चालू घडामोडी - २७ ऑक्टोबर २०१८

Date : 27 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आधार ई-केवायसी वापर बंद करा; सरकारचे टेलिकॉम कंपन्यांना निर्देश :
  • नवी दिल्ली - मोबाइल फोनधारकांची खासगी माहिती पडताळणीसाठी किंवा नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी आधार कार्डची मागणी करणं बंद करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सरकारने शुक्रवारी हे निर्देश जारी केले आहेत.

  • सुप्रीम कोर्टानं गेल्या महिन्यात महत्त्वपूर्ण निर्णय देताना, कायदेशीर तरतुदींच्या अभावामुळे खासगी कंपन्यांद्वारे होणारा आधार ईKYCचा वापर करणं बंद करण्यास सांगितले होते. कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांसाठी तपशीलवार दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये कंपन्यांना आधारद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात ई-केव्हायसीचा वापर करणं थांबवण्यास सांगितले आहे. शिवाय, यासंबंधीचा अहवाल 5 नोव्हेंबरपर्यंत देण्यास सांगितला आहे. 

  • दूरसंचार विभागानं आपल्या 3 पानांच्या परिपत्रकात म्हटले आहे की, ग्राहकांच्या खासगी माहितीच्या पडताळणीसहीत त्यांना नवीन सिम कनेक्शन देण्यासाठी आधार ई-केव्हायसीचा उपयोग केला जाऊ शकत नाही. दरम्यान, जर नवीन कनेक्शनसाठी ग्राहक स्व-ईच्छेनं आधार कार्डची प्रत पुरवत असेल तर कागदपत्रांच्या स्वरुपात त्याचा वापर केला जाऊ शकतो. पण याचा ऑफलाइनच वापर केला जाऊ शकतो. शिवाय, सर्व टेलिकॉम कंपन्या वेळबद्ध पद्धतीनं या आदेशाचे पालन सुनिश्चित करतील, असेही यात सांगण्यात आले आहे. 

  • दूरसंचार विभागाच्या अनुसार,  मोबाइल ग्राहकांना पर्यायी डिजिटल प्रक्रिया उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये कस्टमर एक्विझिशन फॉर्मसहीत ग्राहकांना फोटोसोबत ओळख आणि पत्त्यासाठी स्कॅन कॉपीचा उपयोग करता येईल. या पार्श्वभूमीवर नवीन ग्राहकांसाठी सर्व डिजिटल प्रक्रिया असतील. 

जेट एअरवेज पायलटांची संख्या कमी करणार, काही विमाने करणार परत :
  • नवी दिल्ली : आर्थिक संकटात असलेली जेट एअरवेज आपल्या पायलटांची संख्या कमी करण्याचा विचारात आहे, तसेच भाड्याने घेतलेल्या बोइंग-७३७ विमानांपैकी २३ विमाने मूळ कंपनीला परत करण्यावरही विचार सुरू आहे.

  • कंपनीला विमानांचे भाडे भरणे अशक्य बनले आहे. जेटच्या प्रवक्त्याने मात्र यावर थेट भाष्य टाळले. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना प्रवक्ता म्हणाला की, दिशाभूल करणारी माहिती माध्यमांनी देऊ नका, असे आवाहन आम्ही करीत आहोत. कंपनी पायलटांची संख्या ४० ते ५० वर आणणार आहे. सध्या कंपनीकडे १,८०० पायलट व चालक दल सदस्य आहेत. मुंबई, दिल्ली व बंगळुरूतील काही कर्मचाऱ्यांना कंपनीने बिनपगारी रजा घेण्याचे आवाहन केले आहे.

  • १०,८७८ कोटी रुपयांचा तोटा जेट एअरवेज आपले वाहतूक व्यवहारही कमी करीत आहे. रोजच्या विमान उड्डाणात कपात केली आहे. कंपनीकडे १२४ विमाने आहेत, तसेच कंपनीवर ८,६२० कोटींचे कर्ज आहे, ज्यातील १,९६८ कोटींचे कर्ज विमानांशी संबंधित आहे. कंपनीचा तोटा १०,८७८ कोटी इतका आहे. कंपनीने काटकसरीचे धोरण स्वीकारले असून, दोन वर्षांत २ हजार कोटी वाचविण्याची योजना आखली आहे. आॅगस्टमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली.

सीबीआय मुख्यालयासमोर काँग्रेसची जोरदार निदर्शने :
  • नवी दिल्ली : सीबीआयच्या संचालकांना घरी बसवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने शुक्रवारी दिल्लीसह देशभर सीबीआय कार्यालयांवर जोरदार निदर्शने केली. दिल्लीत राहुल गांधींसह अनेकांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडले. चौकीदार चोर है या घोषणेने निदर्शकांनी दिल्लीतील सीबीआय कार्यालयाचा परिसर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला

  • देशाचा चौकीदार म्हणविणाराच चोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्य दडविण्याचा, त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतील. परंतू काँग्रेस सर्व घोटाळे उजेडात आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी तिथे दिला. या निदर्शनांमध्ये अहमद पटेल, अशोक गेहलोत, वीरप्पा मोईली, रणदीप सुरजेवाला, आनंद शर्मा आदी काँग्रेस नेते तसेच भाकपचे नेते डी. राजा, तृणमूल काँग्रेसचे सर्व खासदार, शरद यादव हे विरोधी पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.

  • राहुल गांधी यांनी यावेळी अगदी छोटेसे भाषण केले. तिथे ते म्हणाले की, आम्ही चौकीदाराला चोरी करू देणार नाही. राफेल व्यवहारात मोदी यांनी अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपयांचा फायदा करून दिला आहे. आलोक वर्मा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर राहुल यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

  • अंबानी पळून गेले तर - त्यांनी सांगितले की, राफेल घोटाळ्यातील सत्य उजेडात येईल या भीतीपोटी मोदी यांनी वर्मा यांच्यावर कारवाई केली आहे. मोदी यांनी भ्रष्टाचार केला असून अनिल अंबानींना मदत केली आहे. नीरव मोदी, मेहुल चोकसी जसे देशाचे पैसे घेऊन विदेशात पळून गेले तशीच कृती अनिल अंबानी कशावरून करणार नाहीत अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

इराणवर संपूर्ण निर्बंध लागणार :
  • वॉशिंग्टन : इराणवरील सगळे निर्बंध २०१५ मध्ये त्याच्याशी झालेल्या अणुकराराने मागे घेतले गेले होते. ते सगळे आता पूर्ण स्वरुपात पाच नोव्हेंबरपासून पूर्ण शक्तीने लागू होतील, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

  • इराणला जगातील घातक शस्त्रे बनवण्यापासून रोखले जाईल, असे ट्रम्प यांनी आश्वासन दिले. मे महिन्यात ट्रम्प प्रशासनाने अणु करारातून माघार घेऊन इराणच्या हानिकारक कारवायांमुळे कठोर निर्बंध लादले.

भारतात लवकरच धावणार विनाइंजिन रेल्वे :
  • रेल्वे म्हटले की त्याला त्याला इंजिन असणार असे आपल्याला अगदी सहज वाटून जाते. पण इंजिनशिवायची रेल्वे तुम्ही कधी पाहिलीये? नाही ना? पण आता इंजिनशिवाय रेल्वे तुम्हाला भारतात दिसू शकते. याचे कारण म्हणजे भारताची पहिलीच इंजिन नसलेली ट्रेन रुळावर परिक्षणासाठी येणार आहे. ही ट्रेन शताब्दी एक्सप्रेसची जागा घेणार आहे, यात वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानामुळे ही ट्रेन नेहमीच्या ट्रेनपेक्षा जास्त वेगाने धावणार आहे. एकूण १६ डब्यांच्या या ट्रेनचे नाव ‘ट्रेन १८’ असे असते.

  • २९ ऑक्टोबरला ही ट्रेन परिक्षणासाठी जाणार आहे. त्यानंतर सर्व नियमांतून पास झाल्यावर ही ट्रेन प्रत्यक्ष रुळावर येईल. या ट्रेनला चेन्नईतल्या इंटिग्रल कोच फॅक्ट्री (आयसीएफ) मध्ये १८ महिन्यांमध्ये तयार करण्यात आलं आहं. या ट्रेनच्या प्रतिकृतीसाठी १०० कोटी रुपयांचा खर्च आला असून भविष्यात त्याच्या निर्मितीचा खर्च कमी होईल असा अंदाज आहे.

  • या ट्रेनचं अनावरण २९ ऑक्टोबरला अनावरण झाल्यानंतर रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायजेशन (आरडीएसओ)कडे ही ट्रेन पुढच्या परिक्षणासाठी पाठवण्यात येईल. या ट्रेनच्या मध्ये २ एक्झिक्युटीव कंपार्टमेंट असतील. प्रत्येकात ५२ जागा असतील, तर सामान्य डब्यात ७८ जागा असतील अशी माहिती आयसीएफचे महाप्रबंधक सुधांशू मणी यांनी दिली आहे.

  • शताब्दी ट्रेनचा वेग १३० किमी प्रती तास आहे. तर ही ट्रेन १६० किमी प्रती तासाच्या वेगानं धावेल. या ट्रेनमध्ये जीपीएस आधारित प्रवासी सूचना प्रणाली, वेगळ्या प्रकारचे लाईट, ऑटोमेटिक दरवाजे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शताब्दी ट्रेन १९८८ मध्ये सुरु करण्यात आली होती. सध्या ही ट्रेन देशातल्या मेट्रो शहरांना दुसऱ्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या २० रेल्वे मार्गांवर सुरु आहे.

दिनविशेष :
  • जागतिक ऑडिओव्हिज्युअल वारसा दिन

महत्वाच्या घटना 

  • १९५८: पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.

  • १९६१: मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) मध्ये प्रवेश.

  • १९७१: डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.

  • १९८६: युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.

  • १९९१: तुर्कमेनिस्तानला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.

जन्म 

  • १८५८: अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते थिओडोर रुझव्हेल्ट यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी१९१९)

  • १८७४: कवी भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचा जन्म. (मृत्यू: ७ डिसेंबर १९४१)

  • १९०४: स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक जतिंद्रनाथ तथा जतिन दास यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२९)

  • १९२०: भारताचे १०वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २००५)

  • १९२३: उद्योगपती अरविंद मफतलाल यांचा जन्म. (मृत्यू: ३० आक्टोबर २०११)

  • १९४७: समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा जन्म.

  • १९५४: पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांचा जन्म.

  • १९६४: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क टेलर यांचा जन्म.

  • १९७६: भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक मनीत चौहान यांचा जन्म.

  • १९७७: श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारा यांचा जन्म.

  • १९८४: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६०५: तिसरा मुघल सम्राट अकबर यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १५४२)

  • १७९५: पेशवा सवाई माधवराव यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १७७४)

  • १९३७: किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु संगीतरत्‍न उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८७२)

  • १९६४: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १८९१)

  • १९७४: गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९३८)

  • १९८७: क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९११)

  • २००१: हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रदीप कुमार यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९२५)

  • २००१: बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, फास्टर फेणे आणि बिपीन बुकलवार या पात्रांचे जनक भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचे निधन. (जन्म: ३१ मे १९१०)

  • २००७: हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेता सत्येन कप्पू यांचे निधन.

  • २०१५: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रानजीत रॉय चौधरी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९३०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.