चालू घडामोडी - २५ जानेवारी २०१९

Date : 25 January, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ऐतिहासिक! इस्रोकडून जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण :
  • श्रीहरीकोटा: भारतीय अंतराळ संधोधन संस्थेनं (इस्रो) इतिहास रचला आहे. काल रात्री उशिरा आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून इस्रोनं जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. काल रात्री 11 वाजून 37 मिनिटांनी इस्रोनं मायक्रोसॅट-आर आणि कलामसॅटचं प्रक्षेपण केलं.

  • मायक्रोसॅट उपग्रहामुळे लष्कराला मोठी मदत मिळणार आहे. तर कलामसॅट हा उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. पीएसएलव्ही-सी44 च्या मदतीनं या दोन्ही उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं. 

  • मायक्रोसॅट आणि कलामसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोचं अभिनंदन केलं. 'पीएसएलव्हीच्या आणखी एका यशस्वी प्रक्षेपणाबद्दल वैज्ञानिकांचं अभिनंदन. या प्रक्षेपणामुळे भारताच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या कलामसॅटनं कक्षेत प्रवेश केला आहे,' अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी इस्रो आणि विद्यार्थ्यांचं कौतुक केलं.

  • पंतप्रधानांसोबतच इस्रोच्या प्रमुखांनीही वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. इस्रो देशातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. तुमचे उपग्रह आमच्याकडे घेऊन या. आम्ही त्यांचं प्रक्षेपण करू, अशा शब्दांमध्ये इस्रो प्रमुख के. सिवन यांनी विज्ञानवाद जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर आवाहन केलं.  

रशियातील १२८ वर्षांच्या वृद्धेचे निधन; रशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये देशातील सर्वाधिक वयस्क महिला अशी होती नोंद :
  • मॉस्को- रशियातील सर्वात वयोवृद्ध महिला नानू साओवाचे काकेशसच्या डोंगराळ भागात नुकतेच निधन झाले.

  • तिचे वय १२८ वर्षे इतके होते. रशियात उपलब्ध असलेल्या सरकारी आकडेवारीनुसार नानू साओवा सर्वात वृद्ध महिला होती. तिचे वय खरे मानले तर तिचा जन्म रशियाचे शेवटचा झार निकोलस द्वितीय गादीवर बसण्यापूर्वी झाला होता.

  • दोन वर्षापूर्वी तिचे नाव रशिया बुक ऑफ रेकॉर्डस््मध्ये देशातील सर्वाधिक वयस्क महिला अशी नोंद झाली होती. रशियातील बोल्शेविकच्या क्रांतीच्या वेळी नानू २७ वर्षाची होती तर १९९० -९१ मध्ये सोव्हिएत संघाच्या तुकडे झाले तेव्हा ती १०१ वर्षाची होती. नानूने केलेले कठोर परिश्रम आणि नियमित दूध पिणे हे तिच्या दीर्घ वयाचे गुपित आहे. 

‘ट्रेन १८’ला विद्युत निरीक्षकांची मंजुरी :
  • नवी दिल्ली : रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी ‘ट्रेन १८’ला तीन दिवसांच्या तपासणीनंतर सरकारच्या विद्युत निरीक्षकांकडून मंजुरी मिळाली असल्याचे रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या गाडीला येत्या आठवडाभरात हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

  • या बहुप्रतीक्षित गाडीने तिच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर आणि रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी तिला सशर्त मंजुरी दिल्यानंतर गेल्या सुमारे महिनाभरापासून ती रखडली होती.

  • या अत्याधुनिक गाडीचे डिझाइन तयार करून तिचे उत्पादन करणाऱ्या रोलिंग स्टॉक विभागाच्या आक्षेपांनंतरही रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर ही गाडी सोमवारी विद्युत निरीक्षकांच्या तपासणीसाठी पाठवण्यात आली होती.

  • या तपासणीचा अहवाल रेल्वे बोर्डाला पाठवण्यात येणार असून, त्यानंतर ही गाडी अधिकृतरीत्या केव्हा सुरू करायची याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. १६ डब्यांची ही गाडी ९७ कोटी रुपये खर्च करून १८ महिन्यांत तयार करण्यात आली असून, ती शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेणार आहे. ही देशातील पहिली इंजिनरहित रेल्वेगाडी आहे.

वडील व्यवसायाने टेलर, मुलगा सीए परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात टॉपर :
  • दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) बुधवारी सीए अंतिम वर्ष आणि फाऊंडेशनचा निकाल जाहीर केला. राजस्थानमधील कोटा येथील शादाब हुसैन हा ८०० पैकी ५९७ गुण घेऊन सीए अंतिम परिक्षेत (जुना अभ्यासक्रम) प्रथम क्रमांक पटकावला आहे. एका साधारण कुटुंबातून आलेल्या शादाबने पहिल्याच प्रयत्नात सीए अंतिम परीक्षा पास केली आहे. शादाबचे वडील व्यवसायाने टेलर आहेत. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तर शादाबने कोटा विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेली आहे. त्याला चार बहिणी आहेत. त्याचे आई-वडील जरी अल्पशिक्षित असले तरी त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कोणतीच कसर ठेवलेली नाही.

  • माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार शादाबने म्हटले की, उतरत्या वयाची माझ्या आई-वडिलांनी चिंता करू नये यासाठी चांगली नोकरी मिळावी म्हणून मी दिवस-रात्र अभ्यास केला. त्यात मला यश आले. सीए हा एक असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये व्यक्ती आयुष्यभर शिकत राहतो. खूप सल्लामसलत आणि चर्चा केल्यानंतर मी सीए होण्याचे लक्ष्य निश्चित केले.

  • परीक्षेसाठी केलेल्या नियोजनाबाबत तो म्हणाला की, मी सर्वांत प्रथम पेपर शांतपणे वाचून काढला. मला ४० गुण मिळू शकतील असे तीन-चार प्रश्न निवडले. ही प्रश्नं मी एका तासात संपवण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने मी दोन तासात आधिकाधीक गुण मिळवण्यावर खर्च केला. मला यात यश ही आले. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शादाबला शुभेच्छा दिल्या आहेत.

दिनविशेष :
  • राष्ट्रीय मतदार दिन

महत्वाच्या घटना 

  • १८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.

  • १९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.

  • १९४१: प्रभात चा शेजारी हा चित्रपट रिलीज झाला.

  • १९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.

  • १९८२: आचार्य विनोबा भावे यांना भारतरत्‍न प्रदान.

  • १९९१: मोरारजी देसाई यांना भारतरत्‍न प्रदान.

  • १९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.

  • २००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्‍न प्रदान.

जन्म 

  • १७३६: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १८१३).

  • १८६२: सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म.

  • १८७४: इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५).

मृत्यू 

  • १९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन.

  • १९९६: रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार यांचे निधन.

  • २००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचे निधन.

  • २०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ – हातकणंगले)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.