चालू घडामोडी - ३० ऑगस्ट २०१७

Date : 30 August, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आर्थिक वर्ष बदल बारगळला अंतिम निर्णय पीएमओ घेणार :
  • पंतप्रधान मोदींनी या संकल्पनेचे सुतोवाच नीती आयोगाच्या बैठकीत केले होते, विविध अडचणी आणि संभाव्य राजकीय धोके लक्षात घेता या महत्त्वाकांक्षी निर्णयाबाबत केंद्र सरकार तूर्त हात आखडते घेण्याच्या मन:स्थितीत आहे.

  • भारताचे आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चऐवजी जानेवारी ते डिसेंबर करण्याचा पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांकित योजनेचा प्रस्ताव, केंद्र सरकार लांबणीवर टाकण्याच्या मन:स्थितीत आहे.

  • भारतात आर्थिक वर्ष बदलण्याचा निर्णय राबवण्यासाठी केंद्र सरकारला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, आर्थिक सुधारणांवर त्याचा अत्यंत नकारात्मक परिणाम होईल, असे अर्थ मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला स्पष्टपणे सूचित केले.

  • आर्थिक वर्ष बदलण्याच्या प्रस्तावाला देशातल्या सर्व राज्य सरकारांनी मान्यता द्यायला हवी प्राप्त परिस्थितीत अनेक राज्य सरकारे हा प्रस्ताव मान्य करायला तयार नाहीत.

  • अर्थ मंत्रालयाने हे कारण भलेही पुढे केले असले तरी हा निर्णय राबवण्यासाठी ज्या व्यावहारिक अडचणींवर सरकारला मात करावी लागेल, ती घाई गडबडीत करता येण्यासारखी स्थिती नाही, हे महत्वाचे कारण आहे.

मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न मुलीचं नाव ठेवलं 'ऑगस्ट' :
  • फेसबुक पोस्टद्वारे झुकेरबर्गने आनंदाची बातमी सर्वांशी शेअर केली असून त्यासोबत दोघांनी ऑगस्टसाठी तिनशे शब्दांचा समावेश असलेले पत्रही लिहिले आहे. 

  • संपूर्ण जगाला कवेत घेऊ पाहणाऱ्या फेसबुक या महासोशल नेटवर्किंग साइट्‌सचा मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न प्राप्त झाले असून झुकेरबर्ग यांची पत्नी प्रिसिला चॅनने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 

  • 'प्रिय ऑगस्ट, तुझी आई आणि मला इतका आनंद झाला आहे की, तो व्‍यक्‍त करण्‍यासाठी आमच्‍याकडे शब्‍द नाहीत.

  • फेसबुकवर झुकेरबर्गने पत्नी आणि दोन मुलीसह फोटो पोस्ट केला आहे, त्याबरोबर आपल्या मुलीसाठी त्याने एक पोस्टही लिहली आहे. 

  • ज्यावेळी तूझ्या मोठ्या बहिनीचा जन्म झाला होता तेव्हा आम्ही जगासाठी पत्र लिहले होतं. ऑगस्ट, तू एका अशा जगात जन्माला आली आहे. जिथे तूला उत्कृष्ट शिक्षण मिळेल.

महापालिका प्रशासनाचा निर्णय नव्याने बायोगॅस प्रकल्प पुढे नाही :
  • दुर्गंधीमुळे होणारा विरोध, खर्चाच्या तुलनेत पुरेसा फायदा नाही व जागेची कमतरता यांमुळे यापुढे ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारा नवा बायोगॅस प्रकल्प करायचा नाही, असा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

  • एकाच वेळी ७०० टन कचºयावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू होणार आहे. मात्र, यामुळे कचरा समस्येत वाढ होण्याची भीती आहे, शहरात रोज साधारण १ हजार ७०० टन कचरा निर्माण होतो.

  • त्यातील सुमारे ८०० टन कचरा ओला असतो. ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा तयार केली असून काही खासगी संस्थांकडेही हे काम देण्यात आले आहे.

  • त्यासाठी महापालिकेने सुरुवातीला काही मोठे प्रकल्प सुरू केले होते; मात्र ते वेगवेगळ्या कारणांनी बंद पडले, त्यावर उपाय म्हणून क्षेत्रीय कार्यालयनिहाय किंवा प्रभागनिहाय प्रकल्प सुरू करण्याचे धोरण आखले. त्याप्रमाणे सध्या महापालिकेचे असे २५ बायोगॅस प्रकल्प आहेत.

  • प्रत्येकी ५ टन कचºयावर तिथे रोज प्रक्रिया केली जाते. त्यापासून होणाºया विजेचा वापर दिव्यांसाठी केला जातो. मात्र, या प्रकल्पांपासून अपेक्षित फायदा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळात सप्टेंबरच्या प्रारंभी करण्यात येणारा प्रस्तावित बदल लांबणीवर :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन व म्यानमारच्या दौ-यावर जात असून, ते परतल्यावरच मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदल केले जातील, असेही संकेत मिळत आहेत.

  • केंद्रीय मंत्रिमंडळात सप्टेंबरच्या प्रारंभी करण्यात येणारा प्रस्तावित बदल लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत, असे सरकारमधील सूत्रांनी सांगितले.

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे १-३ सप्टेंबरदरम्यान तिरुपती बालाजी व गुजरातेतील साबरमती आश्रमाला भेट देणार असून ते २ सप्टेंबरला सायंकाळी दिल्लीत परततील व पुढील दिवशी गुजरातेत जातील.

  • डोकलामचा तिढा काल सुटल्याने पंतप्रधान मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल लगेच करण्याची तसेच नवा संरक्षणमंत्री नियुक्त करण्याची घाई करण्याची शक्यता नाही, या कामासाठी ते आता भाजप अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली व संघ नेतृत्वाशी व्यापक विचारविनिमय करून निर्णय घेतील.

  • संघाची सहा महिन्यांनी होणारी दोनदिवसीय आढावा बैठक मथुरेत २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे त्यामध्ये भाजपसह संघ परिवारातील संघटनांचे नेते सहभागी होत आहेत.

बाबा राम रहीमनंतर आता संत रामपालचा फैसला :
  • साध्वी बलात्कारप्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या बाबा राम रहीमनंतर आता संत रामपालचा फैसला होणार आहे.

  • स्वत:ला संत कबीरांचा अवतार आणि परमेश्वर समजणाऱ्या संत रामपालच्या सतलोक आश्रमातील अवैध कारनाम्याप्रकरणी, हिस्सार कोर्ट आज निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरियाणातील हिस्सारमध्ये कलम १४४ अर्थात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

  • संत रामपालवर सरकारी कार्यात अडथळे आणि आश्रमात जबरदस्तीने लोकांना बंधक बनवण्याचा आरोप आहे.

  • हिस्सारमध्ये २००६ साली झालेल्या एका हत्याप्रकरणात, रामपालला २००८ मध्ये जामीन मिळाला होता, मात्र त्यानंतर तो एकदाही न्यायालयात हजर झालेला नाही.

  • रामपालच्या समर्थकांनी ऑगस्ट २०१४ मध्ये हिस्सार जिल्हा न्यायालयात हुल्लडबाजी केली होती त्यामुळे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने रामपालला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • -

जन्म /वाढदिवस

  • अणुयुगाचा निर्माता रुदरफ़ोर्ड अर्नेस्ट जन्मदिन : ३० ऑगस्ट १८७१

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • पुण्याच्या शनिवारवाड्यात नारायणराव पेशवे यांचा अमानुष खून : ३० ऑगस्ट १७७३

  • सर्पमित्र पू. ज. देवरस यांचे निधन : ३० ऑगस्ट १९९१

ठळक घटना

  • पहिले बालकुमारी साहित्य संमेलन : ३० ऑगस्ट १९७५

  • ज्युडिथ रेस्निक यानी डिस्कव्हरी यानातून अंतराळात प्रवास केला : ३० ऑगस्ट १९८८

    Whatsapp Group

    © Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

    Made with ❤ in India.