चालू घडामोडी - २५ मार्च २०१८

Date : 25 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
२०१८ मध्ये जगातील ‘टॉप ५००’ श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये २८,३४५ अब्ज रुपयांची घट :
  • जगातील पहिल्या ५०० श्रीमंतांना मागचे दोन महिने अत्यंत वाईट गेले आहेत. आर्थिक आघाडीवर त्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागले आहे. अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचा त्यांना जबर फटका बसला आहे. या आठवडयात ५०० श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये १८१ अब्ज डॉलर्स म्हणजे ११,७६७ अब्ज रुपयांची घट झाली आहे.

  • स्टील आणि अॅल्युमिनियमवर आयात शुल्क लागू करण्याच्या निर्णयामुळे ट्रेड वॉर सुरु होण्याची भिती असल्याने अमेरिकी शेअर बाजाराने दोनवर्षातील नीचांकी पातळी गाठली आहे. या महाश्रीमंतांच्या संपत्तीत २६ जानेवारीपासून ४३६ अब्ज डॉलर म्हणजे २८,३४५ अब्ज रुपयांची घट झाली आहे.

  • फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला या घसरणीचा सर्वाधिक फटका बसला असून त्याची संपत्ती १०.३ अब्ज डॉलर म्हणजे ६७० अब्ज रुपयांनी कमी झाली आहे. केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणाचा फटका फेसबूकला बसला आहे. ५ कोटी युझर्सचा डाटा परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुकच्या विश्वासहर्तेला तडा गेला आहे. फेसबुकच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांची घट झाली आहे.(source :loksatta)

भारतीय पथकाचे नेतृत्व पी.व्ही. सिंधूकडे, आयओएने दिला बहुमान :
  • नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत आयोजित राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व दिग्गज बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू करणार आहे. राष्टÑकुलच्या उद्घाटन सोहळ्यात सिंधू भारताची ध्वजवाहक असेल. भारतीय आॅलिम्पिक संघटनेने हा बहुमान सिंधूला दिला.

  • २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती असलेल्या सिंधूकडे ही जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती आयओएने दिली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूकडून राष्टÑकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. ग्लास्गो राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सिंधूने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते.

  • पिस्तूल नेमबाज विजय कुमार याला २०१४ च्या राष्टÑकुलचा आणि २००८चा आॅलिम्पिक चॅम्पियन नेमबाज अभिनव बिंद्रा याला २०१० च्या नवी दिल्ली राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचा भारतीय ध्वजवाहक बनविण्यात आले होते. मेलबोर्न राष्टÑकुल स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात आॅलिम्पिक पदक विजेते असलेले राज्यवर्धनसिंग राठोड यांना हा बहुमान मिळाला. राठोड हे सध्या क्रीडामंत्री आहेत.

  • वर्षभरातील सिंधूची विश्व बॅडमिंटनमधील कामगिरी पाहता आॅलिम्पिक संघटनेने सायना नेहवाल आणि मेरी कोम या सिनियर खेळाडूंना वगळून सिंधूला हा बहुमान दिला. सायना नेहवाल आणि मेरी कोम यांची ही दुसरी राष्ट्रकुल स्पर्धा असणार आहे. मात्र या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याचा मान मिळालेला नाही. भारतीय पथकाचे नेतृत्व करण्यासाठी सिंधूची झालेली निवड ही कामगिरीच्या आधारावर झाली असल्याचे आयओएने स्पष्ट केले आहे.(source :lokmat)

केंब्रिज अ‍ॅनालिटिका कंपनीला केंद्र सरकारने पाठविली नोटीस; सहा प्रश्नांबाबत मागविला खुलासा :
  • नवी दिल्ली : फेसबुकच्या माध्यमातून ५ कोटी लोकांची वैयक्तिक माहिती अनधिकृतरित्या मिळवल्याच्या प्रकरणात वादात अडकलेल्या केंब्रिज अ‍ॅनालिटिका या ब्रिटिश राजयकीय डेटा विश्लेषक कंपनीने भारतीयांचीही माहिती मिळवल्याचा संशय आहे. त्यामुळे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने त्या कंपनीला नोटीस पाठवली आहे.

  • तुमच्याकडून भारतीयांची माहिती कोणी मिळवली वा मिळवत आहे आणि ही माहिती मिळवण्यापूर्वी संबंधित भारतीयांची परवानगी घेतली होती का, आदी प्रश्न केंद्र सरकारने या कंपनीला विचारले आहेत.

  • केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने शुक्रवारी ही नोटीस केंब्रिज अ‍ॅनालिटिकाला पाठवली. २३ मार्च २०१८ रोजी केंब्रिज अनॅलिटिकाला ही नोटीस पाठवली आहे. या नोटिशीतकंपनीकडून सहा प्रश्नांची उत्तरे मागवली असून, ती ३१ मार्चपर्यंत द्यावीत, असेही कळवले आहे. प्रश्नांची उत्तरे न दिल्यास तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे कंपनीला कळवण्यात आले आहे.

  • फेसबुक युजर्सनी आपली वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नये असे आवाहन माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीयांना केले आहे. आपले राहण्याचे व कामाचे ठिकाण, नोकरीची माहिती, राजकीय मते तसेच स्वत:ची ओळख पटवणारी अन्य कोणतीही माहिती फेसबुक वा सोशल मीडियावर ठेवू नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.(source :lokmat)

नेरूळ-मुंबई जलप्रवास मार्गातील अडसर दूर, हायकोर्टाची परवानगी :
  • मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ ते मुंबई प्रवास आता ४५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. कारण नेरूळ जलवाहतूक टर्मिनलच्या बांधकामात अडसर ठरलेल्या खारफुटीच्या राखीव वनाचे स्थलांतर व टर्मिनलला मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या रस्त्याच्या बांधकामाआड येणारी खारफुटी तोडण्याची परवानगी उच्च न्यायालयाने सिडकोला शुक्रवारी दिली.

  • मुंबई ते नेरूळ व नेरूळ ते मांडवा या जलवाहतूक प्रकल्पाला राज्य सरकारने जून २०१५ मध्येच मंजुरी दिली. मात्र, या भागात खारफुटी पसरली असल्याने व हा प्रकल्प सीआरझेड-१, सीआरझेड-२ व सीआरझेड- ४ या क्षेत्रात असल्याने केंद्र व राज्य सरकारकडून पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सर्व परवानग्या घेणे सिडकोला आवश्यक होते.

  • १३ फेब्रुवारीला संबंधित प्रशासकांकडून या प्रकल्पासाठी हिरवा कंदील मिळाल्याने सिडकोने नेरूळ येथे ०.४६ हेक्टरवर असलेले खारफुटीचे राखीव वन घणसोली येथे हलविण्याची व टर्मिनलसाठीचा जोडरस्ता बांधण्याच्या आड येणारी २०० चौरस मीटर क्षेत्रात असणारी खारफुटी तोडण्याची परवानगी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

  • प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या केंद्र व राज्य सरकारकडून घेतल्या आहेत. हा प्रकल्प नवी मुंबईकरांसाठी अत्यंत फायद्याचा आहे. केंद्र व राज्य सरकारने घातलेल्या सर्व अटी सिडको पाळेल, अशी माहिती सिकडोतर्फे अ‍ॅड. जी. एस. हेगडे व अ‍ॅड. पिंकी भन्साळी यांनी अभय ओक, न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाला दिली.

  • उच्च न्यायालयाच्या २०१० च्या आदेशानुसार, कोणत्याही प्रकल्पासाठी खारफुटी हटवायच्या असतील, तर त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोनेही न्यायालयात अर्ज केला.(source :lokmat)

सलग सात वर्ल्ड कप खेळणारा 'हा' संघ २०१९ च्या विश्वचषकातून 'आउट' :
  • हरारे : काल झालेल्या पात्रता फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानने आयर्लंडवर पाच गड्यांनी विजय मिळवत इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे. या आधी दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजने विश्वचषकासाठी पात्रता मिळवली होती. राशिद खान याने ४० धावा देत तीन गडी बाद केले. त्यामुळे अफगाणने आयर्लंडला २०९ धावांवर रोखले. त्यानंतर अफगाणिस्तानच्या संघाने हे लक्ष्य ५ फलंदाजांच्या मोबदल्यात ४९.१ षटकांत गाठले. 

  • यूएईकडून झालेल्या पराभवामुळं झिम्बाब्वेचा संघ 1983 नंतर पहिल्यांच विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास अपात्र ठरला आहे. 1983 नंतर झिम्बाब्वेच्या संघावर असा प्रसंग पहिल्यांदाच आला की विश्वचषक खेळू शकणार नाही.

  • पात्रता फेरीत खेळताना गुरूवारी यूएईकडून 3 गड्यांनी झालेल्या पराभवामुळे झिम्बाब्वेचा 2019च्या क्रिकेट विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न भंगल्यात जमा झाले होते. त्यांच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा पावसावर होत्या मात्र अफगाणिस्तान-आयर्लंडच्या सामन्यामध्ये पाऊस आला नाही. त्यामुळं झिम्बाब्वेच्या संघाच्या राहिलेल्या अपेक्षा धुतल्या गेल्या. 

  • अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आमच्याकडे अनेक संधी चालून आल्या होत्या. आमचा आतापर्यंतचा खेळ चांगला होता. परंतु, आजचा दिवस आमच्यासाठी निराशाजनक ठरला, अशी प्रतिक्रिया झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रेम क्रिमरने पराभवानंतर दिली. (source :lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.

  • १८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.

  • १८९८: शिवरामपंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले.

  • १९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.

  • १९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • २०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.

  • २०१३: मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना

  • २०१३: मेघालय उच्‍च न्यायालयाची स्थापना.

जन्म

  • १९३२: लेखक व कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००१)

  • १९३३: शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचा जन्म.

  • १९३७: डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते टॉम मोनाघन यांचा जन्म.

  • १९४७: इंग्लिश संगीतकार व गायक सर एल्ट्न जॉन यांचा जन्म.

  • १९५६: ग्वाल्हेर घराण्याचे गायक मुकूल शिवपुत्र यांचा जन्म.

मृत्यू

  • १९३१: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर१८९०)

  • १९४०: आसामी कादंबरीकार उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दोलोई यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर१८६७)

  • १९७५: सौदी अरेबियाचा राजा फैसल यांचे निधन.

  • १९९१: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९०७)

  • १९९३: साहित्यिक मधुकर केचे यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९३२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.