चालू घडामोडी - २४ ऑक्टोबर २०१७

Date : 24 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारतीय तरुणांना इसिसमध्ये भरती होण्यास प्रवृत्त करणा-या आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समधून केली अटक
  • मनिला : भारतीय तरुणांत कट्टरता रुजवून, त्यांनी इस्लामिक स्टेट (इसिस) मध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहन देणा-या कारेन आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समध्ये अटक करण्यात आली आहे.

  • एनबीआयच्या पथकाने मनिला येथील घरातून कारेन आयशाला अटक केली. कारेन आयशा भारतीय वंशाची आहे. भारत व अन्य देशांतील तरुणांनी इसिसमध्ये सहभागी व्हावे, यासाठी ती आॅनलाइन प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावत होती.

  • आयशा हमीडॉनचा पती मोहम्मद जाफर माकवीद फिलिपीन्समधील दहशतवादी कृत्यांत सहभागी झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर आयशा इसिसाठी काम करीत होती.

दलाई लामांना भेटणे हा आम्ही अपमान मानू, चीनचा इतर देशांना इशारा
  • बीजिंग : तिबेटी समाजाचे धर्मगुरू दलाई लामा हे चीनच्या मुख्य भूमीपासून तिबेट वेगळे काढू पाहत असल्याने आमच्या दृष्टीने ते ‘फुटीरवादी’ आहेत.

  • त्यामुळे कोणत्याही देशाने त्यांचा पाहुणचार करणे किंवा त्यांना भेटणे हा आम्ही आमचा अपमान समजू, असा इशारा चीनने इतर देशांना दिला आहे.

  • सध्या येथे सुरू असलेल्या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या १९ व्या राष्ट्रीय काँग्रेसच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना चीन सरकारचे एक कार्यकारी उपमंत्री झांग यीजोंग म्हणाले की, परदेशांनी चीनशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करताना तिबेट हा चीनचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले असल्याने दलाई लामांशी संबंध ठेवणे म्हणजे त्या वचनाचा भंग करणे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऊर्जा बचतीच्या क्लस्टर्समध्ये महाराष्ट्राला स्थान नाही!
  • मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊर्जा बचतीसाठी अनेक योजना आणि प्रकल्पांची घोषणा केली असली, तरीही महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असलेल्या महाराष्ट्राकडे याबाबतही दुर्लक्ष केल्याचे दिसते.

  • औद्योगिक खर्च कमी करण्यासाठी देशभरातील दहा लघु व मध्यम उद्योग क्लटर्समध्ये शासनाच्या अनुदानातून ऊर्जा बचतीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यात महाराष्ट्राला स्थान देण्यात आलेले नाही.

  • मात्र एकट्या गुजरातमधील दोन क्लस्टरची वर्णी लावण्यात आली आहे, अशी माहिती सोमवारी एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिस लिमिटेड (ईईएसएल)चे मुख्य महाव्यवस्थापक (तांत्रिक) एस.पी. गरनाईक यांच्याकडून मिळाली.

  • ईईएसएल ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेली कंपनी आहे. केंद्राचे ऊर्जा बचत आणि अपारंपरिक ऊर्जा वापराच्या प्रचार आणि प्रसाराचे काम ईईएसएलच्या माध्यमातून चालते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना :

  • १६०५: मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.

  • १८५१: विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.

  • १८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.

  • १९०१: एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.

  • १९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.

  • १९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.

  • १९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.

  • १९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.

  • १९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.

  • २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

  • २०१६: सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.

जन्म :

  • १७७५: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १८६२)

  • १८६८: औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)

मृत्यू :

  • १६०१: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १५४६)

  • १९२२: कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८३९)

  • १९४४: रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७७)

  • २०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एस. एस. राजेंद्रन यांचे निधन.

  • १९९२: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.