चालू घडामोडी - ३० मे २०१८

Date : 30 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कोहलीला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार :
  • नवी दिल्ली: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सीएट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारावर कोहलीने तिसऱ्यांदा नाव कोरलं आहे.

  • यापूर्वी कोहलीने 2011-12 आणि 2013-14 मध्येही हा पुरस्कार पटकावला होता. भारताचे माजी यष्टिरक्षक-फलंदाज फारुख इंजिनीयर यांना सीएट क्रिकेट रेटिंग्जच्या पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

  • भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि सीएटचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांच्या हस्ते इंजिनीयर यांना गौरवण्यात आलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मानं हा पुरस्कार स्वीकारला.

  • शिखर धवनला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज, तर न्यूझीलंडच्या ट्रेण्ट बोल्टला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय गोलंदाज पुरस्काराचा मान देण्यात आला.

बारावीचा निकाल आज, दुपारी 1 वा वेबसाईटवर निकाल :
  • मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल आज  30 मे 2018 रोजी दुपारी 1 वा जाहीर होणार आहे. बोर्डाच्या www.mahresult.nic.in  वेबसाईटवर हा निकाल जाहीर होईल.

  • बोर्ड 5 वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल.

  • www.mahresult.nic.in, www.result.mkcl.org, www.maharashtraeducation.com, www.knowyourresult.com, www.hscresult.mkcl.org आज  वेबसाईटवर निकाल पाहता येईल तसंच गुणपत्रिका डाऊनलोडही करता येईल.

  •  बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल - विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण वेबसाईटवर उपलब्ध होतील आणि त्याची प्रिंट आऊट घेता येईल.ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल.

  • पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या विभागात बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

दिग्विजय सिंह-गडकरींची कोर्टातली लढाई अखेर सामंजस्याने संपली :
  • नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यातली कोर्टातली लढाई अखेर सामंजस्याने संपली. गडकरींनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी माफी मागितली आणि दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टातलं हे प्रकरण संपवण्यात आलं.

  • कोर्टात दिग्विजय सिंह यांची भाषा बदललेली दिसून आली. नितीन गडकरी आणि खासदार अजय संचेती यांच्याबद्दलचं वक्तव्य राजकीय गरमागरमीत केलेलं होतं. त्यात काही तथ्य नाही, असं दिग्विजय सिंह यांच्याकडून कोर्टात सांगण्यात आलं.

  • काय आहे प्रकरण - गडकरी यांचे त्यांच्याच पक्षाचे खासदार अजय संचेती यांच्याशी व्यावसायिक संबंध आहेत. त्या माध्यमातूनच कोळसा खाण वाटपात हितसंबंध जपले गेले आणि 490 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा दिग्विजय सिंह यांनी आरोप केला होता.

  • नितीन गडकरींवर 2012 च्या दरम्यान हे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर नितीन गडकरींनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला. केस संपवण्यासाठी पटियाला हाऊस कोर्टात याबाबत नंतर दोन्ही पक्षांनी जॉईंट अॅप्लिकेशन केलं होतं. कोर्टाने ही मागणी मान्य केली.

रघुराम राजन विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी होणार :
  • मुंबई: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एका कार्यक्रमाचं आमंत्रण दिलंय. या आमंत्रणाची जोरदार चर्चा असतानाच आता विश्व हिंदू परिषदेनं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर यांना वर्ल्ड हिंदू काँग्रेस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलंय. यंदा शिकागोत वर्ल्ड हिंदू काँग्रेसचं आयोजन करण्यात येणाराय. यासाठी राजन यांना आमंत्रित करण्यात आलंय. 

  • चार वर्षातून एकदा आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत, तिबेटी धर्मगुरु दलाई लामा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गियर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  • जगभरातील हिंदूंना सन्मान मिळावा, त्यांची प्रतिष्ठा वाढावी, या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणाराय. शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी ऐतिहासिक भाषण केलं होतं. या भाषणाला 125 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान वर्ल्ड हिंदू काँग्रेसचं आयोजन करण्यात येणाराय.

  • रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर असलेल्या रघुराम राजन यांनी वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये सहभागी होऊन त्यांचे विचार मांडावेत, असं आयोजकांना वाटतं. त्यामुळेच त्यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलंय. मात्र या कार्यक्रमातील राजन यांचा सहभाग अनिश्चित मानला जातोय. कार्यक्रमात सहभागी होणार की नाही, याबद्दल राजन यांनी आयोजकांना कोणतीही माहिती दिलेली नाही. राजन आमंत्रण स्विकारतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय. 

'या' ठिकाणी मिळतंय देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल :
  • मुंबई: देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलच्या दरानं 80 रुपयांचा टप्पा ओलांडलाय. मुंबईत तर आज पेट्रोल प्रति लिटर 86.24 रुपयांवर जाऊन पोहोचलंय. जयपूर, कोलकाता, श्रीनगर, भोपाळ या शहरांमध्येही पेट्रोलचे दर वाढल्यानं सामान्य जनता त्रस्त झालीय. मात्र अंदमान आणि निकोबार बेटांवर पेट्रोल 67.55 प्रति लिटर रुपयांना मिळतंय. तर डिझेलसाठी 64.80 रुपये मोजावे लागताहेत. संपूर्ण देशात इतकं स्वस्त पेट्रोल आणि डिझेल इतर कुठेही मिळत नाहीय.

  • देशातील राज्यं पेट्रोल, डिझेलवर मोठ्या प्रमाणात व्हॅट लावतात. त्यामुळे इंधन दरात मोठी वाढ होते. मात्र अंदमान निरोबारमध्ये पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट फक्त 6 टक्के इतका आहे. त्यामुळेच या ठिकाणी पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळतं.

  • स्वस्त इंधन दराचा विचार केल्यास अंदमान निकोबारनंतर गोव्याचा क्रमांक लागतो. गोव्यात पेट्रोल, डिझेलवर 16.62 टक्के व्हॅट आहे. त्यामुळे आज गोव्यात पेट्रोलचा दर 72.31 रुपये इतका आहे. तर डिझेलसाठी गोव्यात 70.58 रुपये मोजावे लागत आहेत. 

  • देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मुंबईत मिळतंय. आज मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 86.24 रुपये इतका आहे. राज्य सरकारनं पेट्रोलवर तब्बल 39.78 टक्के व्हॅट लावला आहे. सध्या आसाम, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, केरळ, जम्मू कश्मीर, आंध्र प्रदेश, पंजाब, बिहार आणि मध्य प्रदेशात पेट्रोलचा दर 80 रुपयांहून अधिक आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला इंडोनेशिया दौरा, विविध उद्योगकरार संपन्न होण्याची शक्यता
  • जाकार्ता- पंतप्रधानपदी आल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच इंडोनेशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. आज ते इंडोनेशियासह तीन देशांच्या दौऱ्यासाठी नवी दिल्ली येथून रवाना झाले आहेत. इंडोनेशिया दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सागरी सहाय्य, व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.

  • आज मंगळवारी संध्याकाळी त्यांचे जाकार्ता येथए आगमन होईल. हा दौरा तीन दिवसांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीत इंडोनेशियातील भारतीय समुदायालाही भेटून संबोधित करतील.

  • जाकार्ता येथे उतरल्यावर बुधवारी नरेंद्र मोदी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांची भेट घेतील असे भारताचे इंडोनेशियातील राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी सांगितले आहे.

  • इंडोनेशियन चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या उद्योजकांची बैठक, भारतीय उद्योगांसह विविध बैठकांमध्ये नरेंद्र मोदी आणि जोको विडोडो सहभागी होतील. दोन्ही देशांमध्ये उद्योगक्षेत्रात स्नेहपूर्ण संबंध वृद्धींगत होण्यासाठी दोन्ही नेते प्रयत्न करतील.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६३१: पहिले फ्रेंच वृत्तपत्र गॅझेट डी फ्रान्सचे प्रकाशन झाले.

  • १९३४: मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.

  • १९७४: एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.

  • १९७५: युरोपियन स्पेस एजंसीची स्थापना झाली.

  • १९८७: गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.

  • १९९३: पु. ल. देशपांडे यांना त्रिदल’ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

जन्म

  • १८९४: इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै १९६९)

  • १९१६: अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी १९७१ – मुंबई)

  • १९५०: अभिनेते परेश रावल यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९१२: आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८६७)

  • १९४१: थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १८९३)

  • १९५०: प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचे निधन.

  • १९५५: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: ५ जून१८७९)

  • १९८१: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या. (जन्म: १९ जानेवारी १९३६)

  • २००७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.