चालू घडामोडी - २४ जून २०१८

Date : 24 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘मन की बात’मध्ये मोदींनी टीम इंडियाच्या ‘त्या’ कृतीचं केलं कौतूक :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 45 व्यांदा आपल्या मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला . यावेळी त्यांनी भारतीय क्रिेकेट संघाचं कौतूक केलं.

  • भारत-अफगाणीस्तानमध्ये झालेल्या ऐतिहासिक सामन्याचा उल्लेख करताना त्यांनी भारतीय संघाने अफगाणीस्तान संघासोबत चषक घेतला होता, या निर्णयाचं मोदींनी विशेष कौतूक केलं. याशिवाय मोदींनी अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खानचाही विशेष उल्लेख केला.

  • भारतीय संघाने चषक अफगाणिस्तानसोबत घेतल्याने हा सामना माझ्या नेहमीच लक्षात राहील असं मोदी म्हणाले. यापूर्वी मोदींनी 44 व्या मन की बात कार्यक्रमातही क्रीडा क्षेत्रावर भर दिला होता.

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे यांना मातृशोक :
  • राहुरी : गंगाधर छात्रालयाच्या प्रेरणास्थान, प्रतिकुल परिस्थितीवर मात करून मुलाला न्यायमूर्ती बनविणा-या राहुरी तालुक्यातील गुहा येथील समाजसेविका कौसल्याबाई गंगाधर कोळसे (वय-१०३) यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या त्या मातोश्री होत. 

  • कौसल्याबाई कोळसे यांना जिरायती जमीन असल्याने दुस-यांच्या शेतावर मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण केले.   बी. जी. कोळसे यांना न्यायमूर्ती होण्यासाठी प्रोत्साहन दिले. नानी म्हणून परिचित असलेल्या कौसल्याबाई यांच्याकडून प्रेरणा मिळाल्यानंतर कोळसे पाटील यांनी राहुरी फॅक्टरी येथे शिक्षण घेतले. गुहा येथील आठ एकर क्षेत्र जमीनीचे काय करायचे असा प्रश्न कौसल्याबाई यांनी मुलांपुढे मांडला. गंगाधर बाबा छात्रायल सुरू करण्याची संकल्पना त्यांनी उचलून धरली.

  • मुलाकडे पुण्याला न राहता त्यांनी गुहा येथे अनाथ मुलांमध्ये राहणे पसंत केले. शेकडो अनाथ मुलांच्या त्या नानी बनल्या. कौसल्याबाई कोळसे यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली(सुमन घोगर व क मल देशमुख), सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.  

  • अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणा-या कौसल्याबाई यांच्या शंभरी निमित्त सेवानिवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. आज दुपारी गुहा येथे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शनी २७ जूनला येणार पृथ्वीजवळ :
  • अमरावती : सूर्यमालेतील विलोभनीय कडा असणारा शनी ग्रह २७ जून रोजी पृथ्वीच्या खूपच जवळ येणार आहे. या दिवशी हा ग्रह अगदी सूर्यासमोर राहील. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती असे म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास पृथ्वी-शनी हे अंतर सरासरी कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुप्रसिद्ध सुंदर कडा अतिशय सुंदर दिसते. मात्र, साध्या डोळ्यांनी ती दिसणार नाही.

  • शनी-सूर्य प्रतियुती यापूर्वी १५ जून २०१७ रोजी झाली होती. शनीला एकूण ६२ चंद्र असून, सर्वांत मोठा टायटन आहे. शनिला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास १,२०,००० कि.मी. आहे. २७ जून रोजी सूर्य मावळल्यावर लगेच शनि ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. तो रात्रभर आकाशात दिसेल.

  • काळसर व पिंगट रंगाचा अगदी चमकदार असल्याने तो सहज ओळखता येईल. परंतु, त्याची कडा पाहण्याकरिता टेलिस्कोपची आवश्यकता आहे.

  • यानंतर ९ जुलै २०१९ रोजी तो पृथ्वीच्या जवळ राहील. या दिवशी पृथ्वी-शनी हे अंतर १३५ कोटी १० लक्ष कि.मी. राहील, अशी माहिती अमरावती एस.आर.पी. कॅम्प स्थित हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली. 

अर्थतज्ज्ञांचे निर्गमन दोन अरविंद आणि एक रघुराम :
  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहणाऱ्या एका ज्येष्ठ अर्थतज्ज्ञाबाबत एक किस्सा सांगितला जातो. एकदा एका पत्रकाराने त्यांना विचारले : ‘तुम्ही राष्ट्राध्यक्षांना आर्थिक सल्ला देता म्हणजे नेमके काय करता?’ त्यांचे उत्तर होते : ‘खरं तर मी राष्ट्राध्यक्ष महोदयांचा सेक्शुअल (लैंगिक) सल्लागार आहे. त्याचं काय आहे, मी जेव्हा त्यांना अर्थविषयक सल्ला देतो त्या वेळी ते हमखास म्हणतात : ‘मिस्टर, प्लीज किप युवर फकिं७ अ‍ॅडव्हाइस टू युवरसेल्फ!’

  • हा किस्सा आताच आठवण्याचे कारण म्हणजे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमणियन यांनी कार्यकाल संपविण्यापूर्वीच पद सोडण्याची केलेली घोषणा आणि त्यानंतर सुरू झालेली चर्चा. यापूर्वी निती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा अडीच वर्षांत राजीनामा देऊन अमेरिकेला परतलेले डॉ. अरविंद पानगढिया आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचे अमेरिकेला परतणे, यांचाही संदर्भ आहेच.

  • या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या मीडियामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘स्वतंत्र प्रज्ञा असलेल्या अर्थतज्ज्ञांना सांभाळणे आपल्या राजसत्तेला अवघड बनले आहे हेच... राजीनाम्यामागचे खरे कारण आहे’ इथपासून तर ‘प्रखर बुद्धिमत्तेचे लोक मोदींचे बुडते जहाज आता सोडून जाऊ लागले आहेत,’ अशी टोकाची राजकीय टीका-टिप्पणी केली गेली आहे.

  • खरे तर हे तिघे अर्थशास्त्राचे उत्तम जाणकार आहेत हे निर्विवाद! आर्थिक जगतात तिघांचाही नावलौकिक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:च्या प्रज्ञेचा ठसा उमटवून ते काही काळ मायदेशी आले आणि महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहून त्यांनी लक्षणीय योगदान दिले हेदेखील नि:संशय! या तिन्ही महानुभावांचे काम जवळून पाहण्याची संधी मला मिळाली.

शहिदांच्या पत्नीला शेतीयोग्य जमीन मिळणार :
  • मुंबई : शहीद सैनिकांच्या पत्नीला दोन हेक्टर शेतीयोग्य जमीन देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला आणखी व्यापक रुप देण्यात आले आहे. आता भारतीय सैन्यासह सशस्त्र दलातील शहीद सैनिकांच्या पत्नी अथवा कायदेशीर वारसालाही अशा स्वरुपाचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या निर्णयामुळे शहिदाची पत्नी हयात नसल्यास कायदेशीर वारसास लाभ मिळणार आहे.

  • युद्ध, युद्धजन्य परिस्थिती तसेच देशातील सर्वच क्षेत्रांतर्गत सुरक्षासंबंधी मोहिमा, चकमकी, दहशतवादी हल्ले तसेच देशाबाहेरील मोहिमेत धारातीर्थी पडलेल्या राज्यातील सैनिकांच्या पत्नीला शेतीयोग्य दोन हेक्टर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने 20 मार्च 2018 रोजी घेतला होता. आता या निर्णयात अशा अधिकाऱ्याची पत्नी किंवा ‘जवान अथवा अधिकारी यांचे कायदेशीर वारस’ असा बदल समाविष्ट करण्यात आला आहे.

  • या जमिनीचे वाटप भोगाधिकार मूल्यरहित (ऑक्युपन्सी मूल्य न आकारता) आणि विनालिलाव देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी शासकीय जमीन वाटपासंदर्भातील 1971 च्या नियमात बदल करणे आवश्यक आहे. त्या बदलांना आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. हा निर्णय भारतीय सैन्यदल किंवा सशस्त्र दलांसाठीही लागू असेल. ही जमीन प्रदान करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील.

  • यामुळे आता भारतीय सैन्य अथवा कुठल्याही सशस्त्र दलातील शहीद सैनिक अथवा अधिकाऱ्यांच्या पत्नीला किंवा वारसाला दोन हेक्टर जमीन मिळू शकणार आहे. तसेच ही जमीन देताना कुठल्याही प्रकारचे मूल्य आकारले जाणार नाही. 

अखेर सौदी अरेबियात महिलाही ड्रायव्हिंग सीटवर बसणार :
  • सौदी अरेबिया : रविवार 24 जून हा सौदी अरेबियातील महिलांसाठी ऐतिहासिक ठरला आहे. कारण आजपासून सौदीतील महिलांना वाहन चालवण्याची परवानगी मिळाली आहे. 

  • सौदी अरेबिया हा जगातील एकमेव असा देश होता, जिथे महिलांना वाहनं चालवण्यास परवानगी नव्हती. मात्र गेल्या वर्षी 27 सप्टेंबरला सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ही बंदी उठवत महिलांना दिलासा दिला. वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घेऊन लायसन्स असलेल्या महिलांना आता सौदीमध्ये वाहनं चालवता येणार आहेत. 

  • या निर्णयामुळे महिलांना वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देऊन लायसन्स दिले गेले.लायसन्स मिळाल्यानंतर अनेक महिलां आजच्या दिवसाची खूप वाट पाहत होत्या. यापूर्वी सौदीतील महिला बाहेर जाण्यासाठी नातेवाईक, टॅक्सी चालक यांसारख्या अनेक जणांची मदत घ्यावी लागायची. पण आता त्या स्वत: ड्राइव्ह करु शकतात.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८८०: ओ कॅनडाचे हे गाणे कॅनडाचे राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले गेले.

  • १९३९: सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.

  • १९८२: कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती.

  • १९९६: मायकेल जॉन्सनचा १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावून विश्वविक्रम.

  • १९९८: अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर.

  • २००१: आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकी करणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.

  • २०१०: जुलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.

जन्म

  • १८६२: रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७४)

  • १८७०: चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १८९८)

  • १८९३: द वॉल्ट डिस्नी कंपनी चे सह-संस्थापक रॉय ओ. डिस्नी यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९७१)

  • १८९७: ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडीत औंकारनाथ ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २९ डिसेंबर१९६७)

  • १८९९: मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा कोल्हापुर येथे जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७४)

  • १९०८: कथकली नर्तक गुरूगोपीनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९८७)

  • १९२७: तामिळ लेखक कवियरासू कन्नडासन यांचा जन्म.

  • १९२८: महाराष्ट्रातील लोकनेत्या मृणाल केशव गोरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै २०१२)

  • १९३७: ज्येष्ठ लेखिका अनिता मुजूमदार देसाई यांचा मसुरी येथे जन्म.

मृत्यू

  • १९०८: अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८३७)

  • १९१४: वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गरुडेश्वर, बडोदा, गुजरात येथे निधन. (तारखेप्रमाणे)

  • १९४७: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७६)

  • १९८०: भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न व्ही. व्ही. गिरी यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८९४)

  • १९९७: ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९४४)

  • २०१३: इटलीचे ४०वे पंतप्रधान एमिलियो कोलंबो यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९२०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.