चालू घडामोडी - २७ नोव्हेंबर २०१७

Date : 27 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मिस युनिव्हर्सचा किताब दक्षिण आफ्रिकेकडे, डेमी नेल पीटर्स ठरली विजेती :
  • लासवेगास- मिस युनिव्हर्स 2017 चा किताब दक्षिण आफ्रिकेकडे गेला आहे. डेमी नेल पीटर्सही यंदाच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती ठरली आहे.

  • लासवेगासमध्ये झालेल्या सोहळ्यात मिस साऊथ आफ्रिका असलेल्या डेमी नेल पीटर्सला विजेती घोषीत करण्यात आलं. डेमी नेल पीटर्सला 2016 ची मिस युनिव्हर्स आयरिस मिटेनायर हिने क्राऊन प्रदान केला.

  • दक्षिण आफ्रिकेच्या डेमी नेल पीटर्सला मिस जमाईका डेविना बॅनेट आणि मिस कोलंबियाचं लौरा गोन्जालेज तगड आव्हान होतं. या स्पर्धेत मिस जमाईकाने तिसरं स्थान मिळवलं तर फर्स्ट रन अप मिस कोलंबिया झाली. (source :lokmat)

हाँगकाँग ओपन सुपरसिरीज – पी. व्ही. सिंधूचा अंतिम फेरीत पराभव :
  • भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला हाँगकाँग ओपन सुपरसिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. तैवानच्या ताई त्झु विंगने सिंधूचा २१-१८, २१-१८ अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. अवघ्या ४५ मिनीटांमध्ये विंगने सिंधूचं आव्हान परतवून लावत आपलं विजेतेपद राखलं.

  • सामन्याच्या सुरुवातीच्या मिनीटापासून विंगने आघाडी घेत आपलं वर्चस्व राखलं होतं. ७-३ अशा आघाडीवर असताना काही क्षणांसाठी सिंधूने काही चांगल्या गुणांची कमाई करत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत विंगने सिंधूला आघाडी घेण्याची संधी दिली नाही.

  • मध्यांतराला विंगकडे ११-८ अशी आघाडी होती. मध्यांतरानंतर सिंधू विंगला टक्कर देईल असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र विंगने आपली २-३ गुणांची आघाडी कायम ठेवत अखेरीस पहिला सेट २१-१८ असा खिशात घातला.

  • दुसऱ्या सेटमध्ये सिंधू सामन्यात पुनरागमन करेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्ष सामन्यात विंगने सुरुवातीच्या क्षणांमध्ये आघाडी कायम ठेवली. (source :loksatta)

नासाला जे जमले नाही, ते भारताचा ‘आदित्य’ उपग्रह करणार :
  • चेन्नई : अंतराळात मोक्याच्या ठिकाणाहून सूर्याचे निरीक्षण करून अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) २०१९ किंवा २०२० मध्ये ‘आदित्य एल-१’ हा उपग्रह सोडण्याची जय्यत तयारी करत आहे. नासाला जे जमले नाही ते भारताचा ‘आदित्य’ उपग्रह करणार आहे.

  • उपग्रहाच्या प्रस्तावित नावातील ‘आदित्य’ हे सूर्याचे नाव आहे तर ‘एल-१’ हे अंतराळातील त्याच्या स्थानाचे निदर्शक आहे. ‘एल-१’ म्हणजे लॅगरेंज पॉईंट’ हे स्थान पृथ्वीपासून १५ लाख किमी दूर आहे.

  • ‘आदित्य’ उपग्रह पृथ्वीवरून सोडल्यानंतर सुमारे तीन महिन्यांत या स्थानापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. त्या स्थानावर पोहोचल्यावर तो स्वत:भोवती घिरट्या घेत सूर्यनिरीक्षणाचे काम करेल.

  • ‘एल-१’ हे ठिकाण गुरुत्वीय शक्तींच्या अशा हद्दीवर आहे की तेथे ‘आदित्य’ला आपल्या कक्षेत स्थिर राहण्यासाठी फारशा ऊर्जेची गरज भासणार नाही. हे ठिकाण असे मोक्याचे असेल की तेथून सूर्य ‘आदित्य’च्या कधीही नजरेआड जाणार नाही. अशा मोक्याच्या ठिकाणी राहून सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचे निरीक्षण व अभ्यास करणारा हा पहिला आणि एकमेव उपग्रह असेल.(source :lokmat)

जे 70 वर्षात ISI ला जमलं नाही, ते भाजपने तीन वर्षात करुन दाखवलं’ :
  • नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘जे 70 वर्षात ISI ला जमलं नाही, ते भाजप सरकारने तीन वर्षात करुन दाखवलं,’ असं म्हणत मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाचा समाचार घेतला.

  • आम आदमी पार्टीच्या स्थापनेला पाच वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या रामलीला मैदानावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

  • केजरीवाल म्हणाले की, “सध्या देश अतिशय नाजुक परिस्थितीत जात आहे. हिंदू-मुस्लीमांना एकमेकात भिडवून देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हिंदू-मुस्लीमांमध्येच वाद निर्माण करुन भारताचे दोन तुकडे करण्याचा पाकिस्तानचे प्रयत्न आणि स्वप्न आहे.”

  • ते पुढे म्हणाले की, “जे लोक देशातील हिंदू-मुस्लीमांमध्ये वाद निर्माण करुन, दोन भागात विभाजित करत आहेत, ते खऱ्या अर्थाने पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेचे एजेंट आहेत. देशभक्तीची झुल पांघरुन हे देशद्रोही वावरत आहेत.”(source :abpmajha)

बिटकॉइनद्वारे रिअल इस्टेटमध्ये ब्लॅक मनी? सरकारी यंत्रणा झाल्या सतर्क :
  • नवी दिल्ली : रिअल इस्टेट व्यवसायाला बिट कॉईनच्या व्हर्चुअल करन्सीने नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून हाती आली आहे. अनिवासी भारतीयांची यात मदत घेतली जात आहे.

  • नोटाबंदीनंतर थंडावलेल्या व्यवसायाला बिटकॉईनच्या माध्यमातून पुन्हा बहर आण्याचे प्रयत्न सुरू झाले तर या व्यवसायावरील मंदीचे सावट बºयापैकी दूर होईल, असा विचार करून या क्षेत्रात मोठया व्यावसायिकांनी काही प्रयत्न सुरू केल्याचा सुगावा लागताच, सक्त वसुली संचलनालय (ईडी)ने चौकशी सुरू केली.

  • विशेष म्हणजे बिटकॉईनचा वापराचे केंद्र गुजरातमधे अहमदाबाद येथे असल्याचे समजताच ईडीने दोन ठिकाणी धाडी घातल्याची माहितीही हाती आली आहे.

  • बिटकॉईन ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजावून घेण्यासाठी अर्थ मंत्रालयाने आयटी कंपन्यांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर सरकारने बिटकॉईनबाबत लवकरच एक फ्रेमवर्क तयार करण्याचा विचार सुरू केला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८१५: पोलंड राज्याच्या संविधान स्वीकारले गेले.

  • १८३९: बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन ची स्थापना.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.

  • १९९५: पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर मधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले.

  • १९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

  • २०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला.

जन्म

  • १८७१: इटालियन भौतिकशास्रज्ञ जियोव्हानी जॉर्जी यांचा जन्म.

  • १८५७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९५२ – इस्ट्बोर्न, ससेक्स, लंडन, इंग्लंड)

  • १८७०: इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस यांचा जन्म.

  • १८७८: भारतीय कवि आणि समीक्षक जतिंद्रमोहन बागची यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९४८)

  • १८८८: भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म.

  • १९०३: नोबेल पारितोषिक विजेते नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ लार्स ऑन्सेगर यांचा जन्म.

  • १९०७: विख्यात हिंदी साहित्यिक हरीवंशराय बच्चन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी २००३)

  • १९१५: मराठी कथा कादंबरीकार दिगंबर बाळकृष्ण उर्फ दी. बा. मोकाशी यांचा उरण, रायगड येथे जन्म. (मृत्यू: २९ जून १९८१)

  • १९४०: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ ब्रूस ली यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७३)

  • १९५२: भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते बॅप्पी लाहिरी यांचा जन्म.

  • १९८६: भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांचा जन्म.

मृत्य

  • १९७५: गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट१९२५)

  • १९७६: प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक, कादंबरीकार ग. त्र्यं. माडखोलकर तथा गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)

  • १९७८: भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९०५)

  • १९९४: स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूल चे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०७ – महाड, रायगड)

  • १९९५: दूरदर्शन व चित्रपट कलावंत संजय जोग यांचे निधन.

  • २०००: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०९)

  • २००२: भारतीय कवी आणि शैक्षणिक शिवमंगल सिंग सुमन यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १९१५)

  • २००८: भारताचे ७ वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन. (जन्म: २५ जून १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.