चालू घडामोडी - २४ सप्टेंबर २०१८

Date : 24 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ, 'आयुष्मान भारत'चा लाभ कसा घ्याल :
  • रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांचीतून जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. पंतप्रधान जन आरोग्य योजना (पीएमजएवाय) म्हणजेच आयुष्मान भारत या योजनेंतर्गत देशातील दहा कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना म्हणजेच जवळपास 50 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला या योजनेचा फायदा होणार आहे.

  • या योजनेमुळे लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण मिळेलं, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे उपचार करता येतील. मोदींनी यावर्षी स्वातंत्र्य दिनाला लालकिल्ल्यावरील भाषणातून या योजनेची घोषणा केली होती. आज शुभारंभ केलेल्या या योजनेची अंमलबजावणी 25 सप्टेंबरपासून होईल.

  • भारतात आरोग्य सेवा क्षेत्रात नवनवीन तंत्र विकसित होत असली तरी देशातील एक मोठा वर्ग या सेवांपासून आणि उपचारांपासून वंचित आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये योग्य उपचार मिळत नाही आणि खाजगी रुग्णालयांचा खर्च गरीबांना झेपत नाही.

  • सरकारी पातळीवरुन सातत्याने प्रयत्न करण्यात येतात, मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे हे आव्हानात्मक काम बनत चाललं आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मोदी सरकारने आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आणली आहे.

  • सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात आरोग्यावर जीडीपीच्या 1.13 टक्के खर्च केला जातो. तर हाच आकडा चीनमध्ये 2.45 टक्के आणि थायलंडमध्ये 2.90 टक्के एवढा आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार, ग्रामीण भागातील 85.9 टक्के आणि शहरी भागातील 82 टक्के लोकसंख्येकडे कोणतंही आरोग्य विमा संरक्षण नाही. 

आता व्हॉट्सअॅपवर समजणार ट्रेनचं लाइव्ह स्टेटस :
  • नवी दिल्ली- गेल्या काही वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅप ग्राहकांच्या सेवेत आलं. व्हॉट्सअॅप लाँच झाल्यापासून युझर्सचा त्याला उदंड प्रतिसादही लाभला. अल्पावधीत व्हॉट्सअॅप हे अॅप युझर्समध्ये लोकप्रिय झालं.

  • व्हॉट्सअॅपनं लोकांना प्रत्यक्ष पाहत संवाद साधण्याचं माध्यम उपलब्ध करून दिलं. तसेच व्हॉट्सअॅपनं स्वतःमध्ये अनेक बदल करत डॉक्युमेंट सेंडिंग, वॉईस मेसेज, व्हिडीओ व्हॉइस कॉलिंगसारखे पर्याय उपलब्ध करून दिले. आता व्हॉट्सअॅपनं आणखी एक नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

  • या सुविधेच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनचं लाइव्ह स्टेट्स समजणार आहे. ब-याचदा ट्रेन कुठपर्यंत आली आहे हे समजत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा नाहक त्रास होत होता. याचाच विचार करून व्हॉट्सअॅपनं लाइव्ह स्टेट्सची सुविधा सेवेत आणली आहे.

  • भारतीय रेल्वेनं तुम्हाला आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही ट्रेनच्या लाइव्ह स्टेट्सची स्थिती समजण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता 139 या रेल्वे हॉटलाइन नंबरवर फोन करून तुम्हाला ट्रेनची स्थिती जाणून घेण्याची गरज नाही. व्हॉट्सअॅपच्या एक मेसेजमध्ये तुम्हाला ट्रेनचं लाइव्ह स्टेट्स, वेळ आणि ट्रेनचं स्टेशन समजणार आहे.

'आप' देशभरात १०० जागा लढवणार, २५ जागी विजयाचा विश्वास :
  • नवी दिल्ली  - भल्याभल्या राजकीय पंडितांना चक्रावून दिल्लीत विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने २०१९ साली होणाºया लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. देशभरात १०० जागा लढवून २५ ठिकाणी विजयी होण्याची रणिनती पक्षाने आखली आहे. देशभरात बिगरभाजपा सकार स्थापनेसाठी मदत करण्याची आपची भूमिका असल्याचा दावा पक्षसूत्रांनी केला.

  • गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोणतेही राजकीयदृष्ट्या वादग्रस्त विधान केले नाही. त्यांनी कोणत्याही पक्षावर टीका केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र त्यांनी थेट आव्हाना दिले. नायब राज्यपालांमार्फत राज्यकारभारात ढवळाढवळ करण्यापासून ते 'राफेल' प्रकरणात कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली, या कडे पक्ष सूत्रांवी लक्ष वेधले. आम आदमी पक्षामुळे लोकांना बिगर भाजप, बिगर काँग्रेसचा पहिल्यांदाच पर्याय मिळाला. त्यावरच मते मागणार असल्याचे सूतोवाच सूत्रांनी केले.

  • केजरीवाल यांना पक्षाला दिल्लीतून आता बाहेर न्यायचे आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत १०० जागा लढवून किमान २५ ठिकाणी विजयाची रणनिती आतापासूनच आखण्यात येत आहे. दिल्ली, हरियाण व पंजाबमध्ये जास्तीत जास्त जागांवर विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा सूत्रांनी केला.

  • दिल्लीत व्यापाºयांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत भरघोस मते दिली. व्यापारी सध्या सीलिंगने त्रस्त आहेत. सातही ठिकाणी आपचे खासदार झाले असते तर सीलिंगचा प्रश्न सोडवला असता, असे वक्तव्य केजरीवालांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यामुळे दिल्लीत व्यापाºयांनादेखील आप भरघोस आश्वासने देणार आहे.

अभियांत्रिकीचं कौशल्य ! सिक्कीमचं पहिलं विमानतळ, मोदी आज करणार उद्घाटन :
  • हिमालयाच्या पर्वतरांगातील सिक्कीम राज्याला आज पहिलं विमानतळ मिळणार आहे. राज्यातील पहिल्या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. आतापर्यंत सिक्कीमला जायचे असल्यास गंगटोकपासून १२४ किलोमीटर अंतरावर असलेल्या प. बंगालमधील बागडोग्रा येथील विमानतळावर जावे लागत होते.

  • परंतु, पाकयाँग विमानतळामुळे आता सिक्कीमही देशाच्या हवाई नकाशावर आले आहे. देशात सर्वाधिक उंचीवर असलेल्या पाच विमानतळांपैकी हे एक आहे. हे विमानतळ देशातील 100 वं कार्यरत असलेलं विमानतळ ठरेल. पर्यटनासाठी आणि सिक्कीमच्या आर्थिक विकासासाठी या विमानतळाचा फायदा होणार आहे. समुद्रसपाटीपासून 4,500 फूट उंचीवर असलेलं हे विमानतळ 201 एकर क्षेत्रावर विस्तारलं आहे. सिक्कीममधील पाकयाँग विमानतळासाठी 605.69 कोटी रुपये खर्च आला आहे. हे विमानतळ अभियांत्रिकी कौशल्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे.

  • सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर पाकयाँग विमानतळ आहे. पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळीच या विमानाच्या उद्घाटनासाठी गंगटोकमध्ये पोहोचले आहेत. सिक्कीम पोहोचल्यानंतर मोदींनी तेथील फोटोही ट्विटरद्वारे शेअर केले. स्पाइसजेट कंपनीने या विमानतळावरून कोलकाता येथून दररोज उड्डाणांचे नियोजन केले असल्याची माहिती आहे.

२०२२ पर्यंत प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण - हंसराज अहीर :
  • नागपूर - प्रधानमंत्री आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना असून, यामुळे बेघर हा शब्द संपणार आहे. प्रत्येक भारतीयांचे घराचे स्वप्न या योजनेमुळे पूर्णत्वास येणार आहे, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.

  • गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत विभागात विविध उत्पन्न गटासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या १५१४ सदनिकांसाठी शनिवारी लक्ष्मीनगर चौकातील सांस्कृतिक सभागृहात आॅनलाईन सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी खा. डॉ. विकास महात्मे, म्हाडा नागपूर मंडळाचे सभापती तारिक कुरेशी, नागपूर मंडळाचे मुख्य अधिकारी संजय भिमनवार उपस्थित होते.

  • या वेळी अहीर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्येक नागरिकाला त्याच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच देशातील विषमता दूर करण्यासाठी या योजनेचे महत्त्व वादातीत आहे. आगामी काळात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अधिकाधिक घरे बांधण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  • नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळांतर्गत चंद्रपूर, हिंगणघाट व नागपूर येथील विविध उत्पन्न गटातील अर्जदारांकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

  • प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील वर्षी जुलै महिन्यात करण्यात आला होता. या योजनेंतर्गत विविध उत्पन्न गटातील १५५३ सदनिकांचे आॅनलाईन पद्धतीने सोडत काढून वाटप करण्यात आले. ही सोडत यू-ट्युबच्या माध्यमातून नागपूर हाऊसिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट बोर्ड २०१८ च्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे.

डाऊनलोडच टेंशन खल्लास, आता लवकरच १०० Mbps इंटरनेट स्पीड मिळणार :
  • नवी दिल्ली - भारतकडून सन 2018 आणि 2019 मध्ये जी सॅट 11, जी सॅट-29 आणि जी सॅट 20 उपग्रह लाँच करण्यात येणार आहेत. त्यानंतर देशातील इंटरनेटचा स्पीड 100 जीबीपीएस होईल, असे भारतीय स्पेस संसोधन संस्था म्हणजेच इस्रोचे चेअरमन के. सिवन यांनी म्हटले आहे. हैदराबादमधील एका परिषदेत बोलताना सिवन यांनी याबाबत माहिती दिली.

  • इंटरनेट वापरकर्त्या देशांमध्ये भारताचा सध्या दुसरा क्रमांक लागतो. मात्र, इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताचा 76 वा क्रमांक आहे. इस्रोकडून 2017 मध्ये जीसॅट हे क्षेपणास्त्र लाँच करण्यात आले. तर यंदा म्हणजेच 2018 मध्ये जीसॅट-11 आणि जीसॅट-29 हे उपग्रह अंतराळात सोडण्यात आले. तर लवकरच जीसॅट-20 अंतराळात सोडण्यात येणार आहे. या सर्व उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे भारतातील इंटरनेटचा स्पीड 100 जीबीपीएस होणार आहे.

  • त्यामुळे देशातील डिजिटल यंत्रणा गतीमान होणार आहे. भारत सरकारकडून यासाठी 10 हजार 900 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यानुसार, 30 पीएसएलव्ही आणि 10 जीएसएलव्ही -एमके 3 या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यासाठी आगामी 4 वर्षांचा कालावधी लागणार असून आणखी 50 स्पेसक्राफ्टचे लाँचिंग होणार आहे, असे सिवन यांनी सांगितले.

  • दरम्यान, इस्रोकडून मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून अॅकॅडमिक आणि उद्योजकीय प्रगतीसाठी संस्थेकडून आधुनिक संसोधनावर भर देण्यात येत असल्याचेही सिवन यांनी म्हटले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८७३: महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

  • १९३२: पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.

  • १९४६: हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज ची स्थापना झाली.

  • १९४८: होंडा मोटार कंपनीची स्थापना.

  • १९९४: सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक डॉ. सलमान रश्दी यांच्यावरील मृत्युदंडाचा फतवा मागे.

  • १९९५: मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.

  • १९९९: कैगा अणूशक्ती प्रकल्पाचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले.

  • २००७: कर्णधार धोनीच्या नेतृवाखाली भारताने टी-२० विश्वकप जिंकला.

जन्म

  • १५३४: शिखांचे ४ थे गुरू गुरू राम दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५८१)

  • १८९८: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६०)

  • १९२१: लेखक, समीक्षक व संपादक डॉ. सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९९२)

  • १९२२: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचा जन्म. (मृत्यू: ३० मार्च १९८९)

  • १९२४: अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष गुरू चरणसिंग तोहरा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००४)

  • १९२५: भारतीय विज्ञान आणि शैक्षणिक लेखक ऑटो सिंग पेंटल यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर २००४)

मृत्यू

  • १९३९: युनिव्हर्सल स्टुडियो चे संस्थापक कार्ल लामेल्स् यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १८६७)

  • १९९२: १३वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९०८)

  • १९९८: बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते, दिग्दर्शक वासुदेव पाळंदे यांचे निधन.

  • २००२: लेखक, शब्दकोशकार व अनुवादक श्रीपाद जोशी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.