चालू घडामोडी - २६ नोव्हेंबर २०१७

Updated On : Nov 26, 2017 | Category : Current Affairsअमेझॉनच्या संस्थापकाने बिल गेट्स यांचाही विक्रम मोडला, संपत्ती तब्बल...
 • मुंबई :  ई-कॉमर्स क्षेत्रातील जायंट मानल्या जाणाऱ्या अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजॉस यांनी संपत्तीच्या बाबतीत बिल गेट्स यांचा 18 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. ब्लॅक फ्रायडे सेल्सनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्के वाढ झाल्याने संपत्ती 100.3 अब्ज डॉलर (सुमारे 6 लाख 46 हजार 575 कोटी रुपये) झाली आहे.

 • 100 डॉलर कोटींहून अधिक संपत्ती असणारी जेफ बेजॉस ही दुसरी व्यक्ती ठरली आहे. याआधी 1999 साली मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी या विक्रमाची नोंद केली होती. बिल गेट्स, जेफ बेजॉस आणि तिसऱ्या क्रमांकवर वॉरेन बफेट असा जगातील श्रीमंतांचा क्रम तयार झाला आहे.

 • बिल गेट्स किंवा तिसऱ्या क्रमांकावरील वॉरेन बफेट यांच्या तुलनेत जेफ बेजॉस हे समाजसेवेसाठी खूप पैसा खर्च करतात. मात्र ते करतच नाहीत, असेही नाही. बेजॉस यांनी जूनमध्येच ट्विटरवरुन विचारले होते की, समाजसेवेसाठी कशाप्रकारे मदत करायला हवी ? (source :abpmajha)

गुजरातचा रणसंग्राम : काँग्रेस-भाजपच्या प्रचारासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी मैदानात :
 • नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापलं आहे. भाजप आणि काँग्रेसकडून निवडणूक प्रचारासाठी चांगला जोर लावला जात आहे. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराची धुरा पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या खांद्यावर आहे.

 • तर दुसरीकडे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनेक सभा घेत आहेत. दोन्ही पक्षांनी याबाबत अधिकृत घोषणा केली नसली, तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड सेलिब्रेटिंसह अनेक टीव्ही स्टार उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.

 • अधिक माहितीनुसार, बॉलिवूडचा दंबग खान सलमान भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे. सलमान खान आणि पंतप्रधान मोदींमधील मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रूत आहेत. गुजरात महोत्सवात सलमान खान पंतप्रधान मोदींसोबत पतंगबाजी करताना दिसला होता. त्यामुळे तो भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (source :abpmajha)

तोंडात भरपूर स्ट्रॉ कोंबण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड :
 • ओडिशातील मनोजकुमार महाराणा या पठ्ठ्याने आपल्या तोंडात 459 स्ट्रॉ ठेवूनगिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याला लहानपणापासूनच आपलं नाव नोंदवयाचं होतं म्हणून या त्याने तोंडात स्ट्रॉ ठेवून पराक्रम केला आहे.

 • मनोजकुमार हा अवघ्या 23 वर्षांचा तरुण आहे. तोंडात स्ट्रॉ ठेवून रेकॉर्ड बनवणारे सिमोन एलमोरे यांची प्रेरणा घेऊन मनोजकुमारने हा रेकॉर्ड केला आहे. सिमोन एलमोरे यांनीही असाच रेकॉर्ड केला होता. सिमोन हे जर्मनीचे असून त्यांनी आपल्या तोंडात 400 स्ट्रॉ ठेवून विश्वविक्रम केला होता.

 • आणि आता मनोजकुमार याने तब्बल 459 स्ट्रॉ ठेवून सिमोन यांचा विक्रम मोडला असून नवा विश्वविक्रम केला आहे. सिमोन नंतर मधल्या आठ वर्षात असा रेकॉर्ड कोणीही केलेला नाही.

 • वर्ल्ड रेकॉर्डसाठी काही नियम असतात, त्या नियमांनुसार आपल्या हातांचा आधार न घेता हे स्ट्रॉ 10 सेकंद तोंडात ठेवावं लागतं.

500 बेपत्ता मुलांना मिळाला जगण्याचा 'आधार'! :
 • नवी दिल्ली- सर्व व्यवहार एका बटनावर आणण्याचे प्रयत्न असल्यानं मोबाईल, बँक खाती आधारशी जोडण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. आधारच्या या सक्तीला अनेकांनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केल्या आहेत. परंतु याच आधारच्या माध्यमातून 500 बेपत्ता मुलांचा शोध लागल्याची माहिती समोर आली आहे.

 • यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी हे सार्वजनिक केलं आहे. ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबरस्पेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 • काही बेपत्ता झालेली मुलं अनाथाश्रमात होती. मात्र ज्यावेळी ती मुलं आधार नोंदणीसाठी गेली, त्यावेळी त्यांचा 12 अंकी बायोमेट्रिक क्रमांक आधीच अस्तित्वात असल्याचं समोर आलं.

 • त्यामुळे या मुलांच्या कुटुंबीयांचा थांगपत्ता लावणं सहज शक्य झालं, अशी माहिती पांडे यांनी दिली आहे. हरवलेली मुलं अनेक वर्षांनी त्यांच्या कुटुंबीयांना आधारमुळेच भेटल्याचं भूषण पांडे यांनी सांगितलं आहे.(source :lokmat)

लोकशाहीमध्ये हिंसक धमक्या देणे अयोग्य ! उपराष्ट्रपतींनी पद्मावती प्रकरणी विरोधकांना सुनावले :
 • नवी दिल्ली : हिंसक धमक्या देणे आणि कुणाला शारीरिक नुकसान पोहोचविण्यासाठी बक्षीस जाहीर करणे, असे प्रकार लोकशाहीत स्वीकारार्ह नाहीत, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

 • ‘पद्मावती’ चित्रपटाचा उल्लेख न करता व्यंकय्या नायडू यांनी कायद्याचे उल्लंघन करू पाहणा-यांना इशारा दिला. एका साहित्य महोत्सवात व्यंकय्या नायडू म्हणाले की, काही चित्रपटांवरून समस्या निर्माण झाली आहे. काही लोकांना असे वाटते की, त्यांचा धर्म आणि समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

 • मात्र अशा आंदोलनाच्या काळात काही लोक अतिरेकच करतात आणि बक्षिसांच्या घोषणा करतात. या लोकांकडे एवढा पैसा आहे की नाही याबाबत मला संशय आहे. सर्वच जण एक कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करत आहेत.

 • एक कोटी रुपये असणे सोपे आहे काय? मुळात लोकशाहीत हिंसाचाराला चिथावणी देणाºया धमक्यांना स्थानच असता कामा नये. लोकशाही पद्धतीने विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

 • आंतरराष्ट्रीय महिला मानवी हक्क संरक्षण दिन / भारतीय संविधान दिन

महत्वाच्या घटना

 • १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.

 • १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.

 • १९६५: अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.

 • १९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.

 • १९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.

 • १९९९: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.

 • २००८: महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.

 • २००८: पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैय्यबा ने मुंबई येथे दहशदवाद्याचा आतंकवादी हल्ला. या घटनेला २६/११ म्हणून ओळखले जाते.

जन्म

 • १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १८९९)

 • १९९४: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन. (जन्म: २ मे १८९९)

 • १९९९: पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक दत्तात्रय शंकर जमदग्नी यांचे निधन.

 • २००१: शिल्पकार चंद्रकांत कृष्णाजी जगताप यांचे निधन.

 • २००८: मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामते यांच्यासह १७ पोलीस कर्मचारी शहीद.

 • २०१२: भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी सी नंबुदीपदी यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१९)

 • २०१६: रशियन विमान मिग-२९ चे सह-निर्माता आणि डिझायनर इव्हान मिकोयान यांचे निधन.

मृत्य

 • १८९०: भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक सुनीतिकुमार चटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे१९७७)

 • १८९८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ कार्ल झीगलर यांचा जन्म.

 • १९०२: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९७१)

 • १९१९: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०११)

 • १९२३: चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९७५ – मुंबई)

 • १९२४: भारतीय क्रिकेटपटू जसुभाई पटेल यांचा जन्म.

 • १९२६: कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म.

 • १९३९: अमेरिकन-स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका टीना टर्नर यांचा जन्म.

 • १९४९: पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारी अल्कातीरी यांचा जन्म

 • १९५४: एल. टी. टी. ई. चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २००९)

 • १९८३: फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूजेस यांचा जन्म.

टिप्पणी करा (Comment Below)