चालू घडामोडी - २४ मे २०१८

Date : 24 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री, जी परमेश्वर उपमुख्यमंत्री :
  • बंगळुरु: जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेसचे जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहतील.

  • राज्यपाल  वजूभाई वाला यांनी एच डी कुमारस्वामी  आणि जी परमेश्वर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. देशभरातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बंगळुरुत भव्य असा शपथविधी सोहळा पार पडला.

  • औपचारिकरित्या आजपासून कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार सत्तेवर आलं. काँग्रेसचे आमदार के. आर. रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील. मंगळवारी काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • अवघ्या 55 तासात भाजप नेते येडियुरप्पा यांनी शनिवारी 19 मे रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज कुमारस्वामी यांचा शपथविधीचा मुहुर्त ठरला होता.

  • यासाठी देशभरातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधील, शरद पवार, ममता बॅनर्जींसह दिग्गजांचा समावेश होता.

देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावती, औरंगाबादमध्ये :
  • मुंबई:  सलग 11 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यानं मोदी सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट उमटताना दिसत आहे.

  • आज पुन्हा पेट्रोल 30 तर डिझेलचा दर लीटरमागे 20 पैशांनी वाढला आहे.  देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे.

  • अमरावतीतील पेट्रोलचा आजचा दर 86.52 रुपये तर डिझेल 74.11 रुपये आहे.

  • त्याखालोखाल सिंधुदुर्गात पेट्रोल 86.31 रुपये तर डिझेल 72.89 रुपये प्रति लिटर आहे.

  • तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 86.23 रुपये तर डिझेल 73.91 रुपये आहे.

  • मुंबईत वाढलेल्या दरानुसार पेट्रोलचे दर 85.29 इतके झाले आहेत. तर डिझेल 72.96 रुपये प्रति लिटर मिळत आहे.

जगातील पहिला उडता वायरलेस रोबो, नांदेडच्या तरुणाचं यश :
  • नांदेड/वॉशिंग्टन : युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये जगातल्या पहिल्या, सर्वात लहान, वायरलेस, उडणाऱ्या रोबोचा शोध लावण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे ह्या शोधामध्ये महाराष्ट्राचं कनेक्शन आहे. मूळचे नांदेडचे असलेले संशोधक योगेश चुकेवाड आणि त्यांच्या टीमने हा शोध लावला आहे.

  • योगेश चुकेवाड अमेरिकेत संशोधक म्हणून काम करतात. या रोबोचा आकार पेन्सिलच्या टोकाएवढा असून वजन 190 मिलिग्राम आहे. अमेरिकेतल्या किरो 7 या वाहिनीवरुन सोमवारी (21 मे) या उडत्या रोबोचं प्रक्षेपण करण्यात आलं. तर ब्रिस्बेनमधल्या कॉन्फरन्समध्ये योगेश चुकेवाड आज (23 मे) हा शोध सादर करणार आहेत.

  • रोबोफ्लाय कसा काम करतो - सर्किटवरचा मायक्रोकंट्रोलर हा या रोबोच्या मेंदूसारखा आहे. कुठला पंख किती वेगात फडफडायचा याचा संदेश तो देतो. अवघड मार्गातून आपली वाट शोधण्याची क्षमता रोबोफ्लायमध्ये असावा असा आमचा प्रयत्न आहे. वायू गळती आणि पिकांची देखभाल करण्यासाठी होईल, असं संशोधक योगेश चुकेवाड यांनी सांगितलं.

  • कोण आहेत योगेश चुकेवाड - योगेश चुकेवाड हे ज्येष्ठ बालसाहित्यिक माधव चुकेवाड यांचे चिरंजीव आहेत. योगेश यांचं शिक्षण नांदेडच्या महात्मा फुले विद्यालयात झालं. त्यानंतर त्यांनी आयआयटी मुंबईतून बी. टेक केलं तर अमेरिकेत एम. एस. पूर्ण केलं. आता ते युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमध्ये पीएच.डी करत आहेत.

वैज्ञानिक झालो त्याची गोष्ट :
  • गाव काटेपूर्णा (कुरणखेड), जिल्हा अकोला. बालवाडी ते दहावीपर्यंतचं शिक्षण या गावातच झालं. इथं आपण एक नंबरी होतो. जून १९९२. गावं सुटलं, पुढची दोन वर्षं श्री शिवाजी कॉलेज, अकोला. इथं गंमत सुरू झाली. मी ‘खानदानी’ मराठी माध्यमातून शिकलो. इकडे सायन्स घेतलं. इंग्रजी मीडिअम.

  • पहिले सहा महिने रोज संध्याकाळी आपलं ‘रडणं’ सुरू व्हायचं.. मला इंग्रजी समजत नाही, मी ‘आटर््स’ घेतो’. मला माझी मावशी सांगायची, ‘थोड्या दिवसांत जमून जाईल’. कॉलेजमध्ये माझ्यासारखा मित्र भेटला.. श्याम माहोरे. दोघंही ‘बॉटनी’चा वर्ग सोडत नव्हतो, कारण तेवढंच समजत होतं.

  • आॅक्टोबर १९९२ मध्ये ‘ट्युशन’ सुरू झाल्या. रोज जवळपास पंचवीस किलोमीटरची ‘सायकल’ चालवून, बऱ्यापैकी जम बसला. पण शेवटी इंग्रजीनं दगा दिला. घरी ‘रणकंदन’. तेवढ्यात आमचं अकोल्यात होतं ते बिºहाड गावात स्थलांतरित झालं. रि-अ‍ॅडमिशन घेतली आणि रूम करून राहत होतो, रविनगर अकोला. बारावी पास झालो.

  • अ‍ॅडमिशनकरता ‘कृषी महाविद्यालय’ अकोल्याची ‘आस’ घेऊन होतो, पण मिळालं नागपूर, सप्टेंबर १९९५, आपली रवानगी ‘ओल्ड होस्टेल, ‘कृषी महाविद्यालय’. रॅगिंग, सामाजिक सलोखा आणि इतर शिकवण सगळं मजेदार होतं.

  • सोबतीचे बहुतेक वर्गमित्र पत्ता सांगताना मु+पो.+ता+जि. असंच सांगायचे. सगळेच ग्रामीण. इथं भेटला किंगमेकर ‘नित्या’ ऊर्फ आजचा डॉ. योगेश इंगळे. चार वर्षे गेली, डिग्री हातात आली, पुढे काय करायचं कळतच नव्हतं.

  • आमच्या आधीच्या बॅचमध्ये २०-२२ सिनिअर एम.एस्सी. कृषीकरता होणारी राष्टÑीय पातळीवरची परीक्षा पास झाले आणि राज्याबाहेर शिकायला गेले. त्याला ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप’ मिळत होती. आपण तेच करायचं ‘असं’ ठरवून ‘अभ्यास’ केला. निकाल ‘येरे माझ्या मागल्या’. आपल्याकरता एम.एस्सी.चे दरवाजे बंद. १९९९ गेलं. सन २०००. परत एम.एस्सी. एण्ट्रन्सच्या तयारीला लागलो. यावेळेस म्हणजे जानेवारी ते एप्रिल २००० पर्यंत लहान भावासोबत राहिलो अकोल्यात. तो बी.एच.एम.एस. करत होता. (source : Lokmat)

पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच राहणार - केंद्र सरकार :
  • मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता मावळली आहे. सोईसुविधांसाठी दरवाढ होतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे.

  • वाढत्या इंधन दरवाढीबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, दिलासा तर नाहीच पण पेट्रोल दरवाढीबाबत मोठा झटका बसला आहे.

  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याउलट पेट्रोलियम उत्पादनातून मिळणाऱ्या कराचा वापर महामार्ग आणि एम्ससारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रुग्णालयांच्या निर्मितीसाठी करण्यात येतो, अशी माहिती केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.

  • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर रविशंकर प्रसाद यांना पत्रकारांनी इंधन दरवाढीबाबत प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डीझेलच्या किमती कमी होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८४४: तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.

  • १९४०: इगोर सिकोरसकी यांनी एका-रोटर हेलिकॉप्टर चे यशस्वी उड्डाण केले.

  • १९७६: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.

  • १९९१: एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९९४: २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

  • २०००: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.

  • २००१: १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.

जन्म

  • १८१९: इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९०१)

  • १९२४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८४)

  • १९४२: पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांचा जन्म.

  • १९५५: संगीतकार राजेश रोशन यांचा जन्म.

मृत्यू

  • १९५०: भारताचे ४३वे गर्वनर जनरल आर्चिबाल्ड वावेल यांचे निधन. (जन्म: ५ मे १८८३)

  • १९८४: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. चे स्थापक विन्स मॅकमोहन सीनिय यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९१४)

  • १९९५: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचे निधन. (जन्म: ११ मार्च १९१६)

  • १९९९: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक विजयपाल लालाराम तथा गुरू हनुमान यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९०१)

  • २०००: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.