चालू घडामोडी - २७ सप्टेंबर २०१७

Date : 27 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सौदीच्या इतिहासात पहिल्यांदा महिलांना ड्रायव्हिंगचं स्वातंत्र्य :
  • सौदी अरेबियामध्ये महिलांसाठी क्रांतिकारक बदल घडणार असून लवकरच महिलांना गाडी चालवण्याची मुभा मिळणार आहे, सौदीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांना ड्रायव्हिंग करण्याचं स्वातंत्र्य बहाल होणार आहे.

  • महिला हक्क कार्यकर्त्यांच्या जोरदार मागणीनंतर पुढच्या उन्हाळ्यापासून महिलांना गाडी चालवण्यावर असलेली बंदी उठवण्यात येणार असून सौदी अरेबिया हा महिलांना वाहन चालवण्यापासून रोखणारा एकमेव देश होता. देशात ही बंदी धुडकावणाऱ्या महिला वाहनचालकांची धरपकड केली जात असे, त्यामुळे जगभरात सौदीची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे.

  • किंग सलमान आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रीय दिवसाच्या सोहळ्यात महिलांना रियाधमधील मुख्य स्टेडियममध्ये प्रवेश देऊन नवी सुरुवात केली होती.

  • वाहन चालवण्याचं स्वातंत्र्य हा त्यापैकी एक महत्त्वाचा बदल मानला जात असून सौदी अरेबियातील कडक कायद्यांमुळे महिलांना पुरुष नातेवाईकांच्या मक्तेदारीखाली राहावं लागत असून गेल्या काही वर्षांपासून हळूहळू महिलांना अनेक हक्क दिले जात आहेत.

ट्विटची अक्षरमर्यादा वाढवली जॅक डोर्सी यांच्याकडून २४० अक्षरांचे पहिले ट्विट :
  • ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटकडून संदेशांसाठीची अक्षरमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच प्रायोगिक तत्त्वावर २८० अक्षरांची ट्विट करता येणार आहेत.

  • काही महिन्यांपुर्वीच ट्विटरकडून संदेशांसाठीची अक्षरमर्यादा १४० पर्यंत वाढवण्यात आली होती मात्र, फेसबुक मेसेंजरसारख्या स्पर्धकांचा विचार करता ट्विटर आता २८० शब्दांचे संदेश लिहण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

  • सध्या ट्विटरवरील १४० अक्षरांची मर्यादा अनेकांसाठी अडचणीची ठरत असून अनेक युजर्सनी तशी तक्रारही केली होती, या पार्श्वभूमीवर ट्विटरकडून अक्षरमर्यादा दुपटीने म्हणजे २८० पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

  • ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्सी यांच्याकडून २४० अक्षरांचे पहिले ट्विट करण्यात आले असून ‘हा बदल लहानसा आहे, पण आमच्यासाठी खूप मोठे पाऊल आहे.

  • यापूर्वी ट्विटसाठी १४० शब्दांची तांत्रिक मर्यादा होती, लोकांना ट्विट करताना येणाऱ्या खऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमच्या टीमने विचारपूर्वक जे बदल केले आहेत, त्याचा अभिमान वाटतो’, असे डोर्सी यांनी ट्विटमध्ये लिहले आहे.

माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णांच्या जावयाकडे ६५० कोटींची अघोषित संपत्ती :
  • माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या जावयाच्या विविध ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांत ६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त अघोषित संपत्तीची माहिती मिळाली आहे.

  • प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या २५ ठिकाणांवर ही छाप्याची कारवाई मागील चार दिवसांपासून सुरू असून यादरम्यान त्यांच्या कॉफी कॅफ डे चेनशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले.

  • ही कारवाई बंगळुरू, हासन, चिकमंगळूर, चेन्नई आणि मुंबईत करण्यात आली. विशेष म्हणजे कृष्णा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता.

  • सिद्धार्थ हे कॉफी चेनचे अर्धवेळ मालक असल्याचेही सांगितले जात आहे. कॉफी, पर्यटन, आयटी आणि इतर क्षेत्रांतील त्यांच्या कंपन्या आणि संपत्तीची तपासणी करण्यात आली असून यासंदर्भात त्यांच्याकडे असणाऱ्या विविध कागदपत्रे आणि बँक खात्यांचीही चौकशी होत आहे.

२०२० पर्यंत सुरु होणार 5G तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने स्थापन केली समिती :
  • दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा म्हणाले, या नव्या तंत्रज्ञानाची ध्येय-धोरणे ठरवण्यासाठी आम्ही 5G समितीची निर्मिती केली असून जेव्हा जगात २०२० मध्ये 5G तंत्रज्ञान सुरु होईल, तेव्हा भारत त्यात आघाडीवर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • भारतात झपाट्याने झालेल्या मोबाईल फोन्सच्या क्रांतीमुळे लोकांचे जगणे सुसह्य झाले असून सध्याचा 4Gचा जमाना आहे, आता हे तंत्रज्ञान आणखी वेगवान होणार असून २०२० पर्यंत देशात 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे.

  • केंद्र सरकारने यासंदर्भात एका समितीची स्थापना केल्याची आज घोषणा केली असून ही समिती या नव्या तंत्रज्ञानाचा आराखडा तयार करणार आहे.

  • टेलिकॉम विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार 5G तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी केंद्र सरकार ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार असून या तंत्रज्ञानातील संशोधनासाठी आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी या पैशाचा वापर करण्यात येणार आहे.

२८ सप्टेंबरपासून आंतराष्ट्रीय क्रिकेटचे सामने हे नवीन नियमांनुसार खेळवले जाणार :

२८ सप्टेंबरपासून आंतराष्ट्रीय क्रिकेटचे सामने हे नवीन नियमांनुसार खेळवले जाणार असून आयसीसीने आज यासंदर्भात घोषणा केली आहे, बॅटची जाडी, पंचांना दिलेले विशेष अधिकार आणि डीआरएस यासारख्या नियमांमध्ये आता प्रामुख्याने  बदल करण्यात आलेला आहे.

  • १) वन-डे आणि कसोटी सामन्याप्रमाणे टी-२० सामन्यातही DRS चा वापर करण्यात येणार आहे.

  • २) एखाद्या खेळाडूने पंचांकडे फलंदाज पायचीत (LBW) असल्याचं अपील केलं, आणि पंचांनी फलंदाजाला नाबाद ठरवल्यानंतर निर्णयाविरुद्ध रिव्ह्यू घेताना जर, अंपायर्स कॉल असा निर्णय आला तरीही ‘तो’ संघ आपली ( DRS ) ची संधी गमावणार नसून याआधीच्या नियमांप्रमाणे तिसऱ्या पंचांनी अंपायर्स कॉल असा निर्णय दिल्यावर संघाची संधी संपून जायची.

  • २) कसोटी सामन्यांत यापुढे एका डावात ८० षटकांनंतर DRS च्या दोन नवीन संधी मिळणार नसून याआधी प्रत्येक संघाला ८० व्या षटकांनंतर दोन नवीन संधी मिळायच्या.

  • ४) नवीन नियमांनुसार DRS मध्ये BALL TRACKING आणि EDGE DETECTION TECHNOLOGY या सुविधा असणं अनिवार्य होणार आहे.

  • ५) आयसीसीच्या नवीन नियमांनुसार प्रत्येक फलंदाजाच्या बॅटची रुंदी ही १०८ मिमि, खोली ६७ मिमि तर बॅटची कडा ही ४० मिमि इतकी असणं बंधनकारक असणार आहे.

  • ६) फुटबॉलच्या सामन्याप्रमाणे यापुढे कोणत्याही खेळाडूने मैदानात पंचांशी गैरवर्तन किंवा हुज्जत घातल्यास पंचांना त्यांना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्याचा अधिकार आहे.

  • ७) धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज डाईव्ह करून क्रीजमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतो. चेंडू यष्टींना लागण्यापूर्वी त्याची बॅट क्रीजमध्ये असते, पण डाईव्ह केल्याने खेळाडू मागे राहतो आणि बॅटचा संपर्क क्रीजपासून तुटतो आणि फलंदाज मागे राहतो. 

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक प्रवासी दिन

जन्म /वाढदिवस

  • भगत सिंग, भारतीय क्रांतिकारी : २७ सप्टेंबर १९०७

  • माता अमृतानंदमयी, भारतीय धर्मगुरू : २७ सप्टेंबर १९५३

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • एस.आर. रंगनाथन, भारतीय गणितज्ञ : २७ सप्टेंबर १९७२

  • महेंद्र कपूर, विख्यात भारतीय पार्श्वगायक : २७ सप्टेंबर २००८

ठळक घटना

  • द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली : २७ सप्टेंबर १८२५

  • मराठीमाती या मराठी संकेतस्थळाची सुरूवात : २७ सप्टेंबर २००२

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.