चालू घडामोडी - २९ ऑक्टोबर २०१७

Date : 29 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आॅस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान पदावर राहण्यास अपात्र :
  • कॅनबेरा : आॅस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान बार्नबी जॉयस यांच्यासह संसदेच्या चार सदस्यांना उच्च न्यायालयाने दुहेरी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून अपात्र ठरविल्याने अवघ्या एका मताचे बहुमत असलेले माल्कम टर्नबुल यांचे आघाडी सरकार सत्तेवरून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • आॅस्ट्रेलियाच्या राज्यघटनेनुसार गेली ११६ वर्षे दुहेरी नागरिकत्व असलेली व्यक्ती संसदेची सदस्य राहण्यास अपात्र आहे.

  • उपपंतप्रधान जॉयस यांनी त्यांना वडिलांकडून जन्माने मिळालेल्या न्यू झीलंडच्या नागरिकत्वाचा त्याग न करता संसदेची निवडणूक लढविली होती.

  • आता त्यांनी ते नागरिकत्व सोडून दिले असल्याने ते त्याच मतदारसंघातून पुन्हा संसदेची निवडणूक लढवू शकतात. मात्र त्यांना पराभूत करून विरोधी मजूर पक्ष टर्नबूल यांचे सरकार त्याआधारे सत्तेवरून खाली खेचू शकेल.

सुवर्णपदक मिळवूनही इस्रायली राष्ट्रगीत वाजवलेच नाही :
  • अबुधाबी- खेळ म्हटलं की तिथे वंश, धर्म, भाषा, देश असे कोणतेही भेद करणे अपेक्षित नसतं. पण अबुधाबीने मात्र इस्रायली खेळाडू जिंकल्यावर त्याच्या देशाचे राष्ट्रगीत वाजवण्यास नकार दिला, तसेच इस्रायलचा राष्ट्रध्वजही फडकावला गेला नाही. 

  • ताल फ्लिकर हा इस्रायली खेळाडू मध्यम वजनी गटामध्ये ज्युडो खेळात सुवर्णपदक जिंकल्यावर विजेत्या खेळाडूच्या जागेवर जाऊन उभा राहिला.

  • त्याच्या सन्मानार्थ 'हकित्वा' हे इस्रायलचे पारंपरिक राष्ट्रगीत वाजवण्याऐवजी इंटरनँशनल ज्युडो फेडरेशनचे गीत वाजवले गेले, आणि इस्रायलच्या झेंड्यांऐवजी फेडरेशनचा लोगो फडकावण्यात आला.

स्वच्छ भारत अभियानात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची- नरेंद्र मोदी :
  • नवी दिल्ली- देशाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आलं. या अभियानात प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

  • भाजपाकडून शनिवारी दिल्लीमध्ये ‘दीपावली मंगल मिलन’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते.  

गोव्यातील खगोलशास्त्रज्ञाने लावला कृष्णविवराचा शोध!, नासाची मान्यता :
  • पणजी : नासाच्या (एनएएसए) अवकाशातील हबल दुर्बिणीच्या (हबल स्पेस टेलेस्कोपच्या) साहाय्याने गोव्याचे पुत्र अािण खगोलशास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी यांनी सर्वात दूरवरील कृष्णविवराचा (ब्लॅक होलचा) शोध लावला आहे.

  • हे कृष्णविवर पृथ्वीपासून १३ दशकोटी प्रकाशवर्षे एवढ्या अंतरावर आहे कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यातून कोणतीही गोष्ट बाहेर पडू शकत नाही. अगदी प्रकाशसुद्धा त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचला जातो.

  • त्यामुळेच त्यांचा शोध लावणे कठीण असते. पण आधुनिक तंत्राचा वापर करून आपण कृष्णविवरांचा शोध घेऊ शकतो, असे डॉ. तिळवी यांनी सांगितले.

  • अनेक तारामंडळांच्या मध्यभागी कृष्णविवरे असतात; आकाशगंगेच्या मध्यभागीही कृष्णविवर आहे, असेही ते म्हणाले. या शोधाची माहिती आंतरराष्टÑीय जर्नल ‘अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लॅटर्स’मध्ये प्रकाशित झाली आहे.

  • २०१३ मध्ये डॉ. तिळवी यांच्या संशोधन पथकाने ब्रह्मांडात सर्वात दूरवर असलेल्या तारामंडळाचा शोध लावला होता. 

‘स्वतंत्र’ कॅटलोनियावर स्पेनचे नियंत्रण, फुटीरवादी सरकार केले बरखास्त :
  • बार्सिलोना : कॅटलोनिया स्वतंत्र झाल्याची घोषणा तेथील नेत्यांनी करताच, स्पेनने त्या संपूर्ण भागावर सरळ नियंत्रण मिळविले असून, फुटीरवादी सरकारला बरखास्त केले आहे.

  • कॅटलोनियाच्या फुटीरवादी संसद सदस्यांनी दोनच दिवसांपूर्वी स्वातंत्र्याची घोषणा मंजूर केली होती. त्यानंतर स्पेन सरकारने हे पाऊल उचलले आहे.

  • पंतप्रधान मारियानो राजोय यांनी संसद बरखास्त करताना २१ डिसेंबर रोजी नव्या निवडणुकांचे आवाहन केले आहे. कॅटलोनियाचे राष्ट्रपती कार्ल्स पुइग्डेमोंट यांच्या जागेवर आता पूर्वोत्तर भागात राजोय हे प्रमुख निर्णय घेणारे नेते बनले आहेत.

  • पुइग्डेमोंट आणि कॅटलोनिया कॅबिनेटच्या १२ सदस्यांना आता वेतन देण्यात येणार नाही. त्यांनी निर्देशांचे पालन करण्यास नकार दिल्यास, त्यांच्यावर दुसºयांचे अधिकार बळकाविण्याचा आरोप लावला जाईल.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक स्ट्रोक दिन

महत्त्वाच्या घटना

  • १८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना.

  • १९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीचे पंतप्रधान बनले.

  • १९५८: महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान.

  • १९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.

  • १९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.

  • १९९४: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा होमी भाभा पुरस्कार डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर.

  • १९९६: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड.

  • १९९७: माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकर‍त्‍न पुरस्कार‘ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर.

  • १९९७: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर.

  • २००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.

  • २०१५: चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.

जन्म दिवस

  • १८९७: जर्मनीचे चॅन्सेलर व नाझी नेते जोसेफ गोबेल्स यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९४५)

  • १९३१: साहित्यिक व पटकथालेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०००)

  • १९७१: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांचा जन्म.

  • १९८५: भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म.

मृत्य दिन

  • १९११: हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८४७)

  • १९३३: फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ पॉल पेनलीव्ह यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर१८६३)

  • १९७८: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १८९५)

  • १९८८: मॅगसेसे पुरस्कार विजेत्या स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९०३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.