चालू घडामोडी - २६ एप्रिल २०१८

Date : 26 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सर्वोच्च न्यायालयात थेट न्यायाधीश बनणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला वकील :
  • वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या त्या देशाच्या पहिल्या महिला ठरणार आहेत. न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालयाने संमती दिली आहे.

  • पुढील आठवड्यात इंदू मल्होत्रा शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान , सरकारने न्यायाधीश के.एम.जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय घेतला आहे. जस्टिस जोसेफ उत्तराखंड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आहेत.

  • सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कॉलेजियमने उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के.एम.जोसेफ यांच्या नावाचीही शिफारस केली होती. दोघांच्या बढतीबाबतची शिफारस जवळपास तीन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती अशी माहिती आहे.

  • २२ जानेवारी रोजी याबाबतची फाईल कायदा मंत्रालयाला मिळाली होती. मात्र, जोसेफ यांची बढती रोखण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांना इंदू यांच्या नियुक्तीबाबत पत्र लिहिणार असल्याची माहिती आहे.

सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर, सर्व्हेतून दावा : 
  • नवी दिल्ली- जागतिक नकाशावर भारताने सहिष्णूचेच्या बाबतीच चौथं स्थान पटकावलं आहे. सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत कॅनडा, चीन, मलेशियानंतर भारताचा क्रमांक लागतो. इप्सॉस मॉरी यांच्या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे. 

  • यावर्षाच्या सुरूवातीला इप्सॉस मॉरी यांनी बीबीसीसाठी 27 देशांचा सर्व्हे केला. त्यामध्ये सुरूवातीला त्यांनी 20 हजार लोकांनाच्या मुलाखती घेतल्या. लोकांच्या मते समजाचं विभाजन करणाऱ्या कुठल्या गोष्टी आहे? याबद्दल माहिती गोळा करण्यात आली.

  • सर्व्हेनुसार 63 टक्के भारतीय लोक विविध संस्कृती, दृष्टीकोनाच्या बाबतीत प्रत्येकाचं वेगळं मत असल्याने ते  भारताला सहिष्णू देश मानतात. दुसरीकडे हंगरीमधील लोक त्यांच्या देशाला सर्वात कमी सहिष्णू देश मानतात. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि ब्राझिलचा क्रमांक लागतो. 

  • भारतीय समाजात राजकीय विचारातील मतभेद तणावाचं कारण बनत असल्याचं 49 टक्के लोकांना वाटत असल्याचं सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 48 टक्के लोक धर्मालाही जबाबदार धरतात तर 37 टक्के लोकांना सामाजिक-आर्थिक दरी तणावाचं कारण वाटते. दुसऱ्या संस्कृतीच्या, पार्श्वभूमीच्या लोकांशी मिळून-मिसळून राहिलं की आदर व सन्मानाची भावना निर्माण होते असं 53 टक्के लोकांना वाटत असल्याचं सर्व्हेमध्ये सांगितलं आहे.

आशियातील 'हे' पाच देश सर्वाधिक प्लास्टिक कचरा समुद्रात टाकतात :
  • न्यू यॉर्क- आशिया खंडातील पाच देशांमध्ये होणारा प्लास्टिकचा कचरा महासागरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करत आहेत. इंडोनेशियातील सित्रम नदीमध्ये टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे ही नदी ओळखण्याच्या पलीकडे गेली आहे.

  • जगातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून ती ओळखली जात आहे. या नदीवर प्लास्टिकचा एक थरच निर्माण झाल्यामुळे हे प्लास्टिक काढण्यासाठी थेट लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. याबाबत विविध माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. ग्रीन अर्थ या संस्थेच्या माहितीनुसार हाँगकाँगमध्ये एका दिवसात 52 लाख पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या वापरल्या जातात.

  • आशियामधील चीन, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, थायलंड आणि व्हिएतनाम सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक महासागरांमध्ये टाकत आहेत. या पाच देशांनी महासागरात फेकलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण हे जगातील इतर देशांच्या एकत्रित कचऱ्यापेक्षा जास्त आहे असे ओशन कॉन्झर्वन्सीने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे.

  • अर्थात प्लास्टिकचा प्रश्न जगभरातील सर्वच देशांना भेडसावत आहे. अमेरिकेने 3.36 कोटी टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती केली आणि त्यातील केवळ 9.5 टक्के प्लास्टिक कचऱ्याचेच पुनर्चक्रीकरण करण्यात आले.

आयुष्यभर सुटका नाही, आसारामला जन्मठेप :
  • जोधपूर : अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणात दोषी ठरलेला आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जोधपूर SC आणि ST कोर्टाने ही शिक्षा ठोठावली. याप्रकरणातील दुसरे आरोपी शरद आणि शिल्पी यांना 20-20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

  • आसाराम गेल्या 1 हजार 667 दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये आहे.

  • जोधपूर कोर्टाने आज सकाळीच आसारामसह शरद आणि शिल्पी या तिघांना दोषी  ठरवलं. तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं. एकूण पाच आरोपींबाबत कोर्टाने आज निर्णय दिला.

  • 6 नोव्हेंबर 2013 रोजी पोलिसांनी आसाराम आणि त्याचे सहकारी शिवा, शिल्पी, शरद आणि प्रकाश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.

  • आसारामविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत, जुवेनाईल जस्टिस्ट अर्थात अल्पवयीन न्याय आणि आयपीसीच्या अन्य कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.(source : abpmajha)

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द :
  • मुंबई : एसटी महामंडळामध्ये भरती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना सध्या एक वर्षापर्यंत कनिष्ठ वेतन श्रेणीवर काम करावे लागते. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणीची ही पद्धत रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना होईल, असेही दिवाकर रावते यांनी सांगितले.

  • दिवाकर रावते म्हणाले की, “एसटी महामंडळात भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या एक वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागते. या काळात कमी वेतनामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. या कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक कुचंबणा लक्षात घेता कनिष्ठ वेतन श्रेणीची पद्धती रद्द करण्यात येईल. या निर्णयावर संचालक मंडळाच्या येणाऱ्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात येईल.”

  • “एसटीमध्ये पूर्वी नवीन कर्मचारी भरती झाल्यानंतर त्याला सुरुवातीची पाच वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. तो कालावधी नंतर तीन वर्षावर आणण्यात आला. आपण तो कालावधी एक वर्षावर आणला. पण आता हा कालावधीही रद्द करण्यात येईल, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणीची पद्धत रद्द करण्यात येईल. या निर्णयाचा लाभ नव्याने भरती होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना होईल.”, असेही रावतेंनी सांगितले.

दिनविशेष :
  • जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन

महत्वाच्या घटना

  • १९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.

  • १९३३: नाझी जर्मनीच्या गेस्टापो या गुप्त पोलिसदलाची स्थापना झाली.

  • १९६२: रेंजर-४ हे नासाचे यान चंद्रावर कोसळले.

  • १९६४: टांगानिका झांजीबार मिळून टांझानिया देश तयार झाला.

  • १९७०: जागतिक बौद्धिक मालमत्ता संघटना स्थापन करणारया अधिवेशनाची अंमलबजावणी झाली.

  • १९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.

  • १९८६: रशियातील चेर्नोबिल येथील अणुभट्टीत भीषण स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात फेकले गेले.

  • १९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.

  • १९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.

  • २००५: आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे सीरीयाने लेबाननमधुन सैन्य काढुन घेतले.

जन्म

  • १४७९: पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य यांचा जन्म.

  • १५६४: इंग्लिश नाटककार आणि अभिनेता विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १६१६)

  • १९००: रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक चार्लस रिश्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर १९८५)

  • १९०८: भारताचे १३ वे सरन्यायाधीश सर्व मित्र सिकरी यांचा जन्म. (मृत्यू: २४ सप्टेंबर १९९२)

  • १९४०: भारतीय मोल्वी आणि राजकारणी मोल्वी इफ्तिखार हुसैन अन्सारी  यांचा जन्म. (मृत्यू: ३० सप्टेंबर २०१४)

  • १९४८: अभिनेत्री मौशमी चटर्जी यांचा जन्म.

  • १९७०: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा जन्म.

मृत्यू

  • १९२०: थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचे निधन. (जन्म: २२ डिसेंबर १८८७)

  • १९७६: साहित्यिक चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३०)

  • १९८७: शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकरसिंग रघुवंशी यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर१९२२)

  • १९९९: लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान मनमोहन अधिकारी यांचे निधन. (जन्म: २० जून १९२०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.