चालू घडामोडी - २६ सप्टेंबर २०१८

Date : 26 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ग्रीन कार्ड हवे, शासकीय लाभावर पाणी फेरा, ट्रम्प प्रशासनाचे नवे नियम :
  • वॉशिंग्टन -  अनिवासी लोकांना अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवे असेल तर त्यांनी शासकीय लाभ सोडले पाहिजे. ट्रम्प प्रशासनाने हे नवे नियम तयार केले आहेत. ज्यांनी रेशन आणि अर्थसाहाय्य या आशयाचा शासकीय लाभ घेतला असेल किंवा जे लोक घेत असतील अशांना ग्रीन कार्ड नाकारले जाऊ शकते. नव्या नियमांचा फटका अमेरिकेतील हजारो भारतीयांना बसण्याची शक्यता आहे.

  • अमेरिकेच्या गृहसुरक्षा मंत्र्यांनी प्रस्तावित नियमांवर २१ सप्टेंबर रोजी स्वाक्षरी केली. त्यानंतर ते मंत्रालयाच्या वेबसाईटवर टाकण्यात आले. सिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञान उद्योग तसेच नेत्यांनी याला विरोध दर्शविला आहे.

  • नियमानुसार जे प्रवासी भारतीय स्वत:ची स्थिती किंवा व्हिसामध्ये बदल करू इच्छितात अथवा त्यांनी नव्याने अर्ज केला असेल अशांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभार्थी नसल्याची खात्री करून घ्यावी लागेल. ट्रम्प प्रशासनाने काही दिवसांपूर्वी एका न्यायालयात असे सांगितले होते की, एच-४ व्हिसाधारकांचे वर्कपरमिट रद्द करण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यात अपेक्षित आहे. एच-४ चा सर्वाधिक लाभ अमेरिकेतील भारतीय समुदायाला मिळाला.

  • ओबामा काळातील हा नियम रद्द झाल्यास सर्वाधिक फटका बसेल तो भारतीय महिलांना. वास्तव्याची मुदत वाढवू इच्छिणाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेतला नाही, घेत नाही आणि पुढेही घेणार नाही, असे शपथपूर्वक सादर करावे लागेल,असा नियमात प्रस्ताव आहे.

SC/ST कर्मचा-यांच्या बढत्यांमधल्या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय आज देणार निर्णय :
  • नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालय अनुसूचित जाती-जमाती(SC/ST)च्या कर्मचा-यांना बढत्यांमध्ये आरक्षणासहीत काही महत्त्वाच्या प्रकरणात निर्णय सुनावण्याची शक्यता आहे. यात केंद्राची प्रमुख योजना आधारची वैधता, न्यायालयीन कारवाई, बढत्यांमधल्या आरक्षणाचा समावेश आहे.

  • बढत्यांमध्ये कर्मचा-यांना आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने 2006 साली नागराज खटल्यात दिलेल्या निकालामुळे अडथळे येत आहेत. नागराज खटल्याच्या निकालाला आव्हान देण्यात आल्यानंतर हा खटला गेल्या वर्षी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला होता.

  • सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे या प्रकरणाच्या सुनावणीस शुक्रवारी प्रारंभ झाला. या खंडपीठामध्ये न्या. कुरियन जोसेफ, न्या. आर. एफ. नरिमन, न्या. संजय किशन कौल व न्या. इंदू मल्होत्रा यांचाही समावेश आहे.  सर्वोच्च न्यायालयानं सरकारी नोक-यांमध्ये मिळणा-या बढत्यांच्या प्रकरणात निर्णय राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठामध्ये या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून, निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.

  • घटनापीठानं SC/STच्या लोकांना मागासवर्गीय समजलं जात असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे 2006मधल्या नागराज बनाम प्रकरणात 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं हा निर्णय राखून ठेवला आहे. तसेच राज्यातील नोक-यामधल्या बढत्यांच्या प्रकरणात अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीमध्ये नोकरदारांना आरक्षण देण्याचं सरकारवर कोणतंही बंधन नाही.

भारतीय क्रीडा क्षेत्राचा प्रसिद्ध आवाज कॉमेंटेटर जसदेव सिंग यांचे निधन :
  • नवी दिल्ली - भारतीय क्रीडा क्षेत्रातील भारदस्त आवाज आता आपल्याला ऐकायला मिळणार नाही. यापुढे, हा आवाज केवळ जुन्या आठवणी आणि संग्रह स्वरुपातूनच आपल्याकडे राहिल.

  • क्रीडा क्षेत्रातील नावाजलेले निवेदक (कॉमेंटेटर) जसदेव सिंग यांचे निधन झाले आहे, ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सन 1970-80 च्या दशकात क्रीडा प्रसारणमध्ये रवि चतुर्वेदी आणि सुशील दोशींसह जसदेव सिंह क्रीडा चाहत्यांचे आवडते निवदेक होते.

  • जसदेव यांनी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये निवेदक बनून दोषाची धुरा सांभाळली होती. त्यांनी 1968 साली हेलसिंकीच्या क्रीडा स्पर्धांपासून 2000 पर्यंतच्या ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील स्पर्धांच्या 9 सत्रांमध्ये निवेदकाची भूमिका बजावली होती.

  • जसदेव यांना ऑलिंपिक परिषदेकडून 1988 साली सोल ऑलिंपिकमध्ये खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिंपिक ऑडर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जसदेव यांनी हॉकी विश्वचषक  स्पर्धांमध्येही कॉमेंट्री केली होती. तर 1985 मध्ये पद्मश्री आणि 2008 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

मुकेश अंबानींची दिवसाची कमाई ३०० कोटी रुपये :
  • मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. शिवाय, त्यांची दिवसाची कमाई सुद्धा 300 कोटींवर पोहोचली असून, गेल्या एक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सचे भाव सुद्धा 45 टक्क्यांनी वाढले आहेत. बार्क्लेज् हुरुन इंडियाने भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केलीय.

  • एसपी हिंदुजा अँड फॅमिली, एलएन मित्तल अँड फॅमिली आणि अझीम प्रेमजी या तिघांची मिळून जेवढी संपत्ती आहे, त्यापेक्षा जास्त संपत्ती एकट्या मुकेश अंबानी यांची आहे. गेल्या सात वर्षांपासून मुकेश अंबानी यांनी सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आपलं पहिल्या क्रमांकाचं स्थान कायम ठेवलं आहे.

  • एसपी हिंदुजा अँड फॅमिली यांची संपत्ती - 1,59,000 कोटी रुपये

  • एलएन मित्तल अँड फॅमिली यांची संपत्ती - 1,14,500 कोटी  रुपये

  • अझिम प्रेमजी यांची संपत्ती - 96,100 कोटी रुपये

  • आणि एकट्या मुकेश अंबानी यांची संपत्ती - 3,71,000 कोटी  रुपये

आधार कार्ड वैधतेबाबत सुप्रीम कोर्ट आज अंतिम निर्णय देणार :
  • नवी दिल्ली | आधार कार्ड योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ बुधवारी निकाल देणार आहे. आधार कार्ड अनिवार्य करणं गोपनियतेच्या विरोधात असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. शिवाय विविध सरकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यालाही आव्हान देण्यात आलं आहे.

  • काय आहेत याचिका - हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती के. पुट्टास्वामी यांच्यासह अनेक जणांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आधार योजनेला आव्हान दिलं आहे. याचिकाकर्त्यांनी विविध दावे केले आहेत. याचिकाकर्त्यांचे दावे पुढीलप्रमाणे

  • आधार कार्ड तयार करताना बायोमेट्रिक घेणं हे गोपनियतेच्या मुलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे.

  • आधार कायद्यात हे ऐच्छिक आहे. आधार कार्डसाठी कुणालाही सक्ती करता येणार नाही. मात्र सरकारी योजनांपासून ते बँक अकाऊंट खोलण्यापर्यंत विविध ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. म्हणजे एक प्रकारने आधार कार्डसाठी लोकांना मजबूर बनवलं जात आहे.

  • सरकार नागरिकांच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवत आहे.

  • आधारचे आकडे सुरक्षित नाहीत. आधार डेटा लीक झाल्याच्या बातम्या वारंवार समोर येतात. डेटा सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आलेला नाही.

ग्रामीण भागातील मुलींना मिळणार बारावीपर्यंत एसटीचा मोफत पास :
  • मुंबई | एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणारा मोफत प्रवासाचा लाभ आता बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे.

  • एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या प्रवास सवलती दिल्या जातात. या प्रवास सवलतींची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात एसटी महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावाला आज मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

  • यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना बारावीपर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत ही प्रवास सवलत दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी देण्यात येत होती.

  • तसंच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही बससाठीही प्रवास सवलत लागू करण्यात आली आहे. सोबतच पत्रकारांनाही वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय इतर विविध समाजघटकांना एसटी बसमध्ये प्रवासासाठी सवलतींची घोषणा दिवाकर रावतेंनी केली आहे. या सवलतींचा लाभ राज्यातील सुमारे 2 कोटी 18 लाख लाभार्थ्यांना होणार आहे.

भारताच्या मंगळयानास चार वर्षे पूर्ण :
  • नवी दिल्ली : भारताच्या मंगळ मोहिमेला चार वर्षे पूर्ण झाली असून भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(इस्रो) ही मोहीम कमी काळात यशस्वी केली होती. इस्रोने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी सोडलेले यान २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत स्थापित केले होते. मंगळयानाचा आयुष्यकाल सहा महिने होता पण गेली चार वर्षे हे यान मंगळावरून संदेश पाठवत आहे.

  • इस्रोच्या मार्स ऑर्बिटर ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, मंगळयानाला चार वर्षे झाली आहेत. यात मंगळावरील ऑलिंपस पर्वताची छायाचित्रे असून तो सौरमालेतील सर्वात मोठा ज्वालामुखी पर्वत आहे. मंगळयानाचा संपर्क  काही काळ तुटला होता पण नंतर तो परत प्रस्थापित करण्यात आला. नंतर त्यात काही अडचणी आल्या नाहीत. मार्स ऑर्बिटर मिशन (मॉम) यानाची बांधणी भारतातच करण्यात आली होती.

  • एकाच फ्रेममध्ये मंगळाचा पूर्ण वेध घेणारे हे पहिलेच यान ठरले. मंगळाच्या एकदम टोकाला असलेल्या डिमॉस या नैसर्गिक उपग्रहाची छायाचित्रेही यानाने टिपली आहेत.

  • मंगळावर पाठवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने ९८० छायाचित्रे पाठवली होती. मंगळाचा संपूर्ण नकाशा तयार करण्यात ‘मॉम’ने यश मिळवले होते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९०५: अल्बर्ट आइनस्टाइन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख  प्रकाशित केला.

  • १९१०: त्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेशभीमानी रामकृष्ण पिल्लई यांना अटक करून हद्दपार करण्यात आले.

  • १९५०: इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • १९६०: फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.

  • १९७३: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.

  • १९८४: युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.

  • १९९०: रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • २००१: सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक – संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.

जन्म

  • १८२०: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा बंगाल मध्ये जन्म. (मृत्यू: २९ जुलै १८९१)

  • १८४९: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी१९३६)

  • १८५८: लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १८९८)

  • १८७०: डेन्मार्कचा राजा क्रिस्चियन (दहावा) यांचा जन्म.

  • १८७६: भारतीय कवी, वकील, आणि राजकारणी गुलाम कबीर नैयरंग यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १८५२)

  • १८८८: अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते टी. एस. इलिय यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९६५)

  • १८९४: प्रज्ञावंत भाष्यकार आणि तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा मलकापूर कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९५५)

  • १९०९: नासकार चे संस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुन १९९२)

  • १९१८: मिस वर्ल्ड चे संस्थापक एरिक मॉर्ली यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०००)

  • १९२७: गेटोरेडे चे सह-संशोधक रॉबर्ट कड यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००७)

  • १९३२: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म.

मृत्यू

  • १९०२: लेव्ही स्ट्रॉस कंपनी चे संस्थापकलेवी स्ट्रॉस यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८२९)

  • १९५२: स्पॅनिश तत्त्वज्ञानी जॉर्ज सांतायाना यांचे निधन.

  • १९५६: भारतीय, मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २० जून १८६९)

  • १९७७: भारतीय नर्तक उदय शंकर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १९००)

  • १९८८: रूद्रवीणा वादक शिवरामबुवा दिवेकर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १९१२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.