चालू घडामोडी ३० नोव्हेंबर २०१८

Date : 30 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांच्याबरोबरील बैठक केली रद्द :
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर जी-२० शिखर परिषदेदरम्यान होणारी पूर्वनियोजित बैठक रद्द केली आहे. रशियाने युक्रेनचे जहाज आणि नाविकांना मुक्त न केल्यामुळे ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे.

  • ट्रम्प यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. रशियाने युक्रेनला जहाजे आणि नाविकांना मुक्त केलेले नाही. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर होणारी पूर्वनियोजित बैठक रद्द होणे चांगले राहील, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • ट्रम्प यांनी आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हटले की, जर ही समस्या सोडवली तर मी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची परिषदेत भेट घेईन. दरम्यान, काही वेळापूर्वी ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधून बाहेर पडताना माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी शिखर परिषदेत पुतीन यांची भेट घेण्याची सर्वांत चांगली वेळ असल्याचे म्हटले होते. कदाचित मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेऊ शकतो. मी ती बैठक रद्द केलेली नाही. मी असा विचार करत होतो. पण मी असे केलेले नाही. मला वाटते बैठकीसाठी ही चांगली वेळ आहे.

  • अर्जेंटिनाला डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान उड्डाण करण्याच्या काही क्षण आधी व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी सारा सँडर्स यांनी ही बैठक रद्द झाल्याचे सांगितले. या आठवड्याच्या अखेरीस ब्यूनस आयर्स येथे जी-२० शिखर परिषदेत पुतीन यांना भेटण्याचे ट्रम्प यांचे नियोजन होते.

दुबई-मुंबई दरम्यान समुद्राखालून धावणार रेल्वे :
  • हायपरलूप आणि चालकविरहित उडणाऱ्या कारनंतर संयुक्त अरब अमिरात (यूएई) आता आणखी एका महत्वकांक्षी प्रकल्पाचा विचार करत आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प भारताशी निगडीत आहे. नजीकच्या काळात दुबई आणि मुंबईदरम्यान समुद्रातील पाण्याखालून रेल्वे धावू शकते.

  • ‘खलीज टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, अबुधाबी येथे यूएई-भारत कॉनक्लेव दरम्यान नॅशनल अॅडव्हायजर ब्यूरो लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य सल्लागार अब्दुल्ला अलशेही यांनी याचा खुलासा केला आहे. अलशेही कन्सल्टंट कंपनी नॅशनल अॅडव्हायजर ब्यूरो लि.ची संस्थापक आहे. त्यांनी म्हटले की, पाण्याखालील रेल्वेच्या जाळ्याचा फायदा यूएई-भारताशिवाय दुसऱ्या देशांनाही फायदा होईल. प्रवाशांशिवाय इंधन आणि इतर साहित्यांच्या आयात-निर्यातीसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

  • सध्या याबाबत फक्त विचार सुरु आहे.  मुंबई शहराला पाण्याखालून रेल्वे सेवेने जोडण्याची आमची इच्छा आहे. यामुळे द्विपक्षीय व्यवसायाला चालनाही मिळेल. भारताला तेल निर्यात करता येईल त्याचबरोबर नर्मदा नदीतून अतिरिक्त पाणी आयात केली जाईल, असे ते म्हणाले.

  • या योजनेवर विविध दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे. या प्रकल्पासाठी अभ्यास केला जाईल. जर हे वास्तवात आणता आले तर पाण्याखालून सुमारे २००० किमीच रेल्वे जाळे उभारले जाईल. जगात सध्या अशा पद्धतीचे अनेक प्रकल्प पाइपलाइनमधून कार्यान्वित आहेत. चीन, रशिया, कॅनाडा आणि अमेरिका देश यावर विचार करत आहेत. भारतात मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पावर काम सुरु आहे. यात समुद्राखालूनही बुलेट ट्रेन जाणार आहे.

कार्लसन चौथ्यांदा जगज्जेता :
  • जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या आव्हानवीर फॅबियानो करुआनावर जलदगती डावात ३-० अशी मात करून जगज्जेतेपदाला गवसणी घातली. यासह कार्लसनने सलग चौथ्यांदा जगज्जेतेपद पटकावण्याची किमया केली. पराभवामुळे मात्र बॉबी फिशर यांच्यानंतर (१९७२) अमेरिकेचा पहिला जगज्जेता होण्याची करुआनाची संधी हुकली.

  • क्लासिकल लढतीतील १२ डाव बरोबरीत सुटल्यानंतर जलद प्रकाराच्या ‘टाय-ब्रेकर’मध्ये सामन्याचा निकाल लागला. १२ डावांत एकही विजय नसणे, हासुद्धा एक विक्रम ठरला. मात्र जलद बुद्धिबळमध्ये वरचढ समजल्या जाणाऱ्या कार्लसनने ‘टाय-ब्रेकर’वर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. पहिले तिन्ही डाव जिंकल्यामुळे चौथा डाव खेळवण्याची गरज भासली नाही. कार्लसनने पहिल्या तिन्ही डावांत बाजी मारत बुद्धिबळातील सर्वात प्रतिष्ठेच्या विजेतेपदावर नाव कोरले.

  • अतिशय अटीतटीच्या रंगलेल्या पहिल्या डावात कार्लसनने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत विजयश्री खेचून आणली. दुसऱ्या डावात मात्र करुआनावरील दबाव वाढला. आक्रमक खेळ करतानाच करुआनाला दुसऱ्या डावातही पराभव पत्करावा लागला.

  • पहिले दोन डाव जिंकल्यामुळे कार्लसनला पुढील दोन डावांत फक्त एका बरोबरीची आवश्यकता होती. पण आत्मविश्वास खचलेल्या करुआनाला तिसऱ्या डावातही खेळ उंचावता आला नाही. कार्लसनने तिसरा डावही जिंकून जगज्जेतेपद कायम राखले.

इस्रोची गगनभरारी ! भारताच्या 'हायसिस'सह ८ देशांच्या ३० उपग्रहांचे महाउड्डाण :
  • आंध्र प्रदेश - अंतराळ विश्वात भारतानं नवी भरारी घेतली आहे. श्रीहरिकोटा येथून इस्त्रोकडून आज 'पीएसएलव्ही सी 43' अंतराळ यानाच्या मदतीनं तब्बल 30 उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात झेपावले आहेत.

  • पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या हायसिस या भारतीय उपग्रहासहीत 8 देशांच्या 30 उपग्रहांचा यामध्ये समावेश आहे. 30 पैकी 23 उपग्रह हे एकट्या अमेरिकेचे होते. याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलँड, मलेशिया, नेदरलँड आणि स्पेन यांच्या प्रत्येकी एक-एक उपग्रहाचा समावेश आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी 43चे गुरुवारी.

  •  

  • पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणाऱ्या हायसिसच्या मदतीने जमीन, पाणी, वनस्पती आणि अन्य गोष्टींची माहिती मिळवता येणार आहे. प्रदुषणाची माहिती देण्यामध्ये या उपग्रहाची सर्वाधिक मदत होईल. या उपग्रहाचं वजन 380 किलो एवढे आहे.  

  • दरम्यान, पीएसएलव्हीचे हे 45 वे उड्डाण आहे. एकाचवेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम इस्त्रोच्या नावावर आहे. इस्त्रोने 15 फेब्रुवारी 2017 रोजी सर्वाधिक 104 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते.

आता रोबो बॉम्ब शोधणार; पोलिसांना मोलाची मदत करणार :
  • बीडीडीएस) तीन अत्याधुनिक रोबो दाखल झाले आहेत. त्यामुळे बीडीडीएस पथकात आधुनिकीकरणामुळे बॉम्ब शोधताना होणारी मनुष्यहानीला छाप बसू शकणार आहे. बॉम्ब शोधून तो निष्क्रीय करणारा आधुनिक पद्धतीने तयार केलेला रोबोट दाखल करण्यात आले आहेत.

  • मिनी रिमोटली ऑपरेटेड व्हेहिकल (एमआरओवी) असं या रोबोचं नाव असून त्याची किंमत ८४ लाख इतकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई पोलिसांकडून या रोबोटची मागणी करण्यात येत होती. हा रोबोट भारतातच बनवण्यात आला आहे. 

  • गेल्या काही वर्षात मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात मुंबईची खूप मोठी हानी झाली. यामध्ये त्यांनी ठिकठिकाणी विशेषतः लोकल ट्रेन्समध्ये आरडीएक्स बॉम्ब पेरले होते. अशा प्रसंगी पुढील धोका टाळण्यासाठी बॉम्ब निष्क्रीय करण्याकरीत बीडीडीएस पथक घटनास्थळी धाव घेते. यात मनुष्यहानी होण्याची मोठी शक्यता असते. मात्र, आता या रोबोटमुळे मुंबई पोलिसांची ताकद अधिक वाढली आहे. महत्वाचं म्हणजे हा रोबो पावसाळ्यात देखील आपली भूमिका बजावणारा आहे. 

  • भारतात तयार झालेल्या या रोबोटची किंमत जवळपास ८४ लाख रुपये इतकी असून या यंत्राचे वजन साधारण १०० किलोच्या आसपास आहे. पावसाळ्यातही अगदी योग्य पद्धतीने हा रोबोट काम करण्याच्या क्षमतेचा आहे. ४५ डिग्रीमध्ये उंच पर्वत, विमानाच्या शिड्या, रेल्वे स्थानकाच्या शिड्या अगदी सहज चढू शकणार आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. हा रोबोट रिमोटच्या सहाय्याने चालणार असून बॉम्ब निष्क्रीय करताना मानवहानी होणार नाही, हे या रोबोट आणण्यामागे मुख्य उद्दीष्ट आहे. 

महाराष्ट्रातील पहिली अांतर साेसायटी अाशियाना करंडक एकांकिका स्पर्धा यंदा जानेवारीत :
  • पुणे : महाराष्ट्रातील पहिली अांतर साेसायटी अाशियाना करंडक एकांकिका स्पर्धा यंदा जानेवारीत हाेणार अाहे. 30 साेसायट्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार असून प्रथम तीन सांघिक विजेत्यांना राेख पारिताेषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार अाहेत. विशेष म्हणजे अांतर साेसायटी हाेणारी अाशियाना करंडक एकांकिका स्पर्धा ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा अाहे. 

  • 2014 साली अाशियांना करंडकाच्या माध्यमातून एक अनाेखं पाऊल उचललं गेलं. सर्व लहानथाेरांना एकत्र अाणण्याच्या उद्देशाने अाशियांना करंडक अांतर साेसायटी एकांकिका स्पर्धा सुरु करण्यात अाली. सर्वांना कलेच्या माध्यमातून एकत्र अाणावं, त्या माध्यामतून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव द्यावा अाणि त्यायाेगे दैनंदिन व्यवहारातल्या ताणतणांवापासून मुक्त करावं, या उद्देशाने रश्मिता शहापूरकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा सुरु झाली.  

  • हा उपक्रम यशस्वीरित्या साकार करण्यासाठी प्रियांका वैद्य, प्रतिक्षा जाधव, पायल गाेडबाेले, वैशाली कन्नमवार यांचे माेलाचे सहकार्य लाभले अाहे. पहिल्या वर्षी 17 प्रवेशिका या स्पर्धेसाठी अाल्या. गेल्या वर्षी हा अाकडा 30 पर्यंत गेला. या स्पर्धेच्या प्राथमिक तयारीपासून संपूर्ण अायाेजन महिलाच करतात, हे या स्पर्धेचं अाणखी एक वैशिष्ट अाहे. 

नासाचे 'इनसाईट' मंगळावर लॅन्ड, काय आहेत वैशिष्ट्ये :

मुंबई : नासाचे इनसाईट (इंटेरिअर एक्सप्लोरेशन युझिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन) यान मंगळ ग्रहावर उतरले. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळावर उतरले. नासाकडून याचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. मंगळ ग्रहावरील रहस्य जाणून घेण्यासाठी हे यान बनवण्यात आले आहे. ग्रहाच्या पृष्ठभागावर यान उतरताना १९८०० किमी प्रति तास वेगाने जाणारे हे यान अवघ्या सहा मिनिटात शून्य वेगावर आले. त्यानंतर यान पॅराशूटमधून बाहेर आले आणि लँड झाले. दरम्यान, इनसाईटने मंगळ ग्रहावरुन आपले पहिले छायाचित्रही पाठवले आहे.

नासाच्या इनसाईट यानाची वैशिष्ट्ये

  • पूर्ण नाव - इंटेरिअर एक्सप्लोरेशन युझिंग सिस्मिक इन्व्हेस्टिगेशन

  • वजन - 358 किलोग्रॅम

  • मिशनसाठी तब्बल 7 हजार कोटींचा खर्च

  • सौर उर्जा आणि बॅटरीद्वारे वीजपुरवठा

  • .मंगळावर 26 महिन्यांपर्यंत काम करु शकतो

  • या मिशनमध्ये अमेरिका, जर्मनी, फ्रान्ससह 10 देशांचे शास्त्रज्ञ सहभागी

  • इनसाईटमध्ये सिस्मोमीटर यानच मुख्य उपकरण आहे.

  • इनसाईट यानाद्वारे मंगळावरील भूकंपांची नोंद होणार

  • सेल्फ हॅमरिंगद्वारे मंगळावर खोदकाम करुन मंगळावरील उष्णतेची नोंद घेणार

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८७२: हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.

  • १९१७: कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना.

  • १९६१: १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगत्ये ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.

  • १९६६: बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९९६: ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.

  • १९९८: एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.

  • २०००: पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.

जन्म 

  • १६०२: जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे १६८६)

  • १७६१: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८१५)

  • १८३५: विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९१०)

  • १८५८: भारतीय वनस्पती शास्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९३७)

  • १८७४: ब्रिटनचे माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९६५)

  • १९१०: गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा खावार्डे, गोवा येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै१९८४)

  • १९३५: मराठी लेखक आनंद यादव यांचा जन्म.

  • १९६७: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१०)

मृत्यू 

  • १९००: सुप्रसिद्ध लेखक कवी आणि नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८५४)

  • १९७०: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८८३)

  • १९८९: कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष अहमदिऊ आहिदो यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९२४)

  • १९९५: साहित्यिक वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९१४)

  • २०१०: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९६७)

  • २०१२: भारताचे १२ वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१९)

  • २०१४: अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री जर्बोम गॅमलिन यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १९६१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.