चालू घडामोडी - २९ जानेवारी २०१८

Date : 29 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास किंचितसा घटला, मात्र जगात आजही टॉप 3मध्ये भारत :
  • नवी दिल्ली - देशातील सरकारवर तेथील जनता सर्वाधिक विश्वास ठेवते, अशा देशांच्या यादीत भारत सलग दुस-या वर्षीही टॉप 3 मध्ये आहे.  दरम्यान, दावोसमध्ये जारी करण्यात आलेल्या 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'मध्ये भारताच्या या वर्षांची क्रमवारी आणि गुणांमध्ये वर्ष 2017 च्या तुलनेत किंचितशी घसरण झाली आहे. 

  • गेल्या वर्षी भारत क्रमवारीत अव्वल स्थानावर होता तर या वर्षी तिस-या स्थानावर आला आहे. जीएसटी आणि नोटाबंदीसारख्या आर्थिक सुधारणांदरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'च्या क्रमवारीमुळे भारत सरकारला आणखी उत्साहानं काम करण्याची प्रेरणा मिळेल.  'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'नुसार, पहिल्या स्थानावर चीन, दुस-या स्थानावर इंडोनेशिया आणि तिस-या क्रमांकावर भारत आहे. 

  • सरकारव्यतिरिक्त जनतेचं व्यापार वर्ग, एनजीओ आणि मीडियाकडेदेखील कसं पाहते, याचीदेखील दखल घेतली जाते, मात्र याबाबींमध्येही भारत ट्रस्ट झोनमध्ये येत असल्याचं अहवालात समोर आले आहे. 

  • जनतेचा सरकारवरील विश्वासासंबंधीच्या यादीत चीननं 74 अंकांसहीत उंच उडी घेत यादीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे, दरम्यान 2017मध्ये चीन 67 अंकांसहीत तिस-या क्रमांकावर होतो. तर वर्ष 2017मध्ये भारत 72 अंकांसहीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र यंदा 68 अंकांसहीत भारत तिस-या क्रमांकावर घसरला आहे.  

सर्वात तरुण अर्थमंत्री आणि त्यांचे अर्थसंकल्प :
  • मुंबई - स्वातंत्र्यानंतर अर्थमंत्रालयाची जबाबदारी सांभाळण्याची संधी विविध पक्षाच्या अनेक नेत्यांना मिळाली. मात्र त्यातही बहुतांश वेळेला काँग्रेस पक्षाच्या वाट्याला हे मंत्रालय आले आहे. प्रणव मुखर्जी यांना वयाच्या 46व्या वर्षी या मंत्रालयाची जबाबदारी मिळाली, ते सर्वात तरुण अर्थमंत्री म्हणून ओळखले जातात.

  • मूळचे पश्चिम बंगालचे असणारे प्रणव मुखर्जी 1979 साली राज्यसभेसाठी निवडले गेले. त्यानंतर अल्पावधीतच ते तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून काम करू लागले. 1982 ते 84 या कालावधीसाठी त्यांच्याकडे पहिल्यांदा अर्थमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. या अर्थमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळामध्येच मुखर्जी यांनी अर्थव्यवस्था सुधारणेसाठी महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यांच्याच कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जाचा शेवटचा भाग प्राप्त झाला.

  • 1984 साली युरोमनी मासिकाने जगातील त्यावर्षीचे सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणून नावाजले होते. अर्थमंत्रीपदाच्या त्यांच्या या पहिल्या कार्यकाळानंतर व्ही. पी. सिंग अर्थमंत्री झाले.

  • पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्याकडे नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद आले. 1991-96 या काळात डॉ. मनमोहन सिंग यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळामध्ये भारतातील लायसन्स राज संपुष्टात आले तसेच अनेक आर्थिक घडामोडी घडल्या. या महत्त्वाच्या कालावधीमध्ये मुखर्जी नियोजन आयोगाचे उपसभापती होते. त्यानंतर 2009 ते 2012 असे ते संपुआ सरकारच्या काळामध्ये ते अर्थमंत्री होते.

  • 2009, 2010, 2011 असे तीन अर्थसंकल्प त्यांना मांडता आले. त्यांनी करांमध्ये विशेष सुधारणा घडवून आणल्या. फ्रिंज बेनिफिट टॅर्स आणि कमोडिटिज ट्रँजॅक्शन टॅक्स रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी उपस्थित केलेल्या रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन (पूर्वलक्ष्यी करआकारणी) च्या मुद्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केली होती.(source :Lokmat)

जपानच्या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजवर सायबर हल्ला :
  • टोकियो :  सायबर हॅकर्सनी जपानमधील एक एक्सचेंज हॅक करुन, 58 अब्ज येन ( भारतीय चलनानुसार 34 अब्ज रुपये) किमतीच्या क्रिप्टोकरन्सीवर डल्ला मारला आहे. जपानी मीडियाने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

  • ‘कॉईनचेक एक्सचेंज’ने शुक्रवारी आपल्या वेबसाईटवर सांगितलं की, “ कंपनीने सध्या आपल्या NEM नावाच्या डिजिटल करन्सीची विक्री थांबवली आहे. शिवाय, इतरही क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवरही बंदी घालण्यात आली आहे”

  • शुक्रवारी रात्री आयोजित एका पत्रकार परिषदेत कॉईनचेक एक्सचेंजचे अध्यक्ष कोइचिरो वादा यांनी गुंतवणुकदारांची जाहीर माफी माफी मागितली. तसेच कंपनीने सध्या आर्थिक मदतीची मागणी केली असल्याचंही वादा यांनी स्पष्ट केलं.

  • कॉईनचेक एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रावारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आपल्या सिस्टिममध्ये व्हायरस डिटेक्ट झाला. हा सायबर हल्ला 2014 मधील जपानच्या सर्वात मोठ्या बिटकाईन एक्सचेंज Mt.Gox वरील हल्ल्यापेक्षाही मोठा होता.

  • त्यावेळी सायबर हल्ल्यातून 48 अब्ज येन इतकी रक्कम हल्लेखोरांनी लांबवली होती.(source :abpmajha)

यंदा ‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीत दिल्लीच नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ठरविली नावे :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असले आणि नवी दिल्लीतून राज्यकारभार हाकत असले, तरी ते स्वत:ला देशाच्या राजधानीत उपरे समजत असावेत की काय, अशी शंका ‘पद्म’ पुरस्कारांच्या नावांतून येत आहे. नवी दिल्लीतील एकाही मान्यवराला यंदा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झालेला नाही. असे ६४ वर्षांत प्रथमच घडले आहे. केवळ दिल्लीच नव्हे, तर एकूण १२ केंद्रशासित प्रदेश व राज्यांतील एकाही व्यक्तीचे नाव यंदाच्या ‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीत नाही.

  • दक्षिण, पश्चिम व पूर्व भारतातील अनेक मान्यवरांची नावे या वर्षीच्या ८५ ‘पद्म’ पुरस्कारांच्या यादीमध्ये आहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की, ज्यातील तब्बल १0 जणांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्या खालोखाल ज्या राज्यात यंदा निवडणूक आहे, त्या कर्नाटकातील ८ जण यंदा या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

  • ज्या तामिळनाडूमध्ये भाजपा पाय रोवू इच्छित आहे, तेथील ६ जण आणि केरळमधील ४ जण या यादीत आहेत. पश्चिम बंगालमधील ५ आणि ओडिशामधील चार जणांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

  • बिहार व झारखंडमधील प्रत्येकी तिघे या वर्षी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, या वर्षी तब्बल १६ परदेशी व्यक्तींना हे पुरस्कार देण्याचे जाहीर झाले आहेत. त्यापैकी १0 जण तर आशिअन देशांतील आहेत. या देशांच्या प्रमुखांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

  • अमेरिका व रशियातील प्रत्येकी एका व्यक्तीची ‘पद्मभूषण’ पुरस्कारासाठी या वर्षी निवड करण्यात आली आहे. याखेरीज नेपाळ, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान व व्हिएतनाममधील प्रत्येकी एक जण ‘पद्म’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.(source :Lokmat)

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला :
  • मुंबई - स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून आर. के. षण्मुखम चेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मद्रासमध्ये पेशाने वकील आणि उद्योजक असणाऱ्या चेट्टी यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात विविध पदे भूषविली. 

  • 1920 ते 1922 या काळामध्ये चेट्टी मद्रास लेजिस्लेटिव्ह कौन्सीलमध्ये कार्यरत होते, त्यानंतर त्यांनी स्वराज पक्षामध्ये प्रवेश केला आणि 1924 साली केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे सदस्य म्हणून निवडून गेले.  ओटावा येथे 1932 साली झालेल्या इम्पेरियल अर्थपरिषदेमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 1932 मध्ये ते केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे उपसभापती आणि नंतर सभापती झाले. त्यानंतर 1935मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

  • 1935 ते 1941 अशा सहा वर्षांच्या काळामध्ये ते कोचीन संस्थाचे दिवाण होते. कोचीन बंदराचा विकास करण्यासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या होत्या. 1938 साली जीनिव्हामध्ये लिग ऑफ नेशन्ससाठी भारताचे प्रतिनिधी म्हणूनही चेट्टी गेले होते. त्यानंतर ते अल्पकाळासाठी भोपाळच्या नवाबाचे घटनात्मक विषयांचे सल्लागार झाले. 

  • स्वतंत्र भारताचे ते पहिले अर्थमंत्री म्हणून नेमले गेले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्यांना मिळाली. या अर्थसंकल्पात 171.15 कोटी रुपये महसूलाची नोंद आणि 25.59 कोटी रुपयांची वित्तीय तूट नोंदवली होती. अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द केवळ साडेसात महिन्यांची होती. त्यानंतर त्यांच्या जागी जॉन मथाई यांची नियुक्ती करण्यात आली. 5 मे 1953 रोजी षण्मुखम चेट्टी यांचे हृदयविकाराने निधन झाले.(source :Lokmat)

अखेर झुंज अपयशी, धर्मा पाटील यांचं निधन :
  • मुंबई : मंत्रालयात विष प्राशन केलेले 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली आहे. पाटील यांनी जेजे रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

  • संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तीन वेळा धर्मा पाटील यांचं डायलिसीस करण्यात आलं होतं.

  • धर्मा पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले होते, मात्र ते अपयशी ठरले.धर्मा पाटलांच्या मुलाने अवयवदानाचा अर्ज भरला होता. त्यानुसार निकामी न झालेले अवयव दान करण्यात येतील.

  • जमिनीचा योग्य मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद भूमिपुत्र शेतकरीचा दर्जा देण्याचं आश्वासन सरकार लेखी स्वरुपात देणार नाही, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी घेतली आहे.(source :abpmajha)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले.

  • १८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.

  • १८८६: कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.

  • १९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.

  • १९८९: हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

जन्म

  • १५९७: मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचे निधन. (जन्म: ९ मे १५४०)

  • १९३४: नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर१८६८ – वॉर्क्लॉ, पोलंड)

  • १९६३: लेखक व संपादक सदाशिव आत्माराम जोगळेकर यांचे निधन.

  • १९६३: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १८७४)

  • १९९५: रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक रुपेश कुमार यांचे निधन.

  • २०००: बासरीवादक देवेन्द्र मुर्डेश्वर यांचे निधन.

  • २०००: शिवसेना नेते पांडुरंग सावळाराम तथा काका वडके यांचे निधन.

  • २००१: महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राम मेघे यांचे निधन.

मृत्यु

  • १७३७: अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून१८०९)

  • १८४३: अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅक किनले यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९०१)

  • १८६०: रशियन कथाकार व नाटककार अंतॉन चेकॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १९०४)

  • १८६६: साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमेन रोलँड यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर १९४४)

  • १९२२: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००३)

  • १९२६: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचा जन्म. (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९९६ – ऑक्सफर्ड, इंग्लंड)

  • १९३६: भारतीय कवी आणि गीतकार वसुरी सुंदरमूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे २०१०)

  • १९७०: ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड यांचा जन्म.

  • १९८१: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री आणि गायक रचना खाताऊ यांचा जन्म.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.