चालू घडामोडी - २४ नोव्हेंबर २०१७

Date : 24 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पी. व्ही. सिंधू हाँगकाँग सुपर सीरिजच्या उपांत्यपूर्व फेरीत :
  • भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने हाँगकाँग बॅडमिंटन सुपर सीरिजच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. जपानच्या आया ओहोरीचा सिंधूने २१-१४, २१-१७ ने पराभव केला असून उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना चीनच्या अकाने यामागुचीशी होण्याची शक्यता आहे.

  • हाँगकाँगमधील कोवलून येथे हाँगकाँग बॅडमिंटन सुपर सीरिज सुरु असून या स्पर्धेत गुरुवारी सिंधूचा सामना जपानच्या आया ओहोरीशी होता. सिंधूने एकहाती सामना जिंकला. सिंधूने पहिला सेट २१-१४ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ओहोरीने प्रत्युत्तर दिले.

  • मात्र सिंधूसमोर ती तग धरु शकली नाही. सिंधूने दुसरा सेट २१-१७ ने जिंकला. लागोपाठ दुसऱ्या सामन्यात सिंधूने सरळ दोन गेम्समध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात केली.

  • द्वितीय मानांकित सिंधूने बुधवारी हाँगकाँगच्या लियुंग येईतवेईवर मात केली होती. २१-१८ आणि २१- १० ने तिले येईतवेईवरचा पराभव केला होता. एकीकडे सिंधूने विजय मिळवला असला तरी जागतिक रँकिंगमध्ये तिची घसरण झाली आहे. सिंधू गुरुवारी तिसऱ्या स्थानावर घसरली. (source :loksatta)

नासाची ड्रोन रेस, कृत्रिम बुद्धिला मानवाने हरवले :
  • वॉशिंग्टन : नासाने घेतलेल्या एका चाचणीत मानवी पायलटने कृत्रिम बौद्धिकतेवर आधारित (एआय) प्रणालीवर मात करत आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. या चाचणीत जागतिक स्तरावरील ड्रोन पायलट केन लू यांनी आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडली.

  • नासाचे हे विशेष ड्रोन १२९ किमी प्रति तास या वेगाने जाऊ शकतात. पण, नासाच्या जेट प्रोपल्सन लॅबोरेटरीचे (जेपीएल) ड्रोन प्रति तास ४८ ते ६४ किमी उडू शकत होते. जेपीएलचे प्रोजेक्ट मॅनेजर रॉब रिड यांनी सांगितले की, आपण पाहू शकता की, एआयव्दारे ड्रोन सहजपणे उडत होते.

  • पण, मानवी पायलटचे ड्रोन आक्रमकपणे उडत होते. त्यामुळे त्यांचा मार्ग धक्क्यांचा होता. लू यांनी एक उच्च गती प्राप्त केली होती. त्यांचे उड्डाणही प्रभावी होते. तरीही त्यांच्यात थकवा जाणवत नव्हता. याबाबत बोलताना लू म्हणाले की, मी आतापर्यंत केलेल्या उड्डाणात हा अनुभव वेगाच्या दृष्टीने संस्मरणीय होता.(source :lokmat)

कर्तृत्वाला नवे पंख; पहिली महिला वैमानिक नौदलातही घेणार भरारी :
  • कुन्नुर : भारतीय हवाईदलानंतर आता भारतीय नौदलातही पहिली महिला वैमानिक भरारी घेणार आहे. नौदलाच्या विमानाचे सारथ्य करणारी पहिली वैमानिक होण्याचा मान शुभांगी स्वरूप या उत्तर प्रदेशातील २० वर्षांच्या तरुणीला मिळाला आहे.

  • येथून जवळच असलेल्या एझिमला नौदल अकादमीत नव्याने प्रशिक्षित कॅडेट््सचा दीक्षांत समारंभ पार पडला. प्रशिक्षण काळात दाखविलेल्या तयारीच्या जोरावर शुभांगी स्वरूप हिची वैमानिक शाखेसाठी निवड झाली.

  • पहिलीच वैमानिक...नौदलाच्या दक्षिण कमांडचे प्रवक्ते कमांडर श्रीधर वारियर म्हणाले की, हवाई वाहतूक नियंत्रक व विमानातील दळणवळण व शस्त्रास्त्र यंत्रणेवर लक्ष ठेवणाºया ‘निरीक्षक’ म्हणून महिला याआधीपासून नौदलाच्या हवाई शाखेत काम करीत आहेत. परंतु महिलेची वैमानिक म्हणून निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  • शुभांगीचे वडील ज्ञान स्वरूप नौदलात कमांडर आहेत. या निवडीने शुभांगी व तिच्या वडिलांची जणू स्वप्नपूर्ती झाली आहे. इतर सेवांतही आता महिला याखेरीज नौदलाच्या सेवेत इतकी वर्षे केवळ पुरुष काम करीत असलेल्या आणखी एका शाखेतही महिलांनी प्रथमच प्रवेश मिळविला आहे.(source :lokmat)

ना डिझेलवर, ना एलपीजीवर, बस धावणार चक्क कॉफीवर :
  • लंडन : कॉफी प्यायल्यानंतर फ्रेश वाटतं, उत्साही वाटतं, असं आपण अनेकदा म्हणतो. पण आता हिच कॉफी इंधन म्हणून वापरली जाते, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर, तुमचाही विश्वास बसणार नाही. पण लंडनमध्ये हे खरंच होतं आहे.

  • लंडन शहरातल्या सार्वजनिक वाहतुकीचा मोठा आधार असलेल्या बसमध्ये इंधन म्हणून चक्क कॉफीच्या चोथ्यापासून तयार करण्यात आलेल्या तेलाचा वापर केला जात आहे.

  • सध्या प्रायोगिक तत्वावर ही मोहीम लंडन शहरात सुरु करण्यात आली. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर हेच इंधन इतर वाहनांसाठीही वापरता येईल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

  • लंडनमधील ‘बायो-बीन लिमिटेड’ या कंपनीने हा प्रयोग राबवला आहे. कंपनीने एका वर्षात कॉफीच्या वेस्टपासून बनवलेल्या तेलाचा साठा बस चालवण्यासाठी तयार करुन ठेवला आहे.

  • कंपनीच्या अहवालानुसार, लंडनमधील नागरिकांच्या कॉफी सेवनानंतर उरलेल्या चोथ्यामधून वर्षभरात दोन लाख टन कचरा तयार होतो. हाच कचरा कंपनीने कॉफीची दुकाने आणि कॉफीवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांकडून विकत घेऊन, त्यापासून तेल निर्मिती केली आहे.(source :abpmajha)

मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू भूषण गगरानी :
  • मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी नेमलेल्या शोध समितीत सरकारी प्रतिनिधी म्हणून भूषण गगरानी यांची निवड करण्यात आली आहे.

  • याशिवाय विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय परिषदेच्या सदस्यांपैकी एका सदस्याची निवड लवकरच करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. तसेच मेरिट ट्रॅक कंपनीची गच्छंती करण्याचे संकेतही दिले.

  • निकालाची ऐशीतैशी करणार्‍या मेरिट ट्रॅक कंपनीविरोधात राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने तयार केलेला अहवाल उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यपालांना पाठवल्याची माहिती तावडे यांनी दिली. यासंदर्भात नवे कंत्राट काढण्याचा विचार असून, त्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक असल्याचे तावडे यांनी या वेळी सांगितले.

  • विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांची नियुक्ती तुर्तास टळली आहे.

  • मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा पूर्ण होईपर्यंत नेटके यांची नियुक्ती करू नये, अशी विनंती मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी.ए. चोपडे यांनी राजभवनास केली होती. परिणामी, आणखी काही दिवस घाटुळे यांच्याकडे ही जबाबदारी असेल.

व्हॉल्ट’संबंधी रिझर्व्ह बॅँकेचे नियम जाणून घ्या :
  • नागपूर : लॉकर रूमसंबंधी रिझर्व्ह बँकेचे नियम जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने रिझर्व्ह बँकेच्याच एका सेवानिवृत्त मुख्य सुरक्षा अधिका-याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती वाचकांसाठी देत आहोत..हल्ली रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बनविलेल्या लॉकर रूम्स भारतातही तयार होतात. त्यात गोदरेज, येल, ओझोन, स्टील एज, रोलेक्स, मीरा अरबिंदो या कंपन्या आघाडीवर आहेत.

  • रिझर्व्ह बँकेचे स्ट्राँग रूम व लॉकर रूमसाठी नियम, स्ट्राँग रूम/लॉकर रूमसाठी निवडलेल्या जागेला तिन्ही बाजूंनी सिमेंट काँक्रिटच्या भिंती बांधून मुख्य इमारतीपासून वेगळे करणे आवश्यक आहे. शिवाय लॉकर रूमचा तळ सिमेंट अथवा १८ मि.मी. लोखंडी प्लेटचा असणे आवश्यक.

  • सिमेंट काँक्रिटच्या या भिंतीची जाडी कमीतकमी एक फूट असणे आवश्यक आहे. स्ट्राँग रूम/लॉकर रूमचा दरवाजा

  • १ मीटर (३.२५ फूट)पेक्षा अधिक नको व दरवाजाला दोन्हीकडून सरकत जाणारी लोखंडी ग्रिल असणे आवश्यक आहे. हा दरवाजा फक्त २१ इंच उघडा ठेवावा व एकावेळी एकच व्यक्ती आत/बाहेर जाऊ शकेल.

  • लॉकर रूमचा दरवाजा जनतेला दिसणार नाही अशा तºहेने झाकलेला असावा.

  • लॉकर रूममध्ये बँक अधिकारी व ग्राहक अशा दोनच व्यक्ती एकावेळी उपस्थित असाव्यात.

  • लॉकर दोन चाव्यांनी उघडणारे असावे. यापैकी एक चावी ग्राहकाकडे व दुसरी बँकेकडे असावी.

  • संपूर्ण लॉकर रूममध्ये अलार्म सिस्टिम असणे व तिचा आवाज १ कि.मी.पर्यंत ऐकू येणे आवश्यक आहे.

  • लॉकर रूम असणाºया इमारतीत आत व बाहेर सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे.

  • संपूर्ण इमारतीसमोर सशस्त्र सुरक्षा रक्षक २४ तास असणे आवश्यक.

  • लॉकरचा आकार - अ श्रेणीसाठी ४.५ इंच, ५.७५ इंच, २०.७५ इंच, तर छ/ङ श्रेणीसाठी १५.५ इंच, १९.७५ इंच, २०.७५ इंच असावा.

  • लॉकर रूम वेगळी - असेल तर तळ व बाजूच्या भिंती व दरवाजा १८ मिमी लोखंडी प्लेटचा असणे आवश्यक. इंडियन कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅक्टच्या कलम १५२ प्रमाणे लॉकरच्या बाबतीत बँक/ लॉकर कंपनी व ग्राहक यांचे नाते घरमालक व भाडेकरूचे निश्चित केले आहे. त्यामुळे लॉकर फोडून चोरी झाली तरी ग्राहकाच्या नुकसानीसाठी बँक/लॉकर कंपनी जबाबदार नसते.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • भारतीय ग्राहक दिन.

महत्वाच्या घटना

  • १७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद.

  • १८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.

  • १९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.

  • १९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.

  • १९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.

  • १९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.

  • १९९२: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर.

  • १९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.

  • १९९८: समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.

  • २०००: भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.

जन्म

  • १८७७: भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.

  • १८९४: इंग्लिश क्रिकेटपटू हर्बर्ट सटक्लिफ यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७८)

  • १९१४: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल २००३)

  • १९३७: मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.

  • १९४१: भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म.

  • १९६१: बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म.

मृत्य

  • १९१६: मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)

  • १९४८: मदर्स डे च्या संस्थापिका अॅन्ना जर्व्हिस यांचे निधन. (जन्म: १ मे १८६४)

  • १९६३: महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री मारोतराव कन्नमवार यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी१९००)

  • १९६३: राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९३९)

  • २००३: अभिनेत्री टुनटुन यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२३)

  • २००४: जगप्रसिद्ध लेखक आर्थर हेली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)

  • २०१४: भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९३७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.