चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ मे २०१९

Date : 26 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'मेन इन ब्लू' विश्वचषकात भगव्या रंगात खेळणार :
  • मुंबई : 'मेन इन ब्लू' अशी ओळख असलेला भारताचा क्रिकेट संघ, इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात वेगळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. जर्सीबाबत आयसीसीने यंदाच्या विश्वचषकासाठी फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे अशा नवा प्रस्ताव ठेवला आहे.

  • या नियमानुसार यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार आहे. मात्र आयसीसीने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

  • आगामी विश्वचषकात टीम इंडियाच्या पर्यायी जर्सीचा रंग निळा आणि भगवा असेल. टीम इंडियाच्या वन डे सामन्यांसाठीच्या पारंपरिक जर्सीचा रंग निळा आहे. त्यातही कॉलरवर आणि पाठीवरच्या नाव-क्रमांकासाठी भगव्या रंगाचा मोजका वापर आहे. पण विश्वचषकातल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडिया पर्यायी म्हणजे निळ्या आणि भगव्या रंगाच्या नव्या जर्सीत खेळणार आहे.

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना देशाबाहेर जाताना अडविले :
  • मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. गृहमंत्रालयाच्या लुकआउट नोटिस मुळे देशाबाहेर जाण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती शनिवारी मुंबई विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना दिली.

  • नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी परदेशात जाण्यासाठी मुंबई विमानतळावर आलेले असताना त्यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून अडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी अनिता गोयल यांच्या नावे असलेल्या बॅग्ज देखील विमानातून बाहेर काढून घेण्यात आल्या. या सगळ्या प्रकारामुळे विमानाच्या उड्डाणालाही उशीर झाला.

  • काही दिवसांपूर्वी बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजची सेवा पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. त्यानंतर जेट एअरवेजच्या अधिकारी आणि कामगारांच्या संघटनेने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून नरेश गोयल यांचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली होती.

  • जेट एअरवेजच्या आर्थिक अडचणी वाढल्यानंतर 25 मार्च रोजी संस्थापक नरेश गोयल यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वीच जेटची आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. जेट एअरवेज बंद पडल्यानं 20 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे.

युनोच्या पदकाने जितेंद्र कुमार मरणोत्तर सन्मानित :
  • संयुक्त राष्ट्रे : युद्धग्रस्त डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये युनोच्या शांतता मोहिमेत प्राणाचे बलिदान केलेले भारतीय पोलीस अधिकारी जितेंद्र कुमार यांचा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेज यांनी प्रतिष्ठेच्या डॅग हॅम्मारर्स्कजोल्ड पदकाने शुक्रवारी मरणोत्तर सन्मान केला.

  • युनोच्या मुख्यालयात संयुक्त राष्ट्रांचा इंटरनॅशनल डे ऑफ ‘युएन पीसकीपर्स अँड पे होमेज टू दोज हू कुडन्ट रिटर्न’ च्या स्मरणार्थ युनोतील भारताच्या स्थायी मोहिमेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जितेंद्र कुमार यांना बहाल केलेले पदक युनोतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन यांनी स्वीकारले.

  • कांगोतील मिशनवर असताना धाडस आणि सर्वोच्च बलिदान केल्याबद्दल ११९ स्त्री आणि पुरुषांना या पदकाने सन्मानीत केले. जगभरातील ३८ देशांतील संयुक्त राष्ट्रांच्या १२ वेगवेगळ््या शांतता मोहिमांत काम केलेले लष्करी आणि पोलीस अधिकारी, आंतरराष्ट्रीय सिव्हील सर्व्हटंस, नॅशनल स्टाफ आणि युनोचे स्वयंसेवक यावर्षीच्या या पदकाचे मानकरी होते.

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केली राजीनाम्याची घोषणा :
  • लंडन : आपल्या ‘ब्रेकिझट’ प्रस्तावास संसद सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यास अपयश आल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांनी सत्ताधरी कॉन्झव्हेटिव पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देण्याची शुक्रवारी घोषणा केली.

  • १०, डाऊनिंग स्ट्रीट या आपल्या निवासस्थानाबाहेर एका निवेदनात मे यांनी ही घोषमा केली तेव्हा त्यांचा कंठ भावनावेगाने दाटून आला होता. ब्रिटनला युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ‘ब्रेक्झिट’ करार देऊ शकले नाही, याची मला नेहमीच मनापासून खंत वाटत राहील.

  • मे म्हणाल्या की, ७ जून रोजी मी कॉन्झव्हेटिव व युनियनिस्ट पक्षांच्या नेतेपदाचा राजीनामा देईन. त्यानंतर आठवडाभरात नवा नेता निवडण्याच्या हालचाली सुरु होणे अपेक्षित आहे. नेतेपदाची ही स्पर्धा अनेक आठवडे चालेल, असे दिसते. 

गरिबीमुक्ती, अल्पसंख्याकांचा विश्वास :
  • गेली पन्नास वर्षे देशातील गरीब गरीबच राहिला. त्यांच्याभोवती ‘गरिबी हटाओ’चा भ्रम निर्माण केला गेला. अल्पसंख्याकांना भीती दाखवली गेली, त्यांचा मताच्या राजकारणासाठी वापर केला गेला पण, या कपटी राजकारणाला छेद द्यायचा आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व समाजांना बरोबर घेऊन देशाचा विकास साधण्याचे आश्वासन दिले. गेले पाच वर्षे ‘सबका साथ सबका विकास’ हा नारा दिला गेला होता. आता त्यात ‘सबका विश्वास’ याची भर पडली असल्याचे मोदी म्हणाले.

  • संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शनिवारी ‘एनडीए’च्या संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत ‘एनडीए’च्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. शिरोमणी अकाली दलचे प्रमुख प्रकाशसिंग बादल यांनी हा प्रस्ताव ठेवला. त्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जनता दल (सं)चे अध्यक्ष नितीश कुमार, लोकजनशक्तीचे प्रमुख रामविलास पासवान यांन अनुमोदन दिले. मोदी सेंट्रल हॉलमध्ये येताच खासदारांनी ‘मोदी मोदी’ जयघोष केला. मोदींनी सेंट्रल हॉलमधील संविधानाला नमन केले. त्याआधी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीतही मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मांडलेल्या प्रस्तावाला नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांनी अनुमोदन दिले.

  • डॉ. आंबेडकरांच्या तपस्येतून निर्माण झालेल्या संविधानाच्या चौकटीत राहूनच जनसेवा करण्याचे आवाहन मोदींनी केले. महात्मा गांधी, दिनदयाळ उपाध्याय आणि राम मनोहर लोहिया या तिघांचा भारतीय राजकारणातील प्रत्येकावर प्रभाव आहे. देशातील शेवटच्या माणसाच्या भल्याचा विचार केला पाहिजे असे गांधीजी म्हणत हाच विचार घेऊन जातपात, पंथ यांच्यातील भेदभाव दूर करून देशाचा विकास करण्याचे ध्येय असल्याचेही मोदींनी भाषणात नमूद केले. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील जनमानसातील चैतन्य आणि जोश भारताला २१ व्य शतकात घेऊन जाण्यासाठी गरजेचा असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.

जोकोव्हिचसमोर नदाल, फेडररचे आव्हान :
  • सलग चार ग्रँडस्लॅम जिंकून दाखवण्याची कामगिरी पुन्हा एकदा करण्यासाठी नोव्हाक जोकोव्हिच उत्सुक असून त्याच्यासमोर राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांचेच प्रमुख आव्हान असणार आहे, तर महिलांमध्ये नाओमी ओसाकाच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल.

  • तीन वर्षांपूर्वी जोकोव्हिचने अशी कामगिरी केलेली असल्याने ती किमया पुन्हा साधण्यास तो सज्ज झाला आहे. अशा प्रकारची कामगिरी डॉन बज (१९३८) आणि रॉड लेव्हर (१९६२ आणि १९६९) यांनाच जमली होती. त्यातही लेव्हरप्रमाणे दोन वेळा चारही ग्रँडस्लॅम सलग जिंकण्याची किमया अद्याप कुणालाही दाखवता आलेली नाही. त्यामुळे यंदाची फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकून त्या विक्रमाची बरोबरी करण्याच्या निर्धारानेच जोकोव्हिच उतरणार आहे. जोकोव्हिचने २०१८ची विम्बल्डन आणि अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा तसेच यंदा जानेवारीत झालेली ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली असल्याने त्याला २०१६च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे वेध लागले आहेत.

  • यंदा फ्रेंच खुली टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचची पहिली लढत पोलंडच्या हुबर्ट हूरकॅझशी होणार असून तो अडथळा पार केल्यास पुढील लढतीत त्याला बहुधा जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हशी झुंजावे लागणार आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८९६: निकोलस (दुसरा) रशियाचा झार बनला.

  • १९७१: बांगलादेशातील सिल्हेट येथे पाकिस्तानी सैन्याने ७१ हिंदूंची कत्तल केली.

  • १९८६: युरोपियन समुदायाने (EU) नवीन ध्वज अंगीकारला.

  • १९८९: मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्‍घाटन झाले.

  • १९९९: श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.

  • २०१४: नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.

जन्म 

  • १८८५: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९१९)

  • १९०२: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९६८)

  • १९०६: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक बेन्जामिन पिअरी पाल यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९८९)

  • १९३०: भारतीय-ईराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक करीम इमामी यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै २००५)

  • १९३७: भारतीय अभिनेत्री आणि गायक मनोरमा यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०१५)

  • १९३८: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बी. बिक्रम सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे २०१३)

  • १९४५: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट २०१२)

  • १९६१: भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक तारसेम सिंग यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७०३: विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १६३३)

  • १९०२: अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचे निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८३९)

  • १९०८: अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८३५)

  • २०००: अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचे निधन.

  • २०००: चित्रकार प्रभाकर शिरुर यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.