चालू घडामोडी - ३० जुलै २०१७

Date : 30 July, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान : शाहबाज शरीफ
  • नवाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर आता शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झाली असून शाहबाज शरीफ हे नवाज शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत.

  • नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं आहे, पनामागेट प्रकरणात अडकलेल्या नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.

  • पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) च्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी शाहबाज शरीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. शाहबाज हे पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत.

तब्बल ८५ वर्षांनी कसोटीत सर्वात मोठा विजय :भारताचा परदेशात
  • कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने श्रीलंकेचा दुसरा डाव २४५ धावांत गुंडाळून गॉल कसोटीत ३०४ धावांनी दणदणीत विजय साजरा केला.

  • भारताने या विजयासह श्रीलंका दौऱ्यातल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

  • भारताचा ८५ वर्षांच्या इतिहासातील परदेशातील हा सर्वात मोठा मोठ्या फरकाने मिळवलेला विजय आहे, यापूर्वी भारताने १९८६ साली लीड्स कसोटीत इंग्लंडवर २७९ धावांनी मात केली होती.

५० वर्षापूर्वीचा हात सापडला, १९६६ मध्ये कोसळलेल्या विमानाचे अवशेष आढळले
  • फ्रान्सच्या डॅनियल रोच यांनी, ५० वर्षापूर्वी आल्प्स पर्वतरांगात कोसळलेल्या विमानातील, प्रवाशांच्या मृतदेहाचे अवशेष शोधले आहेत.

  • महत्त्वाचं म्हणजे डॅनियल यांनी शोधलेल्या मृतदेहांचे अवशेष, हे एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांचे असण्याची दाट शक्यता आहे. डॅनियल यांना आढळलेल्या अवशेषांमध्ये महिलेचा हात आणि एका व्यक्तीच्या पायाचे अवशेष आहेत.

  • १९६६ मध्ये एअर इंडियाचं बोईंग ७०७ हे विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जात होतं. त्यावेळी ते आल्प्स पर्वतरांगात कोसळलं. या थरारक अपघातात, विमानातील सर्व ११७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

  • मात्र सापडलेले अवशेष हे १९६६ मध्ये कोसळलेल्या विमानातील प्रवाशांचेच आहेत का, याबाबत त्यांना साशंकता आहे.

देशात GST लागू होणं ही ऐतिहासिक घटना - मोदी
  • एवढ्या मोठ्या देशात जीएसटीची अंमलबजावणी हे यश आहे, जगातील अर्थतज्ज्ञ त्याची नक्की दखल घेतील, देशात GST लागू होणं ही ऐतिहासिक घटना आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून व्यक्त केले आहे.

  • मन की बात या कार्यक्रमाच्या ३४ व्या भागातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला असून जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला आहे.  

  • जीएसटीमुळे ग्राहकांचा व्यापाऱ्यांवरील विश्वास वाढला आहे, तसेच जीएसटी लागू होऊन एक महिना झाला असून त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसत आहेत. जीएसटीचा सर्वात जास्त फायदा गरीब जनतेला होईल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

एप्रिल ते जूनमध्ये घरांच्या विक्रीत घट : सर्व्हे
  • देशातील नऊ मोठ्या शहरांमध्ये घरांच्या विक्रीत घट झाली असून चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील प्रॉपर्टी खरेदी-विक्रीबाबतची आकडेवारी समोर आली आहे.

  • आर्थिक वर्षाच्या तुलनेत ४ टक्के घट पाहायला मिळत आहे, प्रोप टायगर डॉट कॉमने मुंबई, पुणे, नोएडा, गुरुग्राम, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि अहमदाबाद या नऊ मोठ्या शहरातील घरांच्या खरेदी-विक्रीचा अभ्यास केला आहे.

  • “२०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील ९ मोठ्या शहरांमध्ये ५३ हजार ३५२ घरांची विक्री झाली, याआधीच्या तिमाहीत ३ टक्क्यांनी वाढ असली, तरी नोटाबंदी, रेरा आणि जीएसटीचा परिणामही गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत पाहायला मिळाला.

  • गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या तिमाहीत ४ टक्क्यांनी घट पाहायला मिळाली.

‘वंदे मातरम’ न गायल्याने कोणी देशद्रोही ठरत नाही : नक्वी
  • “‘वंदे मातरम’ म्हणणे किंवा न म्हणणे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक आवड आणि विचारांवर अवलंबून आहे, ‘वंदे मातरम’ न म्हणण्याचा संबंध देशभक्तीशी जोडता येणार नाही.

  • एखाद्याला ‘वंदे मातरम’ म्हणायचे नसेल तर त्याला आपण देशद्रोही किंवा देशविरोधी असल्याचे लेबल लाऊ शकत नाही. मात्र, जर एखादा ‘वंदे मातरम’च्या विरोधात असेल तर अशी मानसिकताही योग्य नाही”, असे नक्वी म्हणाले.

  • नुकताच मद्रास उच्च न्यायालयाने यासंदर्भात एक निर्णय दिला आहे. यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणणे अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

दिनविशेष :

जन्म, वाढदिवस

  • सोनू निगम, पार्श्वगायक : ३० जुलै १९७३

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचा सहावा पंतप्रधान : ३० जुलै १९४७

  • शंकर पाटील, मराठी लेखक : ३० जुलै १९९४

ठळक घटना

  • व्हानुआतुला स्वातंत्र्य : ३० जुलै १९८०

  • दुसरे महायुद्ध - जपानच्या आय-५८ या पाणबुडीने अमेरिकेची युएसएस इंडियानापोलिस ही नौका बुडवली : ३० जुलै १९४५

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.