चालू घडामोडी - २६ अप्रैल २०१७

Date : 26 April, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकेची क्षेपणास्त्रसज्ज अणुपाणबुडी दक्षिण कोरियात
  • लष्कर स्थापना दिनानिमित्त उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र किंवा अण्वस्त्र चाचणी करण्याचा इशारा दिला होता.

  • कोरिया द्वीपकल्पात तणावाचे वातावरण असून, वसाहतवादी अमेरिकेच्या लष्करी कवायती ही आक्रमक कृती आहे असे त्यांनी सांगितले.

  • अमेरिकेची यूएसएस कार्ल व्हिन्सन ही विमानवाहू युद्धनौका अजून कोरियन द्वीपकल्पात येणार आहे.

  • चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला विरोध असल्याचे अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांना सांगितले

कठीण प्रश्नांसाठीचे अतिरिक्त गुण रद्द
  • ‘सीबीएसई’चा गुण नियंत्रण धोरणाबाबत निर्णय

  • अतिरिक्त गुणपद्धती रद्द केल्यास विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण देणे शक्य होईल. तसेच, गुणांचा फुगवटाही कमी होईल. कट ऑफ गुण कमी झाल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सुलभ होणे शक्य होणार आहे.

  • सीबीएसईने घेतलेला निर्णय चांगलाच आहे. काही राज्यांमध्ये या विषयावर चर्चा सुरू आहे. मात्र, तरीही याबाबत अंतिम निर्णय राज्यांनी घ्यावा, असे जावडेकर म्हणाले.

के. विश्‍वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर :
  • भारतीय चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हिंदीबरोबरच दाक्षिणात्य इंडस्ट्रीत मोलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते के. विश्‍वनाथ यांना जाहीर झाला आहे.

  • नवी दिल्लीत तीन मे रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दहा लाख रुपये रोख, सुवर्ण कमळ आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

  • के. विश्‍वनाथ यांना यापूर्वी पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार व अकराहून अधिक फिल्म फेअर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच १९९२ मध्ये त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला आहे.

मलेरियाच्या पहिल्या लसीकरणासाठी आफ्रिकेची निवड :
  • मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेली जगातील पहिली लस घाना, केनिया आणि मलावी या आफ्रिका खंडातील तीन देशांमध्ये दिली जाणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) जाहीर केले. या तीन देशांमध्ये मलेरियाचा धोका अधिक असून, पुढील वर्षीपासून या लसीची प्रायोगिक स्तरावर चाचणी सुरू होणार आहे.

  • अद्यापही डॉक्‍टरांपुढे मलेरियाचे मोठे आव्हान असून, जगभरात या रोगामुळे दरवर्षी वीस कोटी जण आजारी पडतात. यापैकी पाच लाख जणांचा मृत्यू होतो. मृतांमध्ये बहुतांश जण आफ्रिकेतील लहान मुले असतात.

  • मलेरिया पसरण्यास कारणीभूत असलेल्या डासांपासून संरक्षण करण्यासाठी येथे मच्छरदाणी आणि डास मारण्याचा फवारा असे दोन उपाय योजले जातात, त्यामुळे ग्लॅक्‍सो स्मिथ क्‍लिन या कंपनीने आरटीएस (अथवा मॉस्क्‍युरिक्‍स) ही लस तयार केली आहे.

इस्त्रोकडून 'शुक्र मिशन'ची तयारी सुरू :
  • आपल्या ग्रहमालेतील 'शुक्र' या ग्रहाची रहस्ये उलगडण्यासाठी भारताने तेथे यान पाठविण्याची योजना अद्याप प्राथमिक स्तरावर असली तरी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) याची जय्यत तयारी सुरु केली असून 'व्हिनस मिशन'मध्ये कोणते वैज्ञानिक प्रयोग करावेत याविषयीचे प्रस्ताव पाठविण्याचे देशभरातील वैज्ञानिकांना आवाहन केले आहे.

  • 'इस्रो' ने त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या माहितीनुसार 'शुक्र' ग्रहाच्या दिशेने पाठवायच्या उपग्रहाचे वजन अंदाजे  १७५ किग्रॅ एवढे असण्याची अपेक्षा असून त्यावर ५०० वॉट वीज उपलब्ध असेल.

  • तसेच हा उपग्रह  ५०० बाय ६० हजार किमी अंतराच्या लंबवर्तुळाकार कक्षेतून  'शुक्रा' भोवती घिरट्या घालेल. काही महिन्यांनी ही कक्षा कमी होईल.

दिनविशेष 

ठळक घटना, घडामोडी

  • १७५५ : रशियातील जुन्या प्रख्यात मॉस्को विद्यापीठाची स्थापना.
  • १९५६ : भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उदघाटन.
  • १९५६ : भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते उदघाटन.
  • १८६५ : अब्राहम लिंकनची हत्या करून पळालेल्या जॉन विल्कस बूथला सैनिकांनी ठार केले.
  • १९२५ : पॉल फोन हिंडेनबर्ग वायमार प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • चायना एरलाइन्सचे एरबस ए-३००जातीचे विमान जपानच्या नागोया विमानतळावर कोसळले. २६४ ठार.

जन्मदिवस :

  • २६ एप्रिल १२१ : मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.
  • २६ एप्रिल १४७९ : वल्लभाचार्य, कृष्णभक्तीचा एक वेगळा पंथ पुष्टिमार्ग स्थापन करणारे थोर पुरुष.
  • २६ एप्रिल १६४८ : पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
  • २६ एप्रिल १८९४ - रुडॉल्फ हेस, नाझी अधिकारी.
  • २६ एप्रिल १९०० : चार्ल्स रिश्टर, अमेरिकन भूशास्त्रज्ञ.
  • २६ एप्रिल १९०८ : सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
  • २६ एप्रिल १९१७ : आय.एम.पै, अमेरिकन स्थापत्यविशारद.
  • २६ एप्रिल १९६३ - जेट ली, चीनी अभिनेता.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • २६ एप्रिल ११९२ : गो-शिराकावा, जपानी सम्राट.
  • २६ एप्रिल १४८९ : अशिकागा योशिहिसा, जपानी शोगन.
  • २६ एप्रिल १९२० : श्रीनिवास रामानुजन, प्रसिध्द गणिततज्ञ.
  • २६ एप्रिल १९२४ : रमाबाई महादेव रानडे.
  • २६ एप्रिल विल्यम लॉकवुड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.