चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ मे २०१९

Updated On : May 28, 2019 | Category : Current Affairsआज जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठे पहाल निकाल :
 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमित शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.

 • विद्यार्थ्यांना दुपारी १ पासून निकाल ऑनलाइन पाहता येईल. राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. गुण पडताळणीसाठी २९ मे ते ७ जून आणि छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून या कालावधीत अर्ज करता येईल. पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे.

असा पहा निकाल

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

http://www.knowyourresult.com

hscresult.mkcl.org

गुरूच्या आकाराएवढे दोन बाह्य़ग्रह शोधण्यात यश :
 • पृथ्वीपासून १५० प्रकाशवर्षे दूर अंतरावर वैज्ञानिकांनी गुरू ग्रहाच्या आकाराएवढे दोन बाह्य़ग्रह शोधून काढले आहेत, सौरमालेत लहान ग्रहांवर जीवसृष्टी शक्य आहे की नाही यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे.

 • अमेरिकेत रिव्हरसाईड येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक स्टीफन कॅनी यांनी सांगितले की, हे ग्रह गुरू एवढे असून पृथ्वीवरील जीवसृष्टीची वाटचाल या शोधातून समजू शकेल. इतर किती ताऱ्यांभोवती असे गुरूएवढे ग्रह आहेत हे माहिती नसले तरी त्यांच्या वसाहतयोग्यतेबाबत यातून प्रकाश पडू शकतो. या ग्रहांवर महासागराच्या रूपात पाणी असू शकते शिवाय उल्का, धुमकेतू व लघुग्रह यांना त्यांच्या कक्षेतून बाहेर फेकण्याची क्षमताही असावी त्यामुळे तेथून सुटलेले हे घटक इतर लहान ग्रहांवर आदळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 • या ग्रहांच्या ताऱ्याभोवती अनेक मोठे ग्रहही सापडले आहेत. असे असले तरी त्यांचा उपयोग आपल्याला सौरमालेच्या रचनेचे आकलन करून घेण्यासाठी फारसा होणार नाही कारण शनी, युरेनस व नेपच्यून हे  सर्व ग्रह सूर्यापासून लांब अंतरावर आहेत. ताऱ्यांपासून दूर अंतरावर असलेले मोठे ग्रह सापडण्याचे प्रमाण अजून कमी आहे.

 • अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नल या नियतकालिकात याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. यात पारंपरिक पद्धतींबरोबर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या संशोधनात करण्यात आला आहे. एखादा ग्रह ताऱ्यासमोरून जातो तेव्हा दिसणाऱ्या प्रकाशाच्या फरकातून बाह्य़ग्रहांचा अंदाज केला जातो.

अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात, अशी आहे प्रवेश प्रक्रिया :
 • मुंबई : कालपासून 11 वी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. या प्रवेशासाठी प्रवेश अर्जामध्ये भाग- 1 हा दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी भरावयाचा आहे. यामध्ये अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतून घ्यायची आहे. त्यामध्ये दिलेल्या लॉग इन आयडी आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून या ऑनलाईन प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात करता येणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांनी गोंधळून जाऊ नये, असे मुंबई शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले आहे.

नेमकी कशी असेल प्रवेश प्रक्रिया

 • सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतून माहिती अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका घेऊन त्यात दिलेल्या पासवर्ड आणि लॉग इन आयडीद्वारे mumbai.11thadmission.net या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन करायचे आहे.

 • त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती रजिस्ट्रेशन फॉर्म भाग - 1 मध्ये टाईप करून ती सेव्ह करायची आहे. यानंतर ज्यावेळी दहावीचा एसएससी निकाल लागणार त्यानंतर या रजिस्ट्रेशन फॉर्म भाग 2 भरायचा आहे.

 • भाग 2 मध्ये दहावीचे मार्क्स त्यासोबतच जास्तीत जास्त दहा कॉलेजचे पसंती क्रमांक विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी द्यायचे आहेत.

 • प्रवेशाच्या पहिल्या फेरीत पहिल्या क्रमांकाचे कॉलेज विद्यार्थ्याला मिळाल्यावर त्याला ते घेणे बंधनकारक असणार आहे. बाकी विद्यार्थ्यांसाठी ते दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा कॉलेज पसंती क्रमांक देऊ शकतील.

शेतकरी पारतंत्र्य दिनानिमित्त १८ जूनला पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन :

 

 • पुणे : पुण्यात 18 जूनला शेतकरी पारतंत्र्य दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 18 जून हा दिवस 'शेतकरी पारतंत्र्य दिन' म्हणून पाळला जातो. यावर्षी पुण्यात 18 जून रोजी यानिमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 • पहिली घटनादुरुस्ती करून 18 जून 1951 रोजी शेतकऱ्यांचे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले, या दिवसाच्या निषेधार्थ शेतकरी पारतंत्र्य दिन पाळला जातो, अशी माहिती या कार्यक्रमाचे संयोजक मयूर बागुल यांनी दिली. या कार्यक्रमात प्रदीप रावत (माजी खासदार), अमर हबीब (किसानपुत्र आंदोलन), आयुषी महागावकर (मुक्त पत्रकार) हे मार्गदर्शन करणार आहेत.

 • '18 जून 1951 रोजी शेतकऱयांना गुलाम करणारी घटनादुरुस्ती झाली. अवघ्या दीड वर्षात हंगामी सरकारने केलेली ही पहिली घटनादुरुस्ती होती. या दुरुस्तीने मूळ घटनेत नसलेले परिशिष्ट 9 अस्तित्वात आले. अनुछेद 31-B नुसार या परिशिष्टात टाकलेल्या कायद्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यास मनाई करण्यात आली. या परिशिष्टात आज 284 कायदे आहेत, त्या पैकी 250 कायदे थेट शेतीशी संबंधित आहेत.' अशी माहिती किसानपुत्र मयूर बागुल यांनी दिली.

 • पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या, पदमजी सभागृह, टिळक रोड, येथे हा कार्यक्रम होणार आहे. 18 जून रोजी संध्याकाळी 5.30 ते 8 या वेळात हा कार्य़क्रम होणार आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १४९०: मलिक अहमद या जुन्नर येथील बहामनी सेनापतीने उर्वरित बहामनी सैन्याचा पराभव करून जुन्नर येथे स्वतंत्र सल्तनतीची घोषणा केली.

 • १९०७: पहिली आइल ऑफ मॅन टीटी रेस आयोजित करण्यात आली.

 • १९३७: नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले.

 • १९३७: फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.

 • १९४०: दुसरे महायुद्ध – बेल्जियमने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

 • १९५२: ग्रीसमधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.

 • १९५८: ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.

 • १९९८: बलुचिस्तानच्या चगाई भागात पाकिस्तानने पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.

 • १९९९: इटली मध्ये लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सपर हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.

जन्म

 • १६६०: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १७२७)

 • १८८३: क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६)

 • १९०३: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल१९९४)

 • १९०७: स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९९४)

 • १९०८: दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चा जनक इयान फ्लेमिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑगस्ट १९६४)

 • १९२१: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९५५)

 • १९२३: तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९९६)

मृत्यू 

 • १७८७: ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १७१९)

 • १९६१: प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १८९१)

 • १९८२: बळवंत दामोदर ऊर्फ कित्तेवाले निजामपूरकर यांचे निधन.

 • १९९४: हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन.

 • १९९९: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते बी. विट्टालाचारी यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९२०)

टिप्पणी करा (Comment Below)