चालू घडामोडी - २८ जून २०१७

Date : 28 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकण्याचा किदाम्बी श्रीकांतचा निर्धार : 
  • सलग दोन सुपर सिरिज बॅडमिंटन विजेतेपद पटकावून पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल १० मध्ये स्थान निश्चित झाल्यानंतर स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने आॅगस्ट महिन्यात होणारी वर्ल्ड चॅम्पिअयनशीप स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला आहे.

  • इंडोनेशिया आणि आॅस्टे्रलिया ओपन जिंकून हैदराबादला परतल्यानंतर श्रीकांतने आपल्या पुढील वाटचालीची माहिती दिली.

  • श्रीकांतने राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपिचंद यांच्यासह आपल्या यशाचा आनंद साजरा केला. यावेळी श्रीकांतच्या कुटुंबियांचीही उपस्थिती होती.

  • मायदेशी परतल्यानंतर प्रसारमाध्यंमाशी बोलताना श्रीकांतने विजेतेपदाच्या निर्धारानेचे आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार असल्याचे सांगितले. श्रीकांतने म्हटले की, ‘जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये पुन्हा प्रवेश करणे चांगली बाब आहे.

देशांना पुन्हा एकदा सायबर हल्ल्याचा फटका :
  • जगभरातील देशांना पुन्हा एकदा सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. वान्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसने गेल्या महिन्याभरात माजवलेल्या दहशतीनंतर आता पेट्या रॅन्समवेअर व्हायरसने जगभरातील देशांना टार्गेट केले आहे. यात भारत आणि युरोपचाही समावेश आहे.

  • युके, रशिया, फ्रान्स, स्पेनमध्ये या व्हायरसनं ग्राहक, मालवाहतूक, हवाई वाहतूक सेवा, तेल कंपन्यांवर हल्ला केला.

  • भारताला या हल्ल्याची झळ बसली आहे, यात जेएनपीटीवर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे सध्या येथील कामकाज थांबवण्यात आले आहे.  

  • हा व्हायरस 'पीटा' नावाच्या जुन्या रॅन्समवेअरचे अॅडव्हान्स्ड वर्जन असल्याचे म्हटले जात आहे. पेट्याने २० प्रसिद्ध कंपन्यांमधील कम्प्युटर हॅक केले आणि कम्प्युटर अनलॉक करण्याच्या मोबदल्यात हॅकर्संनी ३०० डॉलरची मागणी केली होती.

भारतीय लष्करांना मिळणार बुलेटप्रूफ हेल्मेट :
  • भारतीय सैन्यातील जवान सध्या जुन्या काळातील हेल्मेट वापरत होते. पण हे हेल्मेट शत्रूंच्या गोळीपासून संरक्षण करण्यासाठी सक्षम नव्हते. या हेल्मेटचे वजन सुमारे अडीच किलो होते.

  • लष्करी कारवायांमध्ये धाडसाने शत्रूंना सामोरे जाणाऱ्या सैन्याच्या जवानांना केंद्र सरकारने सुरक्षा कवच दिले आहे.

  • सैन्याच्या जवानांसाठी केंद्र सरकारने नवीन बुलेटप्रुफ हेल्मेट घेतले असून गेल्या दशकभरापासून जवानांसाठी बुलेटप्रूफ हेल्मेटची मागणी केली जात होती.

  • सैन्याच्या जवानांना लष्करी कारवायांदरम्यान आधुनिक हेल्मेट द्यावे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती.

  • तसेच केंद्र सरकारने वर्षाच्या सुरुवातीला कानपूरमधील एमकेयू लिमिटेड या कंपनीला बुलेटप्रूफ हेल्मेटचे कंत्राट दिले होते. यूके आणि नाटोच्या सैन्यालाही याच कंपनीने हेल्मेट पुरवले होते.

  • संरक्षण मंत्रालयासोबत झालेल्या १८० कोटी रुपयांच्या या करारानुसार कंपनी सैन्याला १ लाख ६० हजार बुलेटप्रूफ हेल्मेट देणार आहे.

भारताला गार्डियन ड्रोन देण्यास मंजुरी : 
  • अमेरिकेने भारताशी संरक्षण व सुरक्षा सहकार्य वाढवण्याचे ठरवले असून, टेहळणीसाठी गार्डियन ड्रोन देण्यास मंजुरी दिली आहे.

  • संरक्षण सामग्री व तंत्रज्ञानात अमेरिका भारताला मदत करणार असल्याचे अध्यक्ष ट्रम्प व पंतप्रधान मोदी यांच्या चर्चेनंतर प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

  • भारताच्या सागरी सुरक्षेला मजबुती देण्यासाठी गार्डियन ड्रोन उपयोगी पडणार आहेत. भारतीय नौदलाची गुप्तचर, टेहळणी क्षमता यामुळे वाढणार आहे. हा करार दोन ते तीन अब्ज डॉलर्सचा असून, २२ गार्डियन ड्रोन अमेरिका भारताला देणार आहे.

  • संयुक्त निवेदनात म्हटल्यानुसार अमेरिकेचा भारताबरोबरचा संरक्षण व्यापार १९ अब्ज डॉलर्सचा असून, त्यामुळे अमेरिकी लोकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

  • एफ १६ व एफए १८ विमाने भारताला विकण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे. अमेरिका व भारत वज्र प्रहार, रेड फ्लॅग (भारतीय हवाई दल) युद्ध अभ्यास या कवायतीत एकत्र सहभागी होणार आहेत.

आयपीएलचे मुख्य प्रायोजक 'विवो' कंपनीचा करार कायम :
  • ट्‌वेंटी-२० क्रिकेटमधील समीकरणेच बदलून टाकणाऱ्या 'इंडियन प्रीमिअर लीग'चे (आयपीएल) मुख्य प्रायोजक म्हणून 'विवो' या चिनी मोबाईल कंपनीचा करार कायम ठेवण्यात आला आहे.

  • 'आयपीएल'च्या पुढील पाच वर्षांसाठी 'विवो'ने २१९९ कोटी रुपयांची बोली लावली होती. गेल्या महिन्यात संपलेल्या 'आयपीएल'चे मुख्य प्रायोजक 'विवो'च होते.

  • तसेच यापूर्वी २०१६ आणि २०१७ या वर्षांसाठी 'विवो'ने २०० कोटी रुपयांची बोली लावत प्रायोजकत्व पटकाविले होते. २०१४-१५ पासून 'विवो' हे 'आयपीएल'चे मुख्य प्रायोजक होते.

  • 'आयपीएल'च्या पहिल्या पाच वर्षांसाठी 'पेप्सी' हे मुख्य प्रायोजक होते. 'आयपीएल'चा दहा वर्षांचा पहिला टप्पा संपल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रायोजकासाठी निविदा मागविल्या होत्या. या निविदांमध्ये 'विवो'ने बाजी मारली. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळची विशेष समिती :
  • टी.सी. मॅथ्यू (केरळ), ए. भट्टाचार्य (पूर्व विभागाचे प्रतिनिधी), जय शाह (गुजरात), अनिरुद्ध चौधरी (बीसीसीआय कोषाध्यक्ष) आणि अमिताभ चौधरी (काळजीवाहू सचिव) या अन्य सदस्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या शिफारशींची योग्य पद्धतीने अंमलबजावणी कशी करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

  • त्यानुसार सात सदस्यांच्या समितीत बोर्डाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजीव शुक्ला आणि माजी कर्णधार सौरभ गांगुली यांना स्थान दिले आहे.

  • सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या शिफारशींची योग्य आणि त्वरित अंमलबजावणी कशी करता येईल, यासाठी समितीला काम करण्यास १५ दिवसांचा कालावधी त्यांना देण्यात आला आहे.

  • येत्या दोन दिवसानंतर ही समिती कामकाज सुरू करणार आहे. नंतर बोर्डाच्या कार्यकारिणीत शिफारशींवरील उपाययोजनांवर चर्चा होऊन काही गंभीर मुद्दे सर्वोच्च न्यायालयापुढे मांडले जाणार आहेत.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • पी.व्ही. नरसिंहराव, भारताचे माजी पंतप्रधान : २८ जून १९२१

  • गंगाधर पानतावणे साहित्यिक व समीक्षक : २८ जून १९३७

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • मनोएल फेराझ दि कॅम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष : २८ जून १९१३

  • प्रशांतचंद्र महालनोबीश, जगप्रसिध्द संख्याशास्त्रज्ञ : २८ जून १९७२

ठळक घटना

  • कटकजवळ बांधण्यात आलेल्या भारतातील सर्वात लांबीच्या पुलाचे उदघाटन : २८ जून 

  • अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनला पळवून नेण्याचा कट रचल्याबद्दल त्याच्या अंगरक्षक थॉमस हिन्कीला फाशी : २८ जून १७७६

  • कोरियन युद्ध - उत्तर कोरियानेसोल जिंकले : २८ जून १९५०

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.