चालू घडामोडी - ३० मार्च २०१८

Date : 30 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मानवी शरीरातील सर्वात मोठ्या अवयवाचा शोध :
  • नवी दिल्ली : मानवी शरीरात एका नव्या अवयवाचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. इंटरस्टिटियम हा शरीरातील सर्वात मोठा अवयव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • शरीरातील पेशींमध्ये इंटरस्टिटियम पसरल्याचा आतापर्यंतचा समज होता. मात्र 'नेचर'मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात हा एकसंघ अवयव असल्याचं म्हटलं आहे.

  • इंटरस्टिटियम हा मानवी शरीरातील 80 वा अवयव ठरणार आहे. त्वचा आणि इतर अवयवांखाली असलेल्या पेशी हा दाट थर असल्याचं आतापर्यंत मानलं जात होतं.

  • नवीन संशोधनानुसार, हा अवयव म्हणजे द्रवपदार्थाने भरलेल्या कप्प्यांचं जाळं आहे. हे जाळं आकुंचित पावू शकतं किंवा प्रसारित होतं. त्यामुळे शॉक अॅब्झॉर्बरप्रमाणे काम करतं.

  • इंटरस्टिटियममुळे शरीराच्या एका भागातील कर्करोग दुसऱ्या भागात पसरु शकतो. नव्या संशोधनातून शरीरातील या दुर्लक्षित अवयवाविषयी माहिती समोर आली आहे.

  • गेल्या अनेक वर्षांपासून मानवी शरीरशास्त्राचा अभ्यास सुरु आहे. शरीरात 79 अवयव असतात, ही ठाम समजूत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कित्येक वर्षापासून हा अवयव अज्ञात राहिला.(source :abpmajha)

१२% पेन्शन प्रोत्साहन लाभामुळे निर्माण होतील १ कोटी रोजगार, केंद्र सरकारला अपेक्षा :
  • नवी दिल्ली : नव्या कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तीन वर्षांतील पेन्शन निधीची रोजगारदात्याच्या हिश्श्याची १२ टक्के रक्कम सरकारने भरण्याचे ठरविल्यामुळे १ कोटी नवे रोजगार निर्माण होतील, असे सरकारला वाटत आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी झालेल्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत नव्या कर्मचाºयांच्या पेन्शन निधीची १२ टक्के रक्कम सरकारने भरण्याच्या निर्णयास मंजुरी देण्यात आली.

  • श्रममंत्री संतोषकुमार गंगवार यांनी सांगितले की, रोजगार निर्मिती करण्यास आमचे सरकार बांधील आहे. २0१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेत (पीएमआरपीवाय) पेन्शन निधीमधील रोजगारदात्याचे ८.३३ टक्के योगदान सरकारने भरण्याची तरतूद होती.

  • आम्ही योजनेचा आणखी विस्तार केला आहे. वस्त्र-प्रावरणे व कापड उद्योगातील कर्मचाºयांच्या पेन्शन निधीतील रोजगारदात्यांच्या हिश्श्याची १२ टक्के रक्कम सरकारने आपल्या माथी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून आतापर्यंत ३० लाख कामगारांना लाभ मिळाला आहे. या योजनेची अर्थसंकल्पीय तरतूद ६,५०० कोटींवरून १० हजार कोटी करण्यात येत आहे. ज्या कर्मचाºयांना ८.३३ टक्के योगदानाचा लाभ मिळत आहे, त्यांना पहिल्या तीन वर्षांतील उर्वरित काळासाठी वाढीव १२ टक्के लाभ दिला जाईल.(source :lokmat)

इटलीत जागतिक तलवारबाजी स्पर्धेत जालन्याची विद्यार्थिनी :
  • जालना : इटलीतील व्हेरोना शहरात एक ते 10 एप्रिल या कालावधीत तलवारबाजीच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून 14 मुलींची निवड झाली असून, त्यात जालन्याच्या संस्कृती पडुळचा समावेश आहे. या स्पर्धेत संस्कृती पडुळकडून जालनावासियांसह तमाम महाराष्ट्रालाही मोठ्या अपेक्षा आहेत.

  • जालन्याच्या संस्कृती पडुळची तळपती तलवार आता भारताला जग जिंकून देण्याच्या इराद्यानं रणांगणात दाखल होणार आहे. हे रणांगण आहे तलवारबाजीच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेचं. इटलीतल्या व्हेरोना शहरात एक एप्रिलपासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • तलवारबाजी या खेळात फॉईल, इप्पी आणि सेबर या तीन प्रकारांचा समावेश असतो. तलवारबाजीच्या जागतिक विजेतेपद स्पर्धेतल्या सेबर प्रकारासाठी देशभरातून दोन महिला खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात संस्कृतीचा समावेश आहे. संस्कृतीनं आजवर विभागीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर 35 पेक्षा अधिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यात तिने 15 पदकांची कमाई केली आहे.

  • संस्कृतीला पाचवी इयत्तेत असल्यापासून तलवारबाजीची आवड निर्माण झाली. त्या वयात विभागीय पातळीपासून तिने आज जागतिक विजेतेपद स्पर्धेत खेळेपर्यंत मजल मारली आहे.

  • जालना शहरात सरस्वती भुवन शाळेच्या मैदानावर मुलींसाठी तलवारबाजीच्या प्रशिक्षणाची सोय आहे. पण शहरात सुविधांची वानवा असल्यानं संस्कृतीसारख्या खेळाडू मोठ्या संख्येनं तयार होत नाहीत. त्याचं शल्य प्रशिक्षकांच्या मनात आहे.(source :abpmajha)

भ्रष्ट अधिकाऱ्यांना नाही मिळणार पासपोर्ट :
  • नवी दिल्ली : भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सरकारी अधिकाºयांना यापुढे पासपोर्ट जारी केला जाणार नाही. कार्मिक मंत्रालयाने हे स्पष्ट केले. ज्यांना वैद्यकीय उपचारांसाठी विदेशात जाणे आवश्यक आहे, त्यांना पासपोर्ट देण्याबाबत प्राधिकरण निर्णय घेऊ शकतील.

  • ज्या अधिकाºयांवर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांची चौकशी सुरू आहे, ज्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविलेला आहे अथवा ज्यांना निलंबित केले आहे, अशांना पासपोर्ट दिला जाणार नाही. अधिकाºयाच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले असेल, खटला सुरू असेल, भ्रष्टाचार किंवा अन्य गुन्ह्याप्रकरणी चौकशीचे आदेश असतील, अशा अधिकाºयांना पासपोर्ट जारी केला जाणार नाही.

  • स्वत:च्या वा नातेवाइकाच्या उपचारासाठी किंवा कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त सनदी अधिकाºयांना विदेशात तातडीने जावे लागू शकते. अशा वेळी त्यांना पासपोर्ट जारी करण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल.(source :lokmat)

इस्रोच्या जीसॅट-६ ए उपग्रहाचं प्रक्षेपण :
  • नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)कडून जीसॅट-6 ए या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. उच्च शक्तीच्या एस बँड संचार उपग्रहाने युक्त असलेल्या या उपग्रहाचं आयुष्यमान दहा वर्ष आहे. हा उपग्रह जियोसिनक्रोनस उपग्रह प्रक्षेपण याना (जीएसएलव्ही-एफ 08)द्वारे अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.

  • श्रीहरिकोटा केंद्रावरून GSLV-F08 हे यान दुपारी 4 वाजून 56 मिनिटांनी अवकाशात झेपावलं. या मोहिमेचं काऊंटडाऊन बुधवारी दुपारी 1 वाजून 56 मिनिटांनी सुरु झाल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं होतं.

  • जीसॅट-6’ प्रमाणेच ‘जीसॅट-6 ए’ हा उपग्रह असल्याचे इस्रोने स्पष्ट केलं असून, या उपग्रहामुळे आयटी इंजिनियर्सना आपले नवनवे उपक्रम तयार करण्यासाठी मदत मिळेल

  • या उपग्रहाची वैशिष्ट्य - या उपग्रहात 6 एमएस बँड अनफ्लेरेबल अॅन्टिना, हॅडहेल्ड ग्राऊंड टर्मिनल आणि नेटवर्क व्यवस्थापन तंत्रज्ञान आदीचा समावेश आहे. या उपग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यात मल्टी बीम कव्हरेज सुविधा उपलब्ध आहे. ज्यामुळे भारताला मोबाईल संचार प्राप्त होईल.(source :abpmajha)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १६६५: पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडले.

  • १७२९: थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.

  • १८४२: अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.

  • १८५६: पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.

  • १९२९: भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.

  • १९३९: हेइंकेल १०० ह्या सैनिकी विमानाने ७४५ किमी / ताशी वेगाने उडण्याचा विक्रम केला.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सोफिया, बल्गेरिया येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.

जन्म

  • १८९४: इल्युशीन विमान कंपनी चे निर्माते सर्जी इल्युशीन यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७७)

  • १८९५: सोविएत युनियनचे अध्यक्ष निकोलाय बुल्गानिन यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९७५)

  • १८९९: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९७०)

  • १९०६: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९६५)

  • १९३८: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे स्थापक क्लाउस स्च्वाब यांचा जन्म.

  • १९४२: भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्म.

  • १९७७: भारतीय संचालक आणि पटकथालेखक अभिषेक चोब्बे यांचा जन्म.

मृत्यू

  • १९५२: भूतानचे २ रे राजे जिग्मे वांगचुक यांचे निधन.

  • १९६९: कवी व समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १८९४)

  • १९७६: चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१८)

  • १९८१: रीडर्स डॅाजेस्ट चे निर्माते डेविट वलास यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८८९)

  • १९८९: सोबत साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक गजानन वासुदेव तथा ग. वा. बेहेरे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२२)

  • २००२: गीतकार आनंद बक्षी यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १९२०)

  • २००५: भारतीय लेखक आणि चित्रकार ओ. व्ही. विजयन यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९३०)

  • २०१२: कॅनेडियन-भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अक्विला बेर्लास किंनी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.