चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ जून २०१९

Date : 24 June, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय महिलांची जपानवर ३-१ ने मात, पंतप्रधान मोदींनीही केलं अभिनंदन :
  • जपानच्या हिरोशीमा शहरात पार पडलेल्या FIH Series Finals स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने अंतिम फेरीत यजमान जपानवर ३-१ ने मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.

  • आशियाई खेळांचं जेतेपद मिळवलेल्या जपानची कडवी झुंज मोडून काढत भारतीय महिलांनी ऑलिम्पिक पात्रता फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही भारतीय महिला संघाचं अभिनंदन केलं आहे.

  • कर्णधार राणी रामपालने तिसऱ्या मिनीटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. जपानकडून कानोन मोरीने ११ व्या मिनीटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर भारतीय महिलांनी जपानला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. गुरजित कौरने ४५ व्या आणि ६० व्या मिनीटाला गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे.

वेस्ट इंडिज देश नाही, राष्ट्रगीतावेळी वाजवलं जातं ‘हे’ गाण :
  • इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सामना सुरु होण्याआधी प्रत्येक देशाचं राष्ट्रगीत वाजवलं जातं. वेस्ट इंडिजची टीम वर्ल्डकपमध्ये खेळत असली तरी तो एका देशाचा संघ नाहीय. कॅरेबियन प्रदेशात विविध बेटे आहेत. त्या बेटांनी मिळून वेस्ट इंडिजचा संघ तयार झाला आहे. वेस्ट इंडिज म्हणजे अनेक देशांचे मिळून कॉन्फिडरेशन संघराज्य आहे.

  • वेस्ट इंडिज हा एक देश नसल्यामुळे त्यांच्या सामन्याआधी कुठले राष्ट्रगीत वाजवले जाते असा प्रश्न काही क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो? वर्ल्डकपसह आयसीसीच्या स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिजचा सामना सुरु होण्याआधी डेव्हिड रुडर यांचं ‘रॅली राऊंड द वेस्ट इंडिज’ हे गीत वाजवलं जातं. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने या गाण्याचा स्वीकार केला आहे.

  • डेव्हिड रुडर हे कॅरेबियन प्रदेशातील यशस्वी कलाकार आहेत. त्रिनिदाद येथे रहाणारे डेव्हिड रुडर यांनी १९८८ साली ‘रॅली राऊंड द वेस्ट इंडिज’ हे गाणे लिहून संगीतबद्ध केले आहे. या गाण्यामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सर्व भावना असल्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने राष्ट्रगीताच्या जागी या गाण्याचा स्वीकार केला.

  • या गाण्यामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाच वर्णन आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू मायकेल होल्डिंग यांचाही गाण्यामध्ये उल्लेख आहे. गाण्यामधून लोकांना एकत्र येऊन वेस्ट इंडिज क्रिकेटच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा :
  • भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विरल आचार्य यांनी त्यांचा निर्धारित कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच आपले पद सोडले आहे. विरल आचार्य यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. २३ जानेवारी २०१७ ला त्यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र आपला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच त्यांनी पद सोडले आहे.

  • याआधी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी डिसेंबर महिन्यात काही खासगी कारणांमुळे राजीनामा दिला होता. विरल आचार्य यांचा समावेश आरबीआयच्या त्या बड्या अधिकाऱ्यांमध्ये होतो जे उर्जित पटेल यांच्या टीमचे सदस्य होते. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर पद सोडल्यानंतर विरल आचार्य आता न्यूयॉर्क विद्यापीठाच्या सेटर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणार आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

  • आधी उर्जित पटेल आणि त्यानंतर आता विरल आचार्य या दोघांनी सात महिन्यांच्या कालावधीत आरबीआयमधून आपले पद सोडले आहे. खासगी बाब असल्याचे सांगत उर्जित पटेल यांनी गव्हर्नरपद सोडले होते. आता विरल आचार्य यांनीही त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या सहा महिने आधीच पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हे पद का सोडले याचे कारण समोर येऊ शकलेले नाही.

आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ऋचा पुजारीची ग्रँडमास्टरच्या दिशेने वाटचाल :
  • इंडोनिशियात झालेल्या बुद्धीबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ऋचा पुजारीने ११ फेऱ्यांमध्ये ७ गुण पटकावात महिला ग्रँडमास्टर (WGM)हा नॉर्म प्राप्त केला. ११ ते २१ जून या कालावधीत निमंत्रितांच्या राऊंड रॉबिन स्पर्धेत तिने हे यश मिळवले. ग्रॅडमास्टरचा नॉर्म मिळवण्यासाठी तीन नॉर्म आवश्यक असतात. ऋचा पुजारीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

  • जागतिक बुद्धीबळ महासंघाच्या मान्यतेने व इंडोनेशियन चेस फेडरशनेच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत फ्रान्स, जॉर्जिया, भारत, रोमानिया, सिंगापूर व व्हिएतनाम या देशातून प्रत्येक एक व इंडोनेशियातील सहा अशा १२ खेळाडूंना आमंत्रित केले होते.

  • भारतातून एकमेव ऋचा पुजारीला आमंत्रित केले होते. इंडोनेशियातील योगर्टा या शहरातील ग्रँड इन्ना मॅलिओनेरो या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही स्पर्धा झाली.  या १२ खेळाडूंच्या राऊंड रॉबिन स्पर्धेमध्ये प्रत्येकाने प्रत्येकाबरोबर खेळायचे असते. महिला ग्रॅडमास्टरचा नॉर्म मिळवण्यासाठी नऊ फेऱ्यांमध्ये कमीत कमी ६.५ गुण होणे गरजेचे असते. तसेच आपला रेटींग परफॉर्मन्स २४०० च्या पुढे असवा लागतो. ऋचाने आठव्या फेरीतच ६.५ गुणांची कमाई करत महिला ग्रँडमास्टरच्या पहिल्या नॉर्मवर शिक्कामोर्तब केले.

भारतात धार्मिक हक्कांना संविधानाचे संरक्षण :
  • भारतीय संविधानाचे संरक्षण लाभलेल्या हक्कांविषयी प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार परदेशी सरकारला नाही, अशी भूमिका घेत, अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात भारत अपयशी ठरल्याचा अमेरिकेचा धार्मिक स्वातंत्र्य अहवाल भारताने रविवारी सपशेल फेटाळला.

  • भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते  रवीशकुमार यांनी अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य अहवालावर भारताची ठोस प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘‘भारताची ओळख धर्मनिरपेक्ष राष्ट्र अशी आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमची  लोकशाही संवेदनशील आणि सजग आहे. आम्ही कायद्याच्या राज्याला बांधील आहोत. कुठल्याही परदेशी सरकारला आमच्या नागरिकांच्या घटनात्मक हक्कांसंदर्भातील स्थितीवर टिप्पणी करण्याचा अधिकार नाही,’’ असे रवीशकुमार यांनी स्पष्ट केले.

  • परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनीच अमेरिकेचा धार्मिक स्वातंत्र्य अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यांनी २५-२७ जूनच्या आपल्या भारत दौऱ्यात या अहवालाच्या आधारे काही मुद्दे उपस्थित केल्यास परराष्ट्र मंत्रालय त्यांना उत्तर देणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ २५ जूनला भारतात येत आहेत. त्यापूर्वीच अमेरिकेने धार्मिक स्वातंत्र्य अहवाल प्रसिद्ध केला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १४४१: इटन कॉलेजची स्थापना.

  • १८८०: ओ कॅनडाचे हे गाणे कॅनडाचे राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले गेले.

  • १९८२: कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती.

  • १९९६: मायकेल जॉन्सनचा १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावून विश्वविक्रम.

  • १९९८: अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर.

  • २००१: आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकी करणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.

जन्म 

  • १८६२: रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १९७४)

  • १८७०: चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १८९८)

  • १८९३: द वॉल्ट डिस्नी कंपनी चे सह-संस्थापक रॉय ओ. डिस्नी यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९७१)

  • १८९७: ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडीत औंकारनाथ ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २९ डिसेंबर१९६७)

  • १८९९: मराठी रंगभूमीवरचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा कोल्हापुर येथे जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९७४)

  • १९२८: महाराष्ट्रातील लोकनेत्या मृणाल केशव गोरे यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै २०१२)

  • १९३७: ज्येष्ठ लेखिका अनिता मुजूमदार देसाई यांचा मसुरी येथे जन्म.

मृत्यू 

  • १९०८: अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८३७)

  • १९१४: वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचा गरुडेश्वर, बडोदा, गुजरात येथे निधन. (तारखेप्रमाणे)

  • १९९७: ओडिसी नर्तिका संयुक्ता पाणिग्रही यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९४४)

  • २०१३: इटलीचे ४०वे पंतप्रधान एमिलियो कोलंबो यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९२०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.