चालू घडामोडी - ३० सप्टेंबर २०१७

Date : 30 September, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सुरक्षित रेल्वे प्रवसासाठी आता 'इस्रो'ची मदत :
  • रेल्वे अपघाताच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून रेल्वे सुरक्षेसाठी रेल्वे मंत्रालय आता इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोची मदत घेणार आहे.

  • रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये माहिती दिली आहे, गेल्या काही महिन्यात अनेक रेल्वे अपघात झाले, या अपघातांची नैतिक जबाबदारी घेत सुरेश प्रभूंनी रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.

  • मात्र त्यांची पदावरुनच उचलबांगडी करत त्यांना वाणिज्य मंत्रिपदी नियुक्त करण्यात आले आणि पियुष गोयल यांची रेल्वेमंत्रिपदी निवड झाली. मात्र रेल्वे अपघातांच्या घटना बंद झाल्या नाहीत.

  • “रेल्वे सुरक्षेसंदर्भातल इस्रोच्या अध्यक्षांसोबतची चर्चा डोळे उघडणारी चर्चा होती, अनेक गोष्टींमध्ये काय उपयोजना करु शकतो आणि त्यासाठी अवकाश तंत्रज्ञानाची कशी मदत होऊ शकते, याबाबत मीही उत्सुक आहे.

  • रेल्वे प्रवास सुखकर करण्यासाठी इस्रोच्या विकसित अवकाश तंत्रज्ञानाच्या मदत होईल.”, असेही पियुष गोयल यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव भारताला महागात पडला
  • बंगळुरुच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने भारताला २१ धावांनी पराभूत केल्यामुळे भारतीय संघाची क्रमवारीत घसरण झाली असून दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा अव्वलस्थानी विराजमान झाला असून भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

  • ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सलग तीन विजयानंतर आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत मिळवलेले अव्वल स्थान भारताने गमावले आहे.

  • सध्याच्या घडीला भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांना प्रत्येकी १९ गुण असून दोन्ही संघात अवघ्या काही पॉईंट्सचा फरक असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. 

  • दक्षिण आफ्रिकेने ५० सामन्यात ५८२८ पॉईंट्ससह ११९ गुण मिळवले आहेत. तर भारत ५१ सामन्यात ५८७९ पॉईंट्स मिळवून ११९ गुण प्राप्त केले असून मालिका खिशात घालूनही अखेरचा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.

महिला क्रिकेटपटूंना आर्थिक बक्षिसे मंत्रालयाकडून २३ जणांचा सन्मान :
  • रिओ ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या तीन स्पर्धामधील उल्लेखनीय खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्यातील सहभागी खेळाडू अशा एकूण २३ जणांचा राज्य सरकारतर्फे गुरुवारी रोख पारितोषिके देऊन शानदार सत्कार करण्यात आला.

  • सह्याद्री अतिथिगृह येथे क्रीडामंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला असून या सत्कारामुळे अन्य खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

  • रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक (५० लाख), तिचे मार्गदर्शक कुलदीप सिंग (२५ लाख), अ‍ॅथलेटिक्सपटू ललिता बाबर (७५ लाख), तिचे मार्गदर्शक भास्कर भोसले (२५ लाख), नौकानयनपटू दत्तू भोकनळ (५० लाख), हॉकीपटू देविंदर वाल्मीकी (५० लाख), मॅराथॉनपटू कविता राऊत (५० लाख), नेमबाज आयोनिका पॉल (५० लाख), टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे (५० लाख) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रिओ येथे झालेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू उंचउडीपटू मरियप्पन थंगावेलू (एक कोटी), त्याचे मार्गदर्शक सत्यनारायण (२५ लाख), भालाफेकपटू देवेंद्र झझारिया (एक कोटी), त्याचे मार्गदर्शक सुनील तन्वर (२५ लाख), गोळाफेकपटू दीपा मलिक (७५ लाख), तिचे मार्गदर्शक वैभव सरोही (१८.७५ लाख), उंचउडीपटू वरुण भाटी (५० लाख), त्याचे मार्गदर्शक सत्यनारायणा (१२.५० लाख), जलतरणपटू सुयश जाधव (५० लाख) यांचाही रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेमध्ये भारतीय संघाने उपविजेतेपद मिळवले.

बँकेच्या नियमात १ ऑक्टोबरपासून होणार महत्त्वपूर्ण बदल :
  • देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकांचे चेक ३० सप्टेंबर २०१७ पासून स्वीकारले जाणार नाहीत.  

  • स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक आणि त्रवणकोर या एसबीआयच्या सहयोगी बँका आहेत.

  • १ ऑक्टोबरपासून अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार असून याचा परिणाम थेट सामान्य माणसाच्या जीवनावर होणार आहे, १ ऑक्टोबरपासून स्टेट बँक ऑफ इंडियाचे नियम, मोबाईल कॉलचे दर यांमध्येदेखील बदल होणार आहेत.

  • १ ऑक्टोबरपासून मोबाईल कॉलचे दरदेखील कमी होण्याची शक्यता आहे, ट्रायकडून इंटरकनेक्शन चार्जेस कमी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आल्याने कॉल दर कमी होऊ शकतात.

  • ट्रायने इंटरकनेक्शन चार्जेस १४ पैशांवरुन ६ पैशांवर आणले असून याचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो, यासोबतच १ ऑक्टोबरपासून दुकानदारांना कोणतीही वस्तू जुन्या एमआरपीनुसार विकता येणार नाही.

  • ३० सप्टेंबरपर्यंत जुने सामान विकण्याची परवानगी दुकानदारांना देण्यात आली असून यानंतर एखाद्या दुकानदाराने जुन्या एमआरपीनुसार सामानाची विक्री केल्यास त्याविरोधात कारवाई होऊ शकते.

पिंपरी-चिंचवड पाचव्या स्थानी देशातील सुयोग्य शहरांच्या यादीत :
  • स्मार्ट सिटी आणि स्वच्छता भारत अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या बिरुदावलीत आणखी एक भर पडली आहे.

  • प्रॉपर्टी कन्सल्टंट असलेल्या एका खासगी संस्थेने देशातील जगण्यासाठी सुयोग्य शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा पाचवा क्रमांक आला आहे.

  • गेल्या ३० वर्षांत येथील लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली असून झपाट्याने वाढणा-या लोकसंख्येमुळे देशातील अनेक शहरे भकास झाली आहेत, हे सर्व घडत असताना दुसरीकडे मात्र, काही शहरांचे नियोजन अतिशय योग्यरीत्या झाल्याचे दिसत आहे.

  • त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेने देशातील सुनियोजित अशा शहरांची एक स्पर्धा घेतली होती, जगण्यासाठी सुयोग्य शहरांच्या या स्पर्धेत १० निकष ठेवले होते.

  • त्यात नियोजन, दळणवळण सुविधा, मूलभूत सुविधांचे प्रमाण, दैनंदिन गरजा, विश्रांती व मनोरंजन, स्मार्ट प्रशासन, सुरक्षितता व निर्भयता, नोकरीच्या संधी, पर्यावरण व शाश्वत विकास, बांधकाम क्षेत्राची कामगिरी, भविष्याचा विस्तार, दृष्टिकोन हे निकष ठेवण्यात आले होते.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन

  • स्वांतंत्र्य दिन - बोत्स्वाना

जन्म /वाढदिवस

  • प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार : ३० सप्टेंबर १९३३

  • शान, भारतीय संगीतकार : ३० सप्टेंबर १९६२

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

  • रुडॉल्फ डीझेल, जर्मन संशोधक : ३० सप्टेंबर १९१३

  • गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक : ३० सप्टेंबर १९९२

ठळक घटना

  • लीग ऑफ नेशन्सने मुद्दामहून नागरिकी वस्तीवर बॉम्बफेक करणे बेकायदा ठरवले : ३० सप्टेंबर १९३५

  • पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश​ : ३० सप्टेंबर १९४७

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.