चालू घडामोडी - २४ फेब्रुवारी २०१८

Date : 24 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदींनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंचे कान टोचले :
  • नवी दिल्ली : धर्माचा वापर करुन राजकीय उद्देशानं विभाजनाची दरी निर्माण करणाऱ्यांना थारा देऊ नका, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर निशाणा साधला. खालिस्तानच्या मुद्द्यावर नरमाईची भूमिका घेणाऱ्या कॅनडा सरकारचे मोदींनी कान टोचले.

  • ट्रुडो यांनी स्नेहभोजन कार्यक्रमाला दोषी सिद्ध झालेल्या खालिस्तानी दहशतवाद्याला निमंत्रित केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ट्रुडो यांच्या भेटीदरम्यान आपलं मत व्यक्त केलं.

  • राजकीय उद्देशासाठी धर्माचा गैरवापर करणाऱ्यांना कोणतंही स्थान नाही. देशाच्या एकात्मतेला आव्हान देण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही, असं मोदींनी स्पष्ट शब्दात सुनावलं.

  • नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि ट्रुडो यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये सहा करार झाले. कॅनडात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने कॅनडाशी करार केला आहे. यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच स्वस्त दरात धान्य मिळणार - हायकोर्ट :
  • मुंबई : आधारकार्ड शिधापत्रिकेशी जोडणं अनिवार्यच असल्याचं आज मुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढताना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाने स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

  • 1 मार्चपासून राज्यात बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार आहे.  अन्नधान्य पुरवठा विभागाच्या सचिवांना सादरीकरण देण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

  • राज्यभरात अनेक ठिकाणी माहितीचं संगणकीकृत करताना चुका झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. एकट्या नाशिकमध्ये चुकीची माहिती अपलोड झालेल्या शिधापत्रिका 74 हजारांच्यावर आहेत.

  • पालकमंत्र्यांकडे तक्रार करुनही तोडगा निघाला नसल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात दिली. नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते अझीझ पठाण यांनी जनहित याचिका दाखल केली होती.

भारतीय संघ व पंच प्रशंसेस पात्र :
  • आता दौ-याच्या अखेरच्या लढतीबाबत उत्सुकता आहे. न्यूलँडमध्ये खेळल्या जाणा-या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्व गाजवले तर दौरा यशस्वी ठरला, असे भारतीय संघाला वाटेल. सेंच्युरियनमध्ये दुसºया लढतीत विजय मिळवताना दक्षिण आफ्रिकेने शानदार फलंदाजी केली.

  • त्यांच्यासाठी या लढतीतील केवळ विजय महत्त्वाचा नसून एकदिवसीय लढतीत वर्चस्व गाजवणाºया यजुवेंद्र चहलला त्यांनी ज्या पद्धतीने हाताळले त्याचा त्यांना पुढच्या लढतीत नक्कीच लाभ होईल. सेंच्युरियन व जोहान्सबर्गमधील खेळपट्ट्या संथ आहेत. चहलने चेंडूला उंची दिली तरी टप्पा पडल्यानंतर चेंडू अधिक संथ होत होता. त्यामुळे क्लासेनने खेळपट्टीच्या खोलीचा लाभ घेत पुलचे फटके खेळले किंवा पुढे सरसावत चेंडूला स्टँडमध्ये भिरकावले.

  • क्लासेनला ड्युमिनीची चांगली साथ लाभली. भागीदारीदरम्यान ड्युमिनीने क्लासेनला अधिक स्ट्राईक मिळेल, याची खबरदारी घेतली. दुसºयांदा चहल महागडा ठरल्यामुळे न्यूलँड्मध्ये खेळल्या जाणाºया लढतीत अक्षर पटेलला संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. या महिन्याच्या सुरुवातीला खेळल्या गेलेल्या एकदिवसीय लढतीप्रमाणेच खेळपट्टी जर पाटा असेल तर शनिवारी खेळल्या जाणारी लढतही मोठ्या धावसंख्येची होण्याची शक्यता आहे.

  • धावफलकावर अर्धशतक झळकावण्यापूर्वीच तीन फलंदाज गमावले आहेत, असे भारतीय संघाबाबत वारंवार घडत नाही. कोहली एका अप्रतिम चेंडूवर बाद झाला. प्रतीक्षा करीत असलेल्या मनीष पांडेने मिळालेल्या संधीचा लाभ घेतला.

  • धोनीच्या क्षमतेवर शंका उपस्थित करणाºयांना त्याने आक्रमक फटकेबाजी करीत गप्प केले. पांडे व धोनी यांनी जवळजवळ शतकी भागीदारी केल्यामुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्येची मजल मारता आली. भारत या धावसंख्येचा बचाव करण्यात अपयशी ठरला, त्याचे श्रेय दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना द्यायलाच हवे.

जनतेचा पैसा लुटणा-यांची गय केली जाणार नाही - पंतप्रधान :
  • नवी दिल्ली : जनतेच्या पैशाची लूट सरकार कदापि सहन करणार नाही. आर्थिक गैरव्यवहार करणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या ११,४०० कोटींच्या घोटाळ््याबाबत आपले मौन सोडले आहे. नवी दिल्लीत आयोजित ग्लोबल बिझनेस समिटमध्ये ते बोलत होते.

  • हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर पंतप्रधानांनी सर्व प्रमुख वित्तीय संस्था आणि नियामक यंत्रणांना झालेल्या प्रकाराची बारकाईने चौकशी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वित्तीय संस्था, लेखा परिक्षक तसेच नियामकांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  • मेहुल चोकसी बँक खाते साफ करून पळाला - नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ््यातील आरोपी गीतांजली जेम्स कंपनीचा मालक मेहुल चोकसी हा बँक खात्यांमधील सर्व पैसे घेऊन देशाबाहेर पळून गेला आहे. त्याने खात्यांमध्ये फक्त २ कोटी रुपये शिल्लक ठेवल्याचे आढळून आल्याचे प्राप्तिकर खात्याने स्पष्ट केले. चोकसीने एक मेल लिहून कर्मचाºयांचा पगार देऊ शकत नाही असे म्हटले आहे.

  • कोठारी पिता-पुत्रांना कोठडी - रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी व त्याचा मुलगा राहुल यांना शुक्रवारी न्यायालयाने एक दिवसाचा ट्रान्झिट रिमांड सुनावला. या पिता-पुत्रांना ३,६९५ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याप्रकरणी अटक झाली आहे.

  • नीरव मोदीच्या ४४ कोटींच्या ठेवी, शेअर गोठविले - नीरव मोदी समूहाच्या ४४ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि शेअर सक्तवसुली संचालनालयाने (र्ईडी) शुक्रवारी गोठविले. त्याने आयात केलेली महागडी घड्याळेही जप्त केली.

१००० चौरस फूट आकाराचा देश, १ टक्का लोकांनाही माहीत नाही :
  • किंग्डम आॅफ एन्क्लावा या देशाचं नाव तुम्ही ऐकलं असण्याची शक्यता अगदीच कमी. जगातील १ टक्का लोकांनाही हा देश माहीत नाही आणि तरीही तो अस्तित्वात आहे. या देशाचं क्षेत्रफळ आहे १000 चौरस फूट. म्हणजे दोन बेडरूम, किचन, हॉल एवढ्या आकाराइतकं. या देशाला संयुक्त राष्ट्रांची मान्यताही नाही. या देशात कोणीही राहत नाही.

  • तरीही तो देश अस्तित्वात आहे. हा देश आहे क्रोएशिया आणि स्लोवेनिया यांच्या सीमेवर. मधून एक नदी वाहते. या भूभागावर क्रोएशिया आणि स्लोवेनिया या दोन्हींपैकी एकाही देशाने आपला हक्क सांगितला नाही. त्यामुळे या देशाची निर्मिती झाली.

  • सर्वात लहान देश म्हणून ओळखल्या जाणाºया एन्क्लावामध्ये कोणीच राहत नाही. त्या देशाचा कोणी नागरिकही नाही. तरीही या देशाची निर्मिती करणाºयांनी एन्क्लावामध्ये कोणताही कर नसेल आणि इंग्लिश, पोलिश, स्लोवेनियन, क्रोएशियन व मँडरिन यापैकी कोणतीही भाषा या देशात चालेल, असं म्हटलं आहे.

  • जगामध्ये असे अनेक छोटे देश आहेत, ज्यांना संयुक्त राष्ट्रांची मान्यता नाही. काही जण तर एखाद्या देशाच्या दुर्गम भागात जातात, तिथं वस्ती नसल्याचं पाहतात आणि या देशाची आपण निर्मिती करीत आहोत, असं सांगून देश जन्माला घालतात. पण एन्क्लावा हा कोणत्याच देशाचा भाग नाही, हे पाहून प्योत्र वॉवरझिंक्युविक्झ नावाच्या गृहस्थाने या देशाची निर्मिती केली.

  • तो आणि त्याचे काही मित्र एकदा स्लोवेनियातील एका गावात फिरायला गेले होते. तेव्हा त्यांना कोणत्याच देशात नसलेला काही भूभाग तिथून जवळ असल्याचं कळलं. त्यानंतर त्यांनी किंग्डम आॅफ एन्क्लावाची स्थापना केली. या देशाच्या नागरिकत्वासाठी आतापर्यंत तब्बल ५००० लोकांनी अर्ज केला आहे. तीन वर्षांपूर्वी त्या देशात आॅनलाइन निवडणूकही झाली. त्यात ८००कांनी मतदान केलं. अर्थातच आॅनलाइन. तसा देशही आॅनलाइनच आहे म्हणा!

एच-१बी व्हिसाच्या मंजुरीचे नियम अधिक कडक :
  • वॉशिंग्टन : थर्ड पार्टी तसेच एक किंवा त्यापेक्षा अधिक कार्यस्थळी नेमण्यात येणा-या कर्मचा-यांसाठी एच-१बी व्हिसाचे नियम अधिक कडक करणारा आदेश अमेरिकेचे राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जारी केला आहे. याचा फटका भारतीय आयटी कंपन्या व त्यांच्या कर्मचाºयांना बसणार आहे.

  • नव्या नियमांमुळे तिसºया पक्षाच्या कार्यस्थळी नेमणुका देण्यात येणाºया कर्मचाºयांना व्हिसा मिळवून देताना कंपन्यांना अधिक कटकटींचा सामना करावा लागेल. एच-१बी व्हिसा कार्यक्रमांतर्गत विदेशातील उच्च कौशल्ये असलेल्या व्यावसायिकांना हंगामी स्वरूपात अमेरिकेत कामावर ठेवता येते. तथापि, अमेरिकी मनुष्यबळ उपलब्ध नसेल, तरच विदेशी कर्मचाºयांची भरती करता येते.

  • एच-१बी व्हिसा योजनेचा सर्वाधिक फायदा भारतीय आयटी कंपन्यांना झाला आहे. अमेरिकेतील बँकिंग, प्रवासी आणि व्यावसायिक सेवा देणाºया मोठ्या संख्येतील कंपन्या आॅन-साइट भारतीय कर्मचाºयांवर अवलंबून असतात.

  • ट्रम्प प्रशासनाने एच-१बी व्हिसासाठी गुरुवारी नवे सात पानी धोरण जाहीर केले. विदेशी कर्मचारी तिसºया पक्षाच्या कार्यस्थळी जेवढा काळ काम करील तेवढ्याच काळाचा व्हिसा जारी करण्यात यावा, असे आदेश अमेरिकी नागरिकत्व व इमिग्रेशन सेवा संस्थेला देण्यात आले आहेत.

  • ट्रम्प प्रशासनाच्या ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणाला अनुलक्षून हा आदेश काढण्यात आला आहे. अमेरिकी नागरिकांचे रोजगारविषयक हित अबाधित राहावे, यासाठी ट्रम्प प्रशासन काम करीत आहे.

नोटाबंदीपूर्वी इतक्याच नोटा चलनात, RBI ची माहिती :
  • मुंबई : नोटाबंदी लागू करण्यापूर्वी चलनात जितक्या नोटा होत्या, तितक्या नोटा आता पुन्हा बाजारात आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालात समोर आली आहे.

  • 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नोटाबंदी लागू केली होती. म्हणजेच जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यावेळी 17.97 लाख कोटी रुपये चलनात होते, आज दीडच वर्षात यापैकी जवळपास सर्व म्हणजेच 17 लाख 78 हजार कोटी रुपये पुन्हा चलनात आले आहेत.

  • नोटाबंदी केली तेव्हा एका रात्रीत पाचशे आणि एक हजाराच्या नोटा अवैध ठरवल्या, त्यामुळे जवळपास 86 टक्के चलन बाद झालं होतं. यामुळे काळा पैसा बाहेर येईल, करचोरी थांबेल, बनावट नोटांचं प्रमाण घटेल, दहशतवादाला आळा बसेल अशी अनेक कारणं दिली होती. प्रत्यक्षात मात्र त्या जुन्या नोटांपैकी 99 टक्के नोटा परत बँकेकडे जमा झाल्या, हा भाग निराळा.

  • तेव्हा 'लेस कॅश' आणि 'कॅशलेस' अर्थव्यवस्था अशी मांडणी केली गेली होती, कमी कॅश हातात असणं चांगलं असंही सांगितलं गेलं,  मात्र पुन्हा झालेला चलन सुळसुळाट बघता ती मांडणी फोल ठरली आहे, असं या ताज्या आकडेवारीच्या आधारे म्हणता येईल.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६७०: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म.

  • १८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.

  • १९१८: इस्टोनिया देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९२०: नाझी पार्टीची स्थापना झाली.

  • १९३८: ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.

  • १९४२: व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.

  • १९५२: कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.

  • १९६१: मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.

  • १९८७: इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात १९८७ – ए या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला. तेव्हा तो पृथ्वीपासून १,६८,००० प्रकाशवर्षे दूर होता.

  • २००८: फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.

  • २०१०: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.

जन्म

  • १६७०: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम, शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १७००)

  • १९२४: पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९८ – मुंबई, महाराष्ट्र)

  • १९३८: नायके इन्क चे सहसंस्थापक फिल नाइट यांचा जन्म.

  • १९३९: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च २०१२)

  • १९४२: भारतीय तत्त्वज्ञानी गायत्री चक्रवर्ती यांचा जन्म.

  • १९४८: राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री जे. जयललिता यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर २०१६)

  • १९५५: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर २०११)

मृत्यू

  • १६७४: कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले आहे.

  • १८१०: हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री कॅव्हँडिश यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १७३१)

  • १८१५: अमेरिकन अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १७६५ – लिटिल ब्रिटन, पेनसिल्व्हानिया, यू. एस. ए.)

  • १९३६: मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.

  • १९७५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचे निधन. (जन्म: ३० मार्च १८९५)

  • १९८६  भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी १९०४)

  • १९९८: अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या ललिता पवार यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १९१६)

  • २०११: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९२९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.