चालू घडामोडी - २८ जुलै २०१८

Date : 28 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विकासदर जास्त असूनही भारत सुख निर्देशांकात खालीच :
  • आपल्या देशाचा आर्थिक विकास दर जास्त अस्ला तरी एकूणच सुखाच्या निर्देशांकात देशाचा फार खालचा क्रमांक आहे, अशी खंत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केली.

  • भारतीय व्यापार व उद्योग महासंघाच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले. जागतिक सुख निर्देशांकात भारताचा २०१८ मध्ये १३३ वा क्रमांक लागला होता. जास्त आर्थिक विकास दर, जास्त आयुर्मान असतानाही भारतात माणसे सुखी नाहीत.

  • स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनंतर आयुर्मान ३१.४ वर्षे होते ते आतापर्यंत ६८ वर्षांपर्यंत वाढले आहे. १९४७ मध्ये जे अन्नधान्य उत्पादन होते ते आता खूपच वाढले आहे. पण सुखाच्या निर्देशांकात आपण खूप खालच्या क्रमांकावर आहोत. याचा अर्थ आपल्या देशाचा विकास हा सर्वागीण पातळीवर झाला आहे असे म्हणतात येत नाही.

  • सुखाचे कोडे हे शाश्वत विकासाशी निगडित आहे. मानवी कल्याण, सामाजिक समावेशकता व पर्यावरण शाश्वतता यांचाही त्यात मोठा भाग आहे. आर्थिक विकासावर भर देतानाच आपण सामाजिक कल्याण व मानसिक आरोग्यावर भर दिला पाहिजे. आर्थिक उलाढाली या केवळ आर्थिक फायद्याशी निगडित नसाव्यात. त्यात आपला ग्रह, लोक, औद्योगिक विकास व वाढ यांचा समतोल विचार असला पाहिजे.

पुतिन-मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा : 
  • ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या निमित्ताने अनौपचारिक भेट - येथील ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. मोदी यांची रशियातील सोशी येथे मे महिन्यात अनौपचारिक भेट झाली होती. दोन्ही नेते शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर बैठकीत जूनमध्ये चीनमधील क्विंगडाव येथे भेटले होते.

  • पुतिन यांच्याशी विस्तृत व फलदायी चर्चा झाली. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सहकार्य आहे व ते यापुढेही सुरू राहील असे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, पर्यटन यातील मुद्दय़ांवर चर्चा झाल्याचे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले आहे. मोदी-पुतिन यांच्यात मध्यरात्रीनंतरही चर्चा सुरू होती. मे महिन्यात सोशी येथील चर्चेत विशेष  धोरणात्मक भागीदारीवर चर्चा  झाली होती.

  • मोदी यांचे बुधवारी दोन दिवसांच्या ब्रिक्स शिखर बैठकीसाठी येथे आगमन झाले. ब्रिक्स इन आफ्रिका हा या वेळच्या बैठकीचा मध्यवर्ती विषय आहे. ब्रिक्स संघटनेची स्थापना २००९ मध्ये झाली असून त्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. त्यात जगातील चाळीस टक्के लोकांचा समावेश होतो.

  • अंगोला व अर्जेंटिनाच्या नेत्यांशी चर्चा - मोदी यांनी ऊर्जा व कृषी क्षेत्राच्या संदर्भात संबंध वाढवण्यासाठी अंगोला व अर्जेंटिनाच्या अध्यक्षांशीही द्विपक्षीय चर्चा के ली. अंगोलाचे अध्यक्ष जोआव लॉरेन्को यांच्याबरोबरचे मोदी यांचे छायाचित्र ट्विटरवर टाकण्यात आले आहे.

  • अंगोलाच्या स्वातंत्र्यलढय़ास भारताने पाठिंबा दिला होता. त्यानंतर १९७५ मध्ये पोर्तुगीज राजवटीतून तो देश मुक्त झाला. अंगोलाबरोबरचा भारताचा  व्यापार हा १५ टक्के आहे. नायजेरियानंतर या देशाकडून भारत अंगोलातून खनिज तेल घेतो. तेथे भारतीय वंशाचे ४ हजार लोक आहेत. अर्जेंटिनाचे अध्यक्ष मॉरिसिओ मॅक्री यांच्याशी मोदी यांनी कृषी, औषधे व गुंतवणूक या मुद्दय़ांवर चर्चा केली.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे दहा स्फूर्तिदायक विचार :

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची भाषणे नेहमीच प्रेरणादायी असत. त्यांच्या भाषणातील अनेक विचार चांगलेच लोकप्रिय झाले होते. यापैकी काही निवडक विचार लोकसत्ताच्या वाचकांसाठी.

  • आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं.
  • देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.
  • तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.
  • जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा सर्व पक्षी घरट्यात आसरा घेतात. मात्र, गरूड पावसापासून बचाव करण्यासाठी ढगांवरून उडतो.
  • यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.
  • यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.
  • स्वप्न खरी होण्यासाठी स्वप्नं पाहणं गरजेचं आहे.
  • एखाद्याचा पराभव करणे फार सोपे असते. मात्र, एखाद्याला जिंकणे खूपचं अवघड असते.
  • आपण आपल्या वर्तमानातील गोष्टींचा त्याग करून जेणेकरून आपल्या मुलांचं भविष्य उत्तम होईल.
  • स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.
  • संकुचित ध्येय बाळगू नका. महान विचारदृष्टी समोर ठेऊन परिश्रम केले तर आपला देश निश्चितपणे एक विकसित राष्ट्र बनेल.
  • य़शस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.
उच्च शिक्षण घेणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या कमीच : 
  • नवी दिल्ली : राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणसंस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची संख्या कमी असून हेच चित्र राज्यातील खासगी मुक्त विद्यापीठे तसेच सरकार संचालित अभिमत विद्यापीठांमध्येही दिसून येत असल्याचे देशव्यापी सर्वेक्षणात आढळून आले आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले सर्वाधिक विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यानंतर महाराष्ट्र व तामिळनाडूचा क्रमांक लागतो.

  • या २०१७-१८ च्या सर्वेक्षणाच्या अहवालाचे प्रकाशन केल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, देशात

  • १८ ते २३ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांपैकी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाºयांचे ठोकळ प्रवेश प्रमाण २५.८ टक्के आहे.

  • उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३. ६६ कोटी असून त्यामध्ये १.९२ कोटी मुले व १.७४ कोटी मुली आहेत. म्हणजे उच्च शिक्षण घेणाºयांमध्ये मुलींचे प्रमाण ४७.६ टक्के आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी अनुक्रमे २१.८ व १५.९ टक्के आहे.

  • सन २०१७मध्ये ३४ हजार विद्यार्थ्यांना पीएचडी मिळाली. त्यामध्ये २०१७९ पुरुष व १४२२१ महिलांचा समावेश होता. विज्ञान व त्यापाठोपाठ अभियांत्रिकी, तंत्रज्ञान या विषयांत पीएचडी करणाºयांची संख्या जास्त आहे.

  • उच्च शिक्षणात सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून, त्यानंतर व्यवस्थापन अभ्यासक्रमांतील विद्यार्थी आहेत.

NRI विवाहातील समस्या दूर करण्यासाठी लवकरच ऑनलाईन वॉरंट : 
  • नवी दिल्ली : अनिवासी भारतीयांसोबतच्या NRI विवाहांमध्ये येणाऱ्या समस्यांना दूर करण्यासाठी आणि दोषी व्यक्तीस तातडीने पकडण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा शासन विचार करीत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी दिली.

  • केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सदन येथे 'अनिवासी भारतीय विवाह आणि महिला तस्करी- समस्या आणि उपाय योजना' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे उपस्थित होते.

  • 'NRI विवाह' हा विषय आता राज्याचा विषय राहिला नसून देशभरातील सर्व राज्यांमध्ये पीडित महिलांच्या संख्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. याप्रकरणांमध्ये कुटुंबातील व्यक्तींची सहभागिता मोठ्या प्रमाणात दिसून येते. नवविवाहीत युवतींना संरक्षण मिळावे, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही ठोस पावलं उचलली आहेत.

  • मंत्रालयाच्या संकेत स्थळावरून थेट वॉरंट आणि समन्स जारी करण्याचा प्रयत्न सुरू असून या लोकसभा सत्रात अथवा पुढच्या सत्रात या विधेयकास मंजूरी मिळेल, यामुळे दोषी व्यक्ती जगात कुठेही असल्यास त्याला तातडीने पकडता येईल. यासह अनिवासी भारतीयांसोबत विवाह झाल्यास नवविवाहीत मुलीच्या नावे संपत्तीत वाटा असावा याबाबतही कायदे बनविण्यासंदर्भात संशोधन सुरू असल्याचे श्रीमती स्वराज यांनी सांगितले.

दिनविशेष :
  • जागतिक हेपटायटीस दिन

महत्वाच्या घटना 

  • १८२१: पेरू देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९३३: अँडोराचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९७९: भारताच्या ५व्या पंतप्रधानपदी चौधरी चरणसिंग यांची नियुक्ती.

  • १९९८: सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन.

  • १९९९: भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान.

  • २००१: आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

जन्म 

  • १९२५: हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल २०११)

  • १९३६: वेस्ट इंडीजचे क्रिकेट कर्णधार आणि फलंदाज सरगॅरी सोबर्स यांचा जन्म.

  • १९४५: अमेरिकन व्यंगचित्रकार जिम डेव्हिस यांचा जन्म.

  • १९५४: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचा जन्म. (मृत्यू: ५ मार्च २०१३)

मृत्यू 

  • १९६८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ ऑटो हान यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८७९)

  • १९८१: नाटककार बाबूराव गोखले यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९२५)

  • १९८८: राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सलग ८ वेळा विजेतेपद मिळवणारे सैद मोदी यांची लखनऊत हत्या.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.