चालू घडामोडी - २७ ऑक्टोबर २०१७

Date : 27 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीचे निधन
  • बंगळुरू : सुमारे २० वर्षांपूर्वी महाराष्ट्रासह १२ राज्यांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचे गुरुवारी व्हिक्टोरिया इस्पितळात निधन झाले.

  • तेलगी येथील कारागृहात ३० वर्षांची शिक्षा भोगत होता. अनेक वर्षे व्याधींनी जर्जर ५६ वर्षांच्या तेलगीला १० दिवसांपूर्वी इस्पितळात दाखल केले होते. शुक्रवारी खानापूर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील.

  • तेलगीचा मुद्रांक घोटाळा १९९९ मध्ये उघड झाला व २००१ मध्ये त्याला अटक झाली. तेलगीला ३० वर्षांच्या कारावासासह २०२ कोटी रुपये दंडाची शिक्षा झाली.

  • तेलगीने हर्षद मेहताच्या रोखे घोटाळ्याच्या काळात हजारो कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक छापून विकले.  (src:lokmat)

‘आधार’ लिंक नसल्याने रेशन देणे बंद करू नका, भूकबळी प्रकरणानंतर केंद्राचा आदेश

  • नवी दिल्ली : लाभार्थीकडे ‘आधार’ क्रमांक नाही किंवा त्याने तो रेशनकार्डाशी जोडून घेतला नाही या कारणावरून कोणालाही रेशनवरील धान्य व अन्य वस्तू देणे बंद केले जाऊ नये, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले असून याचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाईची ताकीद दिली आहे.

  • रेशनकार्ड असूनही ते ‘आधार’शी जोडलेले नसल्याच्या कारणावरून रेशन पुरवठा बंद केल्याने झारखंड राज्यातील सिमखेडा येथे संतोषी नावाच्या ११ वर्षांच्या मुलीचा उपासमारीने मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने हे निर्देश दिले आहेत.

  • ‘आधार’ क्रमांक नसल्याने कोणाचेही नाव सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थींच्या यादीतून वगळले जाऊ नये. एखाद्याचे नाव बनावट असल्याची खात्री झाली तरच असे नाव वगळले जावे, असेही केंद्राने कळविले आहे. (src:lokmat)

ग्राहक सुरक्षेसाठी नवा कायदा करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
  • नवी दिल्ली : ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आपले सरकार नवा कायदा करणार आहे. या कायद्यावर काम सुरू आहे. दिशाभूल करणा-या जाहिरातींवर कारवाई करण्यासाठी प्रभावी तरतुदी या कायद्यात असतील, तसेच तक्रारींच्या निपटा-यासाठी कालमर्यादा ठरवून दिली जाईल.

  • मोदी यांनी म्हटले की, आम्ही ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी नवा कायदा करीत आहोत. ग्राहकांचे सबलीकरण करण्यावर या कायद्यात भर राहील.

  • दिशाभूल करणा-या जाहिरातींविरोधात कठोर तरतुदी या कायद्यात असतील. ग्राहकांच्या तक्रारींचा झटपट निपटारा करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल.

  • ग्राहक संरक्षण कायदा १९८६ची जागा हा कायदा घेईल. संयुक्त राष्ट्रांनी २०१५ मध्ये जारी केलेल्या ग्राहक संरक्षणविषयक मार्गदर्शक तत्त्वांचा नव्या कायद्यात समावेश केला जाईल. (src:lokmat)

अंडर-17 फिफा वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंड आणि स्पेन भिडणार :
  • कोलकाता : इंग्लंड आणि स्पेन  याच दोन युरोपियन संघांमध्ये रंगणार आहे फिफा अंडर सेव्हन्टिन विश्वचषकाचा अंतिम सामना.

  • या पार्श्वभूमीवर कोलकत्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर इंग्लंड आणि स्पेन हे दोन्ही संघ पहिल्या विजेतेपदासाठी सज्ज झाले आहेत.

  • अंडर सेव्हन्टिन विश्वचषकात इंग्लंड आणि स्पेन या दोन्ही दोन्ही संघांची विजेतेपदाची पाटी अद्यापही कोरीच आहे. विश्वचषकाच्या 32 वर्षांच्या इतिहासात इंग्लंडनं यावेळी पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

  • स्पेनची मात्र विश्वचषकात दाखल होण्याची ही तब्बल चौथी वेळ आहे. 1991, 2003 आणि 2007 साली स्पेननं अंतिम फेरी गाठली होती. दुर्दैवानं तिन्ही वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होत. त्यामुळे यावेळी दोन्ही संघात पहिल्या विजेतेपदासाठीचा संघर्ष फुटबॉल रसिकांना पहायला मिळेल. (src:abpmajha)

दिनविशेष :

महत्त्वाच्या घटना

  • ३१२: कॉन्स्टन्टाइन द ग्रेट यांना विजन ऑफ द क्रॉस प्राप्त झाले असे म्हटले जाते.

  • १९५८: पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.

  • १९६१: मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) मध्ये प्रवेश.

  • १९७१: डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.

  • १९८६: युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.

  • १९९१: तुर्कमेनिस्तानला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.

जन्म दिवस

  • १८५८: अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते थिओडोर रुझव्हेल्ट यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९१९)

  • १८७४: कवी भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९४१)

  • १९०४: स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक जतिंद्रनाथ तथा जतिन दास यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२९)

  • १९२०: भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २००५)

  • १९४७: समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा जन्म.

  • १९६४: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क टेलर यांचा जन्म.

  • १९७६: भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक मनीत चौहान यांचा जन्म.

  • १९७७: श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा यांचा जन्म.

  • १९८४: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण यांचा जन्म.

मृत्य दिन 

  • १६०५: तिसरा मुघल सम्राट अकबर यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १५४२)

  • १७९५: पेशवा सवाई माधवराव यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १७७४)

  • १९६४: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९१)

  • १९७४: गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९३८)

  • १९८७: क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९११)

  • २००७: हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेता सत्येन कप्पू यांचे निधन.

  • २०१५: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रानजीत रॉय चौधरी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९३०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.