चालू घडामोडी - २७ जुलै २०१७

Date : 27 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नितीश कुमार यांचा शपथविधी :
  • बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल (बुधवार) राजीनामा दिल्यानंतर रात्रभर अनेक मोठ्या घडामोडी घडल्या, नितीश कुमार भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.

  • नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड आणि भाजपचे १३-१३ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

  • नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते सुशील मोदी हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

ऊर्जा संवर्धनासाठी ठाणे महापालिकेला पुरस्कार : सुनील पोटे
  • ऊर्जा संवर्धन आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात ठाणे महापालिकेने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दोन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारांनी राज्य शासनाच्या 'महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणा'च्या वतीने ठामपाचा सन्मान करण्यात आला.

  • महाराष्ट्र शासनाच्या अभिकरणाच्या वतीने अलीकडेच पुणे येथे झालेल्या एका समारंभामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

  • ठाणे महानगरपालिका करत असलेल्या कामाचा विशेष गौरवपूर्ण उल्लेख केला, ठामपाने ऊर्जा कार्यक्षमता व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे.

प्रिमियम एफएसआयचा (चटईक्षेत्र निर्देशांक) दर राज्य सरकारने निश्चित ;
  • राज्य सरकारने शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा ०५ जानेवारी २०१७ ला मंजूर केला.

  • अनेक दिवस रखडलेला व त्यामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रावर परिणाम झालेला राज्य सरकारव्दारे प्रिमियम एफएसआयचे दर निश्चित केला.

  • त्यामुळे आता महापालिका हद्दीमध्ये निवासी व औद्योगिक बांधकामांमध्ये मंजूर क्षेत्रापेक्षा वाढीव बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी महापालिकेकडून विशिष्ट दरामध्ये प्रिमियम एफएसआय बाजारमूल्याच्या (रेडीरेकनर) ५० टक्के दराने मिळेल. मॉल व तत्सम बांधकामांसाठी हा दर ६० टक्के असेल.

  • पुणे महापालिकेने राज्य सरकारला शिफारस करताना निवासी व व्यावसायिक, अशा संमिश्र बांधकामासाठी रेडीरेकनरच्या ५० टक्के, औद्योगिक वापरासाठीच्या बांधकामाला ६० टक्के तर, व्यावसायिक स्वरूपाच्या बांधकामासाठी ७० टक्के दराची शिफारस केली होती.

'मिसेस ग्लोबल युनायटेड' किताबच्या मानकरी : नमिता कोहोक
  • समाजसेवेला वाहिलेल्या आणि जगभरात विस्तार असलेल्या ग्लोबल युनायटेड या संस्थेतर्फे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत आपली छाप सोडत त्यांनी हा किताब पटकावला असून, हा किताब पटकावणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.

  • मिसेस इंटरनॅशनल या किताबाच्या मानकरी असणाऱ्या नमिता कोहोक यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेत 'मिसेस ग्लोबल युनायटेड' हा किताब जिंकत नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

  • अमेरिकेत पार पडलेल्या या स्पर्धेत नमिता कोहोक यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. कॅन्सर क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच समाजसेवेला वाहिलेल्या आणि पूर्ण जगात काम करत असलेल्या संस्थेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

  • तसेच २०१५ मध्ये मिसेस इंटरनॅशनला किताब नमिता कोहोक यांनी कॅन्सरवर मात करत २०१५ मध्ये यांगून येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत पहिला किताब पटकावला होता.

अमेरिकेने रशिया, इराण, उत्तर कोरियावर निर्बंध लादले :
  • रशिया, इराण आणि उत्तर कोरिया यांच्यामुळे अमेरिकेच्या हितांना बाधा आली असून ते अमेरिकेच्या शेजार्‍यांना अस्थिर करीत आहेत, असे परराष्ट्र कामकाज समितीचे अध्यक्ष एड रॉयस म्हणाले.

  • अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांचे हित धोक्यात आणल्याचा आणि भांडखोर कृत्ये केल्याचा आरोप करीत अमेरिकेने रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादले असून या निर्बंधांचे स्वरूप स्पष्ट झालेले नाही.

  • हाऊस ऑफ रिप्रेंझेंटेटिव्हजने या निर्बंधांचे विधेयक ४१९-३ अशा मताने संमत केले.

  • राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रशियाच्या कथित लुडबुडीच्या चौकशीबाबत अ‍ॅटर्नी जनरल जेफ सेशन्स यांची भूमिका मला मान्य नसली तरी त्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्याचा माझा विचार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

जलतरणपटू कॅलीचा विश्वविक्रम : 
  • कॅनडाच्या कॅली मॅसीने १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये विश्वविक्रम नोंदवत जागतिक जलतरण स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली.

  • २१ वर्षीय कॅलीने १०० मीटर अंतर ५८.१० सेकंदांत पार केले आणि २००९मध्ये जेमा स्पॉफोर्थने नोंदवलेला ५८.१२ सेकंद हा विक्रम मोडला.

  • अमेरिकेच्या कॅथलीन बेकरने रौप्यपदक मिळवले, तर ऑस्ट्रेलियाच्या एमिला सीबोह्मला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. एमिलाने २०१५मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते.

  • ‘‘विश्वविक्रम नोंदवण्याची खात्री नव्हती, मात्र सुवर्णपदकाची खात्री होती. माझ्यापुढे एमिलाचे आव्हान होते. मी पहिल्यापासून आघाडी घेण्याचे नियोजन केले होते.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • होजे सेल्सो बार्बोसा दिन : पोर्तोरिको.

जन्म, वाढदिवस

  • १६६७ : योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • २००२ : कृष्णकांत, भारताचे उपराष्ट्रपती

ठळक घटना

  • १९४० : बग्स बनीचे चित्रपटसृष्टीत पदार्पण.

  • १९४९ : जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.