चालू घडामोडी - २९ नोव्हेंबर २०१७

Date : 29 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
प्रदीप सिंह खरोला एअर इंडियाचे सीएमडी :
  • वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी (सीएमडी) निवड करण्यात आली आहे. खरोला हे कर्नाटक कॅडरचे असून सध्या ते बेंगळुरुतील मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होते.

  • रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढल्यानंतर ऑगस्टमध्ये एअर इंडियाचे सीएमडी अश्वनी लोहानी यांची रेल्वे मंडळाच्या प्रमुखपदी निवड झाली होती. यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राजीव बन्सल यांची तीन महिन्यांसाठी एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली होती.

  • बन्सल यांचा कार्यकाळ संपत आला होता. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी सरकारने कर्नाटक कॅडरच्या प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली.

  • एअर इंडियांवर सुमारे ५० हजार कोटींचे कर्ज असून एअर इंडियाचे खासगीकरण करण्याच्या दिशेने सरकारच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे खरोला यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. (source :loksatta)

‘१२० बीपीएम’ चित्रपटाला सुवर्णमयूर :
  • पणजी : इफ्फी महोत्सवात फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या ‘१२0 बीट्स पर मिनिट’ या चित्रपटाने सुवर्णमयूर पुरस्कार पटकावला. कॅ नडाचे दिग्दर्शक अ‍ॅटोम इगोयान यांना जीवनगौरव तर बॉलिवूडचे सुपरस्टार बीग बी अमिताभ बच्चन यांना ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी आॅफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • चीनचे दिग्दर्शक विवियान क्यू यांना उत्कृष्ट दिग्दर्शक, नाह्युएल पिरीझ बिस्कार्यात यांना उत्कृष्ट अभिनेता, तर मल्याळम अभिनेत्री पार्वथी टी. के. हिला उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला. अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार आदी बॉलिवूड अभिनेत्यांनी समारोपास उपस्थिती लावली होती.

  • दोनापॉल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या दिमाखदार सोहळ््यास कें द्रीय माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते. सुवर्णमयूर पुरस्काराची रोख ४0 लाख रुपयांची रक्कम निर्माता आणि दिग्दर्शक यांना विभागून देण्यात आली. सुवर्णमयूर स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

  • उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी रुपेरी मयूर स्मृतिचिन्ह आणि १५ लाख रुपये रोख देण्यात आले. उत्कृष्ट अभिनेते आणि अभिनेत्रीसाठी रुपेरी मयूर स्मृतिचिन्ह आणि रोख १0 लाख रुपये देण्यात आले.(source :lokmat)

दहा आयएएस अधिका-यांची बदली :
  • मुंबई : राज्य शासनाने आज दहा आयएएस अधिकाºयांची बदली केली. अतिरिक्त मुख्य सचिव (लेखा व कोषागरे) वंदना कृष्णा यांची बदली याच विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (सुधारणा) म्हणून करण्यात आली.

  • माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची बदली वित्त विभागात (लेखा व कोषागरे) करण्यात आली. वित्त विभागातील प्रधान सचिव (सुधारणा) आर.ए. राजीव यांना याच विभागात प्रधान सचिव (व्यय) या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.

  • धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ओएसडी एस.व्ही.आर. श्रीनिवास हे माहिती तंत्रज्ञान विभागाचे नवे प्रधान सचिव असतील. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलतराव देसाई यांची बदली मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन सेलच्या संचालकपदी करण्यात आली आहे.

  • आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी आतापर्यंत सांभाळत असलेले आर.डी. निवतकर हे मुख्य सचिव कार्यालयाचे नवे सहसचिव असतील. मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव असलेले एस.डी. मांढरे हे पुणे जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.जी. गुरसाल यांची नागपूर येथे मनरेगा मुख्यालयात आयुक्तपदी करण्यात आली आहे.(source :loksatta)

उत्तर कोरियाने जपानच्या दिशेनं डागले क्षेपणास्त्र :
  • नवी दिल्ली -  अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरहीउत्तर कोरियाकडून पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. उत्तर कोरियाने मंगळवारी (28 नोव्हेंबर) मध्यरात्री (स्थानिक वेळेनुसार) जपान समुद्राच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचे दक्षिण कोरियाने सांगितले  आहे.

  • अमेरिकन सरकारमधील सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे क्षेपणास्त्र जपानवरुन किती दूर अंतरावर गेले हे मात्र समजू शकले नाही. किम जोंग उनच्या मनमानी कारभारामुळे अनेक देश चिंतेत आहेत. दरम्यान या संदर्भात जपानच्या पंतप्रधानांनी तातडीने कॅबिनेटची बैठक बोलाविली आहे. 

  • दक्षिण कोरियानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण प्योंगान प्रांतातील प्यांगयांगपासून पूर्वेच्या दिशेनं क्षेपणास्त्र डागण्यात आले. अमेरिकी सैन्यानंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

  • उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणी ही संपूर्ण जगासाठी धोकादायक असल्याचे अमेरिकेच्या संरक्षणमंत्री जेम्स मेटिस यांनी सांगितले आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. (source :lokmat)

मुकेश अंबानींच्या घरासाठी केलेली जमीनविक्री बेकायदा, लबाडीचा व्यवहार, वक्फ मंडळाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र :
  • मुंबई : रिलायन्स उद्योगसमुहाचे मालक मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेली मुंबईतील नेपीयन सी रोडवरील ‘अ‍ॅन्टिलिया’ इमारतीचा जमीनविक्री व्यवहार पूर्णपणे बेकायदा असल्याची स्पष्ट भूमिका महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने मुंबई उच्च न्यायालयात घेतली असून ही जमीन पुन्हा पूर्वीच्या मालकाकडे परत केली जावी, असे प्रतिपादन केले आहे.

  • अंबानींनी घेण्याआधी ही जमीन खोजा समाजातील गरीब आणि अनाथ मुलांसाठी चालविल्या जाणाºया करीमभॉय खोजा अनाथालयाची होती. वक्फ कायद्यानुसार ही औकाफ मालमत्ता होती. अनाथालयाने ही जमीन अंबानींना विकण्याच्या व्यवहारास धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली होती.

  • या परवानगीला आव्हान देणारी अब्दुल मतीन अब्दुल रशीद यांनी केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयात गेली १० वर्षे प्रलंबित आहे. मुख्य न्यायाधीश न्या. मंजुळा चेल्लुर यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने या जमीन व्यवहाराविषयी नेमकी भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश वक्फ मंडळास २१ जुलै रोजी दिले होते.

  • त्यानुसार वक्फ मंडळाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणारे अल्पसंख्य व्यवहार विभागाचे सहसचिव संदेश तडवी यांनी प्रतिज्ञापत्र करून वरीलप्रमाणे भूमिका न्यायालयापुढे मांडली आहे.(source :lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८७७: थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.

  • १९४५: युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.

  • १९६३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेमली.

  • १९७२: अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला.

  • १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.

  • २०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.

  • २०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

जन्म

  • १८०३: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ क्रिस्चीयन डॉपलर यांचा जन्म.

  • १८६९: समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी१९५१)

  • १८७४: नोबेल पारितोषिक विजेते सेरेब्रल एँजिओग्राफी तंत्राचे निर्माते अंतोनियो मोनिझ यांचा जन्म.

  • १९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून २०००)

  • १९०८: तमिळ चित्रपट अभिनेता एन. एस. क्रिश्नन यांचा जन्म.

  • १९१९: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक जोई वीडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१३)

  • १९२०: स्पॅनडेक्सचे निर्माते जोसेफ शेव्हर्स यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २०१४)

  • १९२६: लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९६)

  • १९६३: भारतीय उद्योगपती ललित मोदी यांचा जन्म.

मृत्य

  • १९२६: ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे निधन.

  • १९३९: मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८९४)

  • १९५०: महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे यांचे निधन.

  • १९५९: मराठी इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे निधन. (जन्म: १७ मे १८६५)

  • १९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (जन्म: २९ जुलै १९०४)

  • २००१: बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १९४३)

  • २०११: आसामी साहित्यिक व कवियत्री इंदिरा गोस्वामी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.