चालू घडामोडी - २६ मार्च २०१८

Date : 26 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धा: महाराष्ट्राच्या नितीन म्हात्रेला सुवर्ण :
  • मुंबई : कोणतीही पोझ मारताना एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्थिर राहणारा महाराष्ट्राचा होल्ड मॅन आणि मि. वर्ल्ड नितीन म्हात्रेने 60 किलो वजनी गटात पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करीत आपल्या भारत श्री गटविजेतेपदाची हॅट्ट्रिक केली.

  • नितीनच्या सुवर्ण कामगिरीमुळे महाराष्ट्राने 11 व्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत आपले पहिले सुवर्ण पदक पटकावले. तसेच 55, 65 आणि 70 किलो वजनी गटात रेल्वेच्या जे.जे.चकवर्ती, एस. भास्करन आणि अनास हुसेन यांनी बाजी मारून रेल्वेची सुवर्ण गाडी सुसाट असल्याचे दाखवून दिली. त्याचप्रमाणे 90 खेळाडूंचा सहभाग असलेल्या फिजीक स्पोर्टस् प्रकारात महाराष्ट्राच्या किरण साठे आणि रोहन पाटणकरला धक्का देत चंदीगडच्या चेतन सैनीने धमाकेदार यश संपादले.

  • भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेच्या पहिल्या चार गटात रेल्वेने जबरदस्त कामगिरीची नोंद करीत महाराष्ट्राच्या सांघिक विजेतेपदाच्या स्वप्नांमध्ये अडथळे निर्माण केले आहे. 

  • 55 किलो वजनी गटात रेल्वेच्या जे.जे. चक्रवर्तीने दिल्लीच्या सोनूला मागे टाकत सोने जिंकले. त्यानंतर 60किलो वजनी गटातही रेल्वेच्याच हरीबाबूचा बोलबाला होता, पण महाराष्ट्राच्या होल्ड मॅन नितीन म्हात्रेने आपल्या अनुभवी, पीळदार आणि सहजगत्या पोझ मारण्याच्या कलेच्या जोरावर बाजी मारली. 

इंग्रजी शब्दांचे मराठीतून अर्थ जाणणे सोपे होणार :
  • मुंबई : शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा. रोजच्या व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या इंग्रजी शब्दांचा मराठीत अर्थ आणि मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ सहज उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत येणाºया भाषा संचालनालयाने शासन शब्दकोश अ‍ॅप (उपयोजक) तयार केले आहे. शासन ‘शब्दकोश भाग - एक’ असे या मोबाइल अ‍ॅपला नाव देण्यात आले असून, यात निवडक शब्दकोशातील ७२ हजार १७१ पर्यायी शब्दांचा समावेश आहे.

  • भाषा संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या शब्दकोशांपैकी शासन व्यवहार कोश, प्रशासन वाक्प्रयोग, न्यायव्यवहार कोश व कार्यदर्शिका हे चार निवडक शब्दकोश पहिल्या टप्प्यात या भ्रमणध्वनी उपयोजकाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपयोजकाद्वारे शासन व्यवहारात व न्याय व्यवहारात वापरण्यात येणाºया इंग्रजी शब्दांना मराठीत अर्थ व पर्याय आणि मराठी शब्दांना इंग्रजीत अर्थ व पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

  • दिवसेंदिवस माहिती तंत्रज्ञानात होत असलेला बदल विचारात घेता, मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा या उद्देशाने भाषा संचालनालयाने, निवडक शब्दकोशांचा समावेश असलेला शासन शब्दकोश भाग-१ हे भ्रमणध्वनी उपयोजक (अ‍ॅप) तयार केले आहे.

  • केंद्र व राज्य शासनाचे अधिनियमही उपलब्ध शासन शब्दकोश मोबाइल अ‍ॅपमध्ये राज्य व केंद्र शासनाचे अधिनियमसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सध्या ७५० शासकीय अधिनियम उपलब्ध आहेत. या अधिनियमाची पीडीएफ स्वरूपातील मराठी प्रत उपलब्ध आहे, ती डाऊनलोडसुद्धा करता येऊ शकते.

‘भारतविरोधी’ जॉन बोल्टनची अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती :
  • वॉशिंग्टन : गेल्या 14 महिन्यात तिसऱ्यांदा अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बदलला आहे. यावेळी त्यांनी 'भारतविरोधी' जॉन बोल्टनची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती केली आहे.

  • बोल्टन याने संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला कडाडून विरोध केला होता. संयुक्त राष्ट्र संघात भारताला सदस्यत्व मिळू नये, यासाठी जॉन बोल्टनने चीनशीही हात मिळवणी केली होती.

  • जॉनच्या नियुक्तीवर स्वीडनचे माजी पंतप्रधान कार्ल बिल्ड यांनी आक्षेप नोंदवला आहे. जॉनच्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्तीने संपूर्ण जगात चुकीचा संदेश जात असल्याचं मत बिल्ड यांनी नोंदवलं आहे.

  • बिल्ड म्हणाले की, “बोल्टनची नियुक्ती ही अतिशय चिंताजनक आहे. त्याच्याऐवजी अमेरिकेत इतरही अनेक व्यक्ती आहेत. जे हे पद चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. पण ट्रम्प यांचा हा निर्णय देशासाठी धोक्याची घंटा असू शकतो.”

  • दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टने काही दिवसांपूर्वी आपल्या एका वृत्तातून ट्रम्प विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एचआर मॅकमास्टरला पदावरुन दूर करण्याचे संकेत दिले होते. मॅकमास्टर आणि ट्रम्प यांच्यात एकवाक्यता होत नसल्याने, मॅकमास्टरची गच्छंती होऊ शकते, असं या वृत्तात म्हटलं होतं.

महाराष्ट्राची कांची आडवाणी मिस इंडिया :
  • आधीच नऊ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने अकराव्या मि. इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेच्या महिला शरीरसौष्ठव स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून मिस इंडियाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्राच्या कांची आडवाणीने ऐतिहासिक कामगिरी करीत महिला शरीरसौष्ठवात मणिपूरच्या वर्चस्वाला धक्का दिला.

  • मुळ मणिपूरची असलेल्या ममता देवी यमनमवर मात करीत कांचीने ही सुवर्णमयी कामगिरी रचली. हरयाणाची गीता सैनी तिसरी आली तर मणिपूरच्या जमुना देवी आणि सरिता देवीला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या स्पोर्टस् मॉडेल प्रकारात उत्तर प्रदेशची संजू विजेती ठरली. पश्चिम बंगालच्या सोनिया मित्राने रूपेरी कामगिरी करण्यात यश मिळविले.

  • विक्रमी स्पर्धक आणि अभूतपूर्व गर्दीत शरीरसौष्ठवच्या पुंभमेळ्यात महिलांच्या शरीरसौष्ठव आणि स्पोर्टस् मॉडेल प्रकारात स्पर्धकांचा विक्रमी सहभाग स्फूर्तीदायक ठरला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार चुरस पाहायला मिळाली. या गटात मणिपूरच्या तीन खेळाडू होत्या.

  • पण अवघ्या दीड वर्षात आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या सुडौल बांध्याला पीळदार करणाऱया कांची आडवाणीने इतिहास रचला. श्रीमंत कुटुंबात वाढलेल्या या सिंधी कन्येने आपल्या कुटुंबाचा विरोध झुगारत फिटनेसवर केलेल्या मेहनतीला अखेर मिस इंडिया किताबाचे फळ लाभले. विशेष म्हणजे तिने मणिपूरच्या बलाढ्य आणि पीळदार ममता देवी, सरिता देवी आणि जमुना देवीला हरविण्याचा पराक्रम केला.

काटेरी फणस बनले केरळचे राज्यफळ :
  • काटेरी आणि अवजड असूनही आतमध्ये गोड रसाळ गरे असणाऱ्या फणसाला नुकतेच केरळच्या राज्यफळाचा मान मिळालाआहे. या राज्यात होणारे फणसाचे उत्पादन आणि निर्यात यावरुन हा मान बहाल करण्यात आला आहे. 

  • राज्याचे कृषिमंत्री व्ही.एस. सुनीलकुमार नुकतीच या गोष्टीची विधानसभेत ही घोषणा केली. ते म्हणाले, केरळमध्ये दरवर्षी 30 ते 60 कोटींहून अधिक फणसांचे उत्पादन होते. हे उत्पादन संपूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करुन कोणतीही कटकनाशके न वापरता केलेले असते.

  • केरळचा फणस आणि त्यापासून बनविलेल्या उत्पादनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी येत्या काळात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या सर्व व्यवहारातून सुमारे 15 हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. 

  • तसेच फणसाबरोबर या राज्यातील केळी आणि अननसही परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात. येत्या काळात आपल्या कष्टाचा मोबदला थेट शेतकऱ्यांना मिळावा यासाठी त्यांच्याकडून खरेदी करण्याचा मानस असल्याचेह त्यांनी सांगितले. फणसाला राज्याचे फळ म्हणून मान देणारे केरळ हे पहिले राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.

  • १९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.

  • १९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.

  • १९४२: इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.

  • १९४२: ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.

  • १९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.

  • १९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.

  • १९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.

  • २०००: ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

  • २०१३: त्रिपूरा उच्‍च न्यायालयाची स्थापना.

जन्म

  • १८७४: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९६३)

  • १८७५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्‍ही यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १९६५)

  • १८७९: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ओथमर अम्मांन यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर१९६५)

  • १८८१: गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते गुच्चिओ गुच्ची यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९५३)

  • १८९८: पुमा से कंपनी चे निर्माते रुडॉल्फ दास्स्लेर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)

  • १९०७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)

  • १९०९: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २०००)

  • १९७३: गुगल चे सह-संस्थापक लॅरी पेज यांचा जन्म.

  • १९८५: झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू प्रॉस्पर उत्सेया यांचा जन्म.

मृत्यू

  • १८२७: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७०)

  • १८८५: वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक अंसन स्तागेर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८२५)

  • १९३२: कॅडिलॅक आणि लिंकन कंपनी चे स्थापक हेन्री एम. लेलंड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८४३)

  • १९९६: चित्रकार के. के. हेब्बर यांचे निधन.

  • १९९६: हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर१९१२)

  • १९९७: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९१०)

  • १९९९: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९४२)

  • २००३: गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या.

  • २००८: दलित साहित्यिक बाबुराव बागूल यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९३०)

  • २०१२: प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचे निधन. (जन्म: १० मे १९४०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.