चालू घडामोडी - २९ जुलै २०१७

Date : 29 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘मेक इन इंडिया’ला धक्का, ‘आकाश’ प्राथमिक चाचणीत अपयशी :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या मोहिमेसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे असं मानलं जातंय असून कॅगनं दिलेल्या अहवालात आकाश क्षेपणास्त्राचं अपयश नमूद करण्यात आलं आहे.

  • जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र म्हणून आकाश या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली, मात्र हे क्षेपणास्त्र एक तृतीयांश प्राथमिक चाचण्यांमध्ये नापास झालंय अर्थात अपयशी ठरलं आहे.

  • भारताला जर युद्धाला सामोरं जावं लागलं आणि त्यात क्षेपणास्त्रांची कमतरता भासली तर मोठी जोखीम ओढवू शकते असंही कॅगनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे.

  • ३६०० कोटी रूपये खर्च करून ही क्षेपणास्त्र तयार करण्यात आली असून ‘आकाश’ ची निर्मिती करणाऱ्या एजन्सीला ३६०० कोटी रूपये देण्यात आले मात्र सहा अंकित स्थळांवर एकही आकाश पोहचू शकलं नाही.

  • तसंच आकाश क्षेपणास्त्राप्रमाणेच आकाश एमके २ या मध्यम क्षेपणास्त्राचीही निर्मिती जमिनीवरून हवेत १८ ते ३० किलोमीटर दूर पोहचण्यासाठी करण्यात आली होती.

विश्व क्रमवारीत एच.एस. प्रणय १७ व्या स्थानी :
  • एू स ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटनचा चॅम्पियन भारतीय स्टार एच.एस. प्रणय हा विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या ताज्या रँकिंगमध्ये १७ व्या स्थानावर पोहोचला आहे.

  • विश्व चॅम्पियनशिपची पात्रता गाठणारा चौथा भारतीय समीर वर्मा यालादेखील चार स्थानांचा लाभ झाला असून तो २८ व्या स्थानावर पोहोचला.

  • किदाम्बी श्रीकांत हा भारतीयांमध्ये अव्वल स्थानावर असून, विश्व रँकिंगमध्ये आठव्या स्थानावर आहे.

  • अजय जयराम १६ व्या आणि बी साईप्रणीत १९ स्थानावर आला. महिलांमध्ये पी.व्ही. सिंधू पाचव्या स्थानावर कायम असून, सायना नेहवालची एका स्थानाने घसरण झाल्याने ती १६ स्थानावर आली.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे मोदींना पत्र : ‘बंगळुरु मेट्रो’त हिंदी नकोच
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले असून कर्नाटकमधील मेट्रोच्या फलकांवर हिंदी भाषेचा वापर नको अशी मागणी त्यांनी मोदींकडे केली आहे.

  • बंगळुरुमधील मेट्रो प्रकल्पांमधील फलकांवर कोणत्या भाषेचा वापर करावा यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी बंगळुरु मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

  • बंगळुरु मेट्रो रेलने याबाबत विविध शहरांमधील मेट्रोचा अभ्यास करुन बुधवारी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला होता. यासाठी कोची आणि चेन्नईमधील मेट्रो स्थानकांची पाहणी करण्यात आली होती. 

  • मल्याळम, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांचा फलकांवर वापर करण्यात आला होता, मेट्रोच्या आतमध्ये, प्लॅटफॉर्म, मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार आणि सूचना फलकावर या तिन्ही भाषेचा वापर करण्यात आला आहे.

  • दिल्लीमध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आला आहे.

विजयदुर्ग किल्ला होणार आंतरराष्ट्रीय बंदर : रामेश्‍वर आणि गिर्ये 
  • गोवा आणि मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बंदरांची वाहतूक क्षमता संपली असल्याने पुढील काळात विजयदुर्ग बंदरातून वाहतूक सुरू होईल. त्यासाठी वैभववाडी-विजयदुर्ग रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे.

  • विजयदुर्ग बंदर विकासासाठी दीड हजार कोटींचा खर्च येईल, तर दहा हजार थेट रोजगार संधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिली.

  • विजयदुर्गसह रामेश्‍वर आणि गिर्ये येथील किनारपट्टीवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्‍तपणे आंतरराष्ट्रीय बंदर विकसित होणार आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं : नवाज शरीफ
  • पनामागेट प्रकरणात अडकलेल्या नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहेत तसंच अर्थमंत्री इशाक दार यांनाही पदावरुन हटवलं आहे.

  • पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप असून मागील वर्षी पनामा पेपर लीकमुळे याचा खुलासा झाला होता.

  • संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) नवाज शरीफ प्रकरणाचा तपास केला होता. जेआयटीच्या अहवलात शरीफ आणि कुटुंबीयांवरील आरोप योग्य असल्याचं सिद्ध झालं होतं.

  • सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी ११:३० वाजता खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आणि दुपारी १२.३० च्या सुमारास न्यायालायने निकाल दिला.

अब्दुल कलाम स्मारकाचे उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते
  • अब्दुल कलाम यांचा २७ जुलै हा दुसरा स्मृतीदिन असून त्या निमित्ताने रामेश्वरम येथे त्यांच्या जन्मस्थानी या स्मारकाचे उद्घाटन करण्यात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

  • तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) हे स्मारक उभारले आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरम येथे ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी अब्दुल कलाम यांच्या एका पुतळ्याचे अनावरण केले, आणि आदरांजली वाहिली.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'कलाम संदेश वाहिनी' बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या बसमध्ये प्रदर्शन भरवण्यात आले असून देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून ही बस प्रवास करणार आहे.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • जागतिक व्याघ्र दिन

जन्म, वाढदिवस

  • संजय दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता : २९ जुलै १९५९

  • जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती : २९ जुलै १९०४

  • बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक : २९ जुलै १९२२

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • इश्मीत सिंग सोधी, भारतीय पार्श्वगायक : २९ जुलै २००८

ठळक घटना

  • रोममध्ये प्रेटोरियन रक्षकांनी पुपियेनस आणि बाल्बिनस या दोन रोमन सम्राटांना त्यांच्या महालातून खेचून नेले. रस्त्यातून धिंड काढल्यावर त्यांचा वध केला गेला आणि १३ वर्षांच्या गॉर्डियन तिसर्‍याला सम्राटपदी बसवले गेले : २९ जुलै २३८

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.