चालू घडामोडी - ३० जून २०१७

Date : 30 June, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कॉमन सर्व्हिस सेंटर्स फेब्रुवारीपासून बंदच !
  • ‘डिजिटल इंडिया’अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू करण्यात आलेली कॉमन सर्व्हिस सेंटर्स गेल्या फेब्रुवारीपासून बंदच आहेत.

  • पीपीपी म्हणजे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपमधून ही सेंटर्स सुरू करण्यात आलेली आहेत.

  • डिजिटल इंडियाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतील १० हजार ४७३ व शहरी भागांतील १ हजार ३३६ सेंटर्स सुरू करण्यात आली; परंतु या सेंटर्सवर आधार कार्ड व निवडणूक ओळखपत्र वगळता अन्य सेवा फेब्रुवारीपासूनच बंद पडल्या आहेत.

  • त्यामुळे गैरसोयी दूर होण्याऐवजी त्या वाढल्या आहेत.

'जीसॅट-१७' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण :
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अंतराळ मोहिमेत इस्रोने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

  • अत्याधुनिक संचार उपग्रह जीसॅट १७ चे फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. 'एरियन-५' या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट १७ हे अंतराळात झेपावले.

  • जीसॅट १७चे वजन जवळपास ३४७७ किलोग्रॅम एवढे आहे. या उपग्रहात दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड, एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे.

  • तसेच यात हवामानासंबंधी माहिती मिळवण्यासाठी उपकरणही बसवण्यात आले आहे. शिवाय सर्च आणि रेस्‍क्‍यू सेवेसाठी जीसॅट १७ ची मदत होणार आहे.

दौरा करण्याआधीच इस्त्रायलमधील मीडिया मोदींवर फिदा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलचा दौरा करणारे पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहेत.

  • मोदींच्या या दौ-यावरुन इस्त्रायलमधील प्रसारमाध्यमांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तेथील प्रसारमाध्यमं मोदींच्या या दौ-याला प्रचंड महत्व देत आहे.

  • इस्त्रायलमधील वृत्तपत्र 'द मार्कर'ने मोदींचा जगातील सर्वात महत्वाचे पंतप्रधान म्हणून उल्लेख केला आहे. 

एससी मॅग्लेव जगातील सर्वात वेगवान रेल्वे :
  • जपानने या रेल्वेला एससी मॅग्लेव असे नाव दिले आहे. ताशी ६०० कि.मी. वेगाने धावणारी हे रेल्वे डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच समोरून निघून जाते.

  • सर्वात वेगाने धावण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड या रेल्वेच्या नावावर असून २०१५ मध्ये या रेल्वेने ६०३.मी.चे अंतर एका तासात कापत नवा विक्रम केला होता.

  • जेव्हा रेल्वे धावत असते तेव्हा ती रुळाच्या १ ते ६ इंच वरून जात असते. अगदी वेगात असणाऱ्या या रेल्वेला जवळून कॅमेऱ्यात टिपणेही अवघड आहे.

  • तसेच त्यावेळी ही रेल्वे ११ सेकंदांत १.८ कि.मी.चे अंतर कापत होती. ही रेल्वे मॅग्नेटिक सिस्टीमवर आधारित आहे. अशा प्रोजेक्टसाठी खर्चही खूप येतो. मॅग्नेटिक लेविएटेशनमध्ये (चुंबकीय उत्क्रांती) रेल्वे रूळ आणि चाके यात चुंबकीय दबाव असतो.

बॅडमिंटनपटू श्रीकांतचा सर्वोत्कृष्ट दहा खेळाडूंमध्ये समावेश :
  • २०१५ साली श्रीकांत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र त्यानंतर श्रीकांतचा फॉर्म हरवल्यामुळे त्याची घसरण झाली असून जागतिक क्रमवारीत स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत झेप घेतली आहे.

  • तसेच इंडोनेशियन ओपन आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर श्रीकांतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत श्रीकांतने सर्वोत्तम दहा खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला.

  • नवीन क्रमवारीनुसार किदाम्बी श्रीकांत आठव्या स्थानावर विराजमान आहे. गुंटूरच्या या २४ वर्षांच्या खेळाडूचे आता ५८,५८३ इतके गुण झाले.

  • लागोपाठ दोन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवित श्रीकांतने सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत पुन्हा एकदा धडाक्यात पुनरागमन केले आहे.

पोलीस अधिकारी महेश भागवत यांचा अमेरिकेत गौरव :
  • महेश भागवत हे गेल्या १३ वर्षांपासून मानवी तस्करीविरोधात लढत आहेत. या तेरा वर्षांमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणात त्यांनी व त्यांच्या पथकासोबत शेकडो बालमजुरांची सुटका केली.

  • तेलंगणामधील मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश मुरलीधर भागवत यांचा अमेरिकेने बहुसन्मान केला आहे.  

  • अमेरिकेने 'ट्रॅफिकिंग इन पर्सन रिपोर्ट हिरो अॅवार्ड' देऊन महेश मुरलीधर यांचा गौरव केला आहे.

  • महेश भागवत आता हैदराबादमधील राचकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत.

भारताचा विजयी आघाडीचा निर्धार : 
  • आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या वन डेत आज शुक्रवारी कमकुवत वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा धूळ चारून २-० ने विजयी आघाडी घेण्याच्या निर्धारासह मैदानात उतरणार आहे.

  • सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी ६.३० पासून खेळला जाईल.

  • पोर्ट आॅफ स्पेनचा दुसरा सामना भारताने १०५ धावांनी जिंकला तर पहिला सामना ३९ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे रद्द करावा लागला होता.

  • भारताने ५ बाद ३१० धावा उभारल्या पण त्यात धोनी आणि युवराजचे योगदान नव्हते.

  • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्या तीन आघाडीच्या फलंदाजांनी दमदार फटकेबाजी केल्यानंतर गोलंदाजांनी देखील अचूक मारा करीत वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय मिळवून दिला होता.

दिनविशेष : 

जागतिक दिवस

  • स्वातंत्र्य दिन : कॉँगो.

जन्म, वाढदिवस

  • सनत जयसुर्या, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू : ३० जून १९६९

  • पिएर चार्ल्स, डॉमिनिकाचा पंतप्रधान : ३० जून १९५४

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • दादाभाई नौरोजी, भारतीय नेता व अर्थशास्त्रज्ञ : ३० जून १९१७

  • चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ : ३० जून १९३४

ठळक घटना

  • अल्बर्ट आईनस्टाईन यांनी त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला : ३० जून १९०५

  • अमेरिकेच्या संविधानातील २६वा बदल संमत. मतदानाचे वय १८ वर्षे : ३० जून १९७८

    Whatsapp Group

    © Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

    Made with ❤ in India.