चालू घडामोडी - २७ ऑगस्ट २०१७

Date : 27 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आजही देशात आणीबाणी आहे पण ती दिसत नाही : शरद यादव
  • नितीशकुमार यांनी बिहारचेच नव्हे, तर देशाचे नुकसान केले आहे, असे मत व्यक्त करीत, यादव यांनी आपलेच संयुक्त जनता दल खरे आहे, असा दावा केला. राहुल गांधी सच्चे असून, देशाच्या भल्ल्यासाठी प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.

  • विरोधी पक्ष मजबूत असायला हवा. इंदिराजींच्या काळात मी तुरुंगवास भोगला, पण त्यांनीच देशासाठी सर्वाधिक योगदान दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ खासदार शरद यादव यांनी केले.

  • राजदच्या पाटण्यातील मेळाव्यात ते सहभागी होणार असून, त्यामुळे त्यांना पक्षातून काढले जाण्याची शक्यता आहे.

  • या पार्श्वभूमी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, त्या काळात व आता खूप फरक आहे. आज आणीबाणी आहे, पण ती दिसत नाही. अंधारमय वातावरण भयंकर आहे.

  • येथील विविधता, संस्कृती धोक्यात आहे. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली, त्या वेळी संस्कृती धोक्यात नव्हती. 

आज तिसरी वन-डे मालिका विजयाचे भारताचे लक्ष्य : श्रीलंका
  • श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ आज रविवारी तिस-या वन-डेत विजय मिळवून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने उतरणार असून दुसरीकडे, लंकेपुढे प्रतिष्ठा वाचविण्याचे मोठे आव्हान आहे.

  • विराट अँड कंपनीने पहिले दोन्ही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली असून पुढील सामना जिंकल्यास ३-० अशी विजयी आघाडी होईल. अखेरचे दोन्ही सामने कोलंबोत खेळले जातील.

  • दुसऱ्या वन-डेत १३१ धावांत ७ फलंदाज बाद झाल्यानंतरही भारताने शानदार विजय नोंदविला. याआधी भारतीय संघ २००२ मध्ये या मैदानावर खेळला होता. संघाच्या डावपेचांत कोहली कुठले बदल करतो. 

  • दुसºया वन-डेआधी कोहलीने युवा चेहºयांना संधी देणार, असे म्हटले होते. त्यानुसार अक्षर पटेल आणि यजुवेंद्र चहल कायम राहतील का, हे पाहणे रंजक ठरेल.

थायलंडच्या माजी पंतप्रधान शिनावात्रा यांचे देशातून पलायन :
  • थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान असलेल्या यिंगलक या देशातून पळून गेल्या असल्याचे स्पष्ट झाले.

  • सर्वोच्च न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेले असताना थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा या शुक्रवारी न्यायालयात उपस्थित राहणे अपेक्षित होते, पण त्या आल्याच नाहीत.

  • त्यांना या खटल्यात दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

तृतीयपंथींना लष्करात भरती करण्यावर बंदी : डोनाल्ड ट्रम्प
  • ओबामांनी समलिंगी व्यक्तींना लष्करात प्रवेश देण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यानुसार लिंगबदल शस्त्रक्रियांना परवानगीही देण्यात आली होती.

  • लष्करात तृतीयपंथींना भरती करण्याचा ओबामा यांचा आदेश विद्यमान अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फिरवला असून, समलिंगी व्यक्तींना लष्करात भरती करण्यास बंदी घातली आहे.

  • ट्रम्प यांनी काल व्हाइट हाऊसने याबाबत जारी केलेल्या आदेशावर स्वाक्षरी केली.

  • बंदी आदेशाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्याची योजना २१ फेब्रुवारी २०१८ पर्यंत पेंटॅगॉनने जाहीर करावी व ती २३ मार्च २०१८ पासून लागू करावी असे सांगण्यात आले आहे.

  • त्यात संरक्षण मंत्री, अंतर्गत सुरक्षा मंत्री यांना समलिंगी व्यक्तींना लष्करात प्रवेशबंदी करण्याचा आदेश लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

US व्हिसामध्ये नावात चूक झाली तर ती दुरूस्त करता येते का :
  • चूक कॉन्सुलेटमुळे किंवा त्यांच्या कंत्राटदारांमुळे झाली असेल तर तुम्हाला कोणताही आर्थिक भुर्दंड न पडता कॉन्सुलेट ती चूक सुधारतं.

  • नाव देतानाच चूक झाली असेल तर तुम्हाला अर्जाची पुन्हा किंमत भरावी लागेल, एक वर्षापेक्षा जास्त जुना असलेल्या व्हिसातील चुका आम्ही सुधारू शकत नाही

  • उत्तर - हो. तुम्हाला तुमच्या व्हिसामध्ये काही चुका असल्याचं आढळलं, जसं की नाव चुकीचं लिहिलंय, जन्मतारीख चुकीची आहे, विद्यार्थ्यांच्या बाबतीत स्टूडंट व्हिसामध्ये विद्यापीठाचं नाव चुकलंय तर अशावेळी तुम्ही [email protected] इथं ई-मेल करा आणि काय चूक झालीय ती निदर्शनास आणून द्या.

सॉन वॅन हो याच्याविरुद्ध श्रीकांतची हार :
  • किदांबी श्रीकांतच्या पराभवामुळे जागतिक बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील पदकांचा दुष्काळ तीन तपांनंतर संपवण्याची प्रतीक्षा कायम राहिली.

  • त्याला उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित सॉन वॅन हो याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.

  • जागतिक क्रमवारीत आठव्या असलेल्या श्रीकांतने या स्पर्धेत नेटजवळ हुकूमत राखली होती; पण या वेळी त्याला हेच जमले नाही आणि त्याचबरोबर खेळाची गती आपल्याला अनुकूल अशी राखण्यातही तो अपयशी ठरला.

  • त्याला अखेर ४९ मिनिटे चाललेल्या या लढतीत १४-२१, १८-२१ अशा पराभवास सामोरे जावे लागले.

  • त्यामुळे भारताची या स्पर्धेतील पुरुष एकेरीत पदक जिंकण्याची अपेक्षा ३४ वर्षांनंतरही पूर्ण झाली नाही.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • -

जन्म/वाढदिवस

  • नारायण धारप, मराठी लेखक : २७ ऑगस्ट १९२५

  • दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतिय मल्ल : २७ ऑगस्ट १९७२

  • नेहा धुपिया, भरतीय अभिनेत्री : २७ ऑगस्ट १९८०

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • मुकेश, भारतीय पार्श्वगायक : २७ ऑगस्ट १९७६

ठळक घटना

  • नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान : २७ ऑगस्ट १९६२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.