चालू घडामोडी - २९ मार्च २०१८

Date : 29 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
तब्बल ६ वर्षांनंतर मलाला युसूफझाई मायदेशी :
  • इस्लामाबाद - नोबेल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई तब्बल 6 वर्षांनी पाकिस्तानात परतली आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी मलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यानंतर प्रथमच मलाला पाकिस्तानात आली आहे. पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दुबईमार्गे पाकिस्तानात दाखल झाली आहे. सहा वर्षांपूर्वी 2012मध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी मलालावर हल्ला केला होता. हल्ल्यात तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यानंतर तिनं पाकिस्तान सोडले होते व पाकिस्तान सोडून ती इंग्लंडमध्ये वास्तव्यास गेली.

  • पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी (29 मार्च) पहाटेच्या सुमारास बेनजीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळावर मलाला दाखल झाली. यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्था मलाला हिला एका हॉटेलमध्ये आणणण्यात आले. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मलाला मायदेशी परतली आहे.  यादरम्यान ती पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी, लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा, यांच्यासह विविध मान्यवरांची भेट घेणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मलाला पाकिस्तानात येणार असल्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली होती.(source :Lokmat)

काळवीट शिकार प्रकरणी सलमानचा फैसला ५ एप्रिलला :
  • जोधपूर : बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या भवितव्याचा फैसला पुढच्या गुरुवारी होणार आहे. वर्षानुवर्ष कोर्टात सुरु असलेल्या या केसचा निकाल 5 एप्रिल रोजी लागणार आहे. मुख्य न्याय दंडाधिकारी देवकुमार खत्री निकाल देणार आहेत.

  • राजस्थानातील जोधपूरमधल्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानशिवाय अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलमही आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. सलमानने शिकार केली असून इतर कलाकारांनी त्याला प्रोत्साहन दिल्याचा दावा साक्षीदारांनी केला आहे.

  • वीस वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाचं चित्रीकरण जोधपूरमध्ये सुरु होतं. त्यावेळी सलमानने घोडा फार्म हाऊस आणि भवाद गावात 27-28 डिसेंबरच्या रात्री हरणांची, तर कांकाणी गावात 1 ऑक्टोबरला काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.

  • सलमानविरोधात 1998 मध्ये चार केस दाखल करण्यात आल्या. तीन प्रकरणं हरणाऱ्या शिकारीची असून चौथं प्रकरण आर्म्स अॅक्टचं आहे. सलमानला अटक करताना त्याच्या खोलीतून पोलिसांनी पिस्तुल आणि रायफल हस्तगत केली होती. दोन्ही शस्त्रांच्या परवान्याचा कालावधी संपला होता.(source :abpmajha)

राज्यात ७२ हजार जणांना रोजगार, मुख्यमंत्र्यांची घोषणा :
  • मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील तरुणांना खुशखबर दिली आहे. राज्यात तब्बल 72 हजार जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

  • येत्या दोन वर्षात राज्य सरकारकडून रिक्तं पदांची भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे 2019 पर्यंत 72 हजार जणांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

  • दोन टप्प्यांमध्ये 72 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. निम्मी पदं पहिल्या टप्प्यात भरली जातील, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पदं भरली जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.(source :abpmajha)

भारतात शिकली चहा बनवायला, अमेरिकेत जाऊन बनविली २०० कोटींची संपत्ती :
  • मुंबई- भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला चहा पिण्याची आवड आहे. रस्त्याच्या बाजूला, कॉलेजच्या समोर, ऑफिसच्या बाहेर जवळपास सगळ्यात ठिकाणी चहाचे स्टॉल्स पाहायला मिळतात. भारतात चहा विकून लाखो रुपयांची संपत्ती काहींनी कमावल्याची उदाहरणही आपण ऐकली आहेत. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का, की एक परदेशी महिला चहा विकून करोडपती झाल्याचं? तुम्ही जे वाचलं ते अगदी खरं आहे.

  • अमेरिकेत हा प्रकार घडला आहे. अमेरिकेत राहणारी महिला ब्रुर इडी हिने तिथे चहा विकून तब्बल 200 करोडची संपत्ती बनविली आहे. 

  • चहा बनविण्याची आयडिया ब्रुक इडीला भारतातून मिळाली. 2002 साली ती भारतात आली होती. त्यावेळी तिथे उत्तर भारतातील अनेक गावांना भेटी दिल्या. तिथल्या आलं घातलेल्या चहाची चव तिनं चाखली. तेव्हापासून चहाच्या ती प्रेमात पडली.

  • खेड्यात प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या प्रत्येक चहाची चव वेगळी असते हे तिच्या लक्षात आलं. भारतातील चहाच्या प्रेमात पडलेल्या ब्रुकने कोलोरॅडोमध्ये जाऊन चहाचा स्टार्टअप सुरू केला. 2007 मध्ये तिने 'भक्ती चाय' या नावाने ब्रुकने स्टार्टअप सुरू केला. (source :Lokmat)

आता उत्तर प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात 'रामजी'ही वापरायचाच शासनादेश :
  • लखनौ - डॉ.भीमराव अंबेडकर नाही तर 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' असेे पूर्ण नाव वापरलेच पाहिजे, असा शासनादेश उत्तर प्रदेश सरकारने जारी केला आहे. खरेतर बाबासाहेबांचे आडनाव 'अंबेडकर' असे चुकीचे वापरले जात असल्याने ते 'अांबेडकर' असे योग्य वापरण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र शासनादेश निघताना त्यात वडिलांचे नाव 'रामजी' हेही वापरलेच पाहिजे अशी भर पडली आहे.

  • उत्तर प्रदेशात 'डॉ.आंबेडकर' ऐवजी सर्रास 'डॉ.अंबेडकर' असेे वापरले जात असल्याने राज्यपाल राम नाईक यांनी 'डॉ.आंबेडकर' असा योग्य उल्लेख होण्यासाठी मोहीम राबवली. 2017पासून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर महासभा या संघटनेच्या डॉ. लालजी प्रसाद निर्मल यांच्याशी पत्रव्यवहार केला. इंग्रजीत योग्य स्पेलिंग लिहिले जात असते मात्र हिंदीत लिहिताना एक काना न वापरता ते फक्त 'अंबेडकर 'होत असल्याने ते दुरुस्त होण्यासाठी राज्यपाल नाईक यांनी विशेष प्रयत्न केले.

  • बुधवारी उत्तर प्रदेश सरकारने सर्व सरकारी कार्यालय, न्यायालयांमध्ये यापुढे डॉ.भीमराव अंबेडकर ऐवजी 'डॉ.भीमराव रामजी आंबेडकर' असे पूर्ण नाव वापरण्याचा शासनादेश जारी केेेेला आहे.

  • बाबासाहेबांचे आडनाव चुकीचे वापरले जाऊ नये यासाठी शासनादेश जारी झाला, मात्र मध्ये 'रामजी' हे बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव वापरायचेच अशीही अतिरिक्त भर पडली आहे. त्यासाठी संविधानाच्या मूळ प्रतीतील बाबासाहेेेबांंच्या स्वाक्षरीचा दाखला देण्यात आला आहे. तेथेे बाबासाहेबांची 'भीमराव रामजी आंंबेडकर' अशी स्वाक्षरी आहे.(source :Lokmat)

पाकिस्तानमधील 500 हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर :
  • पाकिस्तान : पाकिस्तानमधील सिंध प्रांतात असलेल्या मातली जिल्ह्यातील जवळपास 500 हिंदूंचे जबरदस्तीने  मुस्लिमांमध्ये धर्मांतर केले आहे. गेल्या 25 मार्चला पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग या पार्टीच्या पदाधिका-यांनी हिंदूंचे धर्मांतर जबरदस्तीने करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

  • एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगच्या पदाधिका-यांनी मातली जिल्ह्यातील जवळपास 50 कुटुंबीयांतील 500 लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करायला भाग पाडले. धर्मांतर करण्यात आलेल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त भारतात स्थानिक होण्यासाठी आले लोक होते. मात्र, त्यांना लॉन्ग टर्म व्हिसा मिळाला नव्हता, त्यामुळे ते पुन्हा पाकिस्तान गेले होते. 

  • गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानमधील हिंदूंची स्थिती अत्यंत वाईट असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्याचबरोबर, येथील हिंदूंची अस्तित्वासाठी धर्म बदलावा लागणे, ही त्यांची लाचारी बनली आहे. धर्म बदलणारांना अनेक संघटना राहण्यायोग्य घर, सामान, काम करण्यासाठी शिवणयंत्रासारखी साधने, शेतीसाठी वर्षभर पाण्याचे आमिष दाखवतात.(source :lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८४९: ब्रिटिश साम्राज्याने पंजाब ताब्यात घेतले.

  • १८५७: बेंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या ३४ व्या तुकडीतील शिपाई मंगल पांडे याने इस्ट इंडिया कंपनीतील ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या.

  • १९३०: प्रभात चा खूनी खंजिर हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

  • १९६८: महात्मा फुले कृषी विद्यापीठाची (MPKV) राहुरी येथे स्थापना.

  • १९७३: व्हिएतनाम युद्ध – व्हिएतनाममधुन शेवटचा अमेरिकन सैनिक बाहेर पडला.

  • १९८२: एन. टी. रामाराव यांनी तेलगू देसम पक्षाची स्थापना केली.

  • २०१४: इंग्लंड आणि वेल्स मध्ये प्रथम समलिंगी विवाह झाले.

जन्म

  • १८६९: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९४४)

  • १९१८: वॉलमार्ट चे निर्माते सॅम वॉल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९२)

  • १९२६: अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण तथा बाळ गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च२०१०)

  • १९२९: रंगभूमी आणि चित्रपट कलाकार उत्पल दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९३)

  • १९३०: मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म.

  • १९४३: इंग्लंडचे पंतप्रधान जॉन मेजर यांचा जन्म.

  • १९४८: साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म.

मृत्यू

  • १५५२: शिखांचे दुसरे गुरू गुरू अंगद देव यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५०४)

  • १९६४: इतिहाससंशोधक शंकर नारायण तथा वत्स जोशी यांचे निधन.

  • १९७१: बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८६)

  • १९९७: सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.