चालू घडामोडी - २९ सप्टेंबर २०१७

Date : 29 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केंद्र आणि राज्य सरकार लवकरच २० लाख लोकांना सरकार देणार रोजगार :
  • केंद्र आणि राज्य सरकार लवकरच शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील तब्बल २० लाख रिक्त पदे भरणार असून त्यातील २ लाखांहून अधिक पदे रेल्वेतील आहेत ती भरण्याची घोषणा आधीच झाली आहे.

  • देशात वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नावरून विरोधकांनी टीका सुरू केल्यामुळे मोदी सरकारने जोरात हालचाली सुरू केल्या असून या मेगाभरतीची सुरुवात केंद्राची विविध खाती व सार्वजनिक क्षेत्रातील २४४ कंपन्यांपासून होण्याची शक्यता आहे.

  • केंद्रीय कामगार मंत्रालयाने या मेगाभरतीसाठी पुढाकार घेतला असून कामगार मंत्रालय सध्या विविध खात्यांमध्ये असलेल्या रिकाम्या पदांची माहिती घेत आहे.

  • ती मिळाल्यानंतर नव्या योजनेचा आराखडा तयार केला जाणार असून त्यानंतर दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक तत्त्वावर ही पदे भरण्यात येतील, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाºयाने दिली आहे.

  • या मेगाभरतीद्वारे सुमारे २० लाख युवकांना रोजगार मिळण्याची शक्यता असून कामगार मंत्रालयाकडून लवकरच सर्व खात्यांकडून तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे गुरुवारी गुरुग्राम येथे निधन :
  • काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माखनलाल फोतेदार यांचे गुरुवारी गुरुग्राम येथे निधन झाले, फोतेदार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तियांपैकी एक होते.

  • त्यांना 'काँग्रेसचे चाणक्य' म्हणूनही ओळखले जात असून १९८०-८४ या काळात इंदिरा गांधींचे ते राजकीय सचिवही होते, त्याचप्रमाणे राजीव गांधी यांचेही ते काही काळासाठी राजकीय सचिव होते.

  • माखनलाल फोतेदार मुळचे जम्मू-काश्मीरचे होते, भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांच्या कार्यकाळात त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता, त्यानंतर राजकीय क्षेत्रात हळूहळू जम बसवायला सुरुवात केली. 

  • त्यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दुःख व्यक्त केले आहे असून फोतेदार आमच्याठी दीपस्तंंभासारखे होते, त्यांच्या जाण्याने कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांमध्ये भावना व्यक्त करुन सोनिया गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

  • माखनलाल फोतेदार यांचा जन्म ५ मार्च १९३२ रोजी झाला होता, पहलगाम मतदारसंघातून ते जम्मू- काश्मीर विधानसभेत निवडून गेले होते.

थ्री डी प्रिंटेड इमारती उभ्या राहतील चंद्रावरही :
  • पुढील २५ वर्षांत चंद्रावर १०० पर्यंत लोक कायमस्वरुपी राहू शकतील, असे युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ईएसए) तज्ज्ञाने सांगितले असून चंद्राचा पृष्ठभाग धुळीने भरलेला असून त्यावर थ्री डी प्रिंटेड इमारती उभ्या राहतील.

  • वितळलेल्या बर्फाचा वापर पिण्यासाठी तसेच तेथील शेतीसाठीही करणे शक्य होईल, एवढेच काय चंद्रावर मुले जन्माला येणेही शक्य आहे, असे गेल्या आठवड्यात लाटव्हियात युरोपियन प्लॅनेटरी काँग्रेसच्या पार पडलेल्या बैठकीत बर्नार्ड फोयिंग यांनी सांगितले.

  • फोयिंग ईएसएचे ‘मून व्हिलेज’ योजनेचे राजदूत आहेत, फोयिंग म्हणाले की, २०३० मध्ये सुरुवात सहा किंवा दहा जणांपासून (त्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि अभियंते असतील) होईल व ती वाढून २०४० मध्ये १०० पर्यंत जाईल. तिथे २०५० साली तुम्हाला हजारो लोक दिसतील असे स्वाभाविकपणेच तुम्ही तेथे कुटुंब असावे असा विचार कराल.

  • इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे काम २०२४ मध्ये थांबवायचे आहे, मग त्याऐवजी कायमस्वरुपी चांद्र वसाहत करावी अशीही कल्पना समोर आली असून तथापि, चंद्राच्या भ्रमणकक्षेत अंतराळवीर ठेवण्यापेक्षा चंद्रावर लोक आणि उपकरणे पाठवणे फारच जोखमीचे तसेच मोठ्या खर्चाचेही काम आहे.

  • ही कल्पना यशस्वी होऊ द्यायची असल्यास ईएसए आणि नासासारख्या सरकारी संस्थांना स्पेस एक्स आणि ब्लू ओरिजिनसारख्या खासगी कंपन्यांसोबत काम करावे लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतीय एनजीओ ‘प्रथम’ने भारतातील उपेक्षित मुलांच्या शिक्षणासाठी ४० लाख डॉलर :
  • भारतीय एनजीओ ‘प्रथम’ने भारतातील उपेक्षित मुलांच्या शिक्षणासाठी ४० लाख डॉलरची रक्कम जमा केली असून न्यू यॉर्कमध्ये वार्षिक कार्यक्रमात या एनजीओने ही माहिती दिली.

  • मुंबईतील माधव चव्हाण व फरिदा लांबे यांनी सुरू केलेली ही संस्था असून यातील ३८ लाख डॉलर ‘प्रथम’ संस्थेने उभारले असून २,६०,००० डॉलर अन्य पुरस्कृत शिक्षण कार्यक्रमासाठी जमा केले.

  • ‘प्रथम’ या एनजीओची स्थापना १९९५ मध्ये मुंबईत एका वस्तीत झाली असून भारतातील सर्वांत मोठ्या बिगर सरकारी संघटनेपैकी ही एक संस्था आहे, संस्थेने दोन दशकांत वंचित वर्गाच्या पाच कोटींहून अधिक मुलांना शिक्षणासाठी मदत केलेली आहे.

  • सहकार्याची प्रशंसा या संस्थेच्या सीईओ रुक्मिणी बॅनर्जी यांनी डिजिटल शिक्षणासाठी गुगलच्या सहकार्याची प्रशंसा केली असून २१ सप्टेंबर रोजी शिकागोत एका कार्यक्रमात बोलताना ‘जेनपॅक्ट’चे अध्यक्ष आणि सीईओ एन.व्ही. त्यागराजन यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व विशद केले.

‘प्लेबॉय’ कर्त्या ह्य़ू हेफ्नर यांचे निधन :
  • बंडखोरीद्वारे साठच्या दशकात अमेरिकेच्या सांस्कृतिक घुसळणीला व्यासपीठ पुरविणाऱ्या, स्त्री सेलिब्रिटींच्या दिगंबर छायाचित्रांना कलात्मकतेची बैठक देणाऱ्या आणि जगामधील साहित्यातील नवमतांचा आदर करणाऱ्या ‘प्लेबॉय’ मासिकाचे कर्ते ह्य़ू हेफ्नर (९१) यांचे निधन झाले. 

  • शिक्षक दाम्पत्याच्या पोटी १९२६ साली जन्मलेल्या हेफ्नर यांनी शिक्षणानंतर सर्जनशील लेखनामध्ये उमेदवारी सुरू केली. ‘एस्क्वॉयर’ या लाइफस्टाइल मॅगझिनमध्ये कॉपीरायटर पदावर काम करीत असताना मागितलेली पाच डॉलर पगारवाढ न केल्यामुळे ती नोकरी सोडून त्यासारखेच नवे मासिक उभारण्याचा चंग बांधला.

  • १९५२ मध्ये आठ हजार डॉलर भांडवलाची उभारणी केली असून डिसेंबर १९५३ मध्ये मेरेलिन मन्रोची नग्न छायाचित्रे आणि साहित्यिक मजकूर छापून पाहिला अंक काढला.

  • अंकाच्या काढण्यात आलेल्या ५० हजार प्रती हातोहात संपल्या आणि अमेरिकी सांस्कृतिक पटलावर ‘प्लेबॉय’ या बंडखोर मासिकाचा जन्म झाला.

  • ह्य़ू हेफ्नर यांनी अमेरिकेतील विघटनाकडे जाणारी कुटुंबसंस्था, लग्नसंस्था यांच्या सूक्ष्मदर्शनासोबत शरीरसंबंधांबाबत होणाऱ्या मुक्त विचारांचा आपल्या मासिकाद्वारे प्रचार आणि प्रसार केला.

पीएफची रक्कम जाणून घेण्यसाठी नवीन सुविधा :
  • आपल्या ‘पीएफ’मध्ये नेमकी किती रक्कम जमा आहे, नियमित जमा होत आहे की नाही याची माहिती मिळवणं आता सहज शक्य होणार असून आता फक्त मिस्ड कॉल किंवा एसएमएस करून तुम्ही प्रॉव्हिडंट फंडातील शिल्लक जाणून घेऊ शकणार आहात.

  • त्यासाठी ०११-२२९० १४०६ या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल द्यावा लागेल, मिस्ड कॉल देण्यासाठी ‘ईपीएफओ’च्या कागदपत्रांमध्ये नोंदवलेलाच मोबाईल क्रमांक वापरण्याची आवश्यकता आहे. एकदा मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळातच एसएमएस येईल, ज्यामध्ये शिल्लक रकमेची माहिती असेल.

  • प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर अर्थात UAN पुरवते असतो तो नंबर अॅक्टिव- कार्यरत करणं आवश्यक आहे, एकदा का तुम्ही UAN अपडेट आणि तुमच्या पीएफ अकाऊंटला लिंक केलात तर तुमचा पीएफ पाहाणं, ई पासबूक हे सर्व सोपं होतं.

  • तुम्हाला तुमच्या पीएफ अकाऊंटवर कोणत्या महिन्यात किती रक्कम जमा झाली याबाबतची माहिती ई पासबुकवर पाहायला मिळू शकते, त्यासाठी EPFO च्या वेबसाईटवर जाऊन ई पासबुक कार्यरत करावं लागले.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • संशोधक दिन : आर्जेन्टिना.

जन्म /वाढदिवस

  • हमीद दलवाई, मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते : २९ सप्टेंबर १९३२

  • मिशेल बाशेलेट, चिलीची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष : २९ सप्टेंबर १९५१

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • उस्ताद युनुस हुसेन खान, उत्तर प्रदेशातील आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक : २९ सप्टेंबर १९९१

ठळक घटना

  • लेहमान ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल या कंपन्यांनी दिवाळे काढल्यावर डाउ जोन्स निर्देशांक एका दिवसात ७७७.६८ गुणांकाने कोसळला : २९ सप्टेंबर २००८

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.