चालू घडामोडी - २४ ऑक्टोबर २०१८

Date : 24 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एम नागेश्वर राव यांची सीबीआयचे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती :
  • सीबीआयमधील उच्चपदस्थांमध्ये संघर्ष सुरु असून अखेर केंद्र सरकारने मध्यस्थी करत दखल घेतली आहे. केंद्र सरकारने कडक पाऊलं उचलत सीबीआय प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

  • आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांच्याकडे सीबीआय प्रभारी संचालकपद सोपवण्यात आलं आहे. 1986 च्या बॅचमधील ओडिशा कॅडरचे आयपीएस अधिकारी राव तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्याचे रहिवासी आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या विशेष पथकाने आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्या कार्यालयात छापेमारी केली असून 10 आणि 11 मजला सील केला आहे.

  • केंद्र सरकारने यासंबंधी आदेश जारी करत तात्काळ स्वरुपात आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांची नियुक्ती केली आहे. महत्त्वाचं म्हणजे विशेष संचालक अस्थाना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एफआयआरमध्ये मांस निर्यातदार मोईन कुरेशी याच्याडून तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतली.

  • आलोक वर्मा यांची पंतप्रधानांसोबत झालेल्या भेटीनंतर एका तासात प्रकरणाशी संबंधित उप अधीक्षक देवेंदर कुमार यांना अटक करण्यात आली, यानंतर काही वेळात अनेक अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.

हाँगकाँग-मकाऊला जोडणारा जगातील सर्वात लांब सागरी पूल :
  • बीजिंग : मकाऊ आणि हाँगकाँग या शहरांना जोडणाऱ्या जगातील सर्वात लांब सागरी पूलाचं उद्घाटन झालं. 55 किलोमीटर लांबीचा हा पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुलाचं उद्घाटन केलं.

  • पर्ल नदीच्या मुखापाशी लिंगडिंगयांग उपसागरात बांधलेला हा जगातील सर्वात लांब सागरी पूल आहे. पुलाचं बांधकाम डिसेंबर 2009 मध्ये सुरु झालं होतं. 20 बिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे एक लाख 47 हजार कोटी रुपये खर्च करुन हा पूल उभारण्यात आला.

  • हाँगकाँग आणि मकाऊ या दोन शहरांमध्ये मिळून 6 कोटी 80 लाख नागरिक राहतात. या पुलामुळे दोन शहरांमधील अंतर तीन तासांवरुन अवघ्या 30 मिनिटांवर आलं आहे.

  • या सागरी पुलामध्ये पाण्याखालून जाणाऱ्या बोगद्यांचाही समावेश आहे. वाढतं बजेट, भ्रष्टाचाराचे आरोप आणि कामगारांचे मृत्यू यामुळे पुलाचं बांधकाम होण्यास नऊ वर्षांचा कालावधी लागल्याचं म्हटलं जातं.

अखेर शिवस्मारकाची पायाभरणी, आजपासून प्रत्यक्ष काम सुरू :
  • मुंबई: बहुचर्चित असणाऱ्या शिवस्मारकाचं बांधकाम आजपासून सुरु होणार आहे. आज दुपारी 3 वाजता शिवस्मारकाच्या पायाभरणीचं काम सुरु होणार आहे. एल अँड टी अर्थात लार्सेन आणि टुब्रो कंपनीकडून आज प्रत्यक्षात समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. पुढच्या 36 महिन्यांत अर्थात ३ वर्षात काम पूर्ण करण्याचं ध्येय ठेवून हे शिवस्मारक बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वोच्च स्मारक असा या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा लौकीक असणार आहे.

  • हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे.  आघाडीच्या सरकारच्या काळात हे  स्मारक घोषित झाले. या स्मारकासाठी भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर स्मारकासाठी आवश्यक परवानग्या दोन वर्षांत मिळाल्या. तसेच या स्मारकाचे जलपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

  • अरबी समुद्रात १५ हेक्टरच्या खडकावर हे स्मारक उभारले जाणार असून स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा खर्च राज्य सरकारने अंदाजे अडीच हजार कोटी रुपये नि‌श्चित केला आहे. या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जागतिक निविदा मागविण्यात आल्या होत्या.

  • त्यात एल अॅन्ड टी, रिलायन्स ‌इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या तीन कंपन्यानी ‌निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यात एल अॅन्ड टी या कंपनीची निविदा ही सर्वात कमी किमतीची असल्यामुळे या कंपनीला स्मारक उभारण्याचे काम सोपविले आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ३ हजार ८२६ कोटी रुपयांची निविदा दिली आहे.

आलोक वर्मा, राकेश अस्थाना सक्तीच्या रजेवर; नागेश्वर राव अंतरिम संचालकपदी :
  • नवी दिल्ली: सीबीआयच्या वरिष्ठांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धात आता मोदी सरकारनं हस्तक्षेप केला आहे. सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सरकारनं सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. वर्मा यांच्या जागी एम. नागेश्वर यांची अंतरिम संचालकरदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे सहसंचालकपदाची जबाबदारी होती. नागेश्वर राव 1986 च्या ओदिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. 

  • आलोक वर्मा, राकेश अस्थाना यांच्यावर लाचखोरीचे आरोप आहेत. सीबीआयमधील या शीर्षस्थ अधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्यानं मोदी सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली. त्यामुळे वर्मा यांच्या जागी नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राव यांच्याकडे तातडीनं अंतरिम संचालकपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. सीबीआयनं स्वत:च्याच कार्यालयात छापा टाकून विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. मांस निर्यातदार मोईन कुरेशीकडून ३ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप अस्थाना यांच्यावर आहे. 

  • CBI vs CBI: काय आहे नेमकं प्रकरण?, कशावरून घडलं महाभारत -  सीबीआय अधिकाऱ्यांमधील या विकोपाला गेलेल्या वादाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. सोमवारी आलोक वर्मा यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. आलोक वर्मा मोदींना भेटल्यानंतर तासाभरात सीबीआयच्या एसआयटीचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सीबीआयने अनेक अधिकाऱ्यांच्या घरी-ऑफिसांवर धाडी टाकल्या.

  • देशातील सर्वात मोठ्या तपास संस्थेत पहिल्यांदाच दोन अधिकाऱ्यांमध्ये एवढी मोठी लढाई पाहायला मिळत आहे. राकेश अस्थाना आणि देवेंद्र कुमार यांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. सीबीआयचे डिएसपी देवेंद्र कुमार यांनी लाचखोरी प्रकरणातील अटकेविरोधात मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

रेल्वेने बनवली इंजिनाविना धावणारी ट्रेन, गाठणार ताशी २०० किमी वेग :
  • नवी दिल्ली - भारतीय रेल्वेमध्ये ट्रेन चालवण्यासाठी डिझेल किंवा इलेक्ट्रिक इंजिनांचा वापर केला जातो. पण भारतीय रेल्वेनेही आता आधुनिकीकरणाच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, रेल्वेच्या तामिळनाडूमधील कारखान्यात इंजिनाविना धावणारी ट्रेन तयार करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणारी ही ट्रेन ताशी 160 ते 200 किमी वेग गाठू शकते.

  • ट्रेन-18 असे या ट्रेनचे नामकरण करण्यात आले आहे. ही ट्रेन संपूर्णपणे संगणकीकृत असून, ती बुलेट ट्रेनच्या धर्तीवर विकसित करण्यात आली आहे. ही ट्रेन बनवण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च आला असून,  तिच्या बांधणीसाठी दीड वर्षाचा कालावधी लागला. या ट्रेनमध्ये 16 एसी आणि दोन एक्झिक्युटिव्ह क्लासचे डबे असतील, अशी माहिती या ट्रेनची बांधणी करणाऱ्या इंटिग्रल कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक सुधांशू मणी यांनी दिली.

  •  या ट्रेनमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष असे दोन बाथरूम आणि बेबी केअरसाठी विशेष स्थान देण्यात आलेआहे. तसेच ट्रेनच्या कोचमध्ये खास स्पेनमधून मागवण्यात आलेल्या सीट बसवण्यात आल्या आहे. या सीटचे वैशिष्ट्य म्हणजे या सीट पूर्ण 360 अंशांमध्ये वळू शकतात.

  •  अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही ट्रेन सुमारे 160 ते 220 किमी वेगाने धावू शकते. आणीबाणीच्या परिस्थितीत ट्रेनच्या ड्रायव्हरशी संवाद साधता यावा यासाठी टॉक बॅक सुविधाही देण्यात आली आहे. अशी ट्रेन परदेशातून आयात केली असती तर सुमारे 170 कोटी रुपये खर्च आला असता. मात्र स्वदेशात या ट्रेनची बांधणी करण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च झाले. 

आॅस्ट्रेलियात शीख व्यक्तीवर वांशिक टीका :
  • मेलबोर्न : पोर्ट आॅगस्टा शहर परिषदेची निवडणूक लढवत असलेले शीख समाजाचे नेते सनी सिंग यांच्यावर ट्रकमधून जात असलेल्या एकाने वांशिक टीका केली. सिंग यांच्या प्रचारासाठी बनवलेल्या जाहिरात फलकावर ही टीका करण्यात आली.

  • माझ्यावर माझ्या वंशावरून स्थानिक समाजातून समाज माध्यमात व्हिडिओद्वारे टीकेला तोंड देण्याची ही माझी पहिलीच वेळ होती, असे सनी सिंग म्हणाले. फेसबुक पेजवर टाकण्यात आलेल्या व्हिडिओत सिंग यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

दिनविशेष :
  • संयुक्त राष्ट्र दिन / जागतिक विकास माहिती दिन / जागतिक पोलियो दिन

महत्वाच्या घटना 

  • १८५१: विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.

  • १८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.

  • १९०१: एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.

  • १९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.

  • १९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.

  • १९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.

  • १९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.

  • १९७२: दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.

  • १९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.

  • १९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

  • २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

  • २००२: सलमान खान यांचा पुन्हा जमीन मंजूर आणि सुटका.

  • २००३: कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.

  • २०१६: सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.

जन्म 

  • १७७५: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १८६२)

  • १८६८: औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)

  • १९१०: मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीला ऊर्फ माई भालजी पेंढारकर यांचा जन्म.

  • १९२१: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी २०१५)

  • १९२६: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)

  • १९३५: भारतीय पत्रकार आणि लेखक म्हणून मार्क टुली यांचा जन्म.

  • १९६३: भारतीय अमेरिकन उद्योगपती अरविंद रघुनाथन यांचा जन्म.

  • १९७२: अभिनेत्री व मॉडेल रीमा लांबा ऊर्फ मल्लिका शेरावत यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६०१: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १५४६)

  • १९२२: कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८३९)

  • १९४४: रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७७)

  • १९९२: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)

  • १९९५: पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने यांचे निधन.

  • २०१३: पार्श्वगायक प्रबोधचंद्र तथा मन्ना डे यांचे निधन. (जन्म: १ मे १९१९)

  • २०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एस. एस. राजेंद्रन यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.