चालू घडामोडी - २८ नोव्हेंबर २०१७

Date : 28 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जागतिक उद्योजकता शिखर परिषद 2017 : इव्हांका ट्रम्प हैदराबाद येथे दाखल :
  • नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प भारत दौ-यावर आल्या आहेत. इव्हांका ट्रम्प मंगळवारी पहाटे जवळपास 5 वाजण्याच्या सुमारास हैदराबाद येथे दाखल झाल्या आहेत. तीन दिवसांच्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेत (जीईएस) इव्हांका ट्रम्प सहभागी होणार आहेत.

  • या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ परिषदेसाठी भारतात दाखल झाले आहे.   

  • 36 वर्षीय इव्हांका या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागारही आहेत. ट्रम्प प्रशासनातील अधिकारी आणि उद्योजकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्या करणार आहेत. अमेरिकेच्या 38 राज्यांतील 350 प्रतिनिधी या शिष्टमंडळात आहेत.

  • भारत-अमेरिका यांच्यातर्फे होणा-या या परिषदेसाठी हैदराबादचे सुशोभीकरण केले आहे. शिखर परिषदेत ऊर्जा व पायाभूत सेवा, आरोग्य व जीवन विज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान व डिजिटल अर्थव्यवस्था, माध्यम व मनोरंजन यांवर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान मोदी आणि इव्हांका ट्रम्प यांच्यासह पाहुण्यांसाठी फलकनुमा राजवाड्यात निजामकालीन टेबलावर स्नेहभोजन होणार आहे.(source :lokmat)

गोव्यात कनव्हेन्शन सेंटर बांधण्यासाठी ईडीसीकडून प्रक्रिया सुरू :
  • पणजी : दोनापावल येथे कनव्हेन्शन सेंटर बांधण्यासाठी गोवा आर्थिक विकास महामंडळाकडून (ईडीसी) प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कनवेनश सेंटरसाठी सल्लागार नेमण्यासाठी इच्छाप्रस्ताव ईडीसीने मागितले आहेत. 

  • दोनापावल येथे 2019 साली पन्नासावा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. त्यासाठी तिथे इफ्फीला आवश्यक अशा सर्व साधनसुविधा उभ्या केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात कनव्हेन्शन सेंटर बांधले जाणार आहे. पूर्वी जिथे स्व. राजीव गांधी आयटी हॅबिटेट उभे करण्याचा प्रस्ताव होता, तिथेच कनव्हेन्शन सेंटर आणि एकूण इफ्फी संकुल साकारणार आहे.

  • सुमारे पाच ते सहा हजार प्रेक्षक क्षमतेचे कनव्हेन्शन सेंटर उभे केले जाणार आहे. शिवाय हॉटेलप्रमाणो मोठय़ा संख्येने खोल्यांचे बांधकाम तिथे केले जाणार आहे. 

  • दोनापावल येथील जागेत पूर्वी गोवा मनोरंजन संस्थेने (ईएसजी) बांधकाम करावे असे वर्षभरापूर्वी ठरले होते. त्यासाठी ईएसजीकडे ती जमीन आयटी महामंडळाने सोपवली होती. मात्र नव्या सरकारने हे काम विशेष यंत्रणोमार्फत व ईडीसीच्या सहभागाने करावे असे ठरविले. मंत्रिमंडळाने त्याविषयीचा निर्णय दीड महिन्यापूर्वी घेतला.(source :lokmat)

इंडिया आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन : लक्ष्य सेन, एम. तनिष्क यांचे वर्चस्व 
  • हैदराबाद : लक्ष्य सेन आणि एम. तनिष्क यांनी आपला चमकदार खेळ कायम राखताना इंडिया आंतरराष्ट्रीय सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले. दोन्ही खेळाडूंनी तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात झुंजार विजयासह बाजी मारली.

  • भारताच्या चौथ्या मानांकित लक्ष्यने मलेशियाच्या यीन हान चोंग याचे तगडे आव्हान २१-१५, १७-२१, २१-१७ असे परतावले. पहिला

  • गेम जिंकून आश्वासक सुरुवात केल्यानंतर लक्ष्यला चोंगकडून कडवी टक्कर मिळाली. या वेळी चोंगने दुसरा गेम जिंकून सामना तिसºया गेममध्ये नेला. या वेळी लक्ष्यने अखेरच्या क्षणी आपली आघाडी न गमावताना जबरदस्त नियंत्रण राखत बाजी मारली.

  • दुसरीकडे, महिलांच्या गटातील अंतिम सामनाही तीन गेमपर्यंत रंगला. तनिष्कने भारताच्या शिखा गौतमचे कडवे आव्हान १७-२१, २२-२०, २१-१८ असे परतावले. पहिला गेम गमावून पिछाडीवर पडल्यानंतर तनिष्कने जबरदस्त पुनरागमन करताना सलग दोन गेम जिंकत सामन्याचेचित्र पालटले. 

सिग्नलला थांबताना योग्य अंतर राखून वाहन थांबवणे हे सर्वांच्याच सुरक्षिततेसाठी आवश्यक :
  • वाहतूक सिग्नलला योग्यवेळी थांबणे हे सर्वात महत्त्वाचे असते. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये सिग्नल यंत्रणा खूप ब-यापैकी प्रभावी आहेत. त्यांचा उपयोग खरे म्हणजे प्रत्येका वाहनचालकाने नीट केला आणि वाहतूक, पार्किंगचे विविध नियम किमान 70 टक्के जरी पाळले तरी प्रचंड वाढलेल्या वाहनांच्या संख्येमध्येही वाहतूक कोंडीची समस्या नाही म्हटली तरी ब-याच प्रमाणात कमी होऊ शकेल.

  • सिग्नल यंत्रणा, त्याद्वारे दिले जाणारे संकेत हे म्हणूनच अतिशय मोलाचे असतात. तसेच सिग्नलचा अर्थ नेमका समजून त्यानुसार सिग्नलपूर्वी असलेल्या दोन आडव्या पांढ-या रेषांपूर्वी तुम्ही तुमचे वाहन थांबवणे गरजेचे आहे.

  • या रेषा झेब्रा क्रॉसिंगच्या आधी असतात. त्याआधी वाहन थांबवणे गरजेचे आहेच, कारण त्यामुळे पादचारीही योग्य पद्धतीने रस्ता ओलांडू शकतील.

  • सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत म्हणून मुंबईत आज या रेषांचे पालन गेल्या काही महिन्यांपासून अनेकजण करू लागले आहेत. सीसीटीव्हीमुळे अयोग्य पद्धतीने सिग्नलला उभ्या असणा-या वाहनांवर कारवाई होते, पोलीस नियंत्रण त्यावर आहे, त्यामुळे हे होत आहे. हा कदाचित काहींना समज तर काहींना गैरसमजही वाटू शकला तरी वस्तुस्थिती मात्र काही सुधार झाल्यासारखी आहे हे कमी नाही.

केरळ लव्ह-जिहाद प्रकरण : हादियाला पुन्हा स्वातंत्र्य मिळाले! 
  • केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणातील हादिया या महिलेने आपल्याला पतीसमवेत राहावयाचे असल्याचे आणि आपल्याला आपले स्वातंत्र्य परत हवे असल्याचे सोमवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. त्यानंतर न्यायालयाने तिच्याशी चर्चा करून पुढील शिक्षणासाठी तिची रवानगी तामिळनाडूतील सालेम येथील होमिओपथी महाविद्यालयात केली.

  • धर्मातर करून शफीन जहान या मुस्लीम पुरुषाशी विवाह केलेल्या अखिला (आता हादिया) या केरळस्थित हिंदू मुलीने आपल्याला पुन्हा आपले स्वातंत्र्य हवे असल्याचे सोमवारी प्रथमच सर्वोच्च न्यायालयात हजर राहून सांगितले.

  • जवळपास दोन तास सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान हादियाने आपल्याला पतीसमवेत राहावयाचे असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने हादियाला, राज्य सरकारच्या खर्चाने शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे का, असे विचारले, तेव्हा आपल्याला शिक्षण पूर्ण करावयाचे आहे, मात्र त्यासाठी लागणारा खर्च राज्य सरकारने करण्याची गरज नाही, आपला पती काळजी घेण्यास समर्थ असल्याचे सांगितले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८२१: पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९३८: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.

  • १९६०: मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.

  • १९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.

  • १९७५: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.

जन्म

  • १८५३: डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर१९४४)

  • १८५७: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५)

  • १८७२: गायक नट रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १९४३)

  • १९६४: भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी मायकल बेनेट यांचा जन्म.

मृत्य

  • १८९०: श्रेष्ठ समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल१८२७)

  • १९५४: नोबेल पारितोषिक विजेते इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९०१)

  • १९६३: इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे निधन. (जन्म: २५ मे १८९५)

  • १९६७: सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर१८८०)

  • १९६८: बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १८९७)

  • १९९९: अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक हनुमानप्रसाद मिश्रा यांचे निधन.

  • २००८: भारतीय सैनिक संदीप उन्नीकृष्णन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९७७)

  • २०१२: अमेरिकन लेखक झिग झॅगलर यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.