चालू घडामोडी - २६ सप्टेंबर २०१७

Date : 26 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मुख्य शहरांमधील खातेदारांसाठी महत्त्वाचा निर्णय एसबीआयकडून :
  • भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने मुख्य शहरांमधील शाखांसाठी एक चांगले पाऊल उचलले असून किमान मासिक शिल्लक (Monthly Average Balance) रकमेची मर्यादा एसबीआयने ५ हजारांवरून ३ हजारांवर आणली आहे.

  • तसेच किमान शिल्लक ठेवता न आल्यास आकारण्यात येणारे शुल्कही कमी करण्यात आले आहे, एसबीआयने या संदर्भातले ट्विट केले आहे.

  • ‘सेमी अर्बन’ शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात हे शुल्क २० ते ४० रूपये असेल. तर मुख्य शहरांमध्ये हे शुल्क ३० ते ५० रुपये असणार हे नवे बदल ऑक्टोबरपासून लागू होतील असेही एसबीआयने स्पष्ट केले आहे.

  • पेन्शनर, सरकारी योजनांचा लाभ घेणारे खातेदार आणि अल्पवयीन खातेदारांना मिनिमम बॅलन्स ठेवण्याचे कोणतेही बंधन ठेवण्यात आले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी - सुशासनाचे राजकारण हवे :
  • ‘‘विरोधकांसाठी सत्ता एक उपभोग्य वस्तू असून सत्ता उपभोगण्यासाठीच ते राजकारण करत असत म्हणून तर विरोधी बाकांवर कसे बसायचे असते, हेच त्यांना समजतसुद्धा नाही.

  • सरकारविरोधात कोणतेही ठोस मुद्दे नसताना, भ्रष्टाचाराचा डाग नसतानाही विरोधक अतिशय आक्षेपार्ह भाषेचा वापर करीत आहेत, पण भाजप त्यांच्यापेक्षा वेगळा आहे.

  • आपली बांधिलकी जनतेशी असली पाहिजे, आपण सुशासनाचे राजकारण केले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या विस्तारित राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये केले.’

  • ’ केंद्रात आणि १९ राज्यांमध्ये सत्ता आपल्याला मिळालीय त्यावरून जनतेच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांचा अंदाज करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • भाजपसारखी संघटना अन्य कोणत्याही पक्षात नसल्याची टिप्पणी करीत ते म्हणाले, ‘‘एक राजकीय पक्ष म्हणून निवडणुका लढविणे आणि जिंकण्यासाठी प्रयत्न करणे स्वाभाविक आहे; पण निवडणुका जिंकणे हेच एकमेव उद्दिष्ट असता कामा नये.

लवकरच येणार सॅमसंगचा घडी होणारा स्मार्टफोन :
  • सॅमसंगने आधीच घडी होणार्‍या डिस्प्लेचे पेटंट घेतले असून याशिवाय, या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये या प्रकारचा डिस्प्ले प्रदर्शीतदेखील करण्यात आला होता.

  • तेव्हाच सॅमसंग कंपनी फोल्ड होणारी उपकरणे विकसित करत असल्याचे स्पष्ट झाले असून यात स्मार्टफोनसह लॅपटॉप व टॅबलेटचा समावेश असेल असे मानले जात होते.

  • मात्र अलीकडच्या घडामोडींचा मागोवा घेतला असता सॅमसंग कंपनी पहिल्यांदा घडी होणारा स्मार्टफोन लाँच करण्याचे संकेत मिळाले असून याचे नाव गॅलेक्सी-एक्स असू शकते.

  • खरं म्हणजे अलीकडेच अ‍ॅपल कंपनीने आयफोन-एक्स हे मॉडेल सादर केले आहे, या पार्श्‍वभूमिवर, सॅमसंग या नावाची कॉपी करणार का याबाबत मात्र थोडा संभ्रम आहे.

  • मध्यंतरी सॅमसंगचे गॅलेक्सी एस ८ व एस ८ प्लस तसेच गॅलेक्सी नोट ८ या फ्लॅगशीप मॉडेल्सला जगभरातील ग्राहकांचा अतिशय उदंड प्रतिसाद लाभला आहे.

  • सॅमसंग गॅलेक्सी एस ९ हे मॉडेल एप्रिल २०१८ मध्ये अपेक्षित आहे. याआधी जानेवारी २०१८ मध्ये होणार्‍या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो वा त्याआधी हा नवीन स्मार्टफोन ग्राहकांना सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

उत्तर कोरियाच्या मंत्र्याचा दावा अमेरिकेकडून युद्धाची घोषणा :
  • अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील शाब्दिक वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत असून उत्तर कोरियाचे विदेश मंत्री री योंग यांनी सोमवारी अमेरिकेकडून युद्धाची घोषणा करण्यात आल्याचा दावा केला आहे

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाची घोषणा केल्याचा आरोप योंग यांनी केला असून त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीस सडेतोड प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज असल्याचेही योंग यांनी सांगितले.

  • अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी उत्तर कोरियाच्या पूर्व भागातील आंतरराष्ट्रीय हवाईसीमेतून उड्डाण करत आपली ताकद दाखवून दिली असून ते म्हणाले, सर्व जगाने लक्षात ठेवले पाहिजे की, अमेरिकेने आमच्या देशाविरोधात युद्धाची घोषणा केली आहे.

  • उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब आणि क्षेपणास्त्र चाचणी केल्यापासून अमेरिका आणि उत्तर कोरियात शाब्दिक युद्ध सुरू आहे. ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत उत्तर कोरियाला इशारा दिला होता.

‘टॉप १०’ श्रीमंत भारतीयांमध्ये ‘पतंजली’चे बालकृष्ण, डी-मार्टचे दमनी :
  • श्रीमंत भारतीयांच्या यादीत योग गुरु रामदेव बाबा यांचे सहकारी, ‘पतंजली’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण आणि डी-मार्टचे राधाकिशन दमनी यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.

  • उद्योगपती मुकेश अंबानी अव्वल स्थानी आहेत, अशी माहिती सहा वर्षांपासून श्रीमंतांची यादी प्रसिद्ध करणाऱ्या हुरन या संस्थेने दिली आहे.

  • रिटेल क्षेत्रातील दमनी यांनी उत्तुंग झेप घेत श्रीमंत भारतीयांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले असून त्यांच्या संपत्तीत ३२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बालकृष्ण गेल्या वर्षी २५ व्या स्थानी होते.

  • त्यांच्या संपत्तीत १७३ टक्क्यांची वाढ होऊन ती ७० हजार कोटी रुपयांवर पोहोचली असून गेल्या वर्षी पतंजलीचा कारभार १०, ५६१ कोटींपर्यंत पोहोचला होता. ही कंपनी अनेक बड्या परदेशी कंपन्यांना टक्कर देत आहे.

  • मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत. जागतिक स्तरावर पहिल्यांदाच अव्वल १५ मध्ये त्यांनी स्थान पटकावले असून शेअर बाजारातील उसळीमुळे रिलायन्सचे शेअर्स वधारले. त्यामुळे अंबानी यांची संपत्ती ५८ टक्क्यांनी वाढली.

  • ती आता २५७० अब्जांवर पोहोचली असून विशेष म्हणजे त्यांची ही संपत्ती येमेन या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीपेक्षा ५० टक्के अधिक आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • कर्णबधिर दिन

जन्म /वाढदिवस

  • देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक : २६ सप्टेंबर १९२३

  • मनमोहन सिंग, भारतीय पंतप्रधान : २६ सप्टेंबर १९३२

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन 

  • जॉन बायरन, इंग्लिश कवी : २६ सप्टेंबर १७६३

  • राम फाटक, मराठी संगीतकार : २६ सप्टेंबर २००२

ठळक घटना

  • 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड : २६ सप्टेंबर २००१

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.