चालू घडामोडी - २८ एप्रिल २०१८

Date : 28 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मोदी-जिनपिंग भेटीने संबंधांतील ताण कमी :
  • वुहान (चीन) : डोकलामला वादामुळे भारत-चीन यांच्यातील संबंध अद्याप तणावाचे असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वुहान शहरात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. या भेटीने दोन देशांतील तणाव कमी होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. शी जिनपिंग भारतात आले, तेव्हा त्यांनी मोदी यांना चीनला येण्याचे निमंत्रण दिले होते.

  • दोन दिवसांत या दोन नेत्यांत सहा बैठका होणार आहेत. दोन देशांतील संबंध सुधारणेच्या दृष्टीने या बैठका महत्त्वाच्या असल्या तरी त्यात डोकलामचा विषय येण्याची शक्यता कमी आहे. ही भेटच अनौपचारिक आहे. अमेरिकेने चीनच्या वस्तुंच्या आयातीवरील कर वाढवल्याचे आपल्या उत्पादनांच्या निर्यातीसाठीसाठी भारताच्या बाजारपेठेकडे चीन लक्ष ठेवून आहे. त्यामुळे व्यवसाय वाढवण्यावरही या चर्चा होणे अपेक्षित आहे.

  • आंतराष्ट्रीय व आशियातील प्रश्नांवर आज चर्चा झाल्याचे कळते. वुहानमधील हुबे म्यूझियममध्ये मोदींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याआधी साबरमतीमधील गांधीजींच्या आश्रमात मोदी व जिनपिंग यांच्यात पहिली अनौपचारिक बैठक झाली होती. त्यानंतरची ही दुसरी अनौपचारिक भेट आहे. या बैठकीत डोकलामविषयी चर्चा होणार नसेल, तर या भेटीला काहीच अर्थ नाही, अशी टीका काँग्रेसने मोदी यांच्या भेटीच्या निमित्ताने केली आहे. 

UPSC चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील यशवंत चमकले :

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) 2017 या वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील गिरीष बदोले यांचा महाराष्ट्रातून पहिला, तर देशात विसावा क्रमांक आला आहे.

महाराष्ट्रातील यशवंतांची यादी :

  • गिरीष बदोले (20)
  • दिग्विजय बोडके (54)
  • सुयश चव्हाण (56)
  • भुवनेश पाटील (59)
  • पियुष साळुंखे (63)
  • रोहन जोशी (67)
  • राहुल शिंदे (95)
  • मयुर काटवटे (96)
  • वैदेही खरे (99)
  • वल्लरी गायकवाड (131)
  • यतिश विजयराव देशमुख (159)
  • रोहन बापूराव घुगे (249)
  • श्रीनिवास वेंकटराव पाटील (275)
  • प्रतिक पाटील (366)
  • विक्रांत सहदेव मोरे (430)
  • तेजस नंदलाल पवार (436) 
बुलेट ट्रेनचा उपयोग ९९ टक्क्यांना नाही :
  • नवी दिल्ली : मोदी सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित करत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, एकीकडे मानवरहित क्रॉसिंगवर १३ मुलांचा मृत्यू होतो, तर दुसरीकडे बुलेट ट्रेनसाठी लाखो कोटी रुपये खर्च केला जात आहे.

  • ज्या दिवशी एक लाख कोटींच्या बुलेट ट्रेनसाठी ७७ हेक्टर जमीन देण्यात आली, त्याच दिवशी १३ मुलांचा क्रॉसिंगवर मृत्यू झाला. बुलेट ट्रेनमधून ९९ टक्के लोक कधीच प्रवास करणार नाहीत.

देशात पुरुषांपेक्षा महिलांना १६.१ टक्के कमी पगार - रिपोर्ट :
  • भारतामध्ये महिलांची कमाई पुरुषांपेक्षा १६.१ टक्के कमी आहे. भारतात महिलांना पुरुषांपेक्षा जवळपास १६.१ टक्के वेतन कमी दिलं जातं. याशिवाय भारतासह जगभरामध्ये नोकरीच्या ठिकाणी लिंगभेद अद्यापही सुरूच आहे. कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्सच्या अहवालातून याबाबत माहिती समोर आली आहे.

  • जागतिक स्तराचा विचार केला असता तेथेही महिलांची स्थिती सारखीच आहे. जागतिक स्तरावरही पुरुषांपेक्षा जवळपास १६.१ टक्के वेतन महिलांना कमी दिलं जातं. एकाच कंपनीमध्ये समकक्ष काम करणाऱ्या पुरुष आणि महिलेच्या वेतनातील फरक दीड टक्क्यांनी कमी आहे. तर सारखेच काम करणाऱ्यांमध्ये हे अंतर केवळ ०.५ टक्क्यांनी कमी होत आहे. भारतामध्ये एकाच पातळीवर काम करणाऱ्या महिला व पुरुषाच्या वेतनामधील अंतर चार टक्के आहे. तर एकसारखेच काम, जबाबदारी हाताळणाऱ्या कंपनीमध्ये हेच अंतर ०.४ टक्क्यांनी कमी आहे.

  • कॉर्न फेरी जेंडर पे इंडेक्सतर्फे, ५३ देशांतील १४ हजार कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये जवळपास १२.३ दशलक्ष कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा समावेश आहे. काही कंपन्यांमध्ये महिलांना सरासरीपेक्षाही कमी वेतन दिले जाते. एकाच पदावरील कर्मचाऱ्यांचा अभ्यास केल्यास हा आकडा कमी होत असल्याचे कॉर्न फेरीचे मुख्य अधिकारी बॉब वेस्सलकॅम्पर यांनी सांगितले.

  • भारतातील वेतन लिंगभेद हा शेजारच्या चीन पेक्षाही जास्त आहे. चीनचा १२.१ टक्के आहे. तर ब्राझीलसारख्या देशांध्ये हाच आकडा २६.२ म्हणजेच सर्वाधिक आहे. फ्रान्समध्ये १४.१, जर्मनी १६.८, यूकेमध्ये २३.८ आणि अमेरिकेमध्ये १७.६ आहे.

इन्फोसिस पुरवणार 3000 अमेरिकी कर्मचाऱ्यांना रोजगार :
  • इन्फोसिस सॉफ्टवेअर क्षेत्रातली आघाडीची कंपनी येत्या पाच वर्षांमध्ये ३००० अमेरिकींना रोजगार देणार आहे. कंपनीचे अध्यक्ष रवी कुमार यांनी सांगितले की अमेरिकेमधील इंडियानापोलिस येथे इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल परिसरात १४१ एकर जागेमध्ये हा कॅम्पस उभारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी २४५ दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

  • टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, या कॅम्पसमध्ये एक ‘टेकहब’ उभारण्यात येणार असून यात कंपनीचा डेटा आणि क्लाऊड टेक्नॉलॉजी यांचा समावेश असेल. या ‘टेकहब’मध्ये इंजिनिअर्स, डेव्हलपर्स, विश्लेषक, आर्किटेक्टस आणि औद्योगिक सल्लागार यांच्या समावेश करण्यात येईल, रवी कुमार यांनी सांगितले.

  • इंडियाना इकोनॉमिक डेव्हल्पमेंट कार्पोरेशननुसार, या प्रकल्पासाठी राज्य आणि शहरातून प्रोत्साहन मिळत असून तब्बल १०१.८ दशलक्ष रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार असून ही एक मोठी भागीदारी ठरणार आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे व्यवसाय करण्याची दिशा बदलत असल्याचे गव्हर्नर एरिक होलकोम्ब यांनी सांगितले. हा प्रकल्प २००५ मध्ये सुरु करण्यात आला असून या प्रकल्पामुळे अनेक जणांना रोजगार मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९१६: होम रुल लीगची स्थापना झाली.

  • १९२०: अझरबैजान यांचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.

  • १९६९: चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

  • २००१: डेनिस टिटो हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ प्रवासी झाला.

जन्म

  • १७५८: अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स मोन्‍रो यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८३१)

  • १८५४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी वासुकाका जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी१९४४)

  • १९०८: ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझीविरोधी ऑस्कार शिंडलर यांचा जन्म.

  • १९१६: प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी चे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली येथे जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी  १९९३)

  • १९३१: लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म.

  • १९३७: इराकी हुकूमशहा आणि इराकचे ५वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर२००६)

  • १९४२: इंग्लिश क्रिकेटर माईक ब्रेअर्ली यांचा जन्म.

  • १९६८: झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचा जन्म.

मृत्यू

  • १७४०: थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १७००)

  • १९४५: इटलीचे हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा गोळ्या घालून मृत्यू. (जन्म: २९ जुलै १८८३)

  • १९७८: अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९०९)

  • १९९२: ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १९०९)

  • १९९८: जलदगती गोलंदाज रमाकांत देसाई यांचे निधन. (जन्म: २० जून १९३९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.