चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ सप्टेंबर २०१९

Date : 25 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान :
  • भारतात यशस्वीरित्या स्वच्छता अभियान राबवण्यात येत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन’च्या प्रतिष्ठित अशा ‘ग्लोबल गोलकीपर्स’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी मोदींना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. दरम्यान, ज्या लोकांना हे अभियान जनआंदोलनात बदलले त्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

  • “या अभियानाचा सर्वाधिक फायदा देशातील गरीब आणि महिला वर्गाला मिळाला आहे. भारत या विश्वाला आपलं कुटुंब मानतो. त्यामुळे या अभियानात भारताने दिलेल्या योगदानामुळे मला आनंद होत आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले. “वसुधैव कुटुंबकम् अशी शिकवण आम्हाला हजारो वर्षांपासून देण्यात आली आहे. आम्ही स्वच्छतेच्या दृष्टीने जे लक्ष्य ठेवले आहे त्याच्या आम्ही जवळ पोहोचत आहोत.

  • याव्यतिरिक्तही भारत अन्य अभियान राबवत आहे. फिट इंडिया मुव्हमेंटद्वारे फिटनेस आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरला आम्ही प्रोत्साहन देण्याचं काम करत आहोत. जल जीवन अभियानाअंतर्गत पाणी वाचवण्यावर आणि त्याच्या पुनर्वापरावरही आम्ही काम करत आहोत,” असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं,

भारतीय संघात रोहित शर्मा घेणार धोनीची जागा :
  • महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात खेळत नसताना, मर्यादीत षटकांच्या सामन्यात उप-कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी येणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ३ विजेतेपद मिळवली आहेत.

  • विराटच्या अनुपस्थितीत रोहितने भारतीय संघाचं नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे. यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली रोहितने संघातील तरुण खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं काम करावं अशी अपेक्षा करत आहेत.

  • “मैदानात काहीवेळा झटपट निर्णय घेण्याची आवश्यकता असते. रोहितने अशावेळी तरुण खेळाडूंशी बोलून, चर्चा करुन त्यांना मदत करावी अशी अपेक्षा आहे. संघामध्ये तुम्हाला समतोल राखायचा असतो. कर्णधाराला मदतीसाठी एका सिनीअर खेळाडूची गरज असते. धोनी संघात असताना कोहली आणि धोनी हे तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करायचे.

  • सध्या धोनी भारतीय संघात नसल्यामुळे रोहितने आपल्या अनुभवाचा फायदा संघातील तरुण खेळाडूंना करुन द्यावा असं सर्वांचं मत पडलं आहे.” संघ व्यवस्थापनातील सुत्राने IANS वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली.

मुंबईतील १४० वर्ष जुनं रेल्वे वर्कशॉप बंद होण्याच्या मार्गावर :
  • रेल्वे प्रशासनाने परळ वर्कशॉपसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी मध्य रेल्वे प्रशासनाने परळ वर्कशॉपमधील ७१५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बडनेरा येथे तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्याचा निर्णय घेतला. यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचं वातावरण पसरलं आहे. रेल्वे प्रशासन १४० वर्ष जुनं परळ वर्कशॉप बंद करण्याच्या तयारीत असून त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

  • परळ वर्कशॉपमध्ये एकेकाळी हजारो कर्मचारी कार्यरत होते. परंतु आता जितके कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांची अन्य ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात येत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने नुकताच ७१५ कर्मचाऱ्यांची एका वर्षासाठी बदली करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर कर्मचाऱ्यांची नाराजी समोर आली होती. रेल्वे प्रशासन परळ वर्कशॉप बंद करण्याच्या तयारीत असल्याची माहिती एका जाणकाराकडून देण्यात आली.

  • गेल्या अनेक वर्षांपासून यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. कधी या ठिकाणी टर्मिनस उभारण्याच्या गोष्टी केल्या जातात तर कधी या ठिकाणी नवी रेल्वे लाईन टाकण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं, असंही त्यांनी सांगितलं. नवभारत टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एकीकडे सरकार मेक इन इंडियाला चालना देण्याबाबत सांगत आहे. तर दुसरीकडे ऐतिहासिक वारसा असलेले कारखाने बंद करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जात आहेत. अशाने मेक इन इंडियाचं स्वप्न कसं साकार होईल, असं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे ‘फादर ऑफ इंडिया’- डोनाल्ड ट्रम्प :
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख फादर ऑफ इंडिया असा केला आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डोनाल्ड ट्रम्प यांनी तोंडभरुन कौतुक केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती आहेत. भारतात सुरुवातीला वादावादी, हल्लकल्लोळाचं वातावरण होतं.

  • मात्र तिथली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप चांगल्या परिस्थितीने हाताळली. त्यांचा उल्लेख फादर ऑफ इंडिया असाच केला पाहिजे. याचं कारण त्यांनी भारतातील परिस्थिती एखाद्या वडिलधाऱ्या माणसासारखीच सांभाळली. आम्ही त्यांना फादर ऑफ इंडिया असंच म्हणू असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर एल्विस प्रेस्लीसोबतही मोदींची तुलना ट्रम्प यांनी केली.

  • “मला असं वाटतं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे एकमेकांची भेट घेतील. त्यांच्या चर्चेतून सकारात्मक आणि चांगलं काहीतरी समोर येईल ” अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी व्यक्त केली. न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत पाकिस्तानातील ISI आणि अल कायदा याबाबत ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा यावर योग्य तो उपाय पंतप्रधान नरेंद्र मोदी योजतील असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९१५: पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू.

  • १९१९: रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.

  • १९२९: डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.

  • १९४१: प्रभात चा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.

  • १९८१: सांड्रा डे ओ’कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.

  • १९६२: अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.

  • १९९९: अवकाश शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

  • १९९९: रसायन शास्त्रज्ञ प्रा. एम. एस. शर्मा यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

  • १९९९: डॉ. पाल रत्नासामी यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.

  • २००३: जपानच्या होक्काइदो शहराजवळ समुद्रात रिश्टर मापन पद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप.

जन्म 

  • १६९४: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान हेन्री पेल्हाम यांचा जन्म.

  • १७११: चिनी सम्राट कियान लॉँग यांचा जन्म.

  • १८९९: भारतीय कवी आणि गीतकार उदमुलाई नारायण कवी यांचा जन्म.

  • १९११: त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान एरिक विल्यम्स यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८१)

  • १९१६: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९६८)

  • १९२०: इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी २००२)

  • १९२२: स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्म.

  • १९२२: नौरूचे पहिले पंतप्रधान हॅमर डिरॉबुर्ट यांचा जन्म.

  • १९२५: बखर वाङमयकार रघुनाथ विनायक हेरवाडकर यांचा जन्म.

  • १९२६: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी बाळ कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९९४)

  • १९२८: पत्रकार माधव गडकरी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००६)

  • १९२९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॉन रुदरफोर्ड यांचा जन्म.

  • १९३२: स्पेनचे पहिले पंतप्रधान एडॉल्फो साराझ यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१४)

  • १९३८: ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोत्झफेल्ट यांचा जन्म.

  • १९३९: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००९)

  • १९४०: भारतीय-इंग्लिश संशोधक, इतिहासकार, आणि लेखक टिम सेव्हरिन यांचा जन्म.

  • १९४६: भारतीय क्रिकेट खेळाडू बिशनसिंग बेदी यांचा जन्म.

  • १९६९: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू हन्सी क्रोनीए यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००२)

मृत्यू 

  • १०६६: नॉर्वेचा राजा हॅराल्ड (तिसरा) यांचे निधन.

  • १५०६: कॅस्टिलचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन.

  • १६१७: जपानी सम्राट गो-योझेई यांचे निधन.

  • १९८३: बेल्जियमचा राजा लिओपोल्ड (तिसरा) यांचे निधन.

  • १९९०: पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९७)

  • १९९८: रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक कमलाकर सारंग यांचे निधन. (जन्म: २९ जून १९३४)

  • २००४: इंग्रजी व मराठी कवी अरुण कोलटकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९३२)

  • २०१३: लेखक शं. ना. नवरे यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १९२७)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.