चालू घडामोडी - २५ सप्टेंबर २०१८

Date : 25 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मालदीवमध्ये सत्तांतर, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते सोलिह यांचा विजय :
  • माले (मालदीव) - गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अनेक राजकीय उलथापालथींनंतर आज अखेर मालदीवमध्ये सत्तांतर झाले आहे. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत वर्तमान राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना पराभवाचा धक्का देत अपक्ष उमेदवार इब्राहीम मोहम्मद सोलिह यांनी विजयाची नोंद केली आहे.

  • सोलिह हे भारतासोबत दृढ संबंधांचे समर्थक असल्याने मालदीवमधील या निवडणुकीत सोलिह यांना मिळालेला विजय भारतासाठी सुचिन्ह मानला जात आहे.  

  • मिहारू डॉट.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार सोलिह यांना आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमधील 92 टक्के मतांपैकी 58.3 

  • टक्के मते मिळाली आहेत. देशातील निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करणाऱ्या ट्रान्सपरेंसी मालदीव या स्वायत्त संस्थेने सोलिह यांनी निर्णायक मताधिक्याने विजय मिळवल्याचे म्हटले आहे. .

  • तसेच विजय मिळवल्यानंतर केलेल्या भाषणात सोलिह यांना हा आनंद, अपेक्षा आणि ऐतिहासिक क्षण असून, आता देशात शांततामय मार्गाने सत्ता हस्तांतरण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.  

हायकोर्टाचा सवाल ! सरकारच्या 'या' योजनेचा लाभ केवळ 'बीपीएल'धारकांनाच का :
  • नवी दिल्ली - अनुवांशिक आणि गंभीर आजारांवर मोफत उपचार देण्याची सरकारची योजना आहे. मात्र, या योजनेवरुन दिल्ली हायकोर्टाने सरकारला विचारणा केली आहे. गंभीर आजारांवर मोफत उपचार केवळ बीपीएलधारक म्हणजेच दारिद्र्य रेषेखाखालील कुटुंबीयांनाच का ? असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला आहे. याप्रकरणी केंद्र आणि दिल्ली सरकारला हायकोर्टाने उत्तरही मागितले आहे. 

  • सरकारच्या या योजनेचा लाभ सर्वच स्तरातील गरिब कुटुंबीयांना व्हायला हवा, तसे का होत नाही ? असा प्रश्न दिल्ली हायकोर्टाने सरकारला विचारला आहे. गतवर्षी हायकोर्टाच्या आदेशानंतर, सरकारने 26 मे रोजी अनुवांशिक आणि गंभीर आजारांवरील उपचार मोफत देण्याची योजना सुरू केली होती. विशेष म्हणजे, हायकोर्टात दोन मुलींच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती.

  • त्यावेळी सरकारकडून दारिद्र्य रेषेवरील कुटुंबीयांवर अन्याय होत असल्याचे हायकोर्टाने म्हटले. जस्टीस विभू भाकरू यांच्या खंडपीठात या याचिकेवर सुनावणी झाली. त्यानंतर, भाकरू यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि दिल्ली सरकारला याबाबत नोटीस पाठविली आहे. त्यामध्ये सरकारकडून बीपीएल आणि एपीएल कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत कृत्रिम अंतर असून ते घटनात्मकदृष्ट्या चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

  • एका याचिकाकर्ता साडेचार वर्षांची मुलगी असून ती एमपीएस या रोगाने पीडित आहे. तर दुसरी याचिकाकर्ती 10 वर्षीय मुलगी असून ती एसएमए (तंत्रिका तंत्र संबंध) या रोगाने पीडित आहे. या दोघांनीही कोर्टात याचिकेद्वारे दावा केला असून या रोगांवरील उपचार अतिशय महाग आहेत. त्यामुळे आमचे आई-वडिल या रोगाचा खर्च उचलण्यास असमर्थ असल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यावर, कोर्टाने सरकारला याबाबत उत्तम देण्याचे आदेश दिले आहेत. 

अमेरिकी वस्तुंवरील आयात कर चीनने आणखी वाढवला :
  • बीजिंग : अमेरिकेच्या ६० अब्ज डॉलर मूल्याच्या ५,२०७ वस्तुंवरील आयात करात चीनने आणखी ५ ते १० टक्के करवाढ केली आहे. नवे कर लावताना चीनने म्हटले की, अमेरिका व्यापार क्षेत्रात दादागिरी करीत आहे.

  • अमेरिकी प्रशासनाने चीनच्या २०० अब्ज डॉलरच्या वस्तूंवर लादलेल्या कराची अंमलबजावणी सोमवारी सुरू होताच चीनने ही प्रति कारवाई केली. यामुळे अमेरिकेच्या ११० अब्ज डॉलरच्या वस्तू वाढीव कराच्या आवाक्यात आल्या आहेत.

  • तडजोडीचा मार्ग म्हणून चीनने अमेरिकेकडून अधिकाधिक नैसर्गिक वायू खरेदी करून चीनच्या शिलकी द्विपक्षीय व्यापारात कपातीची तयारी दर्शविली. परंतु अमेरिकेने चीनचा हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. अमेरिकेच्या चर्चेच्या प्रस्तावातून चीनने अंग काढून घेतल्याचे वृत्त वॉल स्ट्रीट जनरलने दिले आहे. याआधी दोन्ही देशांच्या राजदूतांत २२ आॅगस्ट रोजी शेवटची चर्चा झाली होती.

तिहेरी तलाक बंदी विधेयकाला उच्च न्यायालयात आव्हान :
  • मुंबई : तत्काळ तिहेरी तलाक पद्धतीला गुन्ह्याच्या चौकटीत आणणारे ह्यमुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षणह्ण विधेयक काहीच दिवसांपूर्वी लोकसभेत मंजूर झाले. मात्र या विधेयकाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात शुक्रवारी दाखल करण्यात आली आहे.

  • गेल्याच आठवड्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर सही केली. विधेयकानुसार, तत्काळ तिहेरी तलाक देणे बेकायदेशीर व अवैध आहे. अशा पद्धतीने तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद या विधेयकात आहे.

  • आरोपी पतीची जामिनावर सुटका करण्याची सोय करण्याची तरतूद या विधेयकात असली तरीही या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक मसूद अन्सारी, एनजीओ रायजिंग व्हॉइस फाउंडेशन आणि व्यवसायाने वकील असलेले देवेंद्र मिश्रा यांनी उच्च न्यायालयात शुक्रवारी  याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी २८ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

  • या विधेयकातील तरतुदी बेकायदा व अवैध असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तत्काळ तिहेरी तलाक देणाऱ्या मुस्लीम पतीला गुन्हेगार ठरविणाºया विधेयकातील तरतुदीला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 

३५५ तालुक्यांत कुष्ठरोग शोध अभियान, आजपासून साडेआठ कोटी लोकांची तपासणी करणार :
  • मुंबई :राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आजपासून ९ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील ३५ जिल्ह्यांत व ३५५ तालुक्यांमध्ये कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. ७१ हजार २९७ शोधपथकांच्या साहाय्याने १४ दिवसांत सुमारे साडे आठ कोटी लोकांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी दिली.

  • याबाबत आरोग्यमंत्री म्हणाले, २०१७-१८मध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण दर दहा हजारी ०.८० पेक्षा जास्त असलेल्या २२ जिल्ह्यांत शोधमोहीम राबविण्यात आली. प्रत्येक गावातील स्थानिक ‘आशा’ कार्यकर्ती व एक पुरुष स्वयंसेवक यांचे पथक तयार करून ४ कोटी ५९ लाख २९ हजार ६६१ लोकांची प्रत्यक्ष तपासणी केली.

  • त्यामध्ये १ लाख ६४ हजार ९६४ संशयित रुग्ण शोधण्यात आले व त्यांच्यावर बहुविध उपचार सुरू करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा प्रगती योजनेत समावेश केला आहे. त्या अनुषंगाने देशात विविध मोहिमा राबवून कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर बहुविध औषधोपचार करून त्यांना रोगमुक्त केले जात आहे.

  • गेल्या वर्षी ४ हजार १३४ रुग्ण २०१६-१७मध्ये १६ जिल्ह्णांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. त्यात ४,१३४ नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले व त्यांना बहुविध उपचार देऊन रोगमुक्त करण्यात आले. २०१५-१६मध्येही पाच जिल्ह्णांत शोधमोहीम राबवून १६६ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९१५: पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू.

  • १९१९: रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.

  • १९२९: डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.

  • १९४१: प्रभात चा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.

  • १९८१: सांड्रा डे ओ’कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.

  • १९६२: अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.

जन्म

  • १९१६: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९६८)

  • १९२२: स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्म.

  • १९२२: नौरूचे पहिले पंतप्रधान हॅमर डिरॉबुर्ट यांचा जन्म.

  • १९२५: बखर वाङमयकार रघुनाथ विनायक हेरवाडकर यांचा जन्म.

  • १९२६: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी बाळ कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९९४)

  • १९२८: पत्रकार माधव गडकरी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००६)

  • १९३२: स्पेनचे पहिले पंतप्रधान एडॉल्फो साराझ यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१४)

  • १९३८: ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोत्झफेल्ट यांचा जन्म.

मृत्यू

  • १९९०: पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९७)

  • १९९८: रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक कमलाकर सारंग यांचे निधन. (जन्म: २९ जून १९३४)

  • २००४: इंग्रजी व मराठी कवी अरुण कोलटकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९३२)

  • २०१३: लेखक शं. ना. नवरे यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.