चालू घडामोडी - २५ ऑगस्ट २०१८

Date : 25 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ऑस्ट्रेलियात पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन, ११ वर्षातील सहावे पंतप्रधान :
  • कॅनबरा : ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरिसन यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माल्कम टर्नबुल यांच्याविरोधातील स्वपक्षीयांच्या बंडानंतर स्कॉट मॉरिसन यांची निवड करण्यात आली आहे. माल्कम टर्नबुल यांचे जवळचे सहकारी स्कॉट मॉरिसन यांचा 45 मतांनी विजय झाला. 

  • माल्कम टर्नबुल यांनी आणखी एक सहकारी परराष्ट्रमंत्री जुली बिशप सुद्धा या निवडणूकीच्या शर्यतीत होती. मात्र पहिल्या टप्प्यात त्या बाहेर पडल्या. याशिवाय माजी गृहमंत्री पीटर डटन यांच्या नावाची सुद्धा ऑस्टेलियाच्या पंतप्रधानपदासाठी चर्चा होती. 

  • ऑस्ट्रेलियात गेल्या 11 वर्षात सहा पंतप्रधानाची निवड झाली आहे. माल्कम टर्नबुल यांनी सांगितले की, त्यांना एक याचिका मिळाली होती. त्यामध्ये म्हटले होते की, तुमच्या पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.

  • त्यामुळे पार्टीने नवीन नेता निवडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गेल्या आठवड्यात अविश्वास प्रस्तावानंतर लेबर पार्टीने पुन्हा एका सिनेटमध्ये माल्कम टर्नबुल यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून पुन्हा निवडणुका घेण्याचे घोषित केले आहे.  

निवृत्त सेनाधिकाऱ्यांचे पुनर्वसन योग्यप्रकारे व्हावे :
  • भारतीय लष्करात सध्या काम करीत नसलेल्या पण अत्यंत प्रशिक्षित आणि उच्च प्रतीचे कौशल्य असलेल्या २५ लाख अनुभवी व्यक्ती या त्यांना राष्ट्राच्या उभारणीत संधी मिळेल याची सध्या वाट बघत आहेत. या संख्येत दरवर्षी ६०,००० सैनिकांची भर पडत असते. ते एक तर निवृत्त होतात किंवा त्यांच्यातील कौशल्याचा जेथे वापर होत नाही अशा तºहेची कामे करीत असतात.

  • या साºया ३५ ते ४५ वयोगटातील व्यक्ती असतात. सेनादलातून निवृत्त झालेल्या अधिकाºयांपैकी ८४ टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना पुनर्वसन कार्यक्रमाचा कोणताच लाभ मिळाला नाही. याशिवाय सेनादलातून निवृत्त झालेल्या ८२ टक्के लोकांच्या अभ्यासातून हे दिसून आले की, त्यांनासुद्धा पुनर्वसन योजनेचा लाभ मिळाला नाही.

  • सेनादलात कार्यरत असणाºया अधिकाºयांसाठी निवृत्त हा शब्द वापरणेही भ्रममूलक आहे. हे अधिकारी निवृत्तीनंतर स्वत:च्या करियरमध्ये बदल करीत असतात. आयुष्याच्या मध्यंतरात त्यांना मुलकी जीवनाकडे वळावे लागते. एकूणच सेनादलातील सुरक्षित जीवनाकडून ते अशा जीवनाकडे वळतात जेथे भविष्याची अनिश्चिततता असते आणि तणावपूर्ण वातावरण असते.

  • सैनिकी जीवनाकडून नागरी जीवनाकडे परतल्यावर असे अधिकारी अधिक काळ घरच्या वातावरणातच घालवतात. कारण बाह्य जीवनाशी जुळवून घेणे त्यांना कठीण होते. सध्या वन रँक वन पेन्शनची चर्चा सुरू असली तरी निवृत्तांच्या पुनर्वसनाकडे अधिक गांभीर्याने बघायला हवे.

  • अनुभवी व्यक्तींकडे कोणतीही संस्था लक्ष देत नाही, अशी स्थिती नाही. त्यांच्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्डाच्या अधिपत्याखाली काम करणारी जिल्हा सैनिक बोर्ड अस्तित्वात आहेत. ही बोर्डस् एक्स सर्व्हिसमेनच्या कल्याणाकडे लक्ष देत असतात. सीएसडी (कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट)च्या माध्यमातून या निवृत्तांना शासकीय मदतीतून धान्य, घरगुती उपकरणे आणि दैनंदिन वापराचे सामान दरमहा मिळत असते.

गुजरातमध्ये ABVP ला धक्का, काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा विजय :
  • गांधीनगर (गुजरात): काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्येच नवं आव्हान उभं केलं आहे. गुजरातच्या बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठात  नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघनटेचा विजय झाला आहे. या निवडणुकीत भाजपच्या अभाविप अर्थात अखिल भारतीय विद्यार्थी संघटना तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे.

  • जनरल सेक्रेटरी (जीएस) आणि उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिंडेंट) या पदासाठी या निवडणुका झाल्या असून एकूण 16 हजार विद्यार्थ्यांनी यात मतदान केलं होतं.

  • मोदींच्या राज्यात, तेही त्यांनी निवडणूक लढवलेल्या मतदारसंघात काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने हा ऐतिहासिक विजय मिळवला. जीएसच्या महत्वाच्या पोस्टवर एनएसयूआयच्या उमेदवाराने मोठ्या फरकाने विजय मिळवला. तर जीएस आणि व्हीपी या दोन महत्त्वाच्या पोस्टवर एबीव्हीपी चक्क तिसऱ्या स्थानावर फेकली गेली.

यूपीएससी उत्तीर्ण दृष्टीहीन जयंत मंकलेची सरकार दरबारी लढाई सुरुच :
  • नवी दिल्ली : आपल्या अंधत्वावर मात करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत (सीएसई) उत्तीर्ण होणाऱ्या जयंत मंकलेची सरकार दरबारी लढाई सुरुच आहे. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगने (डीओपीटी) आता ही जबाबदारी दुसऱ्या मंत्रालयावर ढकलली आहे.

  • डीओपीटीचे मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत आणि नंतर डीओपीटीचे जॉईंट सेक्रेटरी विजय कुमार सिंह यांच्यासोबत जयंतची चर्चा झाली. ''ज्या तीन पोस्ट शिल्लक आहेत, त्या परराष्ट्र मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, अर्थमंत्रालय यांच्याकडून डीओपीटीला असं लेटर यायला पाहिजे, की ते अशा 75 टक्के अंध विद्यार्थ्याला पोस्ट द्यायला तयार आहेत,'' असं डीओपीटीकडून सांगण्यात आलं आहे.

  • मंत्रालयाचा रिप्लाय आल्यानंतरच आम्ही पुढची कारवाई करू शकतो, असं जॉईंट सेक्रेटरींनी सांगितलं आहे. हा रिप्लाय कधीपर्यंत येणार असं विचारल्यावर, “त्यांचे उत्तर आहे, आम्ही ते सांगू शकत नाही”, असं उत्तर देण्यात आलं.

  • ''आत्ता माझी सध्याची जी स्थिती आहे त्याबाबत तुम्ही आम्हाला लेखी काही द्या, यावरही त्यांचं म्हणणं आहे की ते आम्ही नाही देऊ शकत,'' अशी माहिती जयंत मंकलेने दिली.

बारावीचा जुलै 2018 परीक्षेचा निकाल जाहीर, किती मुलांना लॉटरी :
  • पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे तर्फे जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 22.65 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.

  • या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 1,02,314 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 1,02,160 विद्यार्थी परीक्षेस पात्र झाले. त्यापैकी 23,140 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी 22.65 इतकी आहे.

  • विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी करावयाच्या अर्जाची मुदत सोमवार, दिनांक 27/08/2018 ते बुधवार, दिनांक 05/09/2018 आहे.

  • जुलै-ऑगस्ट 2018 बारावीच्या निकालामध्ये लातूर विभागानं बाजी मारली आहे. लातूर विभागाचा निकाल सर्वाधिक 31.48 टक्के लागला आहे. तर सगळ्यात कमी निकाल मुंबई विभागाचा 19.27 टक्के इतका लागला आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६०९: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.

  • १८२५: उरुग्वेे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.

  • १९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले.

  • १९६०: इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

  • १९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९९१: बेलारुस सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाले.

  • १९९१: लिनस ट्रोव्हाल्डस याने लिनक्स (Linux) या संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रकाशित केली.

  • १९९१: एअरबस ए-३२० ने पहिले उड्डाण केले.

  • १९९७: दक्षिण कन्नडा जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.

  • १९९८: एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.

  • २००१: सरोद वादक अमजद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.

जन्म

  • १९२३: साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ सप्टेंबर २००८)

  • १९३०: जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेता शॉन कॉनरी यांचा जन्म.

  • १९३६: इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक गिरिधारीलाल केडिया  यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर २००९)

  • १९४१: संगीतकार अशोक पत्की यांचा जन्म.

  • १९५२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू दुलीप मेंडिस यांचा जन्म.

  • १९५७: पाकिस्तानी जलदगती गोलंदाज सिकंदर बख्त यांचा जन्म.

  • १९६२: बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका डॉ. तस्लिमा नसरीन यांचा जन्म.

  • १९६५: भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजीव शर्मा यांचा जन्म.

  • १९६९: भारतीय क्रिकेटपटू विवेक राजदान यांचा जन्म.

  • १९९४: भारतीय लेखक आणि कादंबरीकार काजोल आयकट यांचा जन्म.

मृत्यू

  • १२७०: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १२१४)

  • १८१९: स्कॉटिश संशोधक जेम्स वॅट यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १७३६)

  • १८२२: जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेल यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १७३८)

  • १८६७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १७९१)

  • १९०८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८५२)

  • २०००: डोनाल्ड डकचा जन्मदाता हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचे निधन. (जन्म: २७ मार्च १९०१)

  • २००१: संतसाहित्याचे अभ्यासक समीक्षक डॉ. व. दि. कुलकर्णी यांचे निधन.

  • २००१: टायरेल रेसिंग चे संस्थापक केन टाइरेल यांचे निधन. (जन्म: ३ मे १९२४)

  • २००८: उर्दू शायर सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९३१)

  • २०१२: चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १९३०)

  • २०१३: भारतीय गायक-गीतकार रघुनाथ पनिग्राही यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९३२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.