्या अनेक खर्चांना डेमोक्रॅटिक सदस्यांचा विरोध होता. कॉंग्रेसमध्ये एकमत न झाल्याने कोणत्याही खर्चाच्या मंजुरीशिवाय सभागृह संस्थगित करण्यात आले. त्यामुळे रात्री बाराचा ठोका पुढे सरकताच अनेक मुख्य संस्थांचे कामकाज बंद झाले. अनेक सरकारी संस्थांना कामकाज चालविण्यासाठी पैसेच न मिळाल्याने पुढील काही काळासाठी अमेरिका सरकार अंशत: “बंद’ असणार आहे.

 • या शटडाऊनमुळे अमेरिकेतील सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांपुढे पेच निर्माण होणार आहे. त्यांना या शटडाऊनच्या काळासाठी विनावेतन काम करावे लागणार आहे. ऐन नाताळाच्या हंमागात ही स्थिती ओढवल्याने त्यांच्यात कमालीची नाराजी पसरली आहे. हे या वर्षातील तिसरे “शटडाऊन’ असून ते किती काळ चालेल, ते अद्याप स्पष्ट नाही. या शटडाऊनचा पहिला जोरदार फटका अमेरिकेतील शेअर बाजाराला शुक्रवारी बसला. वॉल स्ट्रीटवरील बाजाराने जबर घसरण अनुभवली. सन 2008 नंतरची ही सर्वांत मोठी घसरण होती.

 • बेकायदा स्थलांतर रोखण्यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी 5 अब्ज डॉलर्सची मागणी ट्रम्प यांनी अमेरिकी काँग्रेसकडे केली आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १७७७: कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.

 • १९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.

 • १९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा.

 • १९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रांच्या फौजांचे सरसेनापती बनले.

 • १९५१: लिबीया हा देश ईटलीकडून स्वतंत्र झाला.

 • १९७९: सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.

 • २०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.

जन्म 

 • ११६६: इंग्लंडचा राजा जॉन यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १२१६)

 • १८१८: ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १८८९)

 • १८६४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९३४)

 • १८८०: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)

 • १८९९: नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९५०)

 • १९१०: हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते मॅक्स मिईदींगर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८०)

 • १९२४: पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९८० – मुंबई)

मृत्यू 

 • १५२४: पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा यांचे निधन.

 • १९६७: बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१३)

 • १९७३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)

 • १९७७: आसामी कवयित्री व लेखिका नलिनीबाला देवी यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८९८)

 • १९८७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१७)

 • १९८८: भारतीय लेखक जैनेंद्र कुमार यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९०५)

 • २०००: कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२३)

टिप्पणी करा (Comment Below)