चालू घडामोडी - २९ सप्टेंबर २०१८

Date : 29 September, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
५ कोटी अकाउंट हॅक, फेबसबुकने बंद केले ‘हे’ फिचर :
  • केंब्रिज अॅनालिटीकाच्या डेटा चोरी प्रकरणानंतर फेसबुक चांगलंच वादात सापडलं होते. हे प्रकरण शांत होते ना होते तोच फेसबुकसमोर आणखी एक मोठी अडचण उभी राहिली आहे. ५ कोटी फेसबुक अकाउंटची माहिती लीक झाली आहे. शुक्रवारी फेसबुकने ५ कोटी अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली.

  • फेसबुकच्या कॉम्प्युटर नेटवर्कवर झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये जवळपास 5 कोटी युजर्सची माहिती लीक झाल्याची शक्यता असल्याची माहिती फेसबुकने शुक्रवारी दिली. फेसबुकच्या विशिष्ट कोडमध्ये बदल करून हॅकर्सनी वापरकर्त्यांची माहिती चोरल्याचे उघड झाले आहे.

  • फेसबुकने या प्रकरणी अंमलबजावणी अधिकाऱ्यांना याची तक्रार दिली आहे. तसेच या कोडमध्ये दुरुस्ती केली आहे. फेसबुकने एक फिचर काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ‘View As’ या फिचरच्या माध्यमांतून हॅकर्सने माहिती चोरली आहे. सुरक्षेचा विचार करून फेसबुकने ‘View As’ हे फिचर काढून टाकले आहे. हॅकर्सने ‘View As’ या फिचर्सच्या माध्यमांतून एक्सेस टोकन चोरले होते.

भारताचा बांगलादेशवर रोमहर्षक विजय, सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं :
  • दुबई : रोहित शर्माच्या टीम इंडियानं बांगलादेशवर अखेरच्या चेंडूवर तीन विकेट्सनी चुरशीचा विजय मिळवला आणि आशिया चषकावर सातव्यांदा आपलं नाव कोरलं. बांगलादेशनं अंतिम सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं होतं. सामन्यात टीम इंडियानं अखेरच्या चेंडूवर बांगलादेशवर तीन विकेट्सनी विजय मिळवला.

  • भुवनेश्वर कुमार बाद झाला, त्या वेळी भारताला अकरा चेंडूंत विजयासाठी नऊ धावा हव्या होत्या. आणि हाताशी केवळ तीन विकेट्स होत्या. केदार जाधवच्या मांडीचे स्नायू दुखावल्यामुळं तो मोठे फटके खेळू शकत नव्हता. त्या कठीण परिस्थितीत जाधव आणि कुलदीप यादवनं नेटानं खेळून विजयाचं समीकरण एका चेंडूत एका धावेवर आणलं. मग महमदुल्लाहच्या अखेरच्या चेंडूवर जाधव आणि यादवनं लेग बाय घेऊन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

  • भारताकडून कर्णधार रोहित शर्मानं 48 धावा बनवल्या. महेंद्रसिंह धोनी (36) आणि दिनेश कार्तिकनं (37) विजयामध्ये आपलं योगदान दिलं. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या लिटन दास आणि मेहदी हसननं 21 षटकांत दिलेली 120 धावांची सलामी टीम इंडियाच्या चाहत्यांना धडकी भरवणारी होती.

भारताने 'सर्जिकल स्ट्राईक 2' केल्याचे गृहमंत्र्यांकडून संकेत :
  • लखनौ : भारतीय लष्कराने दोन-तीन दिवसांपूर्वी भारत-पाक सीमेवर 'सर्जिकल स्ट्राइक'सारखी मोठी कारवाई केली असल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. त्यांनी काहीही स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी शहीद बीएसएफ जवान नरेंद्र कुमार यांची निर्घृण हत्या आणि मृतदेहाच्या विटंबनेचा बदला घेतल्याचं त्यांच्या या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे.

  • उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं. ''पाकिस्तानने बीएसएफ जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची ज्या पद्धतीने विटंबना केली... कदाचित तुम्ही पाहिलं असेल.. काही तरी झालं आहे, मी सांगणार नाही. विश्वास ठेवा, सगळं काही ठिक-ठाक झालंय, दोन-तीन दिवसांपूर्वी आणि पुढेही दिसेल काय होतंय ते,'' असं राजनाथ सिंह म्हणाले.

  • ''मी आपल्या बीएसएफ जवानांना सांगितलं होतं, शेजारी आहेत, त्यांच्या दिशेने पहिली गोळी तुम्ही चालवू नका. पण समोरून गोळी झाडली गेल्यास आपल्या गोळ्या मोजू नका,'' असंही राजनाथ सिंह म्हणाले.

  • ''ज्या चीनने भारतावर हल्ला केला ते चीन आता भारताची ताकद जाणून आहे. त्यामुळेच भारत-चीन सीमेवर आज चीनकडून शस्त्रे उगारली जात नाहीत. केवळ धक्काबुक्कीचे प्रकार घडतात आणि नंतर 'थँक यू' बोलून चीनचे सैनिक माघारी परततात,'' असं राजनाथ सिंह म्हणाले.

सुषमा स्वराज भाषण न ऐकताच निघून गेल्याने पाक परराष्ट्र मंत्र्यांचा तिळपापड :
  • न्यूयॉर्क : सीमेवरील पाकिस्तानच्या नापाक हरकतींमुळे दोन्ही देशांचे संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. याचा परिणाम संयुक्त राष्ट्रामध्ये (यूएन) सार्क परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही पाहायला मिळाला.

  • वेस्टिन हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी हे देखील उपस्थित होते. मात्र दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. बैठकीत आपलं भाषण झाल्यानंतर सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण होण्यापूर्वीच पुढील कार्यक्रमासाठी निघून गेल्या.

  • सुषमा स्वराज भाषण न ऐकताच निघून गेल्याने शाह महमूद कुरेश चवताळलेले दिसून आले. ''मी त्यांचं भाषण ऐकलं. त्यांनी क्षेत्रीय सहकार्याबाबत भाष्य केलं. क्षेत्रीय सहभाग कसा शक्य आहे, जर कुणी एकमेकांचं म्हणणं ऐकतच नसेल आणि तुम्ही त्याला ब्लॉक करत असाल,'' असं वक्तव्य त्यांनी केलं. ''त्यांची (सुषमा स्वराज) तब्येत बरी नव्हती, की काय ते माहित नाही. पण मी त्यांचं सर्व भाषण ऐकलं आणि त्या माझ्या भाषणासाठीही थांबल्या नाही,'' असं शाह महमूद कुरेशी म्हणाले.

दिनविशेष :
  • जागतिक हृदय दिन

महत्वाच्या घटना

  • १८२९: लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली.

  • १९१६: जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले.

  • १९१७: मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – किएव्हमध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.

  • १९६३: बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू.

  • १९९१: हैतीमध्ये लष्करी उठाव.

  • २००८: लेहमन ब्रदर्स व वॉशिंग्टन म्युच्युअल या वित्तीय संस्थांच्या दिवाळखोरीमुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. अमेरिकन शेअर बाजारातील सर्वाधिक घट होती.

जन्म

  • १७८६: मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती ग्वाडालुपे व्हिक्टोरिया यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १८४३)

  • १८९०: पंचांगकर्ते ल. गो. तथा नानाशास्त्री दाते यांचा जन्म.

  • १८९९: बॉलपोइंट पेनचे संशोधक लस्झो बियो यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९८५)

  • १९०१: नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९५४)

  • १९२५: समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २०१३)

  • १९२८: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर २०१२)

  • १९३२: विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै २००४)

  • १९३८: नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान विल्यम कॉक यांचा जन्म.

  • १९४३: नोबेल पारितोषिक विजेते पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष लेक वॉलेसा यांचा जन्म.

  • १९४७: भारताचे ३८वे सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी २०१६)

मृत्यू

  • १९१३: डिझेल इंजिनचे संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८५८)

  • १९८७: अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड दुसरा यांचे निधन.

  • १९९१: आग्रा घराण्याच्या ११व्या पिढीतील गायक उस्ताद युनूस हुसेन खाँ यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.